मांसाहाराची लागलेली चटक कशी सोडवावी?????

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture
टर्बोचार्जड फिलॉसॉफर in जनातलं, मनातलं
30 Nov 2016 - 8:40 pm

तर मंडळी " दिसा माजी काहीतरी ते लिहावे,प्रसंगी अखंडीत वाचीत जावे" असे समर्थ रामदास स्वामींनी सांगुन ठेवले आहे .या उक्तीचा मी पाईक असल्याने रोज काहीतरी हितगुज आपल्याशी करावे असे वाटत राहाते.असो.
तर आजचा विषय आहे नॉन व्हेज .आपल्या सर्वांचा आवडीचा विषय.उत्क्रांतीवादानुसार माणुस हा मिश्र आहारी आहे .तो शाकाहार आणि मांसाहार दोन्ही आवडीने करतो.त्याला मी कसा अपवाद असणार?
जसे मला कळत आहे तेव्हापासुन मि मांसाहाराचा भोक्ता आहे.आम्ही भावंड लहान असताना आठवड्यातून एकदा आमच्या घरी मटण किंवा चिकन शिजायचे.लहाणपणी तिखट सहन होत नसल्याने मी अळणी खायचो.म्हणजे तिखट वजा.पण नळीसाठी मात्र माझा हट्ट असायचा.पुढे वडीलांना हायपरटेंशनचा त्रास सुरु झाल्याने नॉनव्हेज कमी झाले व ति सवय सुटली.

पुढे कॉलेजसाठी मी कोकणात चिपळुणला गेल्यावर मासे खायला सुरवात केली.बांगडा,सुरमई,पापलेट ,कोळंबी,सोडे,मांदेली खेकडे काय काय खाल्ले त्या तीन वर्षात याची मोजदाद ठेवायला गेलो तर डोक्याचं दही होईल.माझ्या मावसंभावाकडे एअरगन असल्याने आम्ही कवडा,ससे इत्यादी मारुन आणायचो व त्यावर ताव मारायचो.कॉलेज संपल्यावर मी सातार्यात परत आलो व शेतीत लक्ष घातले.तिथे माझा एक ग्रुप जमला ,आठवड्यातून एकदा ग्रामिण भागातील एखाद्या धाब्यावर गावरान चिकन,चुलीवरचं मटण खायला आम्ही जायचो.प्रसंगी दारुही प्यायचो.
तर बघता बघता या गोष्टीला आता दहा वर्ष झाली आहेत व मि पुर्णपणे मांसाहाराच्या आहरी गेलो आहे.

मला आता मांसहाराची चटक लागली आहे.आताशा मी ३१ वर्षाचा आहे व वजन आणि तब्येत वाढत चालली आहे.माझे दोन चुलतभाऊ हार्ट पेशंट झाले आहेत.मी ज्या रस्त्याने जात आहे त्याच रस्त्यावर ते गेल्याने एकाला हायपरटेंशन व एकाची ॲँजिओप्लास्टी झाली आहे. मला मांसाहाराशिवाय अलिकडे रोजच्या शाकाहारी पदार्थात इंटरेस्ट राहीलेला नाही.घरी आमटी,भेंडीची भाजी,तोंडलं असल्या भाज्या असतील तर माझे डोके उठते.त्या रोजच्या पोळीभाजीची चव वाटेनाशी झाली आहे.सतत बिर्याणी,चुलीवरचं मटण ,बांगड्याचं कालवण असे काहीतरी डोळ्यापुढे नाचत रहाते.याचा परिणाम असा झाला आहे की मी सतत बाहेर मांसाहार करायला जातो.याचा अर्थात खिश्यावरही ताण पडायला लागला आहे.मांसाहार कमी करण्याचे अनेक प्रयत्न झाले ,पण लौकीक अर्थाने हे व्यसन समजले जात नसल्याने मी फारसे मनावर घेतले नाही.नेहमीप्रमाणे माझे काही प्रश्न आहेत.
१. तुम्हाला मांसाहाराचे व्यसन आहे का?
२. असल्यास तुम्ही ते कमी कसे केले?
३. मला असलेली मांसाहाराची चटक बायलॉजीकल इन्स्टींक्ट आहे की सायकोलॉजिकल?
४. रोजच्या पोळीभाजी आहारात परत इंटरॅक्शन कसे वाढवावे?
५. सध्या नॉर वगैरेचे मसाले मिळत आहेत ,त्याने रोजच्या जेवणाची चव वाढते असा दावा ते करतात,यात कितपत तथ्य आहे? हे रेडीमेड मसाले सेफ आहेत का?
धन्यवाद.

