आदित्य कोरडे ह्यांनी ह्या विषयावर हा धागा काढला. त्यांना दुर्दैवाने प्रक्रियेत आलेला अनुभव हा नक्कीच चांगला न्हवता. आम्ही २०१३ मध्ये मूल (मुलगी) दत्तक घेतली तेव्हा आम्हाला आलेला अनुभव मात्र निश्चितच चांगला होता (काही थोडे सरकारी विलंब वगळता), म्हणून हि लेखमाला लिहितोय.
ह्याचा उद्देश, आम्ही काही जगा वेगळे केले, किंवा इतर कुठलाही नाही, तर आम्हाला मिळालेले मार्गदर्शन, सल्ले आणि आलेले अनुभव इतरांशी शेयर करून, त्यांना त्यातून प्रोत्साहन आणि योग्य दिशा मिळवी एवढाच हेतू आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
"Sir, you please stand back. Ma'am, are you okay? Are you hurt? Did anyone hurt you?"
२००४ च्या सप्टेंबर महिन्याच्या एका वीकांताच्या रविवारी, ९११ ची ऍम्ब्युलन्स आमच्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्स च्या खाली येऊन थांबलेली. बायको असाह्य वेदनेने लिविंग रूम च्या कार्पेट वर पडलेली, आणि ऍम्ब्युलन्स बरोबर आलेला कॉप (पोलीस मामा), मला अडवून, तिची चौकशी करत होता! [आता हसू येतं, पण त्या क्षणी तिने माझ्याकडे नुसतं बोट जरी दाखवलं असतं, तर त्या आडदांड कॉप ने मला सहज लोळवून आत टाकला असता.]
आलेल्या पॅरा-मेडिक्स ने तिची प्राथमिक तपासणी करून, तिला लगेच ऍम्ब्युलन्स मधून नेले. मी माझी गाडी काढून, ऍम्ब्युलन्स च्या मागे सुसाट वेगाने हॉस्पिटल कडे निघालो!
मंडळी, हि गोष्ट आहे, मी आणि बायको अमेरिकेत असतानाची. बायको त्यावेळेस साधारण २२ आठवडे गरोदर होती, तेव्हाची. आदल्या दिवशी ,म्हणजे शनिवारी, मी आणि बायको पान गळतीचा ऋतू (फॉल सिझन) आहे म्हणून जवळच्याच एका पार्क मध्ये फॉल कलर पाहायला गेलेलो. छान फिरुन, ब्रंच बाहेरच करून घरी परत आलेलो. दुसऱ्या दिवशी, मित्रांनी अजून एका जरा दूरवरच्या पार्कला येताय का म्हणून आम्हाला विचारलं, आम्ही आनंदाने तयार झालो. तिथे सुद्धा आम्ही फिरलो, पण हीच चूक आम्हाला आयुष्यभर आठवण करून देणारी घटना देऊन गेली! घरी आल्यावर बायकोला प्रचंड घाम, आणि पोटात वेदना होऊ लागल्या! (त्या वेदना म्हणजे अवकाळी आलेले कॉन्ट्रक्शन्स होते, हे नंतर आम्हाला कळलं. खूप चालल्यामुळे आणि पाणी कमी प्यायला मुळे हे घडले, हे आम्हाला नंतर डॉक्टर कडून कळले).
हॉस्पिटल मध्ये गोळ्या औषधांनी बायकोला बेजार करून सोडले. त्या आठवड्याभराच्या हॉस्पिटल वास्तव्यात माझे धाबे दणाणलेले, त्यामुळे मी तिच्याच रूम मध्ये कोपऱ्यातल्या कोच वर टक्क जागा असायचो. अश्या वेळी मित्रांनी आणि त्यांच्या परिवारांनी आम्हाला खूप मदत केली, हे इथे विशेष नमूद करावेसे वाटते. त्या सात दिवसात, हॉस्पिटल मध्ये तिच्या सोबत राहून, तिचे ते हाल पाहून बहुदा मनात कुठेतरी एक गोष्ट मी पक्की केली!
