ब्रम्हचार्‍याचा संसार. भाग १

मार्मिक गोडसे's picture
मार्मिक गोडसे in जनातलं, मनातलं
12 Jan 2017 - 3:13 pm

दुपारचे जेवण करून पुस्तक वाचायला घेतले. वाचता वाचता डोळा लागला ,इतक्यात लँडलाईनचा फोन खणाणला. घरातील सगळे गाढ झोपले होते, मी फोन उचलला.मीXXX कंपनीकडून मनाली बोलतेय, आमच्या कंपनीने एक सर्वे केला त्यात तुमच्या फोनचा लकी ड्रॉमध्ये नंबर लागलाय. मी श्री. XXXX गोडसेंशी बोलू शकते का? समोरून बोलणार्‍या मुलीचा आवाज इतका मंजूळ होता , की क्षणभर वाटलं खोटं बोलून संभाषण तसंच चालू ठेवावं , परंतु मी तसं करू शकलो नाही. आजोबा झोपले आहेत, थोड्या वेळाने फोन कराल का ? असं मी म्हटल्यावर घाईघाईने तिने, तसं काही नाही तुमाच्याशी बोलू शकते, असं म्हणून तिने विचारले तुम्ही सध्या काय करता? काही नाही मस्तपैकी झोपलो होतो . हे ऐकून लहान बाळाला गुदगुल्या केल्यावर ते जसं हसतं तसं ती जोरजोरात हसू लागली. ऐकायला फार गोड वाटत होतं ते हसणं.

ती : तसं नाही हो , काम काय करता? -

एक छोटासा व्यवसाय आहे माझा. मी सरळ ठोकून दिले.

ती : ओके. शनिवार आणि रविवारी संध्याकाळी ५ वाजता ठाणे पू. हॉटेल XX येथे आमच्या कंपनीने सेमिनार आयोजित केले आहे, ह्यात तुम्हाला आमच्या कंपनीत फायदेशीर गुंतवणुकीची संधी मिळेल , ही गुंतवणूक ऐच्छिक असेल . तुम्ही गुंतवणूक केली नाही तरी कंपनीतर्फे तुम्हाला एक सरप्राईज गिफ्ट मिळेल. गिफ्ट काय आहे हे मी विचारले असता, ते सरप्राईज गिफ्ट आहे असं म्हणून ती पुन्हा खळखळून हसली. आणि हो, तुम्ही विवाहित आहात का ?
नाही, मी खरं बोलून गेलो.

ती : मग तुमच्या आई बाबांना जमेल का?
मी : ते बाहेरगावी आहेत, परंतू माझा साखरपुढा झाला आहे दोन महिन्यानी लग्न आहे.(सावधपणे खोटंबोललो)
ती : छानच की, मग तुम्ही तुमच्या भावी पत्नीला घेऊन येऊ शकाल का ?
मी: हो, नक्कीच जमेल.
ती: मग कधी जमेल तुम्हाला ?
मी: उद्या सांगितले तर चालेला का?

हरकत नाही, xxxxxxx या नंबरवर कळवा आणि माझे नाव सांगा. जेव्हा सेमिनारला याल तेव्हा काऊंटरवरही माझे नाव सांगा असे सांगून तीने फोन कट केला.
दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेल्यावर ग्रुपमधील मैत्रीणीना हे सर्व सांगितले , कोण तयार आहे माझ्याबरोबर यायला हे विचारले, तिघीजणी चटकन तयार झाल्या. शेवटी त्यांनीच एकीला सिलेक्ट केले. शनिवारचा दिवस ठरला.
शनिवारी बरोबर ५ वाजता आम्ही त्या हॉटेलच्या हॉलमध्ये शिरलो. काउंटरवर त्या मुलीचे नाव सांगितले. काउंटरवर मुलीने आम्हाला समोरच्या रिकाम्या टेबलाकडे बसायला सांगितले.

गोलाकार टेबल एका पांढर्‍या कपड्याने खालपर्यंत झाकले होते. तीन खुर्च्या समान अंतरावर ठेवल्या होत्या. आम्ही बसलो, थोड्याच वेळाने एका भडक मेक अप व राखाडी रंगाचा जॅकेट व स्कर्ट घातलेली पांढऱ्या रुंगाची मुलगी हसत हसत आमच्या समोर येऊन बसली. हॉल सापडायला काही त्रास तर झाला नाही ना ? तीने विचारणा केली.

नाही , तुम्ही मनाली का ? मी थेट विचारले.
नाही, ती आज रजेवर आहे, मी अर्चना.
कॉफी घेणार की चहा ? तीने विचारले .

आम्ही दोघांनीही एकसुरात कॉफी सांगितले. तिने ३ कॉफी मागवल्या. त्या थंडगार एसी हॉलमध्ये गरमा गरम कॉफी पिता पिता ती आमची चौकशी करत होती व त्याच बरोबर आपल्या कंपनीची माहितीही देत होती. देशातील सगळ्या प्रसिद्ध पर्यटन स्थळी आमचे रिझॉर्ट आहेत. आमची कंपनी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी देशात विविध ठिकाणी अशी सेमिनार आयोजित करते. लोकांना पर्यटन करताना कोणकोणत्या अडचणी येतात,त्या दूर करण्यासाठी कंपनी कशी मदत करते इ.इ.. ती सांगत होती. तुम्हालाही फिरायला आवडत असेल ना? तीने विचाराले. मी हो म्हटले.
तुम्ही वर्षातून कितीवेळा पर्यटन करता व कुठे कुठे जाता? - ती
वर्षातून एकदा दोनदा व तेही फक्त गोव्याला - मी
आमचे गोव्यालाही रिझॉर्ट आहेत. - ती
तुम्ही गोव्याला कोणत्या हॉटेलमध्ये उतरता ? - ती
आम्ही ओळखीच्या लोकांकडे राहतो.- मी

हे ऐकून ती जरा हिरमुसली, परंतु तिने मला गोव्याच्या बाहेर काढायचा प्रयत्न चालूच ठेवला. कुलू मनाली, नैनीताल ही सुद्धा सुंदर पर्यटन स्थळ आहेत. मी माझ्या आई , बाबांना पाठवले होते हिमालय दर्शनाला. त्यांनी बर्फात खेळण्याचा भरपूर आनंद घेतला.तिकडे ते याकवर बसले. आता ती आम्हाला पकवायला लागली होती. माझ्या आईचा याकवर बसलेला फोटो बघून माझे बाबा म्हणाले , ह्यातील याक कोणता व तुझी आई कोणती हे ओळखता येत नाही , असं म्हणून ती एकटी खोखो हसू लागली. मी म्हटले तुमच्या आईच्या अंगावर एवढे केस आहेत? नाही हो , फारच विनोदी आहात तुम्ही असे म्हणून पुन्हा खोटं खोटं हसायला सुरुवात केली. अचानक बाजूने आरतीच्या घंटी सारखा आवाज आला व समोरची मुलगी,आजूबाजूच्या टेबलावरचे मुले व मुली उभ्या राहिल्या , आम्हालाही उभं राहायला सांगितले. एक भारदस्त व्यक्तिमत्व असलेला तरुण एका वयस्कर जोडप्याच्या बाजूला येऊन उभा राहिला आणि त्याने जोडप्याचे नाव घेऊन आपल्या कंपनीत १ लाखाची गुंतवणूक केल्याची घोषणा केली व त्या जोडप्याचे अभिनंदन केले. सगळ्यांना टाळ्या वाजवून त्या जोडप्याचे अभिनंदन करायला सांगितले. ते जोडपे ह्या स्टँडिंग ओवेशनने भारावून गेले होते.

