श्रावणझड

आनंदयात्री's picture
आनंदयात्री in जे न देखे रवी...
22 Sep 2008 - 7:00 pm

आजूबाजूला ... इकडेतिकडे .... सगळीकडे

तुझ्याच आठवणी पसरलेल्या

तुझी डायरी, तुझे पेन

तुझा डेस्क अन बरेचसे असे तुझे काही

प्रत्येक गोष्टीकडे पाहताना ...

येणारा प्रत्येक संदर्भ तुझाच

अन त्या संदर्भाबरोबर येणारी आठवणीची श्रावणझड

माझीच ......... फक्त माझीच !!

(लेखन इतरत्र पुर्वप्रकाशित. मिपाकर दोस्तांसाठी पुन्हा प्रसिद्ध करायचा मोह !)

कविता

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Sep 2008 - 7:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आजूबाजूला ... इकडेतिकडे .... सगळीकडे तुझ्याच आठवणी पसरलेल्या

जरा आवरुन घ्यायचं ना मग टेबल/घर/ऑफिस ....

अन त्या संदर्भाबरोबर येणारी आठवणीची श्रावणझड

खिडकी लावून घ्यायची अशा वेळेस, ओला होशील आणि मग सर्दी होईल!

मुक्तसुनीत's picture

22 Sep 2008 - 7:05 pm | मुक्तसुनीत

कविता आवडली. श्रावणझडीत प्रिय व्यक्तीच्या आठवणीने भावविभोर झाला नाही असा मनुष्यप्राणी सापडणे कठीण :-)

"तुझ्याच आठवणी पसरलेल्या" ही ओळ विशेष आवडली. प्रत्येक वस्तूला आवडत्या व्यक्तीचा/व्यक्तींचा स्पर्श-गंध असतो...

शितल's picture

22 Sep 2008 - 7:11 pm | शितल

श्रावणझड आवडली रे.
खुप सुटसुटीत शब्द्दात मस्तच भावना व्यक्त केल्या आहेस.
:)

अनामिक's picture

22 Sep 2008 - 7:14 pm | अनामिक

छोटी पण मस्त कविता... आवडली!

यशोधरा's picture

22 Sep 2008 - 7:16 pm | यशोधरा

मस्त आणि नेमकी!

प्राजु's picture

22 Sep 2008 - 7:18 pm | प्राजु

आवडली श्रावणझड..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

ब्रिटिश टिंग्या's picture

22 Sep 2008 - 7:21 pm | ब्रिटिश टिंग्या

आवडली!

मनस्वी's picture

22 Sep 2008 - 7:50 pm | मनस्वी

खूपच सुंदर!

मनस्वी
*डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*

मदनबाण's picture

22 Sep 2008 - 8:09 pm | मदनबाण

आनंदराव लयं आवडल बरं का...

मदनबाण>>>>>

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

छोटा डॉन's picture

22 Sep 2008 - 8:10 pm | छोटा डॉन

श्रावणझड आणि मनात उन्मळुन आलेल्या "प्रिये" विषयीच्या अनावर भावनांचे मोजक्या शब्दात एकदम " भिडणारे" वर्णन !!!
मस्त आहे एकदम ...

बहुतेकांच्या आयुष्यात हा क्षण कधी ना कधी येतोच.
त्यातली गंमत त्यांनाच माहित.
असो.

लिहीत रहा आंद्याभाई, ह्या " प्रेमरसाच्या" क्षेत्रात लिहताना तुमच्यावर सरस्वतीचा आशीर्वादाचा हात आहे.

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मेघना भुस्कुटे's picture

22 Sep 2008 - 8:34 pm | मेघना भुस्कुटे

:)

विसोबा खेचर's picture

22 Sep 2008 - 10:44 pm | विसोबा खेचर

लेखन ठीक वाटलं रे यात्री! नेहमीसारखं सुरेख नाही वाटलं!

तात्या.

इनोबा म्हणे's picture

22 Sep 2008 - 11:05 pm | इनोबा म्हणे

मस्त रे!
सोप्या व सुटसुटीत शब्दांतली ही कविता आवडली आपल्याला...
बाकी "आठवणींचा पसारा" करण्यात तू तरबेज आहेस.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

दत्ता काळे's picture

23 Sep 2008 - 11:04 am | दत्ता काळे

कविता छान.

मिंटी's picture

23 Sep 2008 - 11:13 am | मिंटी

मस्त रे...

छोटीशी पण मस्त कविता..... :)

नंदन's picture

23 Sep 2008 - 12:19 pm | नंदन

नेमकी, छोटेखानी कविता आवडली.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

ऋचा's picture

23 Sep 2008 - 2:01 pm | ऋचा

मस्त आहे छोटीशी कविता(काव्य ह्या अर्थी)!!!!

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

विजुभाऊ's picture

1 Oct 2008 - 3:26 pm | विजुभाऊ

तुझ्याच आठवणी पसरलेल्या
हम्म..............
वो आये कभी हमारे ख्वाब मे
ये ख्वाईश हम जताते है कभीकभी
पर कैसे इकरार करु
इन दिनो हम सोते भी है कभी कभी
......................विजुभाऊ सातारवी

डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत