अकोला आणि अमरावतीचे कुणी मिपाकर आहेत का?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
4 Jul 2016 - 5:35 pm

नमस्कार,

दिनांक ११ ते १६ जुलै ह्या दरम्यान, अकोला आणि अमरावती येथील काही शेतकर्‍यांना भेट द्यायचा आणि त्यांनी केलेल्या प्रयोगांचा विचार आहे.

आधी अकोला आणि मग अमरावती, असा बेत आहे.

तर, महत्वाचा मुद्दा असा की, अकोला आणि अमरावती ह्या भागात कुणी मिपाकर आहेत का?

ते जर शेती करत असतील तर फारच उत्तम.

कळावे, लोभ आहेच.तो वाढावा ह्या निमित्ताने हा प्रपंच.

आपलाच,

मुवि.

मौजमजामाहितीमदत

प्रतिक्रिया

मना सज्जना's picture

4 Jul 2016 - 7:37 pm | मना सज्जना

दत्ता ठाकरे अकोला मोबाईल no 9767776111 मी पण एक शेतकरी आहे

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Jul 2016 - 7:46 pm | कैलासवासी सोन्याबापु

मी अकोल्याचा अन अमरावती दोन्हीचा काका, आपल्याला कश्या प्रकारचे प्रयोग करणारे शेतकरी हवे आहेत ?

मुक्त विहारि's picture

4 Jul 2016 - 8:02 pm | मुक्त विहारि

श्री. सुभाष पाळेकर, ह्यांच्या प्रमाणे झिरो बजेट शेती करणारे.

थोडक्यात चुकामुक होणार मूवी काका...10 तारखेला अमरावतीवरून वापस पुण्याला निघणार..
शेती विषयाला आपला पास...नंबर व्यनी करतो, इतर काही मदत लागल्यास जरूर सांगा..

नाखु's picture

5 Jul 2016 - 11:26 am | नाखु

पुण्यात असून कधी कट्ट्याला आला नाहीस ते , थांब तुझे नाव माईंनाच सांगतो.

नाखु(चा) साक्षीदार

चिनार's picture

5 Jul 2016 - 11:29 am | चिनार

एका कट्ट्याला आलो होतो नाखुकाका..पाताळेश्वरला..
बघतो तर काय..तुम्ही आणि माई दोघेही नाहीत..

अभ्या..'s picture

5 Jul 2016 - 12:06 pm | अभ्या..

माई आलेल्या अरे त्या कट्ट्याला.
टक्या खूप मोठाय, अंतर आहे वयात म्हणून नाराज होऊन गेल्या. ;)

चिनार's picture

5 Jul 2016 - 1:41 pm | चिनार

काय सांगतोस !!!!!.....टक्या त्या कट्ट्याला दमामि म्हणून वावरत होता..तरीसुद्धा माईंनी तो टका आहे हे अचूक ओळखले !!!
माईंना दिव्यदृष्टी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले..

सुधीर कांदळकर's picture

10 Jul 2016 - 8:06 pm | सुधीर कांदळकर

झीरो बजेट शेतीची सुरुवात करणार असाल तर अभिनंदन. खतांवरील अनुदान अर्थात सबसिडी कमी किंवा रद्द करण्यासाठी भारतावर आंतरराष्ट्रीय दबाव आहे. तशी ती रद्द होईलच. शस्त्रास्त्रव्यापारातून भरमसाट नफा मिळवणारी विकसित राष्ट्रे त्यांच्याकडील शेतीला मागील दाराने अनुदान देणार नाहीतच असे काही सांगता येणार नाही. खतांचे दर वाढल्यावर उत्पादन खर्च वाढेलच. मग आंतरराष्ट्रीय बाजारात आपला शेतकरी टिकून राहण्यासाठी झीरो बजेट शेतीला पर्याय नाही. भारत सरकारही या पद्धतीला हळूहळू प्रोत्साहन देते आहे.

आणखी एक म्हणजे रासायनिक खतांमुळे जमिनीचा कस जाऊन शेत उजाड बनून जाण्याचा अनुभव काही शेतकर्‍यांना आलेला आहे. अशी एक १७ एकराची उजाड आंबा बाग आंध्र प्रदेशातील तेलंगण जिल्ह्यातील श्री. किरण कुमार यांचेकडे होती. ते सर्व झाडे तोडून नवी कलमे लावणार होते. ती बाग रु. चार लाख भाडेपट्ट्याने घेऊन श्री. वेंकटराम रेड्डी यांनी केवळ सहा आठ महिन्यात सुभाष पाळेलर झीरो बजेट पद्धतीने पुनरुज्जीवित केली आणि त्या मोसमात एकूण बारा लाखाचे उत्पन्न मिळवले. भाड्याचे चार लाख आणि मजुरी इ. खर्च १ लाख वजा जाता त्यांना निव्वळ नफा रु. सात लाख झाला. अशा अनेक यशोगाथा तू-नळीवर उपलब्ध आहे.

मी देखील नवीनच घेतलेल्या शेतात शेतीला सुरुवात याच पद्धतीने करणार आहे.

पुन्हा एकदा शुभेच्छा.

संदीप डांगे's picture

13 Jul 2016 - 11:08 pm | संदीप डांगे

आणखी एक म्हणजे रासायनिक खतांमुळे जमिनीचा कस जाऊन शेत उजाड बनून जाण्याचा अनुभव काही शेतकर्‍यांना आलेला आहे.

हे तर खरेच आहे. त्याचबरोबर एकूण एक शेतकर्‍यांचा असा अनुभव आहे की सुमारे दहा-बारा वर्षांआधी जेवढी रासायनिक खते लागत असत त्यापेक्षा जास्त आज लागतात व पूर्वीच्या खतांमधून जेवढे उत्पन्न मिळायचे ते वाढीव खते देऊनही कमी होत जात आहे. ह्याला कारण रासायनिक खते जमिनीत वर्षानुवर्षे डम्पिंग होत आहेत. पुरेसा व पुर्वीसारखा पाऊस नाही. बांधावरची झाडे कमी झाली. पाऊस सगळं घेऊन खोल जमीनीत घेऊन जात असे. आता तसे होत नाही. गरजेपेक्षा जास्त दिलेले झाडांकरवी उचलले जात नाही. त्याचे विघटन होत नाही. जमीन क्षारयुक्त बनत जाते व एक दिवस वांझ होते. हा प्रकार अजून फक्त दहा वर्ष जर भारतात चालू राहिला तर उत्पादनक्षमता असलेली जमीन राहणार नाही. भयानक दुष्काळाला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते.

वीस वर्षाआधी पाटाचे पाणी बिन्दास पिऊ शकत होतो. आज हिंमत होत नाही. कामानिमित्त मी रोज अनेक बांधावर जाऊन पाणी, माती परिक्षण करत आहे. परिस्थिती बिकट आहे. रासायनिक खतांचा भस्मासूर थांबवलाच पाहिजे. जैविक व सेंद्रीय शेतीला अजिबात पर्याय नाही. मेहनत जास्त आहे पण परतावाही उत्तम मिळतो (उशीरा का होईना). शेतकरी कंटाळा करतात हेही अनुभवले आहे.

असो.

मुक्त विहारि's picture

11 Jul 2016 - 10:59 am | मुक्त विहारि

ह्या आठवड्यात, अकोला-अमरावती ट्रिप रद्द करावी लागत आहे.

तसदी बद्दल क्षमस्व.