बापाचा गुण

vcdatrange's picture
vcdatrange in जनातलं, मनातलं
28 Jul 2016 - 9:51 am

हल्ली आम्हा बापलेकीचं बरंच गुळपीठ जमलयं, एक तर, आम्ही तिघेही आपापल्या दिनक्रमात अडकल्यामुळे, पुरवठा कमी झाला की मागणी वाढते, या नियमाने असेल कदाचित. मग काल एक नविन फर्मान निघालं, इथुनपुढे घरातील सगळे निर्णय मतदानाने घ्यायचे. विषय होता, पुढच्या दाराला अजुन एक लोखंडी दरवाजा बसवण्याचा. पहिले प्रदीर्घ चर्चा, दरवाजा बसवण्याची आवश्यकता, उपलब्ध पर्याय आणी उपयुक्तता यावर. आम्ही राहतो तिसर्या मजल्यावर, इमारत जुनी असल्यानं लिफ्ट नाहीय. यावर लेकीनं भाष्य केलं ' आजीचं घर खाली आहे, तिथे गाय, कुत्रा, मांजर घरात येतात म्हणुन जाळीचा दरवाजा लावलाय ना, आपण तर वर राहतो मग आपल्याला कशाला हवायं?' मी पुढचा मुद्दा काढला - चोर, यावर लेकीनं जो षटकार मारला "एवढ्या वर चोर कशाला दमायला येईल का?" (आयला हा Sarcasm चा बापाचा गुण बरा उतरला हिच्यात)
मग सरतेशेवटी तिनेच हा मतदानाचा पर्याय निवडला. आई आल्यावर तिच्या गळी हे उतरवणं ही जबाबदारी मात्र बाबाची,

मग कागदाच्या चिठ्ठयाच्या मतपत्रिका, मतदानाचे नियम याची आई समोर उजळणी, गुप्त मतदान, मतमोजणी, आणि निकाल घोषित..... घराला नविन लोखंडी दरवाजा बसणार. दरम्यान आईचा सुप्त कल जाणुन घेण्यात आला होता, हे मात्र रात्री उशीरा समजलं।

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

28 Jul 2016 - 10:20 am | चांदणे संदीप

आवडल!

Sandy

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jul 2016 - 10:40 am | डॉ सुहास म्हात्रे

=)) मनोगत आवडले.

दरम्यान आईचा सुप्त कल जाणुन घेण्यात आला होता, हे मात्र रात्री उशीरा समजलं।
ह्या पडद्यामागच्या राजकारणाचा गुणही तुमच्याकडूनच काय ?!
(हघ्या हेवेसांन)

रातराणी's picture

28 Jul 2016 - 11:48 am | रातराणी

ही ही गोड :)

जव्हेरगंज's picture

28 Jul 2016 - 12:17 pm | जव्हेरगंज

आईचा सुप्त कल जाणुन घेण्यात आला होता,

तरीही घराला नविन लोखंडी दरवाजा कसा काय बसणार ?

तिकडच्या पार्टीचं पॉलिटीक्स गंडलं? की हिकडच्या पार्टीचं जाम भारी होतं?

सिरुसेरि's picture

28 Jul 2016 - 12:50 pm | सिरुसेरि

आवडले . +१००

ज्योति अळवणी's picture

28 Jul 2016 - 6:10 pm | ज्योति अळवणी

मस्त

vcdatrange's picture

30 Jul 2016 - 7:23 am | vcdatrange

पण हे हघ्या हेवेसांन उस्कटून सांगा की

महासंग्राम's picture

30 Jul 2016 - 9:16 am | महासंग्राम

हघ्या: हलकेच घ्या
हेवेसांन :- हे वेगळे न सांगणे लगे

आंतरजालावरील लघुरूपे - मदत करा. रच्याकने हा धागा याची मदत होईल तुम्हाला