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

तुमचा अवतार संपायची वेळ झाली आहे.

संदीप डांगे's picture

30 Nov 2016 - 8:55 pm | संदीप डांगे

हेच म्हणायला आलो होतो, घटिका समीप आली आहे.

तब्येत वाढते आहे म्हणजे नेमकं काय वाढतंय?

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

30 Nov 2016 - 11:04 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

आचरटपणा

अतिशय भित्रट स्वभाव व अतिशय हळवेपणा. +कवडा,ससे इत्यादी मारुन आणायचो व त्यावर ताव मारायचो==व्यवहार ज्ञान नाही,डोके कुठेच चालत नाही

बरखा's picture

1 Dec 2016 - 1:28 pm | बरखा

+१

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

30 Nov 2016 - 8:57 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

I think misalpav has no restrictions over how much thread one should open.if someone relates to my thread he would definitely reply with sincerity. one shall not bother ,if my thread irritates someone ,I highly apologize.

सूड's picture

30 Nov 2016 - 8:58 pm | सूड

ऑच्चं जॉल्लं तल!!

माम्लेदारचा पन्खा's picture

1 Dec 2016 - 12:58 pm | माम्लेदारचा पन्खा

If you trouble the trouble,the trouble will trouble you !

पगला गजोधर's picture

30 Nov 2016 - 9:13 pm | पगला गजोधर

टफीजी,
तुम्ही जैन धर्म स्वीकारा, आणि अहिंसा, अनेकांतवाद, अपरिग्रह व्रते कसोशीने आचरणात आणा. त्यामुळे तुमचे सध्याचे व भविष्यात संभावणार्या समस्या शमतील.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

30 Nov 2016 - 9:47 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

मी नॉन रिलीजस माणुस आहे .कोणत्याच धर्मावर विश्वास नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

30 Nov 2016 - 11:37 pm | अत्रुप्त आत्मा

ब्रम्हकपटी~टनाटनी व्हा! =)) मंजे मग वाट्टेल त्या धर्मावर विश्वास बसेल. ;)

चित्रगुप्त's picture

30 Nov 2016 - 9:38 pm | चित्रगुप्त

.

मारवा's picture

30 Nov 2016 - 9:49 pm | मारवा

?

मारवा's picture

30 Nov 2016 - 9:52 pm | मारवा

हस्तक्षेपजन्य पातळीवर धागा आणि प्रतिसाद आलेले आहेत.
बघावे ही विनंती

पुंबा's picture

30 Nov 2016 - 9:53 pm | पुंबा

+11

खटपट्या's picture

30 Nov 2016 - 10:36 pm | खटपट्या

मांसाहार हा हवाच, त्यात चटक लागण्यासारखे काय आहे? जर तुम्हाला रोज मांसाहार घ्यावासा वाटत असेल तर घ्या. फक्त मसालेदार कींवा तळलेला घेउ नका. परदेशात रोज मांसाहार घेणारे आहेतच. चिकन रोज उकडून मीठ टाकून खाल तर काहीच प्रोब्लेम नाही. त्याबरोबर पोळी, भात खाउ नका. नियमीत व्यायाम करुन खाललेले अन्न पचवण्याचा प्रयत्न करा.
काहीच जमले नाही तर डॉक्टर कींवा आहारतज्ञाला भेटा.

