कदंब

Primary tabs

प्राजु's picture
प्राजु in जे न देखे रवी...
21 Nov 2016 - 9:52 pm

सळसळणारी हिरवळ देही, विस्तीर्णाचे पान
समांतराचा ध्यास उराशी, सममितीचे भान

हिरवट पिवळे, तांबूस लोलक, नाजुक इवली फुले
वार्‍यावरती सरसरणारे , गंधविभोरी झुले

हिरवाईवर तांबूस हळदी, केसर भरले तुरे
चेंडूवरती कशिदाकारी, रुणझुणती गोपुरे

कृष्णासखा की म्हणू कदंब, रूप तुझे भरजरी
पानोपानी जणू वाजते कान्हाची बासरी

अवतीभवती पिंगा घालत भ्रमरांची लीला
मोह वाटुनी सोडून येई आम्रतरु कोकिळा

रुंद–अरुंदशा हिरवाईची दाट तुझी सावली
शांत असा विश्रांत जीवाला, स्मरते मज माऊली
- प्राजु


सदर फोटो जालावरुन साभार.

कधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीकविता

प्रतिक्रिया

सुंदर कविता. झाडा-फुलांवरची कविता वाचली की मला इंदिरा संत यांची 'बाभळी' ही कविता आठवते. त्याच नादमय गेयतेत लिहिलेली ही कविता. आवडली.

कविते खाली इमेज दिसणार नाही का?

त्या दुव्यात खुप इमेजेस आहेत. एक इमेज चा दुवा द्याल का? मी अपडेट करुन टाकते.

प्राजु's picture

21 Nov 2016 - 10:59 pm | प्राजु

तुला त्यात आवडेल ती टाक.

स्रुजा's picture

21 Nov 2016 - 10:49 pm | स्रुजा

आणि कविता आवडली .. तुमच्या मिपावरच्या सेकंड इनिंगला शुभेच्छा :)

चांदणे संदीप's picture

21 Nov 2016 - 11:33 pm | चांदणे संदीप

लयीत सारं काही असल की कविता अजूनच खुलते आणि तशीच ती मला जास्त भावते. कविता आवडलेली आहे!

Sandy

पद्मावति's picture

21 Nov 2016 - 11:47 pm | पद्मावति

मस्तं. आवडली.

शार्दुल_हातोळकर's picture

22 Nov 2016 - 12:06 am | शार्दुल_हातोळकर

अरे वा !! मस्तच हो....

खटपट्या's picture

22 Nov 2016 - 2:20 am | खटपट्या

खूप छान कविता.

रेवती's picture

22 Nov 2016 - 2:39 am | रेवती

कविता आवडली.

अरे ! २ इमेजेस आल्या. अजुन पण कुणी सासं ने टाकली वाटतं.

कविता आवडली. मला मिसळपाव.कॉम बद्दल तुमच्यामुळेच माहीत पडले, पुन्हा सक्रीय झाल्याचे पाहून आनंद वाटला :)

मदनबाण's picture

22 Nov 2016 - 6:21 am | मदनबाण

हिरवट पिवळे, तांबूस लोलक, नाजुक इवली फुले
वार्‍यावरती सरसरणारे , गंधविभोरी झुले

मस्त...
कदंब म्हणजे संत्र्याला मोड आल्या सारखं दिसतं बाँ... ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- haye mera dil - alfaaz ft honey singh - official full video

प्राची अश्विनी's picture

22 Nov 2016 - 6:50 am | प्राची अश्विनी

क्या बात! मनात रुंजी घालणारी कविता!!

नाखु's picture

22 Nov 2016 - 9:00 am | नाखु

कदंबाचे झाड पुण्यात कुठे आहे ?

मंजूताई's picture

22 Nov 2016 - 9:25 am | मंजूताई

खूप छान कविता !

प्रीत-मोहर's picture

22 Nov 2016 - 9:27 am | प्रीत-मोहर

प्राजुताई वेलकम बॅक!!

प्रीत-मोहर's picture

22 Nov 2016 - 9:27 am | प्रीत-मोहर

प्राजुताई वेलकम बॅक!!

कृष्णासखा की म्हणू कदंब, रूप तुझे भरजरी
पानोपानी जणू वाजते कान्हाची बासरी

सुरेख.

बाजीप्रभू's picture

22 Nov 2016 - 10:14 am | बाजीप्रभू

मस्तं. आवडली.

जव्हेरगंज's picture

22 Nov 2016 - 10:56 am | जव्हेरगंज

मस्त आहे कविता!!
पुन्हा एकदा शाळेत गेल्यासारखं वाटलं!

सानझरी's picture

22 Nov 2016 - 11:29 am | सानझरी

सुंदर कविता.. वाह!!!

खेडूत's picture

22 Nov 2016 - 11:39 am | खेडूत

कविता आवडली.
अजून वाचायला आवडतील..

पिशी अबोली's picture

22 Nov 2016 - 11:51 am | पिशी अबोली

मस्त, सुंदर! कदंब उभा राहिला डोळ्यांसमोर. :)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

22 Nov 2016 - 11:51 am | मिसळलेला काव्यप्रेमी

खुप दिवसांनी वाचतोय प्राजुतै तुमची रचना.. व्वाह.. सुंदर

कृष्णासखा की म्हणू कदंब, रूप तुझे भरजरी
पानोपानी जणू वाजते कान्हाची बासरी

हे तर.. मार डाला...

संजय पाटिल's picture

22 Nov 2016 - 12:25 pm | संजय पाटिल

सुंदर कविता..

पैसा's picture

22 Nov 2016 - 1:54 pm | पैसा

सुंदर, नादमय कविता. "ऐलतटावर पैलतटावर" सहज आठवली. इतकी सुरेख झाली आहे!

कवि मानव's picture

22 Nov 2016 - 5:58 pm | कवि मानव

छान नादमय !!

तुमची दुसरी कविता सुद्धा वाचली.... वाचून वाटलं
की तुमच्याकडे शब्दसाठा खूप छान आहे.

मला असल्या कविता आवडतात आणि मी माझ्या कविता सुद्धा अश्याच मांडायचा प्रयत्न करतो.

पद्मश्री चित्रे's picture

26 Nov 2016 - 4:18 pm | पद्मश्री चित्रे

अप्रतिम शब्दचित्र

रातराणी's picture

5 Dec 2016 - 5:06 pm | रातराणी

!!! सुरेख !

चतुरंग's picture

7 Dec 2016 - 8:24 pm | चतुरंग

आमचं गिफ्ट रॅप इथे आहे! ;)

-रंगा

किसन शिंदे's picture

8 Dec 2016 - 10:55 am | किसन शिंदे

मस्त आहे कविता

बरखा's picture

8 Dec 2016 - 12:33 pm | बरखा

मस्त आहे कविता. आवडली

दमामि's picture

10 Dec 2016 - 11:07 am | दमामि

वा!!!!

vikrammadhav's picture

12 Dec 2016 - 1:10 pm | vikrammadhav

अतिशय सुंदर कविता !!!

विवेकपटाईत's picture

13 Dec 2016 - 7:29 pm | विवेकपटाईत

मनाला भावली. अति सुंदर