..बाकी खरंच काही नाही

पद्मश्री चित्रे's picture
पद्मश्री चित्रे in जे न देखे रवी...
3 Oct 2008 - 9:47 am

तुझी आठवण मला आता ,मुळी सुद्धा येत नाही
उगीच डोळे भरुन येतात, बाकी खरंच काही नाही..
फूल बघुन मला आता कुणी सुद्धा आठवत नाही
हळुच नजर वळवते मी, बाकी खरंच काही नाही....
चिम्ब पाउस आला की आपली भेट आठवत नाही
भिजणं मात्र टाळते मी ,बाकी खरंच काही नाही...
पहाट जेव्हा सरत असते ,तुझं स्वप्न पडत नाही
झोप मात्र निघुन जाते ,बाकी खरंच काही नाही...
एकटं एकटं वाटतं पण ,तू मुळीच आठवत नाहिस
विसरलेच नाही तुला मी ,बाकी खरंच काही नाही...

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

3 Oct 2008 - 10:08 am | आनंदयात्री

कुणीतरी आठवण काढतय बाकी काही नाही .. या कवितेची आठवण झाली !

चिम्ब पाउस आला की आपली भेट आठवत नाही
भिजणं मात्र टाळते मी ,बाकी खरंच काही नाही...

मस्त !!
छान जमलिये !!

टुकुल's picture

3 Oct 2008 - 10:21 am | टुकुल

बर्‍याच आठवणी जाग्या झाल्या.

मदनबाण's picture

3 Oct 2008 - 10:21 am | मदनबाण

पहाट जेव्हा सरत असते ,तुझं स्वप्न पडत नाही
झोप मात्र निघुन जाते ,बाकी खरंच काही नाही...
छान...

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

मनस्वी's picture

3 Oct 2008 - 10:22 am | मनस्वी

छान कविता!

मनस्वी
*डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*

मनिष's picture

3 Oct 2008 - 10:29 am | मनिष

नेहमीसारखीच सुरेख कविता! बाकी जेष्ठ कवी आनंदयात्रीजी यांच्याशी सहमत! ;)

- मनिष
(खुद के साथ बातां - आंद्याचा कवितांचा अभ्यास सॉलीड दिसतोय, हे कशाचे लक्षण आहे हे मला अनुभवाने माहिती आहे! ;))

फटू's picture

3 Oct 2008 - 11:09 am | फटू

चिम्ब पाउस आला की आपली भेट आठवत नाही
भिजणं मात्र टाळते मी ,बाकी खरंच काही नाही...

आजच इथे कॅलिफोर्नियात पावसाचा हलकासा शिडकावा झाला... थोडासा "आठवणी" मोडमध्ये होतो... आणि आता या इतक्या हळुवार ओळी... काही खरं नाही आमचं ...

सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

मनीषा's picture

3 Oct 2008 - 11:09 am | मनीषा

सुंदर कविता .

जयवी's picture

3 Oct 2008 - 2:47 pm | जयवी

खूप खूप छान्.....अगदी रेंगाळणारी कविता :)

ऋषिकेश's picture

3 Oct 2008 - 2:54 pm | ऋषिकेश

छान कविता!

पहाट जेव्हा सरत असते ,तुझं स्वप्न पडत नाही
झोप मात्र निघुन जाते ,बाकी खरंच काही नाही...

हे तर लई भारी.

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

राघव's picture

3 Oct 2008 - 3:33 pm | राघव

सहमत आहे.
सुंदर कविता, नेहमीप्रमाणेच :) शुभेच्छा!
मुमुक्षु

अनिल हटेला's picture

3 Oct 2008 - 5:43 pm | अनिल हटेला

नेहेमी प्रमाणे सुंदर कविता !!!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

प्रभाकर पेठकर's picture

3 Oct 2008 - 5:50 pm | प्रभाकर पेठकर

उगीच जुन्या आठवणी चाळवल्या, गंध त्यात उरला नाही,
विसरू म्हणता विसरत नाही, बाकी काही नाही....

अभिनंदन.

तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..

नारदाचार्य's picture

3 Oct 2008 - 5:59 pm | नारदाचार्य

कविता. आवडली.

शितल's picture

3 Oct 2008 - 6:01 pm | शितल

फुलवा,
नेहमी प्रमाणे तु़झ्या कडुन एक सुंदर काव्य रचना वाचायला मिळाली
संपुर्ण कविताच आवडली.
:)

बेसनलाडू's picture

3 Oct 2008 - 11:07 pm | बेसनलाडू

फार आवडली.
चिम्ब पाउस आला की आपली भेट आठवत नाही
भिजणं मात्र टाळते मी ,बाकी खरंच काही नाही...

हे सगळ्यात खास!
(आस्वादक)बेसनलाडू

भाग्यश्री's picture

3 Oct 2008 - 11:14 pm | भाग्यश्री

खूप सुंदर.. :)

यशोधरा's picture

3 Oct 2008 - 11:17 pm | यशोधरा

छान लिहिलेस फुलवा...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Oct 2008 - 11:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली.

'तु' 'मी' च्या तरल भावना मस्तच !!!

प्राजु's picture

4 Oct 2008 - 12:03 am | प्राजु

फुलवा,
कविता मनात रेंगाळत राहिली..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चन्द्रशेखर गोखले's picture

4 Oct 2008 - 1:10 pm | चन्द्रशेखर गोखले

काय सागु तुला आता, ओठावर शब्द येत नाहित
डोळे माझे पाणावले, बाकी खरच काही नाही....

चन्द्रशेखर गोखले

पिवळा डांबिस's picture

4 Oct 2008 - 11:27 pm | पिवळा डांबिस

दुसर्‍याला प्रेरणा देणारी कविता....

पद्मश्री चित्रे's picture

4 Oct 2008 - 11:49 pm | पद्मश्री चित्रे

सर्वांचे मनःपुर्वक आभार.