उद्या मला रोज वडापाव खावासा वाटतो म्हणून त्यावर उपाय काय म्हणून मी धागा काढू का ?

संदीप डांगे's picture

30 Nov 2016 - 10:57 pm | संदीप डांगे

यार, तुम आदमी हो या पाजामा? ह्या प्रश्नाचा अर्थ काय?

अण्णांचा आळेफाट्यावरुन णिशेध!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Nov 2016 - 11:09 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सल्ला दिला असता पण सद्ध्या 38114हा प्रश्ण तुर्तास तोडीस लावा मग बाकीचे गहन (अक्षरांची उलटापालट केलीत तरी हरकत नाही.) प्रश्ण विचारा कसं?

असेल तर ती जित्याची खोड आहे. ती कशी जाणार?

राजेश घासकडवी's picture

1 Dec 2016 - 12:23 am | राजेश घासकडवी

मला वाटतं, 'जिलब्या पाडण्याची लागलेली चटक कशी सोडवावी?????' हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे.

चित्रगुप्त's picture

1 Dec 2016 - 1:18 am | चित्रगुप्त

१. तुम्हाला मांसाहाराचे व्यसन आहे का?.........नाही.
२. असल्यास तुम्ही ते कमी कसे केले?.........लागू नाही.
३. मला असलेली मांसाहाराची चटक बायलॉजीकल इन्स्टींक्ट आहे की सायकोलॉजिकल? ..........तुमच्या वृत्ती मोकाट सुटल्या आहेत, त्यांना आवर घालणे फक्त तुमच्याच हातात आहे. त्यासाठी योगाभ्यास करा. उगा 'बायलॉजीकल इन्स्टींक्ट' वगैरे बौद्धिक उहापोहात पडू नका. हेच तुमच्या अन्य समस्यांचेही उत्तर आहे.
४. रोजच्या पोळीभाजी आहारात परत इंटरॅक्शन कसे वाढवावे?........प्रत्यक्ष खाऊन. स्वतः बनवून खाल तर जास्त चांगले.
५. सध्या नॉर वगैरेचे मसाले मिळत आहेत ,त्याने रोजच्या जेवणाची चव वाढते असा दावा ते करतात,यात कितपत तथ्य आहे? हे रेडीमेड मसाले सेफ आहेत का?.............पॅकेटबंद मिळणारा कोणताही अन्नपदार्थ वर्ज्य, हा नियम पाळणे सर्वात उत्तम. ताज्या भाज्या, फळे तुमच्या शेतात स्वकष्टाने उगवा, त्यांची प्रेमाने जोपासना करा, त्यांच्या रंग-गंध-स्वादाचा आनंदाने आस्वाद घ्या ... हे समाधान फार मोठे वरदान ठरेल.

सुज्ञ's picture

1 Dec 2016 - 1:23 am | सुज्ञ

कशाला सोडताय सवय ?

गामा पैलवान's picture

1 Dec 2016 - 2:10 am | गामा पैलवान

टफि,

मांसाहारी मसाल्यात शाकाहारी अन्न शिजवून पहा. हळूहळू जमेल. उदा. : मटणाच्या मसाल्यात वांग्याची भाजी मस्त होते.

आ.न.,
-गा.पै.

आमचा शेजारी 'कबाब मे हड्डी' ह्या अर्थाने 'मटणात वांगी' असे म्हणायचं त्याची आठवण झाली.

टवाळ कार्टा's picture

1 Dec 2016 - 5:12 am | टवाळ कार्टा

उत्तम माहितीपूर्ण धागा...दुनियेला मारा फाट्यावर...तुम्ही काढा हो धागे....वाचणारे वाचतात जे आवडते ते...अश्यानेच तुमचा भिडस्त स्वभाव जाईल

नावातकायआहे's picture

1 Dec 2016 - 6:08 am | नावातकायआहे

अश्यानेच तुमचा भिडस्त स्वभाव जाईल

अनन्त अवधुत's picture

1 Dec 2016 - 7:34 am | अनन्त अवधुत

पण त्यासाठी आधी भित्रेपणा आणि हळवेपणा सोडावा लागेल.

अनन्त अवधुत's picture

1 Dec 2016 - 7:35 am | अनन्त अवधुत

पण त्यासाठी आधी भित्रेपणा आणि हळवेपणा सोडावा लागेल.

लालगरूड's picture

1 Dec 2016 - 8:19 am | लालगरूड

मिसळपाव ची वाट लावली BC

मी आज आत्तापासून टफि उर्फ टॉफि यांच्या सार्‍या धाग्यांवर बहिष्कार घालत आहे.

टवाळ कार्टा's picture

1 Dec 2016 - 9:43 am | टवाळ कार्टा

खिक्क, आचार्य बाबा बर्वे आठवले

बाळ सप्रे's picture

1 Dec 2016 - 12:20 pm | बाळ सप्रे

मांसाहार हे व्यसन नव्हे.. तरीपण सवय सोडवायची असल्यास.. ४-५ दिवस केवळ मांसाहारी पदार्थ समोर ठेवा.. फक्त मांसाहार करायचा..अति खा.. गळ्याशी येइ पर्यंत खा.. तडस लागेपर्यंत खा.. अति झालं की तुम्हाला कंटाळा येइलच.. ref..रामदास स्वामींची खीरीची गोष्ट

प्रदीप's picture

1 Dec 2016 - 12:38 pm | प्रदीप

थोडा खर्चिक आहे, पण अगदी आचच असेल, तर करून पहावा.

आग्नेय आशियात जावे-- म्यानमार, व्हिएतनाम अशा कुठल्याही देशात जावे. तेथील प्रमुख शहरांच्या बाजारपेठांतून व्यवस्थित, घाई न करता फेरफटका मारावा. विशेषतः मांस विक्री करणारी दुकाने आहेत, तिथे विशेष रेंगाळावे. तिथे लटकावून अथवा टोपलीतून ठेवलेल्या पदार्थांबद्दल विक्रेत्यांकडे नीट चौकशी करावी. साधेच- म्हणजे चिकन वगैरे- असेल तर त्याकडे लक्ष देऊ नये. पण इतर काहीही असेल-- कुत्रे, साप, वगैरे, वगैरे-- तर ते नक्की घेऊन खाऊन पहावे.

ह्या पहिल्या पायरीत मांसाहाराविषयी मन विटले नाही, तर दक्षिण चीनमधे ग्वांगदाँगच्या कुठल्याही गावांत अथवा शहरात जावे. वरील्प्रमाणेच करावे, इथे तर अगदी चिकनपासून सुरूवात करावी. चिकन- फीट खाऊन बघावे. प्रत्य्येक पदार्थ नीट चवीन चाखून पहावा, त्याचा 'आनंद' लुटता आला तर घ्यावा. येथे मिळणारे बरेचसे काही अर्धवट शिजवलेले असते, तेव्हा त्याची 'मूळ' चव लागेल, ती कशी आहे ते अनुभवावी. चिकनपासून सुरूवात करून मग साप, सापाचे गॉल ब्लॅडर घातलेले त्याचे रक्त, वाघाचे शिस्न, माकडाचा मेंदू, डुक्कराचे आतडे,कुत्रे, रानमांजरे इत्यादींचे मांस, त्यातील सर्व भागांसकट मिळते ते खाऊन पहावे. इथले वैशिष्ट्य हे की सगळे ताजे, ताजे मिळते, तुमच्या समोरच जनावरास मारण्याचा विधी केला जातो (वाघ, डुक्कर सोडून-- ते अगोदर मारून त्याचे भाग आणून ठेवलेले असतात; नाईलाज आहे) व तुमचे खाद्य सर्व केले जाते. दुसरे प्राण्याचे सर्व भाग खाण्यासाठी वापरले जातात.

हे सगळे केल्यावर खालीलपैकी एक काहीतरी होण्याची शक्यता आहे:

* पहिली: तुम्ही सहीसलामत, धडधाकट परत घरी जाल, पण तुमची मासाहाराची संवय गेलेली असेल.
* दुसली: तुम्हाला लवकरच बर्ड फ्यू अथवा सार्ससारकेह काहीतरी होईल. त्यातून जगला वाचलात तरी असले धागे काढण्याइतके बळ तुमच्यात मग रहाणार नाही. तुम्हीही सुटाल, आम्ही मिपाकरही!

संजय पाटिल's picture

1 Dec 2016 - 12:52 pm | संजय पाटिल

=))=))

गामा पैलवान's picture

1 Dec 2016 - 1:01 pm | गामा पैलवान

प्रदीप,

या उपायात एक धोका आहे. जर टफि जीवघेणा आजार न होता सहीसलामत परत आले तर त्यांच्या नवसामर्थ्यामुळे मिपाची काय हालत होईल!

आ.न.,
-गा.पै.

प्रदीप's picture

1 Dec 2016 - 2:10 pm | प्रदीप

हो, ते आहेच!

साप , बेडुक, डुक्कर, मगर मस्त लागते...

Nitin Palkar's picture

3 Dec 2016 - 9:21 pm | Nitin Palkar

शिजवलेलं कुठे मिळेल ते सांगा.......

कैलासवासी सोन्याबापु's picture

1 Dec 2016 - 1:22 pm | कैलासवासी सोन्याबापु

चांगल्या सवयी सोडू नये...

(आले रश्यात हाडूक का फोड तिच्यायला संघटना राष्ट्रीय सचिव) बाप्या मांसाहारी

याॅर्कर's picture

1 Dec 2016 - 1:57 pm | याॅर्कर

बोकडाचे स्वच्छ धुतलेले मटण तसेच चिकन व्यवस्थित शिजवून एका मर्यादेपर्यंत खाल्ल्यास काही होणार नाही,म्हणजे व्यसनच लागलं असेल तर रोज दोनच फोडी खाव्यात किंवा आठवड्यातून एकदा खाण्याचा प्रयत्न करावा तसेच मसालाविरहित हळद लावून उखडलेले/शिजवलेले चिकन रोज खाल्ले तरी चालेल पण तितकाच व्यायामही हवा.

(अखिल भारतीय तांबडा-पांढरा वरपिंग संघटना-अध्यक्ष)

बोका-ए-आझम's picture

1 Dec 2016 - 6:58 pm | बोका-ए-आझम

पण असले धागे आवरा.
- (आले रश्यात हाडूक का फोड तिच्यायला संघटना संस्थापक उपाध्यक्ष ) बोका सर्वाहारी

प्रसाद गोडबोले's picture

1 Dec 2016 - 2:06 pm | प्रसाद गोडबोले

कॉलेज संपल्यावर मी सातार्यात परत आलो

सातार्‍यात म्हणजे नक्की कुठे ? किती साली ? असो.

उरमोडी जलाशयाच्या किनारी असलेल्या तेजस फार्महाऊस ला एकदा मटन भाकरी खायला या . किंव्वा मग नितीराज मालवणी ढाबा अफलातुन मालवणी मटण , खुद्द मालवण मध्येही मिळणार नाही इतके भारी ! सुर्वे प्युअर नॉनव्हेज हॉटेल तर सुप्रसिध्द आहेच .

किंव्वा मग असं करुयात का , सरळ नाक्यावरुन २-४ किलो मटन घेवु , भाकर्‍या पार्सल घेवु , मसाला तयार करुन मिळतोच, कासला जाऊन आपणच बनवुन खाऊयात चुली वर !

तात्पर्य काय तर , नॉनव्हेजच्या बाबतीत नो एक्स्क्युज ! चवीने खाणार त्याला देव देणार !

आपला विनम्र

सीझर मार्कस ऑरेलियस अ‍ॅन्टोनियस ऑगस्टस्
Vi Veri Veniversum Vivus Vici

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

1 Dec 2016 - 2:20 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

सातार्यात २००६ साली परत आलो.नीतीराज मालवणि ढाबा कुठय? मालवणी बरोबर तांदळाची भाकरी हवी ,त्याशिवाय मज्जा नाही.

