अर्थक्षेत्र : ट्रेडिंग फंडा

Primary tabs

ज्ञानव's picture
ज्ञानव in अर्थजगत
7 Aug 2016 - 3:46 pm

ट्रेडिंग हा शेअर मार्केटचा अविभाज्य घटक आहे. कुणी कितीही नावे ठेवली तरी ट्रेडिंग करणारे आहेत म्हणून बाजार आहे. ट्रेडिंग कसे करायचे हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो. न्यूनतम पातळीला घेऊन उच्चतम पातळीवर विकायचे हे तत्व सांगितले जाते. पण बाजार काही कुठल्याही तांत्रिकदृष्ट्या विकसित केलेल्या पातळ्यांचा बांधील नाही. तुम्ही शोधलेला रेझिस्टन्स आणि सपोर्टला गद्दारी कशी करायची? असे काही बाजाराला वाटत नसते त्यामुळे त्याची भ्रमंती सुरूच असते.

तो अगदी वारकर्यांच्या भक्तीभावाने दोन पावले पुढे आणि दोन पावले मागे असा टाळ वाजवत तल्लीन होऊन पुढेच सरकत असतो. त्या तालबद्ध सरकण्यास आपण ओळखले आणि आपण त्यात सामील झालो तर थोडे पुण्य आपणास हि कमावता येते. असो.

इथे खाली एक इमेज दिली आहे. जी Axis Bank ह्या बँकेची आठवड्याची वाटचाल दाखवते.

ह्या इमेजमध्ये टिकर किंवा सिम्बॉल किंवा कंपनीचे नाव - तारीख - रेंज (हाय वजा लो )- एम१ (हाय अधिक लो भागिले २)- ओपन - हाय - लो - क्लोज -Avg4 (ओपन अधिक हाय अधिक लो अधिक क्लोज भागिले चार )आणि % चेंज इतके कॉलम्स त्यात आहेत. ह्यामध्ये क्लोज, अव्हरेज४ आणि % चेंज हे कॉलम्स महत्वाचे आहेत.

Axis Bank Weekly Chart

  • खरेदी कुठे करावी ?

निरीक्षणांती असे जाणवते कि पहिल्या आठवड्यात जेव्हा क्लोज (४७५.४०) आणि अव्हरेज४ (५००.४९) आहे तेव्हा खरेदीची वेळ समीप आली आहे. जेव्हा जेव्हा अव्हरेज४ आणि क्लोजमधील तफावत (+/-)३% असते तेव्हा खरेदी किंवा विक्रीचे निर्णय घेऊन एक छोटा ट्रेड करता येऊ शकतो. इथे -५% फरक आहे म्हणजेच क्लोज अव्हरेज४च्या ५% खाली क्लोज झाला आहे तेव्हा इथे पुढील आठवड्यात क्लोज (४७५.४०)च्या खालील पातळीवर खरेदी करावयाची आहे. ह्याचाच दुसरा अर्थ असा कि क्लोज (४७५.४०)च्या वर खरेदी करण्याची चूक आपण करावयाची नाही.

दुसऱ्या आठवड्यात आपण क्लोज (४७५.४) ते लो (४६५.००) ह्या भावांत खरेदी केली. सरासरी ४७०.२० च्या भावाने आपण खरेदी केली असे आपण धरून चालू.

तिसरा आठवडा संपता संपता ४८४.९५ ह्या भावाने आपण शेअर्स विकून टाकले. जवळजवळ ३% वाढीने.

वरील प्रक्रिया ढोबळ आहे. जसे पुरणाला लसूण चालत नाही तसेच एकच फंडा सर्व शेअर्सना चालत नाही. प्रत्येक शेअरचा ट्रेंड ओळखण्याचे परिमाण वेगवेगळे आहे. एन एस ई च्या संकेतस्थळा वरून तुम्ही कुठल्याही शेअरचा आठवड्याचा किंवा महिन्याचा डाटा डाऊनलोड करून हि पद्धत चेक केलीत तर ती अवलंबवावी कि नाही ह्या बाबतीत निर्णय होऊ शकेल. बाजार पूर्ण पडत असताना किंवा चढत असताना काय होते किंवा साईड वेज मार्केटमध्ये काय होते ते पाहून निर्णय घेणे सोपे जाऊ शकते.

