भारतरत्न सचिन....

अनिरुद्ध प्रभू's picture
अनिरुद्ध प्रभू in जनातलं, मनातलं
20 Jul 2016 - 4:14 pm

मी लिहिणार नव्हतोच खरतरं....हा माझा विषयसुद्धा नाही पण तरीही लिहितोय..मी एक टिपिकल मध्यमवर्गिय घरातुन वाढलेला मुलगा...'लोक काय म्हणतील' या अमुल्य संस्काराबरोबर अजुन एक संस्कार 'आपल्याला काय करायच आहे? त्याचे तो बघेल ना...' हा सुद्धा पिढिजातपणे मला देण्यात आला. आता ही दोन्ही रत्न आमच्यात आली नाहीत हे दुर्दैवच (कुणाचं हे विचारु नये...)! पण वरील दोन्ही गोष्टींना काही ना काही मर्यादा आहेत याला कुणाचे दुमत नसावे. हे ही प्रकरण असच.. पाणी छातीपर्यंत आलं, आम्ही ढम्म....गळ्यापर्यंत आलं तरीही आम्ही ढम्म...आता नाकातोंडात जाइल अशी वेळ ठेपली आता मात्र व्यक्त झालचं पाहिजे...बास्स झालं आता...भावना उफाळल्या नि मी लिहिता झालो...!!
काल अगदी नेहमीसारखच मी कार्यालायातुन आंतरजालावरुन बातम्या वाचत होतो...(मला कार्यालयात काही काम नसतं हे मान्य आहे, उगाच प्रश्न उपस्थित करु नयेत..) चाळता चाळता एक बातमी नजरेसमोर आली...
पर्रिकरांनी सचिनला फटकारलं...
फटकारलं??? काय प्रकार असेल बाबा हा? उगाच आपली उत्सुकता.....पान उघडल्यावर सगळा प्रकार समोर आला..
तर आदरणीय सचिन तेंडुलकर साहेब यांचा एक जिवश्च-कंठश्च मित्र श्री. संजय नारंग यांनी कुठेतरी लश्कराच्या जागेवर आपला रेसॉर्ट बांधला. त्याला परवाणगी होतीच पण एका मर्यादेपर्यंतच... तरीही साहेबांनी त्याजागी मोठाले इमले उभे केले..मग काय लागलं लष्कर मागं. बहुदा या मित्रवर्यांच्या लक्षात आलं, अरेच्च्या आपला मित्र तर भारतरत्न आहे..तो कहीतरी करु शकेल...भारतरत्न आहे ना सरकार ऐकेल की त्याचं...मग हे साहेब गेले भारतरत्नांकडे आणि ते गेले पर्रिकर साहेबांकडे....पर्रिकर साहेब मोठा माणुस(कसले मोठे ते ज्यानं त्यानं ठरवाव) .... त्यानीं साहेबांच ऐकुन घेतलं नि निक्षुण सांगितल मी हस्तक्षेप करणार नाही...मनात म्हटलं असा प्रकार आहे होय....सगळा प्रकार कळाला नि संताप येउ लागला..
संताप कोणाचा? आपण भारतरत्न आहोत हे विसरुन एका मित्राच्या अनैतिक कामासाठी थेट सरकारपर्यंत जाणार्‍या सचिनचा, फक्त आणि फक्त खेळाडु म्हणुन असलेल्या लोकप्रियतेच्या निकषवरुन त्याला भारतरत्न देणार्‍याचा कि एवढ सगळं निमुटपणे सहन करणार्‍या तुमच्या-माझ्यासारख्यांचा??
प्रकरण साधं नेहमिच आहे निदान आपल्या देशात तरी पण विचार करण्यासारखा नक्की आहे..

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

मितभाषी's picture

20 Jul 2016 - 4:19 pm | मितभाषी

परिरकर साहेबंचे अभिनंदन.

अनुप ढेरे's picture

20 Jul 2016 - 4:23 pm | अनुप ढेरे

फक्त खेळाडु म्हणुन असलेल्या लोकप्रियतेच्या निकषवरुन त्याला भारतरत्न देणार्‍याचा

हे सोडून बाकिच्याशी सहमत. भारतरत्न त्याला मिळायला हवाच होता.

योग्य केलं पर्रीकर साहेबांनी.

लोकं दिसला अभिनेता बसवला डोक्यावर...दिसला क्रिकेटवीर की बनव देव...नसती थेरं च्यायला.

गॅरी ट्रुमन's picture

20 Jul 2016 - 4:27 pm | गॅरी ट्रुमन

सहमत आहे.या प्रकरणामुळे सचिनविषयी वाटणारा आपलेपणा नक्कीच कमी झाला आहे.

इतके दिवस ज्याला अत्यंत विनम्र, कुठल्याही भानगडींमध्ये कधीच नसणारा इत्यादी इत्यादी समजत होतो त्याचे पायही मातीचेच आहेत की काय या प्रश्नामुळे मात्र अस्वस्थता नक्कीच आली.

पर्रीकरांबद्दल खरच खुप आदर वाटतो.

५० फक्त's picture

20 Jul 2016 - 5:07 pm | ५० फक्त

मला तर नेहमीच संशय आहे, की त्याचे पाय देखिल मातीचेच आहेत, फक्त वरुन चंदनलेपन केल्यानं दिसत नाहीत.

आता बिसिबियात मोठे बदल अपेक्षित आहेत, ते झाल्यावर ब-याच चम्त्कारीक आणि सुरस कहाण्या बाहेर पडतील पुढच्या ३-४ वर्षात.

संदीप डांगे's picture

21 Jul 2016 - 12:33 am | संदीप डांगे

म्हटलं तर बारामतीकर काकांविरोधात कोणतेच पुरावे नाहीत, तरी ...
पाय मातीचेच आहेत, काही गोष्टींचे पुरावे देता येत नाहीत इतकेच.

महासंग्राम's picture

20 Jul 2016 - 5:11 pm | महासंग्राम


पर्रिकरांनी सचिनला फटकारलं...

रेफरन्स आहे का ???

http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/sachin-tend...

श्रीगुरुजी's picture

21 Jul 2016 - 3:27 pm | श्रीगुरुजी

यात नक्की कोणाची बाजू बरोबर आहे (नारंगची का लष्कराची) ते वरील बातमीवरून स्पष्ट नाही.

सचिन हा माझा अत्यंत आवडता खेळाडू आहे. अशा बातम्यांमुळे माझ्या मनातील त्याच्या प्रतिमेवर अजिबात परीणाम होणार नाही.

एस's picture

20 Jul 2016 - 5:23 pm | एस

सहमत.

रघुनाथ.केरकर's picture

20 Jul 2016 - 5:25 pm | रघुनाथ.केरकर

पर्रीकर साहेबांवीषयी असं बरच काही आहे, गोयंकार मिपा सदस्य सांगु शकतील.

लालगरूड's picture

20 Jul 2016 - 5:25 pm | लालगरूड

बातमी कुठे आहे लिंक द्या

रॉजरमूर's picture

21 Jul 2016 - 1:42 am | रॉजरमूर

बातमीची लिंक

बातमी

पुंबा's picture

20 Jul 2016 - 5:37 pm | पुंबा

लश्कराच्या जागेवर आपला रेसॉर्ट बांधला. त्याला परवाणगी होतीच पण एका मर्यादेपर्यंतच...

ही परवानगी देखील मिळायला नको होती. लष्कराच्या जागेत अश्या प्रकारे खाजगी मालमत्ता उभारण्यास परवानगी मिळाली यातच भ्रष्टाचार झाला नाही का?

स्वामी संकेतानंद's picture

20 Jul 2016 - 6:47 pm | स्वामी संकेतानंद

लष्कराच्या जागेत नाही बांधला. DrDO च्या 50 फूट हद्दीत कसलेही मोठे बांधकाम करायला परवानगी नाही. लहान कामे करता येतात मात्र परवानगी लागते. त्यांनी परवानगी बहुतेक टेनिस लॉनची घेतली होती आणि बांधला मात्र चांगला रिसॉर्ट!

सुरक्षेच्या द्रुश्टीने पाहता, असा रिसॉर्ट डीआरडीओ सारक्या संस्थेच्या ५० मी. हद्दीत असणे अत्यंत घातक आहे. सचीनसारख्या समाजात मानाचे स्थान असणार्या व्यक्तीने (शिवाय भारतरत्न, राज्यसभा खासदार) अश्या प्रकारे क्रोनीइझमला पाठींबा देणे अनुचीत आणि त्याला लोकांच्या मनातून उतरवणारे आहे. शेवटी पाय मातीचेच हेच वारंवार सिध्द होत असते आणि भरतीय जनता मात्र नव्या जोमाने नवनवे हीरोज जन्माला घालून मनोभावे पूजत राहते. मिडीयाची बोंबाबोंब अश्या वेळी तीव्र गरजेची वाटते अन्यथा अशी प्रकरणे दाबली जातात आणि भ्रष्ट नामानिराळे राहतात.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

20 Jul 2016 - 7:28 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

संजय नारंग म्हणजे ६०/७० च्या दशकातला स्मगलर मनु नारंग ह्याचा मुलगा रे अनिरुद्धा.
http://indiatoday.intoday.in/story/smuggling-of-art-treasures-from-india...

http://udayindia.in/2010/10/23/blood-stained-brown-gold-and-mean-streets...
अर्थात अहोरात क्रिकेट खेळून देशाची सेवा करणार्या सचिनला ह्याची कल्पना नसणार म्हणा.

अनुप ढेरे's picture

21 Jul 2016 - 11:54 am | अनुप ढेरे

वाह! मस्तं अर्टिकल आहेत दोन्ही. विशेषतः दुसरं. धन्यवाद माई!

( कोणा गाढवाला हा त्या नाना नेफळेचा डुआयडी वाटतो समज नाही!)

क्रिकेट खेळनार्या सचिन बद्दल मला नितांत आदर श्रद्धा व भक्तीभाव आहे, परंतु मैदाना बाहेरच्या थेरांबद्दल मि त्याचे समर्थन करणार नाहीच, परंतु याचा त्याच्या मैदानामधला सचिन चे जे देवत्व आहे यावर काडीचाही फरक पडणार नाही.

अभिजीत अवलिया's picture

20 Jul 2016 - 9:31 pm | अभिजीत अवलिया

मुळात सचिनला भारत रत्न देणे हेच चुकीचे वाटते. क्रीडा जगतातील सर्वोच्च कामगिरीसाठी राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार होताच आपल्याकडे. भारतरत्न हा सर्वोच्च 'सिव्हिलिअन अवॉर्ड' होता जो कुठल्याही खेळासाठी दिला जात नसे. तसेच त्याचा देव म्हणून उल्लेख करणे देखील पटत नाही.

खटपट्या's picture

21 Jul 2016 - 12:04 am | खटपट्या

सहमत

मोदक's picture

21 Jul 2016 - 12:44 am | मोदक

माझी एक मूलभूत शंका..

ऑस्ट्रेलिया किंवा इतर बाहेरच्या देशांनी त्यांच्या हायेस्ट सिव्हिलीयन अ‍ॅवार्डने सचिनला गौरवले आहे आणि भारताने गौरवले नाही असे विचित्र काहीतरी गणित झाले असते तर पुन्हा सरकारलाच शिव्या खाव्या लागल्या असत्या आणि "बघा त्यांनी कौतुक केले पण मातृभूमीने केले नाही" असे काहीसे झाले नसते का?

बोका-ए-आझम's picture

21 Jul 2016 - 7:03 am | बोका-ए-आझम

की भारतरत्न हा बहुमान खेळाडूंना देता येणार नाही. आणि त्याचा देव हा उल्लेख त्याच्या समकालीन क्रिकेटर्सनी पहिल्यांदा केला आणि त्यावरून तो मिडियाने उचलून धरला. त्याच्याशिवाय इतर अनेक खेळाडू - उदाहरणार्थ कै. ध्यानचंद आणि विश्वनाथन आनंद - या बहुमानास पात्र होते, पण तो निर्णय सर्वस्वी सरकारचा आहे.

नाखु's picture

21 Jul 2016 - 11:25 am | नाखु

आप्ल्या येथील युसुफभाईना आधी पाकिस्तानने पुरस्कार दिला आणिइ नंतर भारतानेही दिला..

खेळाडू असलेल्या सचिनचे व्य्वहारीक जगात अगदी आदर्श वागणे असावे ही अपेक्षा असू शकते पण .........

त्याच्या खेळावर व खेळातील वागण्यावर फिदा असलेला नाखु

टवाळ कार्टा's picture

21 Jul 2016 - 12:45 pm | टवाळ कार्टा

युसुफभाई यांचे कर्तुत्व नक्की काय म्हणे?

मुळात युसुफभाईंना भारतरत्न कुठे मिळाले आहे..?

नाखु's picture

21 Jul 2016 - 1:54 pm | नाखु

पण पाकने पुरस्कार (इथला स्र्वोच्च नागरी पुस्रस्कार) दिल्यानंतर भारतानेही दिला इतकेच म्हणायचे होते

तुलना होत नाही काकाश्री... निशान-ए-इम्तियाज आधी भारताने पद्मभुषण दिलेच होते की.

कंजूस's picture

21 Jul 2016 - 12:44 am | कंजूस

खेळाव्यतिरिक्त थोडीही स्टारव्हॅल्यु नसलेला खेळाडू.

मोदक's picture

21 Jul 2016 - 12:45 am | मोदक

स्टारव्हॅल्यु म्हणजे?

टवाळ कार्टा's picture

21 Jul 2016 - 12:55 am | टवाळ कार्टा

कैच्याकै हुकलाय हा प्रतिसाद काका

संदीप डांगे's picture

21 Jul 2016 - 1:05 am | संदीप डांगे

टकाशी सहमत. स्टारवॅल्यू बद्दल माहित नाही पण ब्रॅण्डवॅल्यू कडक आहे महाराजा. एका क्लायंटच्या फारीन डेलिगेट्स ना सचिनने साईन केलेल्या ब्याटी भेट द्याव्या असा काही प्रस्ताव आला. त्यावर सचिन कडून प्रत्येक सहीचे ७६ हजार घेईन असे मॅनेजरकरवी उत्तर आले होते!

७६ हजार हा आकडा कुठुन आला असेल..?

संदीप डांगे's picture

21 Jul 2016 - 1:13 am | संदीप डांगे

अहो, तेच तर नै माहित. असा अधेमधे आकडा आल्यामुळेच तो अजून लक्षात आहे. काही नुमरॉलॉजी असेल बुवा. लै मानतात ते हे सगळं असं ऐकुन आहे...

तुषार काळभोर's picture

22 Jul 2016 - 11:49 am | तुषार काळभोर

युएसडी किंवा युरोत कन्वर्ट करून पाहायचं. ७६००० रुपये म्हणजे १००० युरो, असं काहीतरी गणित असेल.

अनुप ढेरे's picture

21 Jul 2016 - 10:11 am | अनुप ढेरे

५०००० + वॅट + स्वच्छ भारत सेस + कृषी कल्याण सेस =))

बोका-ए-आझम's picture

21 Jul 2016 - 1:17 am | बोका-ए-आझम

या दोन समानार्थी संज्ञा वाटताहेत. Brand value साठी Brand Equity हाही शब्द ऐकलेला आहे.

संदीप डांगे's picture

21 Jul 2016 - 1:24 am | संदीप डांगे

स्टार वॅल्यू वेगळी, ब्रॅण्डवॅल्यू वेगळी. थोडी समानता आहे पण अंधूकसा फरक आहे. एखादा अभिनेता त्याच्या भूमिकेने एखादा चित्रपट तारून नेत असेल तर ती स्टारवॅल्यू, पण तोच अभिनेता एखादे उत्पादन विकण्यास उपयोगी पडत नसेल तर त्याला ब्रॅण्डवॅल्यू नाही. कंपनीच्या सेल्सला एखादी एन्डॉर्न्समेंट किती प्रभावित करु शकते ह्यावर एन्डॉर्सीची ब्रॅण्डवॅल्यू ठरते. ज्यायोगे भरमसाठ जाहिराती करणारा शाहरुखची ब्रॅण्डवॅल्यू, तुलनेने कमी व निवडक उत्पादनांची जाहिरात करणार्‍या धोनीपेक्षा कमी असू शकते. स्टारवॅल्यूच्या बाबतीत उलटे घडते.

