चो..पली २

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
29 Jun 2016 - 11:34 pm

खालील प्रकटन मतमतांतराचा आदर राखुन,२० वर्षाच्या अनुभवावर आधारित.
प्रतिसादात आलेला विषय अ‍ॅप्टीट्युड टेