अरे `देवा'!

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
2 Oct 2008 - 9:55 pm

वाढदिवस म्हणजे बुद्धीत वाढ आणि आयुष्यातील कालावधीत घट होण्याचा दिवस, असं म्हणतात. काही जण मात्र त्याला अपवाद असतात. ते स्वतःला चिरतरुण म्हणवून घेतात आणि म्हातारपणी पोरकटपणा करायला मोकळे होतात. त्यामुळं त्यांचे वाढदिवस जवळ आले, की छातीत धस्स होतं. अंगाला दरदरून घाम फुटतो आणि घशाला कोरड पडते. पुन्हा कुठला तरी नवा संकल्प जाहीर करून आपल्या माथी मारणार की काय, असा झोप उडवणारा प्रश्‍न सतावू लागतो.
यंदाही असंच झालं...एव्हरग्रीन, चिरतरुण, चॉकलेट हीरो म्हणवणाऱ्या आणि अवघे 85 वयोमान असलेल्या एकेकाळच्या समस्त चित्रपटरसिकहृदयसम्राटाचा वाढदिवस होता. गेली अनेक वर्षे हा माणूस सातत्यानं काहीतरी संकल्प जाहीर करत आला आहे...अर्थातच, नवनवीन चित्रपटांचे! भन्नाट स्टाइल आणि सहज अभिनयाच्या जोरावर या माणसानं पन्नास-साठच्या दशकात एक-दोन पिढ्या वेड्या करून टाकल्या असतील. आयुष्यभर संचित असल्यासारखी वाटणारी आणि कधीही, कुठल्याही प्रसंगी मनाला उभारी देणारी, आठवणी जागवणारी गाणी पडद्यावर प्रसन्न करून टाकली असतील. पण त्यानंतर काय?
प्रसिद्धीच्या, यशाच्या शिखरावर असताना तिथून माघारी वळणं याला सर्वांत हुशार माणूस म्हणतात. अनेकांना तेच जमत नाही. आपलं तारुण्य, प्रसिद्धी, लोकप्रियता लोप पावत चाललेली डोळ्यांना धडधडीतपणे दिसत असताना ते सत्य स्वीकारायला तयार नसतात. मग त्यातून सुरू होते त्यांची प्रसिद्धिवलयात राहण्याची केविलवाणी धडपड.
आमच्या या "एव्हरग्रीन' हीरोनं गेली वीस-पंचवीस वर्षे हेच उद्योग चालवले आहेत. त्यांच्या चित्रपटांना चित्रपट तरी का म्हणावं, असा प्रश्‍न कुठल्याही रसिकाला पडावा. अगदी एक-दोन चांगल्या चित्रपटांचा अपवाद सोडला, तर गॅंगस्टर, सेन्सॉर, लव्ह ऍट टाइम्स स्क्वेअर, प्राइम मिनिस्टर, मैं सोलह बरस की, हे त्यांनी स्वतः निर्मित, दिग्दर्शित केलेले चित्रपट अनेकांना माहीतही नसतील. माहीत असण्याचं कारणही नाही. अत्यंत दुर्मिळ अशा चित्रपटांत (म्हणजे कुणीच न पाहिलेल्या) त्यांची गणना होते.
...तरीही हा माणूस गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. दर वर्षीच्या वाढदिवसाला नव्या चित्रपटांचे संकल्प जाहीर करतो आहे. यंदाही केला. सध्या ते 85 वर्षांचे आहेत. त्यांना दीर्घायुष्य आणि (नवे चित्रपट न काढण्याची सद्‌बुद्धी) लाभो, ही परमेश्‍वराकडे प्रार्थना!
--------

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

प्राजु's picture

2 Oct 2008 - 10:24 pm | प्राजु

देव रे 'देवा'.. तुझ्या 'आनंदा' मध्ये चित्रपट रसिकांना नको पणाला लावू असं सांगावंसं वाटतं..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Oct 2008 - 10:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्राजू मस्त प्रतिक्रिया ...

खरं आहे, पण देवानंदनी पिच्चर काढला काय आणि नाही काय, कुठे फरक पडतो कुणाला? हसायला एक नवा मुद्दा मिळतो हे बाकी विसरू नका! ;-)

सुचेल तसं's picture

2 Oct 2008 - 11:08 pm | सुचेल तसं

बर्‍याचशा हिरोंचं असं होतं खरं....

ह्याबाबत अमरिश पुरींना मानायला हवं... शेवटपर्यंत काम करत राहिले पण अतिशय वैविध्यपूर्ण भूमिका केल्या त्यांनी...

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

अनिल हटेला's picture

3 Oct 2008 - 8:45 am | अनिल हटेला

>>ह्याबाबत अमरिश पुरींना मानायला हवं... शेवटपर्यंत काम करत राहिले पण अतिशय वैविध्यपूर्ण भूमिका केल्या त्यांनी...

बरोब्बर !!!
आणी देव आनंद बद्दल न बोललेल च बर !!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

विसोबा खेचर's picture

3 Oct 2008 - 9:04 am | विसोबा खेचर

आम्हाला बाकी देवानंद हा प्राणी खूप आवडतो, आम्ही त्याचे फ्यॅन आहोत...

आपला,
तात्यानंद.