अर्थात हे माझे अभ्यास व निरिक्षनावर आधारित वैयक्तिक मत आहे.

बोका-ए-आझम's picture

21 Jul 2016 - 6:54 am | बोका-ए-आझम

एक शंका - हे झालं films च्या बाबतीत, जिथे या दोन गोष्टी सरळसरळ वेगळ्या काढता येऊ शकतात. पण Cricket मध्ये असा फरक कसा करणार? कारण films ना repeat audience असू शकतो. उदाहरणार्थ १९९४-९५ चा अंदाज अपना अपना अजूनही लोकप्रिय आहे. पण क्रिकेटच्या बाबतीत असं कसं ठरवतात?

संदीप डांगे's picture

21 Jul 2016 - 10:27 am | संदीप डांगे

It's not about films or sports, it's about personality. Will detail this in evening.

संदीप डांगे's picture

22 Jul 2016 - 1:01 am | संदीप डांगे

बोकाशेठ, लोकप्रिय आणि प्रसिद्ध असणे ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत, एकसारख्या वाटत असल्या तरी. सूक्ष्म फरक आहे. जरा विस्ताराने लिहितो - जित्याची खोड मोडायची नाहीच.. ;)

अंदाज अपना अपना ही एक कलाकृती आहे. लोकप्रिय आहे. पण तीला ब्रॅण्डवॅल्यू नाही. क्रिकेटला आहे. क्रिकेटरला आहे. क्रिकेटचा आधार घेऊन आज अक्षरशः काहीही विकले जाऊ शकते. आयपीएल-बीसीसीआयला असतांना मिडीया, अ‍ॅडवर्टायझिंग अ‍ॅण्ड प्रमोशन्स च्या खात्यातच काम केलेले असल्याने बर्‍याच गोष्टी फार जवळून, आतून माहित आहेत.

एखादा नट केवळ तो नायक आहे म्हणून चित्रपटाला गर्दी खेचू शकतो ही स्टारवॅल्यू. राजेशखन्ना, अमिताभ ह्यांनी सर्वात शुद्ध अवस्थेतली स्टारवॅल्यू प्राप्त केली होती. आज अमिताभला स्टारवॅल्यू नाही पण ब्रॅण्डवॅल्यू आहे. आता ब्रॅण्डवॅल्यू म्हणजे काय?

ब्रॅण्ड म्हणजे ओळख. हा एका जुन्या शब्दाचा अपभ्रंश आहे. मूळ शब्द brandr म्हणजे बर्न्ट. म्हणजेच 'जाळलेला'. जुन्या काळी घोड्यांची विशेष मागणी असायची. जातीवंत घोड्यांच्या पागांचे (स्टेबल्स) मालक आपल्या पागेचा घोडा भरबाजारात गिर्‍हाईकांना ओळखू यावा म्हणून तापलेल्या लोखंडी शिक्क्याने घोड्यांच्या पाठीवर मार्क करायचे. आताआतापर्यंत करत होते -बहुतेक. आता अशा अमूक एका पागेचा-मालकाचा शिक्का असलेला घोडा म्हणजे अस्सल जातीवंतच ही खात्री तो मार्क् -ते चिन्ह- असायचा. अशा खुणांचा वापर आपल्या उत्पादनांवर करणे हे कॉमन असले तरी अस्सल, उत्तम उत्पादनांची खात्री म्हणजेच ब्रॅण्डनेम. खात्रीशीर, उत्तम उत्पादन-सेवेद्वारे ग्राहकांच्या मनात आपली एक खास जागा, हक्काचा कोपरा मिळवणे म्हणजेच ब्रॅण्डवॅल्यू.

ह्यात बरेचदा लोक कन्फ्युज होतात, ते असे की भरमसाठ जाहिराती केल्या- टीवीकमर्शियलचा रतीब घातला की झाला ब्रॅण्ड तयार. असे नसते. मुळात सुरवातीला तरी अव्वल दर्जा पाहिजेच पाहिजे. लोकांची गरज (भौतिक, मानसिक) उत्तम पद्धतीने परिपूर्ण केली की झाला ब्रॅण्ड तयार. एकदा ब्रॅण्ड तयार झाल्यावर काही केल्या ती जादू उतरत नाही.(अपवाद असतातच)

नुसते एखाद्या कामात-सेवेत-उत्पादनात नाव कमावणे म्हणजे ब्रॅण्ड नव्हे. ब्रॅण्डचा संबंध टॅन्जीबलपेक्षा इन्टॅण्जीबल गोष्टींशी जास्त असतो. सर्व काही समान असले तरी अ‍ॅपलचा फोन स्वस्तातल्या चायनाफोनसमोर भाव खाऊन जातो. ग्राहकाच्या मनात ब्रॅण्डची एक प्रतिमा असते. बरेचदा ती तशी मुद्दाम तयार केली जाते. उदा. पीटर इन्ग्लन्ड शर्ट्स. अगदी कालपरवापर्यंत अनेकांना, काहींना आजही हे माहित नसेल की पीटर इन्गलन्ड शर्ट्स हे भारतीय कंपनी बनवते, शंभर टक्के भारतीय माल आहे. लोकांचा समज असाच आहे-होता की हे शर्ट्स इम्पोर्टेड आहेत. कंपनीने हे अचूक हेरून ब्रॅण्ड डेवलप केला. मूळ भावना: भारतीय लोकांना लोकल शर्ट्सपेक्षा इम्पोर्टेड कपड्यांची क्रेझ आहे, त्याने आत्मविश्वास वाढतो, आपण उच्चभ्रूंमधे गणल्या जाऊ अशी भावना येते. 'बीइंग ह्युमन' ही कुठलीतरी एन्जीओ असावी असे समजल्या जाते, पण ती एन्जीओ खरेतर एका कपड्याच्या कंपनीने आपले कपडे खपवण्यासाठी हेतुपुरस्सर तयार केलेला दर्शनी देखावा आहे. सलमान खान त्याचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर. म्हनजे 'बीइंग ह्युमन्चे टीशर्ट घालायचे आणि समाजकार्य करतोय असे दाखवायचे' ह्या कामाची सदर कंपनी सलमानभाईला किम्मत मोजते आहे. (मजकडे ह्या ब्रॅण्डची डेवलपमेंट केसस्टडी तिथेच काम करणार्‍या एका व्यक्तिकडून आली होती, तेव्हा कळले हे ;) )

तर ब्रॅण्ड म्हणजे १० टक्के दर्जाचा आणि ९० टक्के भावनेचा खेळ, सरळ सरळ. पद्मिनी, मारुती ८०० नंतर भारतीयांची कौटुंबिक वाहनाची, नवसंपन्नतेच्या मुसंडीची ओळख बनली ती टाटा इन्डिका - बडी छोटी गाडी. धपाधप सेल झाला. नंतर ट्रान्स्पोर्ट, ट्रॅवल्सवाल्यांनी पिवळ्या प्लेट लावायला सुरुवात केल्यावर ह्या नवसंपन्न भारतीयांच्या मनाचा एक कोपरा हलला. ह्यॅ, ही तर काय कोणीही - अगदी टॅक्सीवालेही घेतात. इंडिकाला जी प्रतिमा मिळाली ती गमावली, सेल कमी झाला. टाटाने इन्डिका विस्टा हे महाग आणि अधिक लग्जरीयस वर्जन आणलं. नंतर तर अशा लग्जरियस महाग वाहनांचा पोळा फुटला भारतीय बाजारात. लक्षात घेण्याची केसस्टडी अशी की जरी उत्तम दर्जा होता तरी ग्राहक कमी होत जाण्यामागे दुसरे नाजूक कारण होते. ते म्हणजे ब्रॅण्डची प्रतिमा.

