दिल जलता है तो जलने दे

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
24 Dec 2016 - 9:28 am

दिल जलता है तो जलने दे

दिल जलता है तो जलने दे
आँसू ना बहा फ़रियाद ना कर
तू परदानशीं का आशिक़ है
यूँ नाम-ए-वफ़ा बरबाद ना कर

मासूम नजर के तीर चला
बिस्मिल को बिस्मिल और बना
अब शर्म-ओ-हया के परदे में
यूँ छुप छुप के बे-दाद ना कर

हम आस लगाये बैठे है
तुम वादा करके भूल गये
या सूरत आ के दिखा जाओ
या कह दो हमको याद ना कर
मुकेश

परदानशि--पडद्यातील स्त्री, शालीन, आशिक-- प्रियकर, वफा ---प्रेम, भक्ती, एकनिष्ठा मासुम ---निष्पाप, बिस्मिल ---घायाळ, प्रियकर, हया --- शरम, लाज बेदाद --- अत्याचार, जुलूम, ऑंस ---दर्द, संवेदना
http://www.dailymotion.com/video/x12mtjf_very-popular-old-indian-song-di...

वाट पाहून पाहून तो पार थकला आहे. डोळे भरून आले आहेत व केव्हा धारा वाहू लागतील याचा भरोसा राहिलेला नाही. पण या निराश, केवलवाण्या स्थितीतही त्याला आपल्या जबाबदारीची जाणीव आहे. जर हे आपले आसू कोणी पाहिले तर त्याचे परिणाम काय होणार ? तर तीचाच बोभाटा गावभर होणार. तो स्वत:ला बजावतो, " हृदय जळते आहे ? जळू दे. आंसवे वहाता कामा नयेत. तक्रारीचा चकार शब्दही तोंडातून बाहेर पडणार नाही याची काळजी घे. शेवटी एका शालीन, मुलीचा तू प्रियकर आहेस, तू प्रेमाच्या निष्ठेला बदनाम करू नकोस."

आता तो तिला आपल्या परिस्थितीची जाणीव करून देतांना म्हणतो " तुझ्या निष्पाप नजरेतून जो बाण सुटला त्याने मला घायाळ केले." ही कल्पना काही नवीन नाही परंतू ’बिस्मिलको बिस्मिल और बना" यातील मजा पहा. बिस्मिलचे दोन अर्थ, जखमी व प्रियकर. म्हणजे " जख मीची जखम आणखी खोल झाली", " प्रियकर आणखी घायाळ झाला ", "प्रियकराचे प्रेम त्या नजरेने आणखी वाढले ", अशा अनेक छटा डोळ्यासमोर उभ्या रहातात. गझल मधली प्रेयसी, साकी, ही नेहमी निष्ठूर, बनेल असते. पण ही तशी दिसत नाही. तिची नजर अजून मासूम, निष्पाप आहे, ती लाजाळू आहे. म्हणून तो म्हणतो " या लाजेच्या पडद्यात लपून तू आणखी अत्याचार करू नकोस." हया म्हणजे शरम, लाज. "शर्म-ओ-हया" ही द्विरुक्ती झाली आहे का ? नाही. आपण साधारणत: शरम म्हणजेच लाज, लज्जा असे म्हणत असलो तरी त्यात थोडासा फरक आहे. शरम म्हणजे अपराध झाल्यामुळे वाटणारी लाज तर लज्जा ही निसर्गसुलभ भावना आहे. ती निष्पाप आहे, तिला निसर्गत: लाज वाटत असेल पण तिच्या नजरेने तो विद्ध झाला आहे, म्हणजे नकळत का होईना तिचा अपराध झाला आहे, तेव्हा तिला शरम वाटत असेलही. त्याची मागणी एकच आहे, "आता तरी पडद्या आडून हे अत्याचार करणे बंद कर, दोघांमध्ये हा पडदा कशाला ?"