आम्ही खाली बसल्यावर तिने आपल्या हातातला अल्बम आमच्या समोर ठेवला. ज्यात कंपनीच्या रिझॉर्टचे फोटो होते. ती एक एक पान पालटत होती, आजूबाजूला एखादी घंटी वाजली जायची, पुन्हा तेच,उभे राहून टाळ्या वाजवल्या जायच्या , आमचा उठाबशांचा व्यायाम चालू होता . आता तिने थेट कंपनीचा प्लानच समोर ठेवला. १ लाख गुंतवा , वर्षातून तीन वेळा एक आठवडा फुकट राहा. नसेल राहायचे तर तुम्हाला त्या जागेचे भाडे कंपनी देईल. जितकी जास्त गुंतवणूक तितकी अधिक सुविधा व भाडे मिळेल. त्या रिझोर्टची देखभाल व उपलब्धतेबद्दल विचारले असता त्या स्कीमचे खरं रूप समोर आले. ह्यात देखभालीचा खर्च आपल्याकडून वसूल केला जातो. आयत्यावेळी रिझोर्ट मिळत नाहीत आणि सीझनमध्ये हवे असल्यास ३-४ महिने अगोदर बुक करावे लागते. ब्रेकफस्ट व जेवण कंपल्सरी त्यांच्याकडचेच घ्यावे लागते, जे भयानक महाग असते. मी स्पष्ट नकार दिला व थेट सरप्राईज गिफ्ट काय आहे ते विचारले. तिने रागाने समोर काउंटरवरून घेऊन जा असं सांगितले, व पसार झाली.
काउंटरवरील मुलीने हातात एक काचेचा मोठा बाऊल ठेवला. तेथून बाहेर आल्यावर मैत्रीण म्हणाली, बस आता स्टेशनबाहेर आणि त्या वाडग्यात बोहणी म्हणून १ रुपया टाकला. ह्या वाडग्यात पोह्यांचा काला कालवून खाण्याचे स्वप्न रंगवत मी स्टेशनच्या दिशेने चालत होतो.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ट्रिंग ट्रिंग ट्रिंग , आजीने फोन उचलला , अरे ती बाई काहीतरी विचारते आहे , तूच बोल.
ओके . एक मिनीट लिहून घेतो. हं, बोला.. दादर पू. हॉटेल xxxxx . शनिवारी नक्की.
आजी ह्यापुढे असे फोन आले आणि मी घरी नसेल तर त्यांना नंतर फोन करायला सांग.

अर्थकारणअनुभव

प्रतिक्रिया

लय फसवतात हे लोकं...जोरजोरात गाणे सुरु असतात त्यांच्या त्या खोलीत
मस्त लिहिलंय..पुभाप्र

जेपी's picture

12 Jan 2017 - 4:24 pm | जेपी

अच्छा अस घडलय तर .!

हा घ्या आमचा शेम टू शेम अनुभव. बादवे - मला पण काचेचे बाऊल मिळाले.

**********************************************************************

कोणत्यातरी टीनपाट हॉलीडे कंपनीने फोन करून त्रास द्यायला सुरूवात केली. तुम्हाला लकी ड्रॉ मध्ये किचन अ‍ॅप्लायन्सेस चे फ्री गीफ्ट लागले आहे, त्याबरोबर २०,०००/- चे हॉलीडे व्हाऊचर पण मिळेल.

खूप टाळाटाळ करून एका शनिवारी (आई वडीलांसह) त्यांच्या औंध ऑफिसात गेलो.
बाबौ.. मासळी बाजार बरा. ३० / ४० टेबले, प्रत्येक टेबलाशेजारी ५ जण. ४ फ्यामिली आणि एक सेल्सवाली. विनाकारण गळेपडूपणा करत, "कुठे कुठे फिरता तुम्ही?", "इन्कम किती?" "आवडलेले ठिकाण कोणते?" असले प्रश्न विचारून आणि त्यांचे वेगवेगळे अल्बम दाखवून हैराण केले. मी अत्यंत शांतपणे दर १० / १५ मिनीटाला १ छोटा ग्लास कोल्ड्रींक संपवत सगळ्यांची मजा बघत बसलो.