प्रतिमा हीच जाहिरात जगाचा आत्मा आहे. मार्केटींगचा कणा आहे, सेल्सची प्रेयसी आहे. तर अशा काही प्रतिमा ओवर द पिरियड बनत जातात, काही मुद्दाम साच्यात घडवून बनवल्या जातात. अमिताभ अशीच एक प्रतिमा आहे, शाहरुखही, अमिरही, सलमानही, राखी सावंत ही, पूनम पांडेही आणि सनी लियोनही. प्रत्येकाची आप आपली प्रतिमा आणि आपआपली ब्रॅण्डवॅल्यू.

जाहिरात एजन्सीला आपल्या क्लायंटच्या प्रॉडक्टला सूट होईल अशी प्रतिमा असलेला सेलेब्रिटी वापरावा लागतो. (हे टेक्स्टबुकीय ज्ञान आहे, भारतातच ह्या अमूल्य ज्ञानाचा विचका केलेला जागोजाग आढळून येतो. महागडा, गडगंज श्रीमंती आव आणणारा रिडअ‍ॅण्डटेलर कपड्यांचा ब्रॅण्डअ‍ॅम्बेसेडर अमिताभ शेतातल्या पाण्याचा उपसा करणार्‍या पंपाचीही जाहिरात करतो. इट्स डिस्गस्टींग फॉर अ‍ॅन अ‍ॅडवर्टायजिंग प्रोफेशनल लाईक मी) फिटनेसफ्रीक असलेली बिपाशा फॄटज्यूसची जाहिरात करणार हे संय्युक्तिक, तसेच धोनी एखाद्या एनर्जी ड्रिंकचा ब्रॅण्डअ‍ॅम्बेसेडर हेही. दोघांनी मिळून बहुतेक धावण्याच्या शूजची जाहिरात केलेली, तेही योग्यच. लोकप्रिय व्यक्तिमत्वाच्या सर्वात ज्ञात व परिणामकारक पैलूशी आपल्या उत्पादन/सेवेची सांगड घालून आपल्या उत्पादन/सेवेचे मूल्य वाढवणे म्हणजे ब्रॅण्डवॅल्यू वाढवणे. लोकप्रियता हा निकष महत्त्वाचा असला तरी तो व्यक्तिमत्वाच्या कोणत्या बाबीमुळे आहे हे तपासणे महत्त्वाचे. ती बाब म्हणजे ब्रॅण्डवॅल्यू, निव्वळ लोकप्रियता म्हणजे ब्रॅण्डवॅल्यू नाही. नाईके, आदीदास ह्यांनी उत्तम उत्पादने दिलीत पण ती उत्तम खेळाडूंना जाहिरातीत झळकवून, त्यांना खेळतांना आपले उत्पादन वापरायला लावून. उत्तम खेळाडूंचे सगळेच उत्तम असते ही भावना जनसामान्यांत असते. मग तो रिबॉक असेल तर "तो उत्तमच असेल, त्याशिवाय का तो त्याने घातला आणि भन्नाट परफॉरमन्स दिला".

क्रिकेटमधे ब्रॅण्डवॅल्यू अशीच बनते. सचिन उत्तम खेळतो, अनेक विश्वविक्रम करतो, तो सर्वोत्कॄष्ट आहे, त्याची चॉईसही सर्वोत्तम असेल. मग तो जे जे उत्पादन एन्डॉर्स करतो त्याचीही वॅल्यू वाढते. किंवा ब्रॅण्डेड कंपन्या अशा सर्वोत्तमांना घेऊन 'दोन समान दर्जाचे लोकच मैत्री करु शकतात' ह्या जनसामान्यांच्या अंडरकरंट भावनेला कुरवाळतात. मग सचिन कशाचीही जाहिरात करो तिला एक आश्वासक खात्री त्याने त्याच्या उपस्थितीने मिळवून दिलेली असते. ल्युमिनस बॅटरी हे एक उदाहरण आत्ता आठवते. जुने म्हणजे अगदी सुरुवातीचे ते, 'सनी' ह्या दुचाकीची जाहिरात.

चित्रपटक्षेत्रातल्या कलाकारांना फक्त लोकप्रियता ह्या निकषावर निवडले जाते. अगदी टेक्स्टबुकिय ज्ञान लावायचे झालेच तर ज्या समुहातल्या लोकांना जो आवडतो त्या समूहासाठीच्या उत्पादनांसाठी ते ते अभिनेते, अभिनेत्री वापरल्या जातात. डॉलर, अमूल माचो, लक्स कोझी, रुपा, खुशबूवाला व्हील, हे एकाबाजुला तर डीबीअर्स, ल ओ रियल, नेस्कॅफे, गार्नियर दुसरीकडे. डू आय नीड टू से मोअर?

तसेच क्रिकेटमधे किंवा एकूण स्पोर्टसमधे राष्ट्रीय (भारतात राष्ट्रीयला तशी फार वॅल्यू नाहीच) आंतरराष्ट्रीय ख्यातीचे झाल्यावरच ब्रॅण्डवॅल्यू तयार होते. पण मनोरंजनक्षेत्रात फार लोकल लेवललाही सेलेब्रिटी स्टेटस मिळत असल्याने पॉप्युलॅरीटी वॅल्यू मिळते. कुठल्या भंगार पण लोकप्रिय सिरीयलमधल्या काहीही हं करनारीला सुद्धा एन्डॉर्समेंट्चे कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतात. प्रियंका, दिपिकाच्या एक शतांश वा एक हजारांश तरी मोबदला मिळतो. दुकानाची फित कापायला पाच पंचेवीस हजारात अशा सेलेब्रिटी येऊन जातात. तालुका-शहर पातळीवर सदर आस्थापनाचा गवगवा होतो, पैसा वसूल होतो. पण अशी वॅल्यू फर्स्टक्लास क्रिकेट खेळणार्‍याला नाही मिळत.

कोहलीला दुसरा सचिन म्हटल्या जात आहे, त्यामागे जाहिरातबाजच आहेत. सचिन आता खेळत नाही, त्याच्या रिटायरमेंटला उशिर होण्यामागेही जाहिरातदार आणि त्यांचे एन्डॉर्समेन्ट्स होत्या. आता ही सचिन नामे सोन्याची कोंबडी खुडूक झाल्यावर व त्याच्याइतकी ब्रॅण्डवॅल्यू+इमेजवाला दुसरा कोणी तयार झालेला नसल्याने कोहलीला सचिनचा उत्तराधिकारी म्हटले जाऊ लागले. उत्तराधिकारी तो फक्त ह्या एन्डॉर्समेन्टचाच. कारण जाहिराती चालणे उत्पादकांसाठी आवश्यक, आणि क्रिकेट चालणे जाहिरातींसाठी आवश्यक. क्रिकेटमधे सचिन असणे क्रिकेटसाठी आवश्यक. पण तो नाही तर कोहलीला पुढे केले जात आहे. आणि तो आहेही आजच्या तरूणांसारखा, बेधडक, बिन्दास्त. कोणे एकेकाळी थकलेल्या, मरगळलेल्या भारतीय तरूणांच्या आत्मविश्वासाला फुंकर घालायचे काम सचिन ने केले. त्यानंतर एक पिढी निघून गेली. नव्या पिढीची, नव्या क्रिकेटची प्रतिमा म्हणून कोहली गाजत आहे, गाजवला जात आहे.

अजून बरंच आहे काय काय... तुर्तास एवढे लेक्चर पुरेसे ;)

आणि तुम्हीही मासकम्युनिकेशन मधे शिकलात-की-शिकवता असे थोडेसे आठवते, तुम्हाला अधिक काय सांगणे!

अंतु बर्वा's picture

22 Jul 2016 - 1:55 am | अंतु बर्वा

माहीतीपुर्ण प्रतिसाद. बीइंग ह्युमन बद्दल ठाउक नव्हतं.. :-)

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jul 2016 - 4:44 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर प्रतिसाद !

बिईंग ह्युमन ही सलमानने स्थापलेली (आणि त्याच्या कोर्टात चालू असलेल्या खटल्यांत सहानभूती मिळवण्यासाठी उपयोगात आणली जाणारी) एनजीओ आहे असाच सर्वसाधारण समज आहे... आता तुम्ही दिलेली माहिती वाचून ती संस्था सलमानने स्थापन केली आहे "समज करून दिला गेला आहे" असे वाटते ! :) :(

======

वरच्या पॉप्युलॅरिटी, स्टार व्हॅल्यु आणि ब्रँड व्हॅल्यु यांच्या संदर्भात प्रतिसाद द्यावा म्हणुन इन्स्टिस्ट्युशनालायझेशनवर (institutionalization) काही लिहिले. ते जरा लांबत गेले. या धाग्यावर फार अवांतर होऊ नये यासाठी ते दोन पैश्याचे नाणे स्वतंत्रपणे इथे प्रसिद्ध केले आहे.

बेकार तरुण's picture

22 Jul 2016 - 7:22 am | बेकार तरुण

संदीप प्रतिसाद अत्यंत माहितीपूर्ण आहे. आवडला.
बीईंङ ह्युमन = मंधाना ईंडस्ट्रीज?

म्हणजे ह्याला म्हणतात प्रतिसाद अश्या उच्च पक्षी किचकट माहीती आणि सोप्या भाषेत सांगणे याचा मिलाफ आहे.

अगदी असाच नाही पण किमान माहीती देणार्या (न खेकसता) प्रतिसादाची अपेक्षा होती मिपालोकांची तुमच्या मित्राकडून, बाकी फार अपेक्षा नाही,

सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे !

आपलाच नेहेमीच नम्र नाखु

बोका-ए-आझम's picture

22 Jul 2016 - 1:23 pm | बोका-ए-आझम

ही माहिती पुस्तकी स्वरूपात होती. Practical स्वरूपात नव्हती. प्रत्यक्ष जाहिरात आणि branding क्षेत्रात काम करणाऱ्या तुमच्यासारख्या मित्रांकडून practical माहिती समजते, म्हणूनच तो प्रश्न विचारला होता. पुन्हा एकदा धन्यवाद!

फारएन्ड's picture

22 Jul 2016 - 7:28 pm | फारएन्ड

मीडिया ने कोहलीचा सचिन करणे सुरू केल्याचे लक्षात आले होते. कारण भारतीय क्रिकेट पेक्षा मीडिया व स्पॉन्सरर्स ना नवीन सचिन ची गरज होती.

बाकी ब्रॅण्ड बद्दलची माहितीही छान.

कैलासवासी सोन्याबापु's picture

23 Jul 2016 - 2:44 pm | कैलासवासी सोन्याबापु

डांगे ब्वा दंडवत स्वीकार करावा ही विनंती

_______/\________

ह प्रतिसाद वाचनात आलाच नव्हता. आम्ही एक्काकांच्या धाग्यावरुन इकडे आलो ब्वा.
एनीवे. संदीपराव, अल्टीमेट प्रतिसाद. इतका डीट्टेल अभ्यास आमच्याने कधी झाला नाही ब्वा. मुख्य म्हणजे असे सुसंगत लिहायला जी स्थिरता लागते ती आपल्याकडे जबरी आहे. आवडले आहे अत्यंत. अशा स्वरुपाचे आपल्या फिल्डमधले अजून लिखाण होत राहावे हि शुभेच्छा.
बाकी बीईंन्ग ह्युमनचे सुझुकीसोबत टायप (सुझुकीचा ब्रान्ड अम्बासिडर सलमान आहे. प्रत्येक सुझुकीवर बीईंग ह्युमनचा लोगो असायचा) माहीत होता.

कैलासवासी सोन्याबापु's picture

23 Jul 2016 - 2:54 pm | कैलासवासी सोन्याबापु

अशा स्वरुपाचे आपल्या फिल्डमधले अजून लिखाण होत राहावे हि शुभेच्छा.

+10000

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Jul 2016 - 11:08 am | कैलासवासी सोन्याबापु

स्टारव्हॅल्यु = नवाजुद्दीन सिद्दीकी

ब्रँडव्हॅल्यु = शाहरुख खान

शब्द चुकला असेल.पण संस्थळावर जास्ती लिहिता येत नाही.

त्यात असं म्हटलं आहे की संजय नारंग अाणि सचिन तेंडुलकर यांच्यात सध्या कुठल्याही प्रकारचे व्यावसायिक संबंध नाहीत पण एकेकाळी होते हे तितकंच खरं आहे. संजय नारंग यांची MARS Hospitalities नावाची कंपनी आहे. जेट एअरवेज आणि जेट लाईट यांचं इन-फ्लाईट केटरिंग ते करतात आणि शिवाय त्यांची काही restaurants सुद्धा आहेत - मुंबईत Pizza by the Bay, All Stir Fry, Just around the corner आणि On Toes ही त्यांच्या मालकीची restaurants आहेत. पुण्यात एकेकाळी (असं म्हणतोय कारण आत्ता माहित नाही) ईस्क्वेअरमधलं All Stir Fry पण त्यांचंच होतं. त्यांनी कुलाब्याला गेटवे आॅफ इंडिया जवळ Tendulkar's नावाचं एक restaurant चालू केलं होतं. त्यात सचिन आणि संजय नारंग partners होते. केजरीवाल एंटरप्राईझेस नावाच्या एका Marketing Company साठी मी consulting assignment केली होती तेव्हा या सगळ्या restaurants च्या Food and Beverage Managers शी आणि सरतेशेवटी खुद्द संजय नारंग यांच्याशीही भेट झाली होती. Tendulkar's साठी आम्ही इतर restaurants पेक्षा वेगळं आणि exclusive deal द्यावं म्हणून संजय नारंग कसे अडून बसले होते ते मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. ही साधारण २००४ ची गोष्ट आहे. त्यामुळे सचिन आणि संजय नारंग यांची फक्त मैत्री आहे यात काहीही तथ्य नाही. त्यात कुठल्यातरी स्वरूपाची business relationship असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेमन्त वाघे's picture

21 Jul 2016 - 12:09 pm | हेमन्त वाघे

केजरीवाल एंटरप्राईझेस हि अलोक केजरीवाल ची ( कॉन्टेस्ट टु विन ) वाल्या ची कंपनी होती ??

बोका-ए-आझम's picture

22 Jul 2016 - 1:33 pm | बोका-ए-आझम

पण त्यांचं दूरचं नातं आहे. निदान मला तरी त्यांनी हे विचारल्यावर असंच सांगितलं होतं.

त्यात असं म्हटलं आहे की संजय नारंग अाणि सचिन तेंडुलकर यांच्यात सध्या कुठल्याही प्रकारचे व्यावसायिक संबंध नाहीत पण एकेकाळी होते हे तितकंच खरं आहे. संजय नारंग यांची MARS Hospitalities नावाची कंपनी आहे. जेट एअरवेज आणि जेट लाईट यांचं इन-फ्लाईट केटरिंग ते करतात आणि शिवाय त्यांची काही restaurants सुद्धा आहेत - मुंबईत Pizza by the Bay, All Stir Fry, Just around the corner आणि On Toes ही त्यांच्या मालकीची restaurants आहेत. पुण्यात एकेकाळी (असं म्हणतोय कारण आत्ता माहित नाही) ईस्क्वेअरमधलं All Stir Fry पण त्यांचंच होतं. त्यांनी कुलाब्याला गेटवे आॅफ इंडिया जवळ Tendulkar's नावाचं एक restaurant चालू केलं होतं. त्यात सचिन आणि संजय नारंग partners होते. केजरीवाल एंटरप्राईझेस नावाच्या एका Marketing Company साठी मी consulting assignment केली होती तेव्हा या सगळ्या restaurants च्या Food and Beverage Managers शी आणि सरतेशेवटी खुद्द संजय नारंग यांच्याशीही भेट झाली होती. Tendulkar's साठी आम्ही इतर restaurants पेक्षा वेगळं आणि exclusive deal द्यावं म्हणून संजय नारंग कसे अडून बसले होते ते मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. ही साधारण २००४ ची गोष्ट आहे. त्यामुळे सचिन आणि संजय नारंग यांची फक्त मैत्री आहे यात काहीही तथ्य नाही. त्यात कुठल्यातरी स्वरूपाची business relationship असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संदीप डांगे's picture

21 Jul 2016 - 1:16 am | संदीप डांगे

शक्यता आहे.