प्रसाद गोडबोले's picture

1 Dec 2016 - 2:56 pm | प्रसाद गोडबोले

नीतीराज

जुन्या हायवेच्या , एसएच ५८ च्या बाजुला , रामनगर वर्ये अरीयात ! तिथे तांदळाची भाकरी मिळत नाही , पण मटनला तोड नाही ! मला परसनली मालवणी मटन सोबत नीर डोसा खायला आवडतो , पण आता तेवढ्यासाठी मुंबैला कोण जाणार ?

प्रसाद गोडबोले's picture

1 Dec 2016 - 3:05 pm | प्रसाद गोडबोले

अर्थात हे सगळे सांगण्याचा उद्देश म्हणजे ...

आपण आपले स्वतःचे चवीचे आवडी निवडीचे स्टॅन्डर्ड्स अतिषय उच्च पातळीवर नेऊन ठेवले की कोणतेही व्यसन सुटण्यास सोप्पे जाते , उदाहरणार्थ नीतीराज सारखे अफलातुन मालवणी मटन अजुन तरी मला अन्यत्र कोठेच मिळाले नाही त्या मुळे अन्यत्र खाणयाचे आपोआप टाळले जाते , कोल्हापुरीसाठी राजवर्धन , बिर्याणीसाठी हैद्राबादी हौस , घरगुती मटन साठी तेजस फार्म हाऊस , हे अशा प्रकारे आपल्या हुच्चब्रु आवडी फिक्स झाल्या की नॉनव्हेजचे व्यसन आपोआप सुटेल !

अवांतर : पुण्यामध्ये आपल्या सातार्‍याचे सुर्वेज प्युअर नॉनव्हेज सुरु झालंय एफ.सी रोड ला , कधी जायचं बोला ?

पगला गजोधर's picture

1 Dec 2016 - 3:47 pm | पगला गजोधर

मार्कसजी
एक डौट विचारू का ?

उदाहरणार्थ नीतीराज सारखे अफलातुन मालवणी मटन अजुन तरी मला अन्यत्र कोठेच मिळाले नाही त्या मुळे अन्यत्र खाणयाचे आपोआप टाळले जाते

तुम्ही अन्यत्र कुठे मटण खाल्लं तरच तर, तुम्हाला ते 'नीतीराज सारखे अफलातुन मालवणी मटन'
आहे की नाही, ते कळणार नं ? मग खाणे कमी कसे होईल ?
उलटपक्षी जसं जसं तुम्हाला तसे मटण मिळणार नाही, तसं तसं तुम्ही जोमाने धुडांळत फिरणार नं ?
म्हणजे मटण खाणे वाढणार ? शिवाय तुम्हाला मनासारखे मटण न मिळाल्याने, तुम्ही थोडेसे
निराश होऊ शकता, मग निराश माणूस अजून खाण्यावर भर देतो (निराशा = जास्त खाणे, हे कुठेतरी वाचलंय, पण संदर्भ देता येत नाहीये)

प्रसाद गोडबोले's picture

1 Dec 2016 - 3:54 pm | प्रसाद गोडबोले

विश्वासार्ह सुत्रांकडुन एकदम ऑथेन्टिक फीडबॅक आल्याशिवाय मी शक्यतो नवीन हॉटेलात जात नाही आणि गेलोच तर मटन खात नाही !

तरीही नवीन हॉटेलात गेलोच आणि नॉनव्हेजच खायचे असेल तर आधी चिकन टेस्ट करावे , (आमचे आपले उगाचच असे एक हायपॉथेसीस आहे की) सहसा ज्याला चिकन चांगले बनवता येत नाही त्याला मटन मासे पोर्क बीफ इत्यादी इत्यादी बनवता येणे जवळपास अशक्य असते !

