आईवडिलांबद्दल पुस्तके लिहिणे

वृंदा१'s picture
वृंदा१ in जनातलं, मनातलं
27 Dec 2016 - 11:10 pm

आपण सगळेच जाणतो की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या आईवडिलांची भूमिका फार फार महत्वाची असते. आयुष्य चालत राहतं,काळ वाहत राहतो आणि एक दिवस आपल्याला आई किंवा वडिलांचा कायमचा वियोग सहन करावा लागतो. शेवटी प्रत्येकाला एक दिवस जायचेच आहे हे माहीत असूनही हे दुःख सहन करण्याच्या पलीकडचे असते.त्यांच्या जाण्याने आपण आत आत कुठेतरी पोकळ होऊन जातो.आपल्याजवळ त्यांच्या लाखो आठवणी असतात.आपल्याला असं वाटतं की हे आठवणींचं भांडार आपल्यानंतरही कायम राहावं.आपली आई कशी होती किंवा वडील कसे होते हे पुढच्या पिढ्यांनाही कळावं.मी स्वतःही यातून गेले आहे,जात आहे.मलाही वाटतं की आपले प्रियजन फक्त फोटोत न राहता त्यांच्यातले गुण,आपल्यासाठी त्यांनी केलेले श्रम,लाखो लाखो आठवणी शब्दबद्ध व्हाव्यात.आपले मत अपेक्षित आहे.मला हे काम प्रामाणिकपणे आणि मनापासून करण्याची इच्छा आहे.अर्थात हे काम व्यावसायिक तत्वावर करणार आहे.कारण हे फुलटाईम काम आहे.आपले मत अपेक्षित आहे.मी जरी हे काम व्यवसाय म्हणून करणार असले तरी दर्जा,रिसर्च अशा कोणत्याही बाबतीत कधीही कमी पडणार नाही.

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

चांगला विचार (आणि व्यवसाय) आहे. शुभेच्छा.

(अवांतर - मध्यंतरी छायाचित्रकारांच्या ग्रुपवर एकाने फ्युनरल फोटोग्राफीबद्दल विचारणा केली होती हे आठवलं. आता कदाचित रुळला असेल, पण पूर्वी असं कधी ऐकलं नव्हतं त्यामुळं तिथं बरीच साधकबाधक चर्चा झाली होती. केवळ तुमच्या पोस्टमुळं आठवलं म्हणून टाकलं.)

वृंदा१'s picture

28 Dec 2016 - 2:37 pm | वृंदा१

एसदा,धन्यवाद.

जयन्त बा शिम्पि's picture

27 Dec 2016 - 11:51 pm | जयन्त बा शिम्पि

आपापल्या स्वत:च्या आई-वडिलांच्या आठवणीत इतर कोणाला स्वारस्य असण्याचे काही कारण असेल असे मला वाटत नाही.त्यामुळे व्यावसायिक तत्वावर पुस्तक लिहुन, काय साध्य करणार हे जरा स्पष्ट व्हायला हवे होते. उदाहरणार्थ माझे वडिल त्यांच्या वयाच्या ८१ व्या वर्षी वारले. त्यांच्या निधनाने फार मोठी पोकळी जीवनात आली असे नुसते म्हणण्यासाठी ठीक आहे, पण माझ्या मनात आले की वयाची ८१ वर्षे ते जे जीवन जगले, मुला-मुलींचे संसार बहरतांना त्यांनी पाहिले, नातू-पणतु यांच्या बरोबर खेळलेत, त्यामुळे त्यांचे जीवन सफल झाले असेच म्हणावे लागेल.कारण त्यावेळी माझेच वय ५५ वर्षे होते.आता माझी आई त्यानंतर दहा वर्षांनी मरण पावली. आता यामध्ये इतरांना स्वारस्य कसे असेल ? खुलासा झाला
तर पुढे लिहिणार.

प्रश्न जीवनाच्या सफलतेचा नाही.प्रत्येकाला असतो तसा तुम्हालाही आईवडिलांविषयी अभिमान असणारच.असे पुस्तक लिहिण्याचा मुख्य उद्देश आपल्या प्रियजनांची माहिती पुढच्या पिढ्यांना होत राहावी.कुठलाही सर्वसामान्य माणूस आपले घर सांभाळताना,मुलांना वाढवताना अथक संघर्ष करत असतो.प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर विलक्षण प्रसंग घडत असतात.कुठल्याही माणसाला वयाच्या एका टप्प्यावर पोचल्यानंतर आपल्या पुर्वजांविषयी कुतूहल असते,असे मला वाटते. काय साध्य करणार आणि इतर कोणाला स्वारस्य असण्याचे काय कारण यातल्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळाले असेल.जर लेखनमूल्य सकस असेल आणि वाचणारा संवेदनशील असेल तर अशी पुस्तकेही प्रसिद्ध होऊ शकतात.तसेही आपल्याला ओळखणारे,नातेवाईक वगैरे २००-३०० तरी असतातच.शंकांचे स्वागत आहे.धन्यवाद.

कंजूस's picture

28 Dec 2016 - 9:14 am | कंजूस

>>आईवडिलांबद्दल पुस्तके लिहिणे
जयन्त बा शिम्पि>>

++ १

स्वीट टॉकर's picture

28 Dec 2016 - 4:08 pm | स्वीट टॉकर

वृंदाताई - कुठलंही लेखन करताना मिळणारा आनंद हाच त्याचा खरा परतावा असतो. आपल्या आईवडिलांबाबत वाचायला बाकीच्या लोकांना खूप आवडेल अशी अपेक्षा ठेवली तर अपेक्षाभंग व्हायची शक्यता असते.

लिहावसं वाटतय ना? मग लिहाच!
कर्मण्ये वाधिकारस्ते . . . .

धन्यवाद.असेच प्रोत्साहन देत राहा.तेच बळ देतं.