निंजा टर्टल's picture

21 Jul 2016 - 1:47 am | निंजा टर्टल

क्रिकेट खेळणारे साहेब निवृत्त झाले.
आता बास झालं की!

खटपट्या's picture

21 Jul 2016 - 2:13 am | खटपट्या

ओळख पटतेय हळू हळू

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

21 Jul 2016 - 9:55 am | माईसाहेब कुरसूंदीकर

वाचतेय.

त्यावर सचिन कडून प्रत्येक सहीचे ७६ हजार घेईन असे मॅनेजरकरवी उत्तर आले होते!

मग त्यात विशेष ते काय? तो कदाचित एक लाखही सांगेल व लोक कदाचित ती बॅट्ट विकतही घेतील. सचिनच्या क्रिकेटच्या कर्तृत्वाबाबत दुमत नकोच.क्रिकेटमधला तो एक जागतिक दर्जाचा अव्वल खेळाडू होता व असंख्य विक्रमांची नोंद त्याच्यावर आहे.मूळ मुद्दा सचिनने संजय नारंग ह्याला मदत करण्यासाठी स्वःचे वजन वापरले हा आहे.व ते चूक आहे असे आमचे मत.त्याला भारतरत्न मिळायला नको होते.. वगैरे मुद्दे गौण आहेत. तत्कालीन सरकारला भारतरत्न द्यावेसे वाटले व त्यास कोणाही लोकप्रतिनिधीने (उघडपणे)आक्षेप घेतला नाही वा कोणत्या क्रिकेटपटूनेही नाराजी व्यक्त केली नाही.

.

किसन शिंदे's picture

21 Jul 2016 - 1:38 pm | किसन शिंदे

सचिनच्या क्रिकेटच्या कर्तृत्वाबाबत दुमत नकोच.क्रिकेटमधला तो एक जागतिक दर्जाचा अव्वल खेळाडू होता व असंख्य विक्रमांची नोंद त्याच्यावर आहे.

याच्याशी असंख्य वेळा सहमत.

मूळ मुद्दा सचिनने संजय नारंग ह्याला मदत करण्यासाठी स्वःचे वजन वापरले हा आहे.व ते चूक आहे असे आमचे मत.

याच्याशीही सहमत..

एकुणात माईच्या संपूर्ण प्रतिसादाशी सहमत आहे.

संदीप डांगे's picture

21 Jul 2016 - 11:02 pm | संदीप डांगे

सचिनने सहीचे ७६ हजार काय ७६ लाख घेतले तरी मला विशेष वाटत नाही. उलट मला तर वाटते की घ्यावेत आणि दणदणित इन्कमटॅक्स भरावा. त्यात करमाफीसाठी सरकारकडे शब्द टाकू नये. बाकी किस्सा एवढ्याकरता सांगितला की महोदयांची ब्रॅण्डवॅल्यू किती आहे ते फर्स्ट ह्याण्ड कळावे म्हणून. अनेकदा सेलेब्रिटींबद्दल 'दे आर नॉट अक्सेसिबल' असते कृत्रिम वलय तयार केलं जातं ते अशाच किमती मोजल्या जाव्यात म्हणून. अशा किमती असतात हे सर्वांना माहित आहे पण नक्की आकडा काय हे केवळ संबंधित लोकांनाच ठावूक असतं. तेवढंच सांगायचा उद्देश होता.

बाकी ती ब्रॅण्डवॅल्यु बनवण्यासाठी आणि सारखी वाढवत राहण्यासाठी पडद्यामागे काय काय होतं तो भाग अलाहिदा ( ह्यात जागतिक विक्रम, अव्वल खेळाडू असणे वेगळे, पण कोणत्याही गुंत्यात -पक्षी म्याचफिक्सिंगमधे कधीही नाव घेतले न जाणे, इत्यादी बरंच आहे - पण भक्तांना भक्त बनवून ठेवणे ज्यांच्या हिताचे असते ते ब्रॅण्डवॅल्यू जपणे अचूक जाणतात)

सूचना: काहिंना वाटेल मी सचिनवर चिखलफेक करतोय किंवा तत्सम तर क्षमा असावी. काही गोष्टी माहित असून सांगता येत नसतात, सांगितल्या तरी कोणी विश्वास ठेवत नसतं. सामान्य माणसांनी असंच वागणं अपेक्षित असतं.

अभिदेश's picture

22 Jul 2016 - 12:00 am | अभिदेश

एक तर तुम्ही वर जे ७६ हजार चे म्हणताय त्याला काही पुरावा नाही. आणि जरी त्याने मागितले असतील तर तुमच्या किंवा आपल्या पोटात दुखायचे काही कारण नाही. त्याने इन्कमटॅक्स भरला असेल आणि त्यासाठी कोणतीही करमाफी मागितलेली नाही. आता तुम्ही परत ते फेरारी बद्दल बोलणार असाल तर ते आता जुने झालाय ,

<<बाकी ती ब्रॅण्डवॅल्यु बनवण्यासाठी आणि सारखी वाढवत राहण्यासाठी पडद्यामागे काय काय होतं तो भाग अलाहिदा ( ह्यात जागतिक विक्रम, अव्वल खेळाडू असणे वेगळे, पण कोणत्याही गुंत्यात -पक्षी म्याचफिक्सिंगमधे कधीही नाव घेतले न जाणे, इत्यादी बरंच आहे - पण भक्तांना भक्त बनवून ठेवणे ज्यांच्या हिताचे असते ते ब्रॅण्डवॅल्यू जपणे अचूक जाणतात) >>
ह्यावरून तुमचा आकस सरळ सरळ दिसतोय , वर मखलाशी अशी की काही गोष्टी माहित असून सांगता येत नसतात , तुम्हाला माहीत असेल्या गोष्टी वर आम्ही का विश्वास ठेवावा ? तुम्ही म्हणजे ब्रह्मदेव नाही..
कसं असत ना काही लोकांना जे प्रस्थापित , प्रथितयश मिळवलेल्या व्यक्ती सहन होत नाहीत. त्या मागे थोडाफार मानसिक कारण असतात ( दोन उदाहरणे देतो सगळे communist आणि केजरीवाल ) , तूर्तास एवढेच.

संदीप डांगे's picture

22 Jul 2016 - 12:13 am | संदीप डांगे

गड्या अभिदेशा, एखाद्याला हास्यास्पद ठरवणे आणि पुरावे मागणे खूप सोपे असते, बरे का!

तुम्ही आपल्या फेफ्रातल्या बातम्या वाचित जावा आणि नंदनवनात खुश र्‍हावा. तुम्ही विश्वास ठेवा न ठेवा, माका कायबी फरक पडत नाय...

बाकी, तुम्ही मानसिक कारणापर्यंत पोचलात हे बाकी भारी केलंत, ज्यातलं आपल्या काही समजत नाही, माहित नाही, कधीही माहित होऊ शकत नाही ते, जगात अन्य कुणालाही कधीच कळू शकणार नाही कारण ते अस्तित्वातच नाही असे भास ज्यात होतात तेही एखादे मानसिक कारणच असेल, नैका?

असो.

अभिदेश's picture

22 Jul 2016 - 12:25 am | अभिदेश

तुम्ही फेफ्रातल्या बातम्या सोडून दुसरीकडे कुठे बातम्या वाचता आणि खुश होता ? आम्हालाही सांगा ना गडे... मानसिक कारण जरा जास्त मनाला लागलं वाटतं ? असू दे , असू दे ... खरं लागत नेहेमीच मनाला.

ज्यातलं आपल्या काही समजत नाही, माहित नाही,
तुम्ही सर्वज्ञ आहात का म्हणजे ? म्हणजे तुम्हाला सगळ्यातलं , सगळं कळतं का ?
रच्याने ... असं वाटणं हे देखील मानसिक लोच्या असू शकतो बुवा.

