विज्ञानकथा आहेत का कुठे?

kool.amol's picture
kool.amol in जनातलं, मनातलं
1 Nov 2016 - 12:48 am

मराठी माणसाने विज्ञान क्षेत्रात एक ठसा उमटवला आहे.राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले वैज्ञानिक हि मराठी परंपरा.विज्ञानकथा हा प्रांत मराठीला तसा चांगलाच परिचयाचा आहे. इथे देखील आपला ठसा हा बऱ्यापैकी ठळक म्हणावा असाच. जयंत नारळीकर,निरंजन घाटे, बाळ फोंडके यांनी विज्ञान लेखनाला चांगले दिवस आणले. पण हि परंपरा कुठेतरी थिजली आहे असे वाटते. मराठी साहित्यातील हा रंग फिकट होतो आहे असे नाही का वाटत? दिवाळी अंकातदेखील अगदी मोजकच म्हणता येतील इतक लिखाण पण दिसत नाही. काय कारण असावीत या परिस्थितीला?

विज्ञानप्रकटन

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

1 Nov 2016 - 12:56 am | अभ्या..

काय कारण असावीत या परिस्थितीला?

आळस

जयन्त बा शिम्पि's picture

1 Nov 2016 - 9:26 pm | जयन्त बा शिम्पि

https://archive.org/search.php?query=science%20stories येथे विज्ञान कथा मिळतील. पण इंग्रजीमध्ये

साहना's picture

1 Nov 2016 - 10:24 pm | साहना

आमच्या bookstruck.in ह्या संकेत स्थळावर आणि मोबाईल अँप मध्ये आपल्याला काही विज्ञान कथा सापडतील.
१. अग्निपुत्र
२. जलजीवा
३. पुन्हा नव्याने सुरुवात

ह्या तीन कथा विशेष सुप्रसिद्ध आहेत.