शेवटी तो कळवळून म्हणतो, "मी येथे दु:खाला कवटाळून बसलो आहे आणि तू मात्र येण्याचे कबूल करून विसरून गेलीस. आता एक तर ये आणि तुझे दर्शन दे. ना तर एकदाचे सांगून टाक "मला विसरून जा "
(आपण मराठीत म्हणतो "डोळे लावून वाट बघतो आहे " येथेही "ऑंस" च्या ऐवजी "ऑंख" कसे वाटते ? )

मुकेशचे या गाण्याशी एक अतूट नाते आहे.
मुकेशचा जन्म दिल्लीत १९२३ साली झाला. बहिणीला शिकवावयाला येणा‍र्‍या संगीत शिक्षकांकडे त्याने संगीताचे पहिले धडे घेतले. दहावीनंतर शाळा सोडून फुटकळ नोकर्‍या केल्या. त्यावेळीही संगीताची साथ सोडली नाही. पुढे मोतिलाल यांनी त्याचे गाणे ऐकून, पुढील शक्यता लक्षात घेतल्या व ते त्याला घेऊन मुंबईत आले. तिथे त्यांनी जगन्नाथ प्रसाद यांच्याकडे त्याला संगीत शिकण्याकरिता पाठविले मुकेशला १९४३ साली नट-गायक म्हणून सिनेमात काम करण्याची पहिली संधी मिळाली. या काळी सैगलच्या गाण्याचा हिन्दुस्थानात फार पगडा होता व मुकेश सैगलला दैवत मानावयाचा सैगलच्या गाण्याची तो हुबेहुब नक्कल करत असे.
मुकेशला पहिला ब्रेक मिळाला १९४५ साली "पहिली नजर" या सिनेमात " अनिल विश्वास" याच्या सगीत दिग्दर्शनाखाली तो गायला "दिल जलता है तो जलने दो " ते गाणे अफाट लोकप्रिय झाले. असे म्हणतात की सैगलने ते गाणे पहिल्यांदी ऐकले व तो म्हणाला " आश्चर्य आहे, मी हे गाणे केव्हा गायलो ते मला आठवत नाही ".
नौशाद अलीने प्रयत्न करून करून मुकेशच्या गाण्याला सैगलच्या पगड्यापासून दूर केले. मुकेश स्वत:च्या नैसर्गिक पद्धतीने गाऊ लगला. मुकेश प्रथम दिलिपकुमारचा पार्श्वगायक होता व महमद रफ़ी राज कपूरचा. त्यातील अनेक गाणी आजही लोकप्रीय आहेत. पण नंतर दिलिपकुमारने रफ़ीला निवडले व मुकेशला राज कपूरने. नंतर राज कपूर व मुकेश हे इतके एकरूप झालेले दिसतात की म्हणे मुकेशच्या मृत्यूनंतर राज कपूर म्हणाला "आज माझा आवाज गेला "

मुकेशने १२००-=१३०० गाणी गायली आहेत. रफीच्या तुलनेत हा आकडा लहान असला तरी मुकेश गाण्यांबद्दल जास्त चोखंदळ होता. शेवटी शेवटी हृदयविकाराच्या आजारपणाने त्याच्यावर बंधनेही आली. त्याला अनेक पारितोषकेही मिळाली.
२७ -८-१९७६ ला अमेरिकेच्या दौर्‍यात तो मिशिगन येथे हृदयविकाराच्या धक्क्याने मरण पावला. .
शरद .

संगीतमाहिती

प्रतिक्रिया

खेडूत's picture

24 Dec 2016 - 10:02 am | खेडूत

वाह!
खूप आवडले...

जयन्त बा शिम्पि's picture

24 Dec 2016 - 2:07 pm | जयन्त बा शिम्पि

खरं आहे, मुकेशजी व राजकपूरजी म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या.छान लेख, पण एकाच गाण्यावर कां थांबलात ? अजून येवू द्या की ! !

