भंडारदरा ते शिवनेरी: दोन दिवस ढगात.. भाग 1
सकाळी जाग आली ती पावसाच्या आवाजानं. खिडकीतून बाहेर बघितलं तर बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. गझर व्हायला आजून पंधरा मिनिटे बाकी होती. पाऊस माझ्या सर्व प्लॅन वर पाणी फेरतोय कि काय आस वाटू लागलं. प्लॅन कॅन्सल केला तर किती हास होईल त्याची फक्त कल्पना केली आणि आता माघार नाही असं ठरवलं. पाऊस फक्त नवी मुंबईत, बाहेर रखरकीत ऊन असा समज (गैरसमज) करून घेतला आणि आवरायला लागलो.
रेनकोटची गरज पडणार हे माहित होतं पण इतक्या लवकर गरज पडेल वाटलं नव्हतं. बॅगेत कोंबलेले रेनकोट कडून अंगावर चढवला. बूट व रायडींग हातमोजे घालून स्वतःला एअरटाइट केलं आणि हेल्मेट हातात घेऊन सूर्याच्या पहिल्या किरणांची वाट पाहू लागलो. माझी अवस्था फायटर प्लेन च्या पायलट सारखी झाली होती. मला हेल्मेट घालूनच घराबाहेर पडावं लागलं.
पहिल्या टप्प्यात शंभर किमी आंतर कापायचे ठरवून गाडी स्टार्ट केली. ठाणे पार केलं. पहाटेचा संधीप्रकाश, थंड वारा, मोकळा रस्ता आणि धो धो कोसळणारा पाऊस या मध्ये माझा हेल्मेट सिंगर (बाथरूम सिंगर तसा मी हेल्मेट सिंगर) जागा झाला. ऐ जिंदगी गले लगा ले.. पासून आपडी पोड पोड पोड पर्यंत आणि लग जा गले के फिर ये हसीं रात हो न हो... पासून दोन रुपये दोन रुपये दे ग मला... पर्यंतची सर्व गाणी कुणाचीही (होतं कोण म्हणा?) पर्वा न करता गाऊन घेतली.
पहिला स्टॉप घेतला तो शंभर किमी आंतर कापून हॉटेल कामत वर. माझी आवस्था बघून वेटर नि "आला हॉटेल घाण करायला" टाईप लूक दिला. एखाद्या जादूगाराकडे पाहतात तसा मला निरखून पाहू लागला. मी पण मिस्टर बिन टाईप बॅगची चॅन उघडली त्यातून प्लॅस्टिकची पिशवी बाहेर काढली. ती उघडून त्यातून आतली दुसरी प्लासिकची पिशवी बाहेर काढली. ती उघडून त्यातून पैशाचे पाकीट बाहेर काढलं. हा सर्व शो लाइव्ह बघणाऱ्या वेटरचा ज्याम ब्रह्मनिरास झाला. मी माझ्या पिशवीतून पैशाच्या पाकीटा ऐवजी ससा किंव्हा कबुतर बाहेर काढावं आशी त्याची इच्छा होती का काय देव जाणे..
वडा सांभार आणि मिसळ पाव वर आडवा उभा हात मारून पुढील प्रवासासाठी तयार झालो. पुढे घोटी शिर्डी रोडला भंडारदरा फाट्याला टर्न न घेता तशाच पंधरा किमी पुढे गेलो. पण रस्ता चुकलो नसतो तर ह्या मूर्तीचे दर्शन झालं नसत अशी मनाची समजूत घातली.
पावसाळ्यातली हिरवाई, दाट धुक आणि हवेतील गारवा याचा पुरेपूर आनंद घेत मी निघालो. वाटलं तिथं थांबा,निसर्ग डोळे भरभरून पहा मोबाईल वर फोटो काढा असा कार्यक्रम करत मी निघालो होतो. निसर्गाने मुक्त हस्ते सुंदर्याची उधळण केलेल्या या परिसराचे शब्दात वर्णन करणं कठीण.
साइब..तुमच्या गाडीवर बसून फोटू कडू काय अशी निरागस विनंती केल्यावर कोण नाय म्हणणार..
एक फोटो माझ्या D.S. चा
सरळ गेलो ते धरणावर. कटोकट भरलेले धारण
इंजिन बोट- शंभर रुपयात दहा मिनिटे बॅक वॉटर मधून फिरून आलो.
अंब्रेला धबदबा:- धरणातील पाणी व्यवस्थापित करण्यासाठी सोडलेल्या पाण्यामुळे तयार झालेला हा धबधबा. रौद्र आणि मनात धडकी भरवणारा आणी त्याच वेळी डोळ्याला सुख देणारा अप्रतीम नजराना.
