"स्व"....

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...
22 Oct 2016 - 3:43 pm

कोणी शब्दबंबाळ...कोणी गोष्टीवेल्हाळ ....
कोणी अर्थजंजाळ...कोणी नुसतेच पाल्हाळ....

व्यक्ती असतील वेगवेगळ्या पण वागणूक तीच.....
जगात काय तो एकटा शहाणा मीच !

एक आपला "स्व" मोठा , बाकी कस्पटासमान.....
आपण त्यांच्याबरोबर नाही हे इतरांचेच नुकसान !?

आपण काय म्हटले .....त्याने हाती काय लागले ?
का म्हणून सगळेचजण आपल्याशी असे वागले ?

जमत असेल तर एकदा तटस्थपणे करावा विचार.....
स्वत:ला थोडे बाजूला ठेवून विचार करावा सारासार..!

सगळेच काहीतरी म्हणतात म्हणजे त्यात काही तथ्य आहे
माणूस आहोत,माणुसकीने वागू...बाकी सगळे मिथ्य आहे

जेव्हा वेळ पडेल तेव्हा "स्व"नाही ..स्वभाव कामी येतो
"स्व" मध्येच अडकलात तर....पण लक्षात कोण घेतो ????

अभय-लेखनआता मला वाटते भितीकरुणशांतरसवावरशिक्षण

प्रतिक्रिया

अश्विनी वैद्य's picture

22 Oct 2016 - 4:57 pm | अश्विनी वैद्य

सुंदर कविता... आवडली... मोजक्या शब्दांत अचूक मांडलेली भावना पोचली.

सतिश गावडे's picture

23 Oct 2016 - 8:31 am | सतिश गावडे

तुमच्या काव्याच्या शिर्षकात दोन चुका आहेत.

"स्व"....

१. स्व ला अवतरणांची गरज नसते.
२. स्व हे फक्त एक टींब असते. चार नाही.

:प

तुम्ही जी कविता लिहीली आहे ती खोट्या स्व बद्दल आहे.

माम्लेदारचा पन्खा's picture

23 Oct 2016 - 8:35 am | माम्लेदारचा पन्खा

खरा स्व कधी जागवायचा ते आपल्या हातात असतं.....

माम्लेदारचा पन्खा's picture

23 Oct 2016 - 8:37 am | माम्लेदारचा पन्खा

माहितीबद्दल आपले शतश:आभार.

टवाळ कार्टा's picture

23 Oct 2016 - 4:41 pm | टवाळ कार्टा

बाब्बो, आता तुम्ही कविता पण करणार...कविता भारी जमलीये

नाखु's picture

24 Oct 2016 - 9:14 am | नाखु

इक्डे पण घुसले तर !!!

छान आहे चालू द्या