आज सकाळपासून मिपा बंद होते, तसेच मागील काही दिवसांपासून असे मधेमधे होत होते हे मी व इतरांनीदेखील अनुभवलेत. मला वाटते कि सरपंचांनी दिलगीरी व्यक्त करण्याची गरज नाही कारण तुम्ही आम्हा पामरांसाठी जेवढे करता तेवढे खूप आहे.
सर्व्हर कोसळण्यासारखी गंभीर समस्या उद्भवून देखील तुम्ही आमचे मागच्या आठवड्यापर्यंतचे लेखन वाचवले याबद्दल अखिल मिपाकर आपले आभारी असतील असे मला तरी वाटते.
एक गरजू शाळा.संदर्भात मी ही मिपाकरांना एक विनंती करू इच्छितो कि ज्या मिपाकरांनी देणग्यासंदर्भात मला संपर्क केला होता त्यांनी पुन्हा करावा तसेच ज्या मिपाकरांनी शाळेला ऑनलाईन मदत पाठवली आहे त्यांनी कृपया मला आपले पत्ते व्यनि करावेत.
धन्यवाद.
प्रतिक्रिया
23 Dec 2016 - 6:26 pm | धर्मराजमुटके
सहमत आहे ! पण हल्ली मिपाडिक्टपणा वाढला आहे. फाफॉवर मिपा उघडत नव्हते म्हणून चक्क आठवड्यात दोन वेळा उडवून परत इन्स्टॉल केले.
24 Dec 2016 - 10:11 am | इरसाल कार्टं
मागे एकदा गूगल उघडत नव्हते तेव्हा जगभरातील हजारो लोकांनी इंटरनेट कनेक्शन चेक केले होते.