बुद्धिबळाच्या युद्धपटावर!

सचिन जाधव's picture
सचिन जाधव in जे न देखे रवी...
1 Oct 2008 - 8:06 pm

बुद्धिबळाच्या युद्धपटावर,
एक प्याद निमुटपने लढत होत.....
स्वबळावर स्वहिमतीवर,
एक एक घर ते पुढ सरकत होत.

समोर येना-या प्रत्येक सन्कटाला,
ते धैर्याने समोर जात होत,
स्वबळावर स्वहिमतीवर,
एक एक घर ते पुढ सरकत होत.

लढता लढता ...लढता लढता,
पोहचल शेवटच्या घरट्यात,
तेव्हा ते प्याद एक वझिर होत,
स्वबळावर त्यान आता राजालाही,
नमवल होत.

पण्.........पण ????
खेळ सन्पला तेव्हा......
ते प्याद मात्र एक प्यादच होत,
अण पुन्हा एकदा ,
लढण्यासाठी सज्ज होत.........पुन्हा एकदा लढण्यासाठी सज्ज होत.

कविता

प्रतिक्रिया

फारतर नेने's picture

1 Oct 2008 - 8:10 pm | फारतर नेने

सुन्दर कल्पना आणि रेखाचित्र.

मनापासुन आवडले

सुपरफास्ट
फारतर नेने

स्वाती राजेश's picture

2 Oct 2008 - 12:14 am | स्वाती राजेश

मस्त लिहिली आहे....
आणखी येऊ देत..............

विसोबा खेचर's picture

2 Oct 2008 - 1:08 am | विसोबा खेचर

वा!

प्याद्याचे रुपक आवडले..!

आपला,
तात्या कास्पाराव.

अनिरुद्धशेटे's picture

2 Oct 2008 - 3:08 pm | अनिरुद्धशेटे

सच्या
अप्रतिम शब्द, तु ही कविता फोर टू वन शिफ्ट असताना ऐकवली होती

अनिरुद्ध