जाहिरात : मिसळपाव वरील काही ऑथेन्टिक फीडबॅक हवे असतील तर आमच्या ह्या http://www.misalpav.com/node/32722 धाग्यावर चक्कर टाकावी :)

पगला गजोधर's picture

1 Dec 2016 - 4:16 pm | पगला गजोधर

धन्स

:)

बोका-ए-आझम's picture

1 Dec 2016 - 6:56 pm | बोका-ए-आझम

ही सगळी नवी माहिती तिथे द्या की.हा धागा बुकमार्क करायची इच्छा नाही.

संदीप डांगे's picture

3 Dec 2016 - 10:12 pm | संदीप डांगे

नळी फोडून समर्थन!!!

बबन ताम्बे's picture

1 Dec 2016 - 2:09 pm | बबन ताम्बे

आख्खे हाडूक गिळून पहावे किंवा पापलेट काट्यासकट खावून पहावा.

सुचना : हा फक्त विनोद करण्याचा क्षीण प्रयत्न केला आहे. तुमचे असले धागे वाचून असा समज झाला आहे की तुम्ही हे असले उपाय अमलात आणु शकाल. कृपया हा उपाय करून स्वतःला अपाय करू नये . त्यापेक्षा तुमच्या लेखांनी मिपावाचकांना अपाय झालेला परवडेल.

श्रीगुरुजी's picture

1 Dec 2016 - 2:58 pm | श्रीगुरुजी

नानासाहेब,

एक काम करा. एखाद्या खाटकाच्या दुकानात जाऊन उभे राहून तो ब़ळजबरीने एखाद्या बोकडाला, मेंढीला कसा जिवंतपणी मारतो ते पहा. त्यांच्या गळ्यावर सुरा फिरविल्यावर तो प्राणी कसा केविलवाण्या आवाजात जीवाच्या आकांताने ओरडतो ते कान भरून ऐका. नंतर त्यांच्या शरीरातून रक्ताच्या चिळकांड्या उडताना तो प्राणी अंगाला कसे झटके देत पळायचा प्रयत्न करतो ते पहा. थोड्या वेळाने तो प्राणी झटके देत मेल्यावर खाटिक त्यांची कातडी कशी सोलून काढतो ते पहा. कातडी सोलल्यावर आतले मांस कसे दिसते ते डोळे भरून पहा. तो मांस कसा सोलतो, मासांचे कसे तुकडे करतो, हाडे कशी वेगळी करतो ते पहा. सोललेल्या मांसाचा व वाहणार्‍या रक्ताचा नाकपुड्या भरून सुगंध नाकात साठवा. रक्ताचे वाहणारे लोट पहा. नंतर तेच मांस घरी घेऊन जा आणि मटण शिजवून ते गट्टम करा.

बघा एका दिवसात तुमची चटक संपुष्टात येती का नाही ते.

प्रसाद गोडबोले's picture

1 Dec 2016 - 3:44 pm | प्रसाद गोडबोले

टर्बोचार्ज्डराव ,

खाटकाच्या दुकानात जाऊन उभे राहून बोकड कापला जात असताना हा श्लोक आठवावा म्हणजे मांसखाण्याची चटक संपुष्टात येत नाही

मा त्वा॑ तपत्प्रि॒य आ॒त्मापि॒यन्तं॒ मा स्वधि॑तिस्त॒न्व१॑आ ति॑ष्ठिपत्ते ।
मा ते॑ गृ॒ध्नुर॑विश॒स्ताति॒हाय॑ छि॒द्रा गात्रा॑ण्य॒सिना॒ मिथू॑ कः ॥ २० ॥

मा त्वा तपत् प्रियः आत्मा अपिऽयंतं मा स्वऽधितिः तन्वः आ तिस्थिपत् ते ॥
मा ते गृध्नुः अविऽशस्ता अतिऽहाय छिद्रा गात्राणि असिना मिथु करिति कः ॥ २० ॥

( हे अश्वा ) तूं इहलोक सोडून जाते वेळी तुझ्या प्राणाला यातना न होवोत, व कापणाराची सुरी तुझ्या मानेंत कुचंबून न राहो. कापणारा अडाणीपणानें एखाद्या गिधाडाप्रमाणें तुझी गात्रें आपल्या सुरीनें भलत्याच ठिकाणी तोडतोडून खराब न करोत. ॥ २० ॥
-ॠ-१-१६२-२०

हे खरे तर घोड्याला उद्देशुन आहे पण घोड्याआधी बकर्‍याचा बली द्यायचा असतो , त्यामुळे सेम मंत्र चालायला हरकत नाही ...

