मूळ उर्दू कथा : इब्ने इंशा
________________________________
इराण मध्ये कोण राहतात ??
इराण मध्ये इराणी लोक राहतात
इंग्लिस्तान (इंग्लंड) मध्ये कोण राहतात ??
इंग्लिस्तान मध्ये इंग्लिश लोक राहतात.
फ्रान्स मध्ये कोण राहते ??
फ्रान्स मध्ये फ्रांसिसी लोक राहतात!!!
हा कोणता देश आहे ??
हा पाकिस्तान आहे !!!
इथे पाकिस्तानी लोक राहत असतील ना ??
नाही, इथे पाकिस्तानी नाही राहत !!!
इथे सिंधी राहतात !!!
इथे पंजाबी राहतात !!!
इथे बंगाली राहतात !!!
इथे हे लोक राहतात, इथे ते लोक राहतात
पण पंजाबी तर हिंदुस्तानात पण राहतात ???
सिंधी तर हिंदुस्तानात पण राहतात ???
बंगाली तर हिंदुस्तानात पण राहतात ???
मग हा वेगळा देश का बनवला ???
“चुकी झाली. यावेळेस माफ करा. यानंतर पुन्हा नाही बनवणार .... ”
प्रतिक्रिया
28 Aug 2016 - 8:40 pm | कैलासवासी सोन्याबापु
क्लास!!!
28 Aug 2016 - 10:00 pm | महासंग्राम
मास्तर , लक्ष असू द्या !!!
28 Aug 2016 - 11:23 pm | चंपाबाई
छान
29 Aug 2016 - 2:33 am | बोका-ए-आझम
मस्तच!
29 Aug 2016 - 6:02 am | क्षमस्व
mast
29 Aug 2016 - 7:07 am | निखिल निरगुडे
मस्त लिहिलंय!
पण खंत तर हीच आहे कि हिंदुस्थानात पण सिंधी, पंजाबी, बंगालींबरोबरच मराठी, तामिळ, कन्नड, मारवाडी, गुजराती इ. राहतात...
ना पाकिस्तानात पाकिस्तानी सापडतात, ना हिंदुस्थानात हिंदुस्थानी (अर्थात अपवाद वगळता)
29 Aug 2016 - 7:31 am | हुप्प्या
जो भूभाग पाकिस्तान म्हणून ओळखला जातो, तिथे फाळणीच्या आधी जे लोक रहायचे त्यांना फाळणीशी देणे घेणे नव्हते. पंजाब, बंगाल ह्या भागात सर्व प्रकारचे लोक आनंदाने रहात होते. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार ह्या भागातील लोकांनी पाकिस्तान बनवण्याचे मनावर घेतले. जिनासारखा नंतर अस्सल पाश्चिमात्य जो जबरदस्तीने धार्मिक मुस्लिम बनवला गेला, जो एक शिया होता, ज्याची बायको पारशी, जो सूकरमांस, मदिरा ह्यांचे नियमित सेवन करत असे असा माणूस पाकिस्तानचा नेता बनला. आणि पंजाब, सिंध, बलुचिस्तान, पख्तुन, बंगाल असल्या विविध भागांची गोधडी शिवून तिथे पाकिस्तान बनले. मुस्लिमांचा देश म्हणून त्यांनी सुरवातीला अरबी भाषा रुजवायचा प्रयत्न केला पण ती भाषा पार वेगळी असल्याने तो प्रयोग फसला. मग उर्दू भाषा सक्तीनी लादली. सिंधी, पंजाबी, पुश्तो, बलोच ह्या सगळ्या भाषांची गळचेपी केली. बंगालचा पूर्व पाकिस्तान होता त्यांचे उर्दुभाषिकांशी जमेना. त्यांचे दिसणे, नेसणे, खाणे पिणे बोलणे सगळेच वेगळे. त्यांच्यावरील अत्याचारामुळे तो भारताच्या मदतीने देश फुटून निघाला.
निव्वळ धर्म हा प्रमाण मानून असल्या वेगवेगळ्या लोकांना पाकिस्तान मनाने एकत्र आणू शकलेला नाही. कारण कितीही म्हटले तरी भारतखंडात मुस्लिम धर्माला अनेक फाटे फुटलेले आहेत. वहाबी वा सलाफी लोकांसारखे धर्माचे स्वरूप एकमात्र नाही. अहमदिया, शिया, बोहरा, खोजा, सुफी असले अनेक उपपंथ त्या धर्मात अनेक शतके आहेत.
अरबी वहाबी धर्म रुजवायचे प्रयोग आजवर फार यशस्वी ठरलेले नाहीत. लोकांना अजूनही दर्गा, पीर, मजार ह्यांचे आकर्षण आहे. विविध वाद्ये, गायनकला जे वहाबी इस्लामला वर्ज्य आहेत ती पाकिस्तानात आजही लोकप्रिय आहेत.
मुळात ६०-७० वर्षांपेक्षा जुना पाकिस्तानचा इतिहास कोणता मानावा ह्याविषयी संभ्रम आहे. सिंधू संस्कृती, तक्षशिला विद्यापीठ हे आपले मानावे का नाही? ह्यावर पाकिस्तानी विचारवंत आजही भांडतात. त्यामुळे त्या देशाला आपली अशी ओळख नीट ठरवताच आलेली नाही. कदाचित अजूनही त्या देशाची शकले होऊ शकतात.
30 Aug 2016 - 4:07 pm | रघुनाथ.केरकर
आवडला
5 Dec 2016 - 3:07 pm | मराठी_माणूस
हे काही समजले नाही. फक्त ह्या भागातील जनतेलाच असे वाटत होते का ? बाकी कोणाचे काहीच म्हणणे नव्हते का ?
29 Aug 2016 - 8:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त.....!
-दिलीप बिरुटे
29 Aug 2016 - 8:38 am | नाखु
सटक आणि सटलही !!!
30 Aug 2016 - 3:24 pm | पद्मावति
मस्तं!
30 Aug 2016 - 3:46 pm | सामान्य वाचक
,
4 Dec 2016 - 10:51 pm | पैसा
मस्तच!
5 Dec 2016 - 12:32 pm | गॅरी ट्रुमन
छान.
त्यांची चुक झाली असेल आणि त्यानंतर पुन्हा त्यांना आपला देश नको असेलही. पण निदान मला तरी ती घाण परस्पर बाजूला गेली हे चांगलेच झाले असे वाटते. तेव्हा त्यांना ती चूक परत करायची नसली तरी ते लोक आपल्याबरोबर नकोत त्यामुळे आपण त्यांना ती चूक दुरूस्त करू देता कामा नये.
5 Dec 2016 - 1:02 pm | गामा पैलवान
गॅरी ट्रुमन,
पाकिस्तानातल्या लोकांनी वेगळा पाकिस्तान कधीच मागितला नव्हता. तो मुंबई, अलीगड, लखनौ इथल्या मुसलमानांनी मागितला. या मुस्लिमांचा पाकिस्तानी जनतेशी कसलाही संबंध नव्हता. ही घाण आजूनही भारतातच आहे. याच घाणीत कन्हैय्याकुमारसारखी डुकरं लोळतात आणि तुम्हाआम्हाला शहाणपणा शिकवतात.
आ.न.,
-गा.पै.
5 Dec 2016 - 1:39 pm | गॅरी ट्रुमन
अर्थातच सगळी घाण गेलेली नाही. जे.एन.यु सारख्या ठिकाणी त्या घाणीचे मूर्त स्वरूप बघायला मिळेल. पण जेवढी घाण गेली ते पण चांगलेच झाले नाही का?
5 Dec 2016 - 1:51 pm | गामा पैलवान
गॅरी ट्रुमन, माझ्या मते गेलेल्या घाणीचं प्रमाण नगण्य आहे. इतकी कमी घाण घालवण्यासाठी किंमत मात्र जबर मोजावी लागलीये. थोडक्यात काय, भारताच्या हातात फारसं काही पडलं नाही. शिवाय दहशतवादाचा भस्मासुर उभा राहिला तो वेगळाच.
आ.न.,
-गा.पै.
5 Dec 2016 - 2:47 pm | पाटीलभाऊ
मस्त...!