काय तुझे होणार... मानवा

कवि मानव's picture
कवि मानव in जे न देखे रवी...
12 Dec 2016 - 7:18 pm

भजन रूपी विडंबन गाणे आहे. काळ माणसाला उद्देशून हे म्हणत आहे.

काय तुझे होणार... मानवा....काय तुझे होणार !!

खरेपणाचे मोल न उरले, खोटे अवघे मोठे झाले,
सत्य टेकवी सदैव माथा, दुष्टांचा जयकार.......काय तुझे होणार... मानवा ------- १

ज्ञानी इथले चरणी लोळती, लंपट उठुनी कथा सांगती,
कलीयुगात या भक्त न उरले, देवच झाले फार ....काय तुझे होणार... मानवा ---- २

नीती विकुनी माती खालली, भ्रष्ट होऊनी पुष्ट जाहली,
पैसा एकच धर्म हा उरला, जडला कैसा विकार.....काय तुझे होणार... मानवा ---- ३

न्याय निवाडा इथे मोकळा, बळवंतांनी विकत घेतला,
समाजकंटक ताट मानेंनी, करती स्वैर विहार.....काय तुझे होणार... मानवा ---- ४

dive aagarविडंबन