ऑफर अशी होती की त्यांची ६० / ७० हजाराची मेंबरशीप १२ हप्त्यात घ्यायची

प्रश्नांची उत्तरे एकदम फ्लॅट टोन मध्ये देत होतो. उत्तरे ऐकून प्रश्न विचारणार्‍या कन्येचा चेहरा जास्ती पडत गेला.. Smile

प्रश्न - आप कारसे आए हो क्या.. पार्किंग ठीकसे मिला ना..?
मी - अ‍ॅप्रीशीएट यूवर कन्सर्न. ( कार का बाईक हा प्रश्नच उद्भवू दिला नाही ;-) )

प्रश्न - घर आपका खुद का है या रेंटेड..?
मी - पर्सनल डीटेल्स शेअर नही करूंगा.. आप प्लीज हॉलीडे व्हाऊचर के बारेमे बताईये.

प्रश्न - सर आपका पॅकेज कितना है..?
मी - दो वक्त का खाना निकलताहै, अमाऊंट नही बताऊंगा.

साधारणपणे २ तास सगळे सहन केल्यानंतर मी इंटरेस्ट नाही म्हणून सांगीतले.. कारण सांगीतले की ऑफर पटली नाही.. मला नक्की काय पटले नाही तेही शेवटपर्यंत सांगीतले नाही. ;)

किचन अ‍ॅप्लायन्सेस म्हणून त्यांनी झकास प्याक केलेला एक मध्यम बॉक्स दिला.. मी पण निर्लज्जपणे बॉक्स तिथेच उघडून आत काय आहे (किंवा खरेच कांही आहे का..?) ते बघितले, आणि मगच तो घेवून आलो.

तिथे जमलेले बहुतेक पब्लीक सोशल प्रेशर मुळे या फसव्या कल्पनांना बळी पडते असा कयास आहे.

यसवायजी's picture

12 Jan 2017 - 4:41 pm | यसवायजी

असला एक्ष्पेरीन्चे घ्यावा लागेल.

बाकी,
मी म्हटले तुमच्या आईच्या अंगावर एवढे केस आहेत? >> :))

अप्पा जोगळेकर's picture

12 Jan 2017 - 4:51 pm | अप्पा जोगळेकर

मला 'कंट्री क्लब' कडून ६ कप मिळाले होते चहाचे. आणि चहा पण मिळाला (वेगळ्या कपातून).
काहीच्या काही प्रश्न विचारत बसतात. मी १०-१५ मिनिट सहन केल जेमतेम. नंतर उठून डायरेक्ट गिफ्टच विचारल.
मग पुन्हा ५ मिनिट पकवल. मग बायकोने पुन्हा गिफ्ट ? म्हणून विचारल. देऊन टाकल त्यांनी. तेही सुटले. आम्हीसुद्धा.

अप्पा जोगळेकर's picture

12 Jan 2017 - 4:54 pm | अप्पा जोगळेकर

बाकी गोडसेंना बायकोचा टेंपररी रोल करणार्‍या मैत्रीणी आहेत म्हणजे कौतुकच आहे. :)

खेडूत's picture

12 Jan 2017 - 4:56 pm | खेडूत

:))
इतक्या जणांना जर बोलावतात तर आपण पुढच्या वेळी एक कट्टाच करू की तिथे. तेही खुस, अन मिपाकर्सही..

विशुमित's picture

13 Jan 2017 - 3:20 pm | विशुमित

"टेंपररी बायको" काय मस्त स्वप्नरंजित कन्सेप्ट आहे.
नशीबवानच म्हणायचे गोडसे साहेब...!! कशाला उगाच संसाराच्या फंदात पडता, असेच ब्राह्मचारी राहा. (आपुलकीचा सल्ला आहे, हलके घ्या)

चांदणे संदीप's picture

12 Jan 2017 - 5:20 pm | चांदणे संदीप

" "

Sandy

बबन ताम्बे's picture

12 Jan 2017 - 5:27 pm | बबन ताम्बे

मी ही महिन्द्रा हॉलिडेज च्या सेमिनार ला गेलो होतो. सेम अनुभव आणि प्रॉमिस केलेले गिफ्ट पण दिले नाही.