यथावकाश, आम्ही त्या प्रसंगातून सुखरूप बाहेर पडलो. पुढे, चांगले ४० आठवडे भरून, ७.५ पौंडांचे आमचे चिरंजीव जन्माला आले! ईश्वर कृपेमुळे, झालेल्ये प्रसंगाचे कुठलेही पडसाद बाळ बाळन्तिणीवर न्हवते.
पुढे मुलगा मोठा होत गेला, थट्टा-मस्करीत आता दुसऱ्याचे बघा वैगेरे मित्रां मध्ये चर्चा व्हायची, मी आणि बायको ने एकदा असेच बोलता बोलता म्हंटलं, कि दुसरी मुलगी असावी, आणि दुसऱ्याचा कधी विचार केलाच तर आपण ती दत्तक घ्यावी. ह्या विचारात, माझावर मात्र कुठेतरी घडलेल्या प्रसंगाचा प्रभाव होता, हे मात्र नक्की.
अमेरिका वारी संपवून, आम्ही भारतात परत आलो, मुलगा मोठा होत गेला, आम्ही आमच्या नोकऱ्या, रहाटगाडग्यात व्यस्त झालो. बऱ्याच वेळेला हा दुसऱ्या मुलीचा विषय अधून मधून डोकं काढत असे, पण नक्की दिशा मिळत न्हवती, त्यामुळे आम्ही सुद्धा सध्या नको, पुढे बघू म्हणून विषय पुढे ढकलत राहिलो.
वर्ष झपाट्याने सरत गेली, आणि बघता बघता चिरंजीव ८ वर्षांचे झाले! दुसऱ्या अपत्याचा विषय थोडा मागे पडू लागतो न लागतो तोच त्याने आम्हाला प्रश्न विचारायला सुरुवात केली. शाळेत, त्याच्या मित्रांच्या घरी कोणी भाऊ, बहीण अशी नवीन पाहुणे मंडळींचे आगमन त्यांच्या घरात होऊ लागले, आणि मग त्याला कुठेतरी ते जाणवायला लागलं. मग तो आम्हाला "मला का भाऊ किंवा बहीण नाही?" असे नेहेमीचे प्रश्न विचारू लागला.
योगायोग असा, कि ह्याच दरम्यान, एका मित्राने अचानक ई-मेल वर आम्हाला एक आनंदाची बातमी दिली. त्याने आणि त्याच्या बायकोने एक ३ महिन्यांचे बाळ दत्तक घेतलेले! अचानक आम्हाला मार्ग सापडला!
त्याला फोन करून त्याचे आधी अभिनंदन करून, त्याची आणि त्याच्या बायकोची वेळ मागून घेतली. एका विकांताला त्याला आम्ही (चिरंजीव सुद्धा) जाऊन भेटलो, भरपूर बोललो, खूप छान माहिती मिळाली, आणि आत्मविश्वास वाढला. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून एक जाणवल, ते म्हणजे दत्तक घेणेची प्रक्रिया खरं तर खूप सोप्पी आहे, पण अर्थात वेळ काढू आहे.
क्रमश:
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुढील भागात, मी आम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल सविस्तर लिहिणार आहे. हेतू निव्वळ हा आहे, कि ह्यातून काही लोकांना माहिती किंवा मार्गदर्शन मिळेल. [आम्ही २०१२ साली प्रक्रिया सुरु केलेली, आणि २०१३ मध्ये सव्वा वर्षांची आभा आमच्या आयुष्यात आली. सध्या प्रक्रिया बद्दलली आहे, पण त्या बद्दल मला जेवढी माहिती आहे, ती सुद्धा लिहिण्याचा प्रयत्न करीन]
प्रतिक्रिया
26 Oct 2016 - 2:31 pm | यशोधरा
वाचते आहे..
26 Oct 2016 - 2:43 pm | नाखु
वाचत आहे.