दुपारचे दोन वाजले आणि पोटाने भोकेची आठवण करून दिली. हॉटेल काका (9420343021/9595700611/9657121335) हे व्हेज, आरोग्यदायी जेवणासाठी उत्तम. चप्पल बूट बाहेर कडूनच आत जाऊ दिलं जात. मोठा ग्रुप असेल तर ऍडव्हान्स मध्ये सांगावं लागत.( कितीही खा. दीडशे रुपये फक्त)
हॉटेल काकातील काकांनी माझा बॅकवॉटर ट्रिप चा प्लॅन बनवून दिला. उजव्या बाजूने स्टार्ट करून पांजरा मार्गे कोकणकडा घाटघर -साम्रद -रतनवाडी - रंधा धबधबा म्हणजे बॅकवॉटर ला पूर्ण वेढा होतो. पांजरा मार्गे घाटघर कोकणकडा हा रस्ता खराब आणि कमी रहदारीचा असला तरी बाजूचा परिसर प्रचंड सुंदर आहे. एका बाजूला बॅकवॉटर/आर्थर लेक व दुसऱ्या बाजूला डोगरावरून कोसळणारे धबधबे आणि धुक्यात हरवलेली डोंगर शिखरे . स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच....
कोकणकड्याकडे जाता जाता सुरु झालं प्रचंड धुकं. गाडीची लाईट लावूनपण दहा फूट समोरचे दिसेना. इंडिकेटर चालू करून गाडी सावकाश चालवून कोकणकड्या जवळ पोहोचलो. दाट धुक्यमुळे काहीही दिसत नव्हतं. सेल्फी काढलातर पांढऱ्या कपड्या समोर उभ राहून काढल्या सारखे वाटत होतं.
प्रचंड धुक्यात हरवलेला कोकणकडा.
इथं टपरीत चहा मस्त भेटतो.
तीच गत सांदण दारी ला.प्रचंड धुकं.
अमृतेश्वर मंदिर.:- एक हजार वर्षपूर्वेचे हे मंदिर खूपच सुंदर आहे.
रंधा धबधबा:- प्रवरा नदीवर असलेला हा धबधबा खूपच छान पद्दतीने पर्यटन स्थळ म्हणून विकसित केलाय.
पाच वाजून गेले होते. मला सूर्याच्या प्रकाशात मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजे सत्तर किमी लांब ओझर ला पोहचायचं होतं. राजूर कोतुळ ब्राम्हणवाडा ओतूर मार्गे ओझर ला पोहोचलो.
भक्त निवास मध्ये 350 रुपये मध्ये रूम बुक केली, फ्रेश झालो, आजून बरचं वेळ आसल्यामुळे देवदर्शनासाठी गेलो.
महाराष्ट्राला दिलेला रुद्रसुन्दर रूप आणि ते मला अनुभवायला मिळावे म्हणून मला दिलेले धडधाकट शरीर याबद्दल विग्नेश्वराचे मनोमन आभार मानले.
भक्त निवास मध्ये जेवण केलं आणि झोपी गेलो.
प्रतिक्रिया
3 Sep 2016 - 3:20 pm | प्रचेतस
अतिशय सुंदर परिसर आहे हा.
अमृतेश्वर मंदिर हे त्याच्या गाभार्याच्या दोन्ही बाजूंना प्रवेशद्वारे असल्याने युनिक समजलं जातं.
रंध्याला रेलिंग लावलं असलं तरी लोक त्याच्या बाहेर पडून आगावूपणा करताना दिसतच आहेत.
3 Sep 2016 - 8:56 pm | राजेंद्र मेहेंदळे
पावसाळ्यात रतन- कलाड-कुंजर-कात्रा -हरीश्चंद्र-आजोबा परीसर एकदम झळाळुन उठतो. तुम्ही जवळपास सर्वच फिरलात. पण धुक्यामुळे काहीच दिसले नसेल. एक दोन फोटोत मला अलंग/ मदन दिसल्याचा भास झाला. (कदाचित माझा फार दिवसांचा ट्रेकचा उपास कारणीभुत असेल. :( )
4 Sep 2016 - 7:30 am | मनिमौ
अशीच एक भटकंती ओपन जीप मधुन करायची फार इच्छा आहे
4 Sep 2016 - 11:45 am | लोनली प्लॅनेट
फोटू लय भारी
भंडारदऱ्याच्या परिसर स्वर्गासारखाच असतो
4 Sep 2016 - 12:07 pm | अभ्या..
जोरात आहे हं वन मॅन शो. लगे रहो.
डीएस भारीय. जर क्रॅश बार ला दोर्या बिर्या बांधा. नटवा जरा.
4 Sep 2016 - 1:54 pm | रातराणी
अप्रतिम!