खरेदी करताना आणि विक्री करताना दरवेळी तयार होणारे हाय किंवा लो ह्या कडे लक्ष दिले असता तसेच ATP हा एक महत्त्वाचा घटक ध्यानात घेतला असता ट्रेंड बदलाची आगाऊ सूचना मिळू शकते. त्याबाबतची माहिती किंवा जिलबी पुढच्या लेखात लिहावी म्हणतो.

मी इथे २५००० रुपयाचे ५३ शेअर्स ४६८.२० ह्या भावाने घेतले होते आणि ५१ शेअर्स ४८४.85 ह्या भावाने विकले होते. उरलेले २ शेअर्स अजून जमा आहेत.

प्रतिक्रिया

सुधांशुनूलकर's picture

7 Aug 2016 - 9:29 pm | सुधांशुनूलकर

लेख छान आहे.
खूपच दिवसांनी तुमचा लेख वाचला, आनंद झाला.

स्वप्क००७'s picture

7 Aug 2016 - 10:32 pm | स्वप्क००७

कृपया अश्या युक्त्या / थंब रूल्स चे लेख वाचावयास आवडतील
पुढील लेख येऊ द्यात !!

उपयुक्त माहिती. अजून येऊ द्यात.

ज्ञानव's picture

8 Aug 2016 - 4:34 pm | ज्ञानव

धन्यवाद,

५ ऑगस्टला संपलेल्या आठवड्याचा % चेंज -८.८९% होता आणि क्लोज ४६६.२५ च्या खाली आज जर खरेदी केली असती तर आजच ५०० ला विक्री हि करता आली असती.

JUSTDIAL

कलंत्री's picture

10 Aug 2016 - 5:03 pm | कलंत्री

माझ्या एका शेअर्स ब्रोकर मित्राने आमच्या मित्रांच्या असलेल्या शेअर्सवर मार्जिन मनी वर वर्षाला १८ % परतावा दिला. प्रत्येक महिन्याच्या ६/७ तारखेला तो मागच्या महिन्याचा नफ्यातून अंदाजे १.५ % रक्कम आमच्या खात्यात जमा करत असतो.

कमी धोका आणि आपले उदिष्ट्य साधणे यावर त्याचा विष्वास आहे.

प्रत्येकाने आपापले तंत्र विकसित करावयाचे असते असे तो म्हणतो.

जवळ जवळ मागच्या वर्षापासुन ते हे करत आहे.

ज्ञानव's picture

10 Aug 2016 - 7:14 pm | ज्ञानव

शेअर मार्केट किंवा कुठलाही व्यवसाय करताना निरीक्षणा अंती आलेले तारतम्य आणि चुका सुधारण्या ऐवजी जे बरोबर आहे ते सुधारवत राहणे आणखी तीक्ष्ण करणे हे फार महत्वाचे आहे.

टिके's picture

16 Aug 2016 - 10:48 am | टिके

अतिशय महत्वचे !

मराठी कथालेखक's picture

11 Aug 2016 - 11:38 am | मराठी कथालेखक

छान माहिती , धन्यवाद

गंम्बा's picture

11 Aug 2016 - 12:10 pm | गंम्बा

लेखाबद्दल धन्यवाद.

ह्या आणि अश्या विषयावर इतके थेट आणि प्रॅक्टीकल जालावर वाचायला मिळत नाही.

ऍक्सिस बँक मध्ये सद्य स्तिथीत 574 ते 577 ह्या लेव्हल मध्ये मोठा रेसिस्टन्स आहे
तिथून हा शेयर 500 पर्यंत खाली येऊ शकतो अथवा 577 हि लेव्हल मोठ्या वोल्युम ने ब्रेक केल्यास 600+++ अपेक्षित आहे.

आजच ऍक्सिस बँक ने ब्रेक आऊट दिला आहे, येत्या दिवसात 600 ते 630 पर्यंत किंमत जाईन असा अंदाज आहे.

अन्या दातार's picture

11 Aug 2016 - 11:10 pm | अन्या दातार

ते एटीपी काय हाय?? बाकी डोस्क्याला जरा त्रासाचंच दिसतंय. रोजची हमाली करता जमायच का हा प्रश्नच आहे.