26 Oct 2016 - 2:48 pm | मोदक
वाचतो आहे.
26 Oct 2016 - 2:46 pm | कंजूस
हा लेखही वाचायला आवडेलच.तुमच्या दोघांच्या निर्णयाचे कौतुक आहेच. नातेवाइक अथवा ओळखीतच एकादे मूल घेतल्यास त्रास फार कमी पडत असावा.
26 Oct 2016 - 5:59 pm | रेवती
असा सोपा वाटणारा मार्ग अवघड असण्याची शक्यता आहे.
26 Oct 2016 - 2:47 pm | नि३सोलपुरकर
धन्यवाद ,
वाचतो आहे .
पुभाउ .
26 Oct 2016 - 3:10 pm | एस
वाचतोय. आवर्जून लिहा.
26 Oct 2016 - 3:27 pm | nanaba
Chan lihilay
26 Oct 2016 - 5:46 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर सुरुवात ! पुभाप्र.
सद्या चाललेल्या राजकारणी गरमागरमीत (जी नेहमीचीच आहे !) हा आणि याच विषयावरचा आदित्य कोरडे यांचा लेख म्हणजे भर उन्हाळ्यात आलेल्या गार वार्याच्या झुळूकी आहेत !
26 Oct 2016 - 6:01 pm | रेवती
वाचतिये. आपला अभिजीत या मिपाकराने निमिषला दत्तक घेण्याच्या प्रक्रियेची माहिती देणारी लेखमाला लिहिली होती ते आठवले.
26 Oct 2016 - 6:46 pm | पिलीयन रायडर
माझ्या बहिणीने ३ वर्षांपुर्वी सोफोश मधुन एक मुलगी दत्तक घेतली. तेव्हा तिलाही खुप काही कायदेशीर प्रक्रियांमधुन जावे लागले. त्यात थोडासा त्रास झालाच. साधं लायसन्स काढायचं तर आपल्याकडे सरळ काम होत नाही, इथे तुम्हाला प्रत्यक्ष मुल देणार आहेत ते, तुमची तेवढी चौकशी तर सरकार करणारच. पण कुठेही ह्याचा त्रास वाटलाच नाही कारण कुशीत आलेलं पिल्लु!
आधी मलाही वाटायचं की आपण दुसरं मुल दत्तक घ्यावं. पण ताईने दत्तक घेतल्यावर असंही लक्षात आलं की मुळात माझा ओढा लहान मुलांकडे एवढा नाही. ताईला जशी १० वर्ष मुलाची आस होती तशीही वेळ माझ्यावर आली नाही. आजही अबीरला बघताना वाटतं की हा "माझा" मुलगा आहे हे फार महत्वाचं आहे माझ्यासाठी. इतकं प्रेम मी बाकी कुणावरच करु शकणार नाही. पण ताई मात्र काल भेटलेल्या मुलीची अगदी पोटच्या लेकरासारखी काळजी घेत होती. तेव्हा माझ्या मनाचा कोतेपणा लख्खकन माझ्या लक्षात आला.
जी माणसे मुल दत्तक घेतात आणि तत्क्षणी ते मुल दत्तक आहे हे विसरून आपलेच असल्यासारखे सांभाळु शकतात, ती माणसे फार फार फार मोठी असतात. मला दत्तक घेणार्यांचा म्हणुनच नेहमीच प्रचंड आदर वाटतो.
__/\__
26 Oct 2016 - 6:49 pm | सुबोध खरे
जी माणसे मुल दत्तक घेतात आणि तत्क्षणी ते मुल दत्तक आहे हे विसरून आपलेच असल्यासारखे सांभाळु शकतात, ती माणसे फार फार फार मोठी असतात. मला दत्तक घेणार्यांचा म्हणुनच नेहमीच प्रचंड आदर वाटतो.