संदीप डांगे's picture

22 Jul 2016 - 1:02 am | संदीप डांगे

वत्सा, तुजप्रत कल्याण असो. ;)

अभिदेश's picture

22 Jul 2016 - 1:07 am | अभिदेश

ब्रह्मदेवा...

संदीप डांगे's picture

22 Jul 2016 - 1:29 am | संदीप डांगे

जौ देत हो.. तुमचा दोष नाही तो.

मज पामराचे आयुष्यच असे भन्नाट गेले आहे-जात आहे-जाणार आहे, की घाण्याच्या बैलासारख्या हयातभर रोज त्याच त्या घिरट्या मारणार्‍यांना, मी खोटं बोलतोय असंच वाटत असतं.

अभिदेश's picture

22 Jul 2016 - 3:44 am | अभिदेश

तुम्ही तुमच्यावरची मागे झालेली कारवाही विसरलात वाटतं , प्राणीवाचक शब्द वापरल्याबद्दल ? तरी पुन्हा एकदा तुम्ही तसच लिहिताय .... घाण्याच्या बैलासारख्या ??? झालेल्या चुकांमधून काही शिकण्याची तुमची इच्छा नाही हे सिद्ध झालाच आहे , तुम्हाला जर का कोणाचा प्रतिवाद सभ्य भाषेत करता येत नसेल तर लिहीत जाऊ नका . आम्ही आमची पातळी सोडू शकत नाही . त्यामुळे सध्या एवढेच "देवा ह्याला क्षमा कर , हा काय बोलतोय ते त्याला कळत नाहीये ."

संदीप डांगे's picture

22 Jul 2016 - 4:18 am | संदीप डांगे

माझ्यावर.... कारवाही..????? कधी बुवा??? कोणत्या चुका??? झोपेतून जागे व्हा महाराज. आम्ही इथेच आहोत, कसल्याही कारवाईशिवाय. उगाच अफवा पसरवून आमचे नाव बदनाम करु नका.

तुम्ही घाण्याचे बैल आहात हे मी म्हटले नाहीच तेव्हा तुम्हाला का बरे लागले??? आता तुम्हीच वर बोलला होता की "खरं लागत नेहेमीच मनाला".. ते इथे लागू करावे काय?

माझे मानसिक कारण, मानसिक लोच्या इत्यादी काढण्याआधी सभ्य भाषेचा विचार तुमच्या सभ्य मनाला शिवला नाही, आधी मला दिलेले उपप्रतिसाद, त्यातली भाषा, रोख, अर्थ सगळे तपासून बघा, मग विचार करा, कोणाला कळत नाही काय बोलतोय ते.

'तुम्हाला लाख असेल सचिन प्रिय म्हणून त्याच्यासाठी तुम्ही माझा अपमान करु शकत नाही' हे एवढा साधा सभ्यतेचा संकेत सुरवातीसच पाळायला हवा होतात. पलटवार झाला तर कळवळलात होय??

अभिदेश's picture

22 Jul 2016 - 6:32 am | अभिदेश

गैरसमज दूर केला ते , आम्हाला वाटले तसे . त्या पोस्ट नंतर तुम्ही गायब झालात म्हणून मी म्हटले . पण एकूणच तुम्हाला प्राणीवाचक शब्द आवडतात तर .असो .जर का तुम्ही घाण्याचे बैल , हा उल्लेख माझ्या पोस्ट ला रिप्लाय करताना वापरला होता मग तो मला नाही तर कोणाला उद्देशून केला होता ? राहिले मानसिक कारण , तर ती एक प्रकारची वृत्ती असते लोकांची , एक मानसिकता असते त्यांची. त्यांना काही लोकांची प्रसिद्धी सहन होत नाही , मग उगाच काहीतरी खुसपट काढायची , पुड्या सोडायच्या आणि आपण दुरून गम्मत बघत बसायचं . तुम्ही स्वता: सचिन वर काहीही आरोप करताय पुराव्यावाचून ही कोणती वृत्ती आहे ? आणि जाब विचारला तर स्वतःलाच कस सगळं कळत आणि बाकीचे सगळे कसे अजाण आहेत हे बोलायचं . मी जी मानसिकता म्हटलं ती हीच .

अभिदेश's picture

22 Jul 2016 - 12:05 am | अभिदेश

एक तर तुम्ही वर जे ७६ हजार चे म्हणताय त्याला काही पुरावा नाही. आणि जरी त्याने मागितले असतील तर तुमच्या किंवा आपल्या पोटात दुखायचे काही कारण नाही. त्याने इन्कमटॅक्स भरला असेल आणि त्यासाठी कोणतीही करमाफी मागितलेली नाही. आता तुम्ही परत ते फेरारी बद्दल बोलणार असाल तर ते आता जुने झालाय ,

बाकी ती ब्रॅण्डवॅल्यु बनवण्यासाठी आणि सारखी वाढवत राहण्यासाठी पडद्यामागे काय काय होतं तो भाग अलाहिदा ( ह्यात जागतिक विक्रम, अव्वल खेळाडू असणे वेगळे, पण कोणत्याही गुंत्यात -पक्षी म्याचफिक्सिंगमधे कधीही नाव घेतले न जाणे, इत्यादी बरंच आहे - पण भक्तांना भक्त बनवून ठेवणे ज्यांच्या हिताचे असते ते ब्रॅण्डवॅल्यू जपणे अचूक जाणतात)

ह्यावरून तुमचा आकस सरळ सरळ दिसतोय , वर मखलाशी अशी की काही गोष्टी माहित असून सांगता येत नसतात , तुम्हाला माहीत असेल्या गोष्टी वर आम्ही का विश्वास ठेवावा ? तुम्ही म्हणजे ब्रह्मदेव नाही..
कसं असत ना काही लोकांना जे प्रस्थापित , प्रथितयश मिळवलेल्या व्यक्ती सहन होत नाहीत. त्या मागे थोडाफार मानसिक कारण असतात ( दोन उदाहरणे देतो सगळे communist आणि केजरीवाल ) , तूर्तास एवढेच.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jul 2016 - 12:13 am | डॉ सुहास म्हात्रे

माई तुम्ही स्वतःचे मत सांगितलेत (जरा चुकल्याचुकल्यासारखे वाटले) ! :)

मात्र, तुम्ही १००% बरोबर बोललात !!

मूळ मुद्दा सचिनने संजय नारंग ह्याला मदत करण्यासाठी स्वःचे वजन वापरले हा आहे.व ते चूक आहे असे आमचे मत

अश्या वेळी भारतरत्न काढुन घेण्याची पण सोय असली पाहिजे. एका उघडकीस आलेल्या ( लपलेल्या कीतीतरी असतील ) कृतीने रत्नाचा दगड झाला हे मान्य करायला सरकार आणि भारतीय जनतेला काही हरकत नसावी.

मराठी_माणूस's picture

21 Jul 2016 - 10:26 am | मराठी_माणूस

"some are more equal than others" हे आपल्याकडे तंतोतंत लागु आहे. त्यात काही लोकांना तो आपला हक्कच आहे असे वाटते. नियम, कायदे सामान्य लोकांसाठी असतात अशी त्यांची समजूत असते. गंमत म्हणजे सामान्य लोकच त्यांना देव वगैरे म्हणून त्यांची अशी समजुत करुन देण्यास हातभार लावतात. गुन्हेगार आहे हे माहीत असुन त्यांच्या सिनेमांना गर्दी करतात.