ज्ञानव's picture

12 Aug 2016 - 9:21 am | ज्ञानव

किंवा average ट्रेडिंग प्राईज किंवा वेटेड अव्हरेज प्राईज हि एन एस ई च्या साईट वर किंवा तुम्ही ज्या ट्रेडिंग PLATFORM वर काम करता तिथे मिळते. पण माझा स्वतः बनवलेला SOFTWARE असल्याने मी डेटा डाऊनलोड करून
पुढचे संन्स्कार करतो. पण बेसिक ट्रेंड समजण्यासाठी atpची close किंवा इतर घटक जसे हाय लो किंवा हाय-लो ह्यांचा मध्य वगैरेशी तुलना करता येते.

ATP = TOTAL TRADED VALUE OR VOLUME
----------------------------------
TOTAL NUMBER OF TRADED SHARES

जाताजाता : हमाली आहे; पण हमालीपण चांगलीच मिळते

छान. काहीतरी मूल्यवर्धन केल्याशिवाय फायदा नाही.

आपला हा व्यवसाय आहे का? कि हौसेखातर आपण काम करतात.

ज्ञानव's picture

14 Aug 2016 - 11:46 am | ज्ञानव

पूर्णवेळ इक्विटी ट्रेडिंग आणि इक्विटी ट्रेडिंग संदर्भात सल्ला देतो. (टिप्स नाही) तसेच आयकर, सेवाकर आणि अकौंट लिहिण्याची कामे करतो.

शाम भागवत's picture

19 Aug 2016 - 10:57 pm | शाम भागवत

तुम्ही दिलेला डाटा असा आहे
aaa

मी एनएससी च्या साईटवरून डाटा डाऊनलोड केला तर मला तो असा मिळाला.

Date Open High Low Close
30-Oct-15 472.00 478.40 465.00 475.40
06-Nov-15 462.0 467.50 459.50 465.15
13-Nov-15 475.40 487.20 472.30 484.95

त्यामुळे टक्केवारी वगैरे सगळेच चुकत आहे.

ज्ञानव's picture

20 Aug 2016 - 11:52 am | ज्ञानव

इथे प्रतिसाद दिला आहे.

ज्ञानव's picture

20 Aug 2016 - 1:54 pm | ज्ञानव

पुढील वाटचालीस शुभेच्छा.....
मॉक ट्रेड करताना डे ट्रेडिंगचा मोह किंवा डे ट्रेडिंग वर प्रयोग करण्याचा मोह टाळावा हि विनंती.

शाम भागवत's picture

20 Aug 2016 - 2:49 pm | शाम भागवत

तस कधी केले नाही आणि कधी करेन असेही वाटत नाही.
ऑप्शन फ्युचर व मार्जीन मधे पण कधी काही करावेसे वाटले नाही.
शुभेच्छांबद्दल धन्यवाद.

शाम भागवत's picture

8 Jun 2017 - 1:56 pm | शाम भागवत

आपल्या मोलाच्या सल्याबद्दल धन्यवाद,

मी इन्डोसोलरचे काही शेअर्स आयपीओ नंतर १८ रूपयांच्या भावाने २०१० मधे घेतले होते आणि पैसे अडकले होते. २०१३ मधे तर तो शेअर दीड रूपया झाला होता. तुमचा फंडा दोन वर्ष (२०१४-२०१६) पडताळून पाहिला. नंतर ६-७ महिने कागदोपत्री व्यवहार करून पाहिले. तुमचा फंडा पटला.

शेवटी जानेवारी २०१७ ला सुरवात केली व १८ मे २०१७ ला सगळ भांडवल सुटून वरती फायदाही झाला. त्या व्यतिरिक्त माझ्याकडे आता फ्री शेअर्सही आहेत. १५ टक्के आयकर बाजूला काढून ठेवला आहे. तुम्ही दिलेल्या शुभेच्छा फलद्रुप झाल्यामुळे तुम्हाला धन्यवाद देण्यासाठी मुद्दामहून हे लिहित आहे.
_/\_

ज्ञानव's picture

11 Jun 2017 - 7:16 am | ज्ञानव

लेखन सार्थकी लागल्याचा आनंद दिलात. आपली ऊत्तरोत्तर प्रगती होवो ही हार्दिक शुभेच्छा.

श्रीगुरुजी's picture

12 Jun 2017 - 2:53 pm | श्रीगुरुजी

या अडकलेल्या समभागातून बाहेर पडून भांडवली नफा कसा मिळविला ते सविस्तर सांगाल का.

