आमची छकुली (आमची नात) आता पाच महिन्यांची होत आली आहे. तिच्या हिरड्या सळसळू लागल्या आहे, जे समोर दिसेल त्या वर तोंड मारायचे, तोंडात घालून चोखून बघायचे. मग स्वत:च्या पायाचा अंगठा का असेना. काल गम्मत म्हणून कारले तिच्या तोंडात दिले. थुर्रSS करत विचित्र तोंड बनविले आणि भोंगा पसरला. बहुतेक रडताना विचार करत असेल, आजोबा, काही दिवस थांबा, मला मोठी होऊ द्या, बघून घेईल तुम्हाला, काय समजता स्वत:ला.
च् च् च् करत तिला दोन्ही हातानी वर उचलले, तिच्या नाकाला आपले नाक रगडले. हा तिचा आवडता खेळ. आज मात्र तिने पटकन माझे नाक आपल्या तोंडात टाकले, सळसळत्या हिरड्यानींं जोरात चावा घेण्याचा प्रयत्न केले. छी! छी!छी! नाकुचा चावा घेते, गंदी बच्ची, तुझी आई सुद्धा अशीच करायची. बहुधा आमच्या लेकीने ऐकले, हसत हसत तिने विचारले, बाबा, खरोखरच! मी नाकु खायची?
लेकी कडे बघितले, क्षणात काळात मागे पोहचलो. दीड-एक वर्षाची असेल माझी मनी,... अकुंच्या- पकुंच्या पिकले पान कोण खातो? आSई. अकुंच्या - पकुंच्या सडके पान कोण खातो? बाबा. हट्ट, बाबा तर पान खातच नाही. तुला माहित आहे, मनी, गंदे बच्चे पान खातात, बाबा तर अच्छे बच्चे आहेत. तिच्या चेहर्यावर प्रश्न चिन्ह. मग मी हळूच म्हणायचो, माहित आहे मनी, सडके पान न तुझी नानी खाते. आईला सांगू नको, नाही तर तुझी आई माझी पिट्टी-पिट्टी करेल. तिला काही समजो न समजो, पिट्टी-पिट्टी शब्द मात्र चांगला समजायचा. ती जोरात हसायची.
मला अस शून्यात हरवलेले पाहून लेकीने दोन्ही हातानी माझे डोके आपल्या कुशीत घेतले. डोक्यावरून हात फिरविला. त्या स्पर्शात आईची माया जाणवली. लेकी किती लवकर मोठ्या होतात... आई बनतात... वाटले क्षणात लहान बाळ होऊन आईच्या कुशीत दडून जावे... पण या शरीराचे काय, लहानाचा मोठा झालो, आता केस हि पांढरे झालेले आहेत... पण अजूनही स्वत:ला छोटेसे बाळ समजणाऱ्या आतल्या जीवाला हे सत्य कोण सांगणार? काही क्षण असेच गेले.
आपल्या कडे कुणाचे लक्ष नाही पाहून, अं Sअूं SS अूं करून छकुलीने आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. अ लेSS ले छकुली. सॉरी. चला आपण पुन्हा आजोबांचे नाकु खाऊ. तिला दोन्ही हातानी उचलले, नाकाला नाक घासले.... नाकु खाणार छकुली! चिमुकल्या छकुलीच्या चेहर्यावर हास्य पसरले, अगदी तिच्या आई सारखे....
प्रतिक्रिया
5 Jul 2016 - 8:08 pm | रातराणी
गोडुलं लिहलय.
6 Jul 2016 - 12:27 pm | सौंदाळा
+१
खुप सुंदर
5 Jul 2016 - 8:10 pm | यशोधरा
किती गोड लिहिलंय!
5 Jul 2016 - 9:36 pm | माम्लेदारचा पन्खा
पण इथं तर गोड धक्का बसला !
6 Jul 2016 - 11:28 am | पद्मावति
खूप गोड लिहिलंय.
6 Jul 2016 - 11:52 am | कंजूस
मस्तच हो दुसरं बालपण.
6 Jul 2016 - 12:16 pm | बोका-ए-आझम
मस्तच!
6 Jul 2016 - 6:13 pm | सविता००१
फार फार गोडुलं लिहिलंय.
भन्नाट आवड्लं.
6 Jul 2016 - 6:14 pm | अजया
किती गोड लिहिलंय.डोळ्यांत पाणीच आलं.
6 Jul 2016 - 7:04 pm | विवेकपटाईत
प्रतिसादाबाबत सर्वांना धन्यवाद.
8 Jul 2016 - 1:14 am | सचु कुळकर्णी
विवेक सर आमच्या लहानपणी आणि नंतर एवढच ऐकल्याच स्मरतय
कुकुंच्या बावुंच्या पिकले पान कोण खातो?
बाकि सगळ गोडच :)
8 Jul 2016 - 6:34 am | डॉ सुहास म्हात्रे
अत्यंत हृद्य प्रसंग... साध्या शब्दात अत्यंत परिणामक प्रकारे भावना शब्दात उतरवल्या आहात, पटाईतसाहेब !
मला वाटलं अकुंच्या नावाने काही तरी असेल.... पण इथं तर गोड धक्का बसला !
+१ :)
8 Jul 2016 - 9:18 am | इशा१२३
सुंदर!गोड लिहिलय अगदी!
8 Jul 2016 - 9:18 am | इशा१२३
सुंदर!गोड लिहिलय अगदी!
8 Jul 2016 - 9:19 am | इशा१२३
सुंदर!गोड लिहिलय अगदी!
8 Jul 2016 - 9:19 am | इशा१२३
सुंदर!गोड लिहिलय अगदी!
8 Jul 2016 - 11:51 am | स्मिता_१३
+१११
8 Jul 2016 - 9:30 am | धनंजय माने
सुंदर!गोड लिहिलय अगदी!
(त्याच भावना असल्यानं कॉपी पेस्ट केलंय)
8 Jul 2016 - 8:30 pm | बहुगुणी
'आजोबा' असणं शब्दांत सुरेख उतरलंय!
8 Jul 2016 - 8:46 pm | वगिश
सुंदर!गोड लिहिलय अगदी!
(त्याच भावना असल्यानं कॉपी पेस्ट केलंय)
12 Jul 2016 - 12:35 pm | पैसा
डोळ्यात पाणी आलं वाचताना.