सुबोध खरे's picture

21 Jul 2016 - 10:28 am | सुबोध खरे

देव म्हणून उल्लेख करणे देखील पटत नाही.
बाडीस
देव म्हणून घ्या, घरात देव्हाऱ्यात बसवा आणि त्याच्या पायाचे तीर्थही घ्या. कशाला?
त्याचे खेळातील प्राविण्य पहा आणि सोडून द्या.उगाच त्याच्या एकंदर वागणुकीचे उदात्तीकरण करणे सोडून द्या. फेरारीवर कर लावू नका म्हणून केलेली मागणी. घरात अनधिकृत जिम बसविणे इ गोष्टींमुळे तो बाकी आयुष्यात सामान्यच आहे हे स्पष्ट होते. साडे चार वर्षाच्या राज्यसभेच्या कारकिर्दीत त्याने विचारलेले चार प्रश्न सोडता त्याने काय केले हा ही प्रश्न विचारता येईल.
श्री व्यंकटेश माडगूळकर १९४६ मध्ये लिहून गेले "साहेब, तुम्ही मिठाई खावी कारखाना बघण्याच्या फंदात पडू नका.
सचिन तेंडुलकरचे क्रिकेट पहा आणि सोडून द्या
उगाच खासदार, देव, महान मानव इ बनविण्याचा फंदात पडू नये.

संदीप डांगे's picture

21 Jul 2016 - 10:29 am | संदीप डांगे

Exactly!!!

पद्मावति's picture

21 Jul 2016 - 10:46 am | पद्मावति

सहमत आहे.

राजाभाउ's picture

21 Jul 2016 - 11:19 am | राजाभाउ

शब्दा शब्दाशी सहमत.

मितभाषी's picture

22 Jul 2016 - 7:52 pm | मितभाषी

डाॅ खरे १०० टक्के खरे बोलले.
लै मेहनत वाचवली.

गामा पैलवान's picture

21 Jul 2016 - 11:23 am | गामा पैलवान

खरे डॉक्टर,

>> साहेब, तुम्ही मिठाई खावी कारखाना बघण्याच्या फंदात पडू नका.

अगदी खरं बोललेत पहा व्यंकटेश माडगूळकर. ऋषीचं कूळ आणि नदीचं मूळ शोधायचं नसतं ते याचसाठी.

आ.न.,
-गा.पै.

पैसा's picture

21 Jul 2016 - 11:40 am | पैसा

मी वाचले ते नारंग हा सचिन तेंडुलकरचा बिझिनेस पार्टनर आहे असेच वाचले. http://timesofindia.indiatimes.com/india/Sachin-Tendulkar-sought-Parrika...

पर्रीकरांनी सचिनला ठाम नकार दिला असेल हे नक्कीच. आणि गोव्यातल्या कोणालाही त्याचे आश्चर्य वाटणार नाही. मुलांना कॉम्प्युटर वाटप करायचे काँट्रॅक्ट असो, की नारायण राणेंच्या चिरंजिवानी टोल बूथ फोडून तिथल्या लोकांना केलेली मारहाण असो, अशी कित्येक प्रकरणे पर्रीकरांनी ठाम राहून हाताळलेली आम्ही पाहिली आहेत. त्यांच्यावर कोणाचेही कसलेही प्रेशर येऊ शकत नाही. म्हणूनच मधे पर्रीकरांच्या जागी जेटलींना संरक्षण मंत्री करण्याची शक्यता आहे अशी बातमी वाचली तेव्हा काय हा दळभद्रीपणा असे वाटले होते.

खटपट्या's picture

21 Jul 2016 - 11:20 pm | खटपट्या

बरोबर. पर्रीकरांसारखा मुख्यमंत्री आजपर्यंत गोव्याला मिळाला नाही आणि मिळणार नाही. आजकाल अशी माणसंच कमी होत चालली आहेत. सुरेश प्रभु, मधू दंडवते ही काही त्याच पठडीतील माणसं

हवाबाण हरडे's picture

22 Jul 2016 - 4:19 am | हवाबाण हरडे

सचिन नं नको होत कराले असं..

स्वीट टॉकर's picture

22 Jul 2016 - 11:11 am | स्वीट टॉकर

संदीप,
स्टार व्हॅल्यू आणि ब्रॅन्ड व्हॅल्यूवर तुम्ही फारच सुरेख विवेचन दिलं आहे. धन्यवाद!

बोकाभाऊंची इन्साइड इन्फर्मेशनदेखील खूपच महत्वाची आहे.

गामा पैलवान's picture

22 Jul 2016 - 11:48 am | गामा पैलवान

संदीप डांगे,

इथला माहितीपूर्ण प्रतिसाद आवडला. तुमची विश्लेषणाची पद्धत सुरेख आहे.

अशीच पद्धती वापरून आसारामबापूंच्या ब्रँडव्हॅल्यूची चिकित्सा करता येईल का? त्यांनी हिंदू धर्माचा ज्या तडफेने प्रसार केला त्यामुळेच त्यांना अटक झालीये. आपण समजतो त्यापेक्षा ब्रँड खूप खोलवर जातो. बाबा रामदेव हेही असेच एक ब्रँड आहेत. अर्थात, धर्म सांभाळला की ब्रँड आपोआप सांभाळला जातो अशी या दोघांची धारणा आहे.

आ.न.,
-गा.पै.

प्रसाद भागवत's picture

22 Jul 2016 - 12:19 pm | प्रसाद भागवत

अकरावी ऑनलाइन प्रवेशातून निर्माण होत असलेल्या गोंधळामुळे पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याने हजारो विद्यार्थी व पालक नाराज आहेत.अनेक आमदारांनी प्रवेश न मिळालेल्या किंवा चुकीच्या, गैरसोयीच्या महाविद्यालयात प्रवेश दिल्याची उदाहरणे दिली. तेव्हा अ‍ॅड. आशीष शेलार यांनी सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचाही आपल्याला दूरध्वनी आल्याचे सांगितले. त्यांच्या वाहनचालकाच्या मुलाला पसंतीचे महाविद्यालय न मिळाल्याची तक्रार तेंडुलकर यांनी शेलार यांच्याकडे केली. शेलार यांनी हे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या निदर्शनास आणले खरे, पण त्या मुलाला गुणवत्तेनुसारच प्रवेश मिळेल, असे स्पष्ट करून तावडे यांनी लक्ष घालण्यास चक्क नकार दिला. - See more at: http://www.loksatta.com/mumbai-news/loksatta-kujbuj-2-1271279/#sthash.bs...

पिलीयन रायडर's picture

22 Jul 2016 - 7:22 pm | पिलीयन रायडर

सचिन असं बेकायदेशीर काही करणार नाही अशी आपली एक उगाच भाबडी समजुत आहे. केलं असेल तर चुकच आहे.. वादच नाही.

ह्या विषयावर संदीप डांगेंचे प्रतिसाद खुपच आवडले. मला तरी ते कुठेही आकस आणि मत्सर वगैरे मनात ठेवुन लिहीलेत असं वाटलं नाही. म्हणजे मुळात ते असं सचिन बद्दल आकसाने लिहीतीलच कशाला असाही प्रश्न पडला. इथे बहुदा कोणते तरी जुने स्कोर सेटल होत असावेत. नाहीतर असला हास्यास्पद फाटा फुटलाच नसता.. असो..

सचिनला भारतरत्न त्याच्या खेळामुळे मिळालाय. परत घ्या काय? येडचॅपपणा..
भारतरत्नाचा इथे काही संबंध नाही..

फारएन्ड's picture

22 Jul 2016 - 7:30 pm | फारएन्ड

सचिनचा मी प्रचंड फॅन आहे. पण हे आवडले नाही.

अर्थात बातम्या जरा अतिरंजित कराव्या लागतात बरेचदा. काही बाबतीत वरिष्ठ लोकांच्या "डिस्क्रीशन" मधे काही निर्णय असतात, त्याचा फायदा घ्यायला तो गेला असेल. तरीही नाकारले हे योग्यच होते

नाखु's picture

23 Jul 2016 - 8:57 am | नाखु

त्याने चूक केले आणि त्याच्या "वलयापेक्षा" आप्लया उत्तरदायीत्वात चोख राहिल्याबद्दल पर्रीकराम्चे अभिनंदन.

सचिन्ला यातुन सुबुद्धी मिळो हिच अपेक्षा (राजकारणाच्या एका फटक्याने अमिताभ शहाणा झाला तसे काहीसे)

सचिनचा चाहता (तरी सचिन चुकीचे वागला हे उघ्ड मान्य करणारा)