Ranapratap's picture

12 Jan 2017 - 7:09 pm | Ranapratap

गोवा मध्ये बिचवर यांचे एजंट फिरत असतात, लकी कूपन वाटतात, दोन तीन पैकी एक कूपन मध्ये बक्षीस लागते, ते घ्यायला एका हॉटेल मध्ये बोलवून वरील प्रकार होतो, नाही म्हणून सांगितले कि यांचं attitude change. जाम वैताग येतो.

संजय क्षीरसागर's picture

12 Jan 2017 - 7:11 pm | संजय क्षीरसागर

मी आणि बायकोनी तिथे फुल टिपी केला आणि महिंद्र हॉलीडेजची 2 N / 3D ची काँप्लिमेंटरी व्हाऊचर्स घेऊन आलो . मग पाचगणीला त्यांच्या रिसॉर्टमधे मजा करून श्रमपरिहार केला.

बाकी साखरपुडा झालायं ही आयडीया अती आवडली !

संदीप डांगे's picture

12 Jan 2017 - 7:27 pm | संदीप डांगे

डझ् एनिबडी वॉन्ट द 'फर्स्ट हॅन्ड' एक्स्पीरीयन्स फ्रॉम अदर साईड ऑफ द टेबल...? ;) =))

फर्स्टमॉन्क's picture

12 Jan 2017 - 8:21 pm | फर्स्टमॉन्क

यस् प्लीझ

फर्स्ट हॅन्ड

;) येउद्या

चिनार's picture

13 Jan 2017 - 12:15 pm | चिनार

लिवा की..वाट बघतो..

साहेब..'s picture

13 Jan 2017 - 12:28 pm | साहेब..

लिवा की..वाट बघतो..

हे मी चुकून लिवा की..वाट लावतो.. असा वाचलं.

अस्वस्थामा's picture

12 Jan 2017 - 8:45 pm | अस्वस्थामा

आंग आसं जरा त्ये मोदी बिदी आनी राजकारन सोडून खुसखुशीत पन येउ द्यावं म्हंतो आदून मदून..
बरं वाटतं तेवडंच.

(मोदी, नोटबंदी आणि त्याच त्या चर्चांना विटलेला)

अत्रुप्त आत्मा's picture

12 Jan 2017 - 9:18 pm | अत्रुप्त आत्मा

@मी म्हटले तुमच्या आईच्या अंगावर एवढे केस आहेत? ››› हहपुवा..

पैसा's picture

13 Jan 2017 - 2:16 pm | पैसा

क्लब महिंद्रा. सेम आण्भव. फोनवर त्या ललना विचारत तुम्हाला सुटीत कुठे जायला आवडेल. मी म्हणे आम्ही गोव्यात रहातो आणि आम्हाला रत्नागिरी सोडून कुठेच जायला आवडत नाही. शेवट एका प्रेजेंटेशनला गेलो आणि चा भिस्कुट खाऊन परत आलो. तिथपर्यंत जायला पेट्रोल खर्च झाले म्हणून नवरा नंतर श्या घालत होता.

नाशिक ला बजाज अलियांजला खूप वैतागुन सोडले होते मी, खूप झोप येतेय असे नाटक शुरू केले जांभया काय देत होतो. शेवटी त्यांनी दिलेली अँक्सीडेंट पालीसी त्यांच्यासमोर फाडून फेकून दिली, घंटी तिथेही होती.

अशाच अनुभवांवर इथेच दोन ते तीन धागे येऊन गेले आहेत. असेच अनुभव लिहिलेत.