अत्यंत अर्थहीन, स्वैर आणि अजागळ विडंबन सादर आहे!
कुणाच्या फांदीवर कुणाची आर्ची?
कशासाठी चढवावे टेकू देऊन?
झाड होते कुणासाठी मूळ रोवून?
जमतात येथे कुणी मुव्हीज बघून!
तरी कशी आणतात घरातुनी खुर्ची?
लोक सारे येती येथे बुलेटवरून
वृक्ष जाती वजनाने वाकून झुकून
फांदीवर घेती सेल्फी झोकून झोकून
म्हणती हे वेडे पीर, 'चढू फांदी वरची!'
अंत झाला फोटोसाठी, जन्म एक सेल्फी
पारध्याची वाणी म्हणजे बेचवच कुल्फी
फांदी तीच परी तिची पडे गड्या ढलपी
परश्यापरी आयुष्य हे फांदीमुळे खर्ची
- स्वामी
प्रतिक्रिया
17 Jan 2017 - 9:11 pm | सतिश गावडे
कैच्याकै विडंबन =))
17 Jan 2017 - 10:21 pm | पैसा
हे काय आहे? याच्यामुळे झाडाच्या फांदीवर चढलेल्या मिपाबायका आणि बुडणारी संस्कृती आठवली!
17 Jan 2017 - 10:33 pm | एस
अप्रतिम! 'ती' फांदी तुटली ना, त्यावरून सुचलेय हे स्वामीजींना.
_/\_
17 Jan 2017 - 10:44 pm | पैसा
आर्ची आणि परश्या हे आता ऐतिहासिक लोकांत जमा झाले का? नशीब आपल्याकडॅ बंगाली लोकांसारखी सिनेमानटांची देवळे बांधत नाहीत!
18 Jan 2017 - 10:07 am | खेडूत
अरेरे.. तुटली? कशी काय?
पर्यटन खाते काय करते तरी काय ?
आता एक धातूचं म्युरल बनवून घ्या म्हणावं झाडासारखं, अन आमच्या लाडक्या कलाकारांचे पुतळे सुद्धा!
माणसानं सेल्फी घ्यावी कशी?
18 Jan 2017 - 10:10 am | एस
अक्च्युअली ही भारी आयडिया आहे. पर्यटनखात्याने गंभीरपणे विचार करायला हरकत नाही.
18 Jan 2017 - 12:19 am | आदूबाळ
Swamiji - the king of unintended puns...
18 Jan 2017 - 11:14 am | जयंत कुलकर्णी
Swamiji - the king of intended puns...
:-)
18 Jan 2017 - 11:29 am | पैसा
रे मेल्या, गप रंव. मिपावर एकतरी निरागस पोरगं असू दे! =))
18 Jan 2017 - 9:35 am | अत्रुप्त आत्मा
दुत्त दुत्त स्वामिज्जीईईईईईई! =))
18 Jan 2017 - 10:56 am | थॉर माणूस
वाह वा...
एका वेगळ्याच उंचीवरून खाली येणारी कविता. :D