शाम भागवत's picture

16 Jun 2017 - 8:19 pm | शाम भागवत

ज्ञानव सरांनी सांगितल्याप्रमाणे तक्ते करत होतोच. १ जानेवारी २०१७ पासून हा फंडा वापरावयाचे ठरवले होते. त्यासाठी किमतीतील बदल उणे ३% ची वाट पहात होतो. ती वेळ त्यानंतर २१ एप्रिल २०१७ ला आली. बंद भाव रू.६.४५ होता. म्हणजे त्या भावाच्या खालच्या भावात शेअर्स खरेदी करणे चालू केले. प्रत्येक घसरणीत खरेदी चालू होती व प्रत्येक घसरणीत खरेदी करावयाच्या शेअर्स ची संख्या थोडी थोडी वाढवत होतो. या पध्दतीनुसार ११ मे २०१७ हा शेवटचा दिवस निघाला. दररोज NSE च्या संकेतस्थळावर जाऊन डिलिव्हरीची टक्केवारी ५० टक्केच्या वर असल्याची खात्रीही करून घेत होतो. तर त्या शेवटच्या दिवशी यापध्दतीने ५.९५ च्या भावाने १०००० शेअर्स घेतले गेले होते. त्यानंतर एकदम लॉटरीच फुटली. (असे नेहमी होत नाही हेही मान्य. कदाचित ज्ञानव सरांच्या शुभेच्छांमुळे अस झाल असावं :) ) सलग ५ दिवस अप्पर सर्किट लागून तो भाव ११.९० पर्यंत गेला. शेवटी स्टॉप लॉस नुसार १०.९५ ला शेअर्स विकले गेले.

९ जून २०१७ ला परत खरेदीचा सिग्नल मिळाला आहे. त्यानुसार ८.४५ च्या खाली खरेदी करावयाची आहे. पण भाव अजून त्याखाली आलेला नाही.

पण वारंवार येणार्‍या अप्पर लोअर सर्किटमुळे, ३० मे २०१७ पासून आता हा शेअर टी२टी मधे गेला आहे याचे भान ठेवणे अत्यावश्यक झाले आहे.

ज्ञानव's picture

16 Jun 2017 - 10:02 pm | ज्ञानव

"ज्ञानवफंडा" नामकरणाने हुरळून गेलो. आपण घेतलेली मेहनत 99% आणि 1% माझा खारीचा वाटा असं म्हणूया.
पुढील वाटचालीसाठी पुनश्च हार्दिक शुभेच्छा.

सुबोध खरे's picture

17 Jun 2017 - 8:51 pm | सुबोध खरे

एक विशेष सूचना
पेनी शेअर्स penny stocks मध्ये फक्त कसलेल्या लोकांनी भाग घ्यावा अन्यथा मोठ्या प्रमाणावर नुकसान गळ्यात पडते असा सार्वत्रिक अनुभव आहे. नवशिक्यांनी तर नक्कीच या फंदात पडू नये.

शाम भागवत's picture

19 Jun 2017 - 8:28 pm | शाम भागवत

एकदम बरोबर बोललात खरे साहेब

शेअर मध्ये फ़ंडा काम जर करू शकला असता तर...
शेअर सोडा, कोणत्याही व्यवसायामध्ये फ़ंडा काम करत नाही, योग्य वेळी योग्य निर्णय घेणे व तडजोड साठी किमान वेळ हातात असणे हे गरजेचे पण त्याच सोबत अभ्यास अति गरजेचा.

पेशन्स, फायनान्स, आणि कुलनेस हे असेल तर मार्केट आणि शेअर्स सगळे जग तुमचे, अजून एक पण आहे कधी बास म्हणून मोकळे व्हावे व हात बाहेर काढून शांत उभे रहावे हे माहिती हवे.

नाहीतर, अनेक लोक जाहिरात करतात 20 वर्षांपूर्वी घेतलेला 2 रु चा शेअर 2000 ला विकला, पण येथे पण आहे, किती शेअर?
ज्यांना कमवायचे असते, ज्यांना गणित समजले असते तव कधीच फायदा घेऊन बाहेर पडलेले असतात :)

ज्ञानव's picture

12 Jun 2017 - 4:08 pm | ज्ञानव

फंडा म्हणजे आयडीया (जो बदल दे आपकी दुनीया).

आपल्या ऊर्वरित म्हणण्याला मात्र पूर्ण दुजोरा आहे.