वढ तु नळी

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ

याॅर्कर's picture

1 Dec 2016 - 5:06 pm | याॅर्कर

=(( =((

alokhande's picture

1 Dec 2016 - 4:07 pm | alokhande

I'm from Satara

टफी साहेबांचे पुढील धागे खालीलप्रमाणे...

दारूचं व्यसन कस सोडवावं?
बायांचा नाद कसा सोडवावा ??
जुगाराची सवय कशी सोडवावी???
तंबाखूची तल्लब कशी सोडवावी????

तरी सर्व मिपाकरांनी वरील संभाव्य धाग्यांसाठी आप - आपल्या संभाव्य प्रतिक्रिया तयार ठेवाव्यात किंवा वरील शीर्षक विडंबनासाठी कच्चा माल म्हणून वापरले तरी चालेल.

ही समस्या माझीसुद्धा आहे. मांसाहार खाऊन वजन वाढते व त्यासाठी शाकाहारी खावे तर ते आवड़त नाही किंबहुना ते जमत नाही त्यामुळे परिणामी वजन वाढतच जाते.
मला वाटते पनीर, दही, ताक लस्सी या गोष्टी खाऊन आपण मांसाहारीचे व्यसन कमी करू शकतो कारण ताक प्यायल्यावर मासे खावेसे वाटत नाही असा मला अनुभव आहे. वजन कमी करण्याची तीव्र इच्छा असेल तरच तुम्ही मांसाहार कमी करून हळूहळू शाकाहारी बनू शकता.

झपाटलेला फिलॉसॉफर's picture

3 Dec 2016 - 8:21 pm | झपाटलेला फिलॉसॉफर

माझ्या माहितीनुसार कल्पक आणि हौशी सुगरण / शेफ असेल तर व्हेज मध्ये इतके अनन्त प्रकारचे चविष्ट पदार्थ बनवता येतात की अन्डे किंवा मांसाहाराचा विचारदेखील करण्याची वेळ येवू नये

Nitin Palkar's picture

3 Dec 2016 - 8:52 pm | Nitin Palkar

भौ, असं एसेस्सीला नापास झाल्यावणी का बोलताय? ‘चटक’ ऐवजी “आवड” हा शब्द वापरा. वजन कमी व्हायला लगेच सुरुवात होईल.
‘पचेल ते खावे, रुचेल ते बोलावे ...’ असं कुणीसं म्हटलेलं आहे. तसंही एकतीस म्हणजे काही फार वय नाही. अजून वीस वर्षं जे वाटेल ते बेगुमान करा, काळज्या करत राहू नका. स्वतःच्या सर्व जबाबदाऱ्या योग्य रीतीने पर पाडण्यात अजिबात हयगय करू नका. सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःला अजिबात अपराधी समजू नका.
कधीतरी आम्हालाबी बोलवा .....

पैसा's picture

3 Dec 2016 - 10:02 pm | पैसा

म्हणून तुम्ही मिपाकरांचा भेजाफ्राय करता काय!

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

3 Dec 2016 - 10:04 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार.

स्थितप्रज्ञ's picture

4 Dec 2016 - 11:04 pm | स्थितप्रज्ञ

youtube वर Farm to Fridge असे सर्च करा आणि एक विडिओ येईल (लिंक खाली देत आहे) ती बघा. मांसाहार करायची इच्छा कमी होईल.

हीच ती लिंक
Farm to Fridge