+१००
26 Oct 2016 - 7:58 pm | संदीप डांगे
+10000
26 Oct 2016 - 8:29 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१००
27 Oct 2016 - 6:03 am | तुषार काळभोर
+१०१
27 Oct 2016 - 8:55 am | योगी९००
तेव्हा माझ्या मनाचा कोतेपणा लख्खकन माझ्या लक्षात आला.
इतक्या प्रांजळपणे तुम्ही मान्य केलेत. तेवढा मोठेपणा पण आमच्यात नाही.
जी माणसे मुल दत्तक घेतात आणि तत्क्षणी ते मुल दत्तक आहे हे विसरून आपलेच असल्यासारखे सांभाळु शकतात, ती माणसे फार फार फार मोठी असतात. मला दत्तक घेणार्यांचा म्हणुनच नेहमीच प्रचंड आदर वाटतो.
+१००००००
29 Oct 2016 - 8:12 pm | झेन
अगदी असेच म्हणतो.
27 Oct 2016 - 1:03 pm | मराठी कथालेखक
चालतंय.. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो.
मला तर मुलच नकोय (स्वतःच , दत्तक काहीही नकोच आहे) . कुणी मला स्वार्थी म्हंटलं तरी मला काही वाटत नाही ..म्हणू देत जे म्हणायचयं ते..
26 Oct 2016 - 9:09 pm | अर्धवटराव
प्लीज, लवकर टाका पुढील भाग.
26 Oct 2016 - 10:33 pm | स्वीट टॉकर
"जी माणसे मुल दत्तक घेतात आणि तत्क्षणी ते मुल दत्तक आहे हे विसरून आपलेच असल्यासारखे सांभाळु शकतात, ती माणसे फार फार फार मोठी असतात. मला दत्तक घेणार्यांचा म्हणुनच नेहमीच प्रचंड आदर वाटतो."
हे तर खरे आहेच, पण त्याहूनही अवघड गोष्ट म्हणजे एक मूल असताना दुसरं मूल दत्तक घेणं! दोघांना सारखंच प्रेम द्यायला फारंच मोठं मन लागतं!
उत्सुकतेने वाचतो आहे.
26 Oct 2016 - 10:58 pm | अभिजीत अवलिया
अवघड गोष्ट म्हणजे एक मूल असताना दुसरं मूल दत्तक घेणं! दोघांना सारखंच प्रेम द्यायला फारंच मोठं मन लागतं!
--- सहमत.
26 Oct 2016 - 11:19 pm | पिलीयन रायडर
अगदी अगदी... कदाचित अगदी तान्ह मुल असेल तर लळा पटकन लागतो. पण मोठ्या मुलांना सांभाळणं अवघड काम आहे. त्यांनाही समज आलेली असते बरीच.
हे अनुभव वाचायला खरंच उत्सुक आहे..
26 Oct 2016 - 10:48 pm | पिंगू
केडी, पुलेशु. मला ह्याबद्दल जास्तीचे जाणून घ्यायला नक्की आवडेल.
27 Oct 2016 - 9:44 am | जिन्गल बेल
वाचते आहे .... लवकर टाका पुढचा भाग!!
27 Oct 2016 - 11:59 am | टुकुल
छान सुरुवात केली आहे..
27 Oct 2016 - 12:32 pm | संजय पाटिल
वाचतो आहे. दत्तक प्रक्रीयेची माहिती, त्याच बरोबर दत्तक घेतल्यानंतरचे अनुभव पण सांगा.
30 Oct 2016 - 2:34 pm | मंजूताई
जी माणसे मुल दत्तक घेतात आणि तत्क्षणी ते मुल दत्तक आहे हे विसरून आपलेच असल्यासारखे सांभाळु शकतात, ती माणसे फार फार फार मोठी असतात. मला दत्तक घेणार्यांचा म्हणुनच नेहमीच प्रचंड आदर वाटतो.>>>>+ 100
4 Nov 2016 - 6:59 pm | केदार-मिसळपाव
तुमचे अभिनंदन,
तुमच्या ह्या निर्णयाचा आदर आहे.
पु.भा.प्र.