अत्रुप्त आत्मा's picture

24 Dec 2016 - 8:26 pm | अत्रुप्त आत्मा

लेख लैकण्यात येत आहे.

या गाण्याचा एक किस्सा लिहिलेला आहे. गाण्याच्या रेकाॅर्डिंगच्या वेळी मुकेश उशिरा आला कारण तो आपलं रेकाॅर्डिंग आहे हे विसरून झोपला होता. सगळेजण त्याच्यासाठी ताटकळत बसले होते. शेवटी तो आल्यावर संगीतकार अनिल विश्वासने त्याच्या कानाखाली मारली. तो ढसाढसा रडला, बाथरूममध्ये जाऊन तोंडावर पाणी मारून आला आणि मग त्याने एकाच टेकमध्ये हे गाणं ओके केलं.

अमर विश्वास's picture

25 Dec 2016 - 12:10 am | अमर विश्वास

मुकेश ... क्या बात है ...

छान आठवण ताजे केलीत ...

तुमच्या लेखतील एक ओळ : (आपण मराठीत म्हणतो "डोळे लावून वाट बघतो आहे " येथेही "ऑंस" च्या ऐवजी "ऑंख" कसे वाटते ? )...

येथे "ऑंस" च बरोबर वाटते ... त्याचा अर्थ वाटेकडे डोळे लावून असा न घेता
तू येण्याची अपेक्षा / तीव्र इच्छा ("ऑंस" ) धरून बसलो आहे असा घ्या ..
बघा कसे वाटते ?

पैसा's picture

25 Dec 2016 - 9:26 am | पैसा

गाण्याची छान ओळख आणि त्यानिमित्ताने मुकेशचीही छान ओळख.

प्रदीप's picture

25 Dec 2016 - 12:14 pm | प्रदीप

आवडला.

मुकेशच्या आवाजाची एक वेगळीच प्रत होती, तसेच त्याची गाण्याचीही स्वतःची शैली होती. तो niche गायक होता खरे तर. त्यामुळे रफी व मन्ना डे ह्यांच्याप्रमाणे कुठल्याही अभिनेत्यासाठी तो गाऊ शकत नसे. तसेच, असे म्हटले जाते, की त्याच्या गाण्यास काही मर्यादाही होत्या. चालीतील कठीण पॅसेजेस आत्मसात करतांना त्याला त्रास होई. त्याच्या ह्या मर्यादा लक्षांत घेऊन, त्याच्या आवाजाच्या प्रतिचे व गायकीचे सामर्थ्य तत्कालिन काही संगीतकारांनी ओळखले, आणि त्यांजसाठी मुकेशने अनेकानेक बहारदार गीते दिली. इतरांपेक्षा थोड्या चोखंदळ समजल्या जाणार्‍या अनिल विश्वास व सलील चौधरी ह्यांची पुरूष गायकांत मुकेश ही सर्वप्रथम निवड होती. आणि शंकर जयकिशन ह्यांनी तर त्याचा राज कपूरसाठी भरपूर उत्कृष्ट वापर केला. सुरूवातीच्या काळांत राजसाठी मुकेश व मन्ना डे अशा दोघांचाही वापर ते करीत. कालांतराने मात्र राजचा आवाज मुकेश हे समीरकण झाले.

मुकेश अनेकांकडे अतिशय सुंदर गाऊन गेलाय. इथे त्याच्या राजसाठी गायलेल्या गाणांची दुव्यांसकट छोटीशी जंत्री देतो.

प्रथम शंकर जयकिशन ह्यांनी केलेली गीते:

बरसात (१९४९)

* छोड गये बालम
* पतली कमर है *

आवारा (१९५१)

* आवारा हूं *
* हम तुझ से मोहब्बत कर के सनम *

आह (१९५३)

* आजा रे अब मेरा कौन सहारा
* जाने न नजर

श्री ४२० (१९५५)

* मेरा जूता है जपानी *

कन्हैय्या (१९५९)

* रूक जा ओ जानेवाली *

* मुझे तुम से कुछ भी न चाहिये *

* याद आयी आधी रात को कल रात की तोबा *

अनाडी (१९५९)

* सब कुछ सीखा हमने *

* दिल की नजर से

* किसी की मुस्कराहठों पे हो निसार *

मै नशे मे हूं (१९५९)

* मुझ को यारों माफ करना *

* नजर नजर मे हो रही है बात प्यार की

आशिक (१९६२)

* तुम जो हमारे मीत न होते *
* ओ शमा मुझे फूंक दे
* मेहताब तेरा चेहरा *
* ये तो कहो कौन हो तुम, कौन हो तुम *

जिस देश मे गंगा बहती है (१९६२)
* मेरा नाम राजू *
* होटों पे सचाई रहती है *
* प्यार कर ले नही तो फॉसी चढ जायेगा *
* बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना
* हम भी है, तुम भी हो

एक दिल सौ अफसाने (१९६३)

* सुनो जी सुनो हमारी भी सुनो *
* मस्त नजर *

संगम (१९६४)

* दोस्त दोस्त ना रहा *
* ओ मेहबूबा *
* ओ मेरे सनम
* हर दिल जो प्यार करेगा

तीसरी कसम (१९६६)

* दुनिया बनानेवाले *
* सजन रे झूट मत बोलो *
* सजनवाँ बैरी हो गये हमार *

सपनों का सौदागर (१९६८)

* सपनों का सौदागर आया *

मेरा नाम जोकर (१९७०)

* जाने कहाँ गये वो दिन *
* जीना यहाँ, मरना यहाँ *
* कहता है जोकर *

धरम करम (१९७५)

* इक दिन बिक जायेगा माती के मोल *

ह्याच दरम्यान इतर संगीतकारांनीही राज कपूर+ मुकेश ह्यांच्यासाठी केलेल्या ह्या रचना:

रोशनः

बावरे नैन (१९५०)

* खयालों मे किसी के इस तरह आया नही करते

दिल ही तो है (१९६३)

* दिल जो भी कहेगा *
* गुस्से मे जो निखरा है *
* तुम अगर मुझको न चाहो तिओ कोई बात नही *
* भूले से मोहब्बत कर बैठा *
* तुम्हारी मस्त नजर

सी. रामचंद्र

शारदा (१९७५)

* जप जप जप रे *

खय्याम

फिर सुबह होगी (१९५८)

* फिर न कीजिए मेरी गुस्ताख़ निगाही का गिला

* वो सुबह कभी तो आयेगी

* आसमाँ पे है खुदा और जमीं पे हम *
* चीनो अरब हमारा *

दत्ताराम

परवरीश (१९५८)

* ऑंसूभरी है ये जीवन की राहे *

श्रीमान सत्यवादी (१९६०)

* हाले दिल हमारा *

कल्याणजी- आनंदजी

छलिया (१९६०)

* मेरे टूटे हुवे दिल से *
* डम डम डिगा डिगा *
* मेरी जान कुछ भी कीजिये
* छलिया मेरा नाम *

दुल्हा दुल्हन (१९६४)

* जो प्यार तुमने मुझ को दिया था *
* हमने तुझ को प्यार किया है जितना *

वरील * दर्शवलेली गीते, एकल- गीते आहेत.

नीलस्वप्निल's picture

23 Aug 2020 - 2:15 pm | नीलस्वप्निल

धन्यवाद :)

रमेश आठवले's picture

26 Dec 2016 - 8:58 am | रमेश आठवले

हे गीत दरबारी कानडा या रागावर आधारित आहे असे वाटते.

मुकेशच्या चाहत्यांसाठी पुन्हा एकदा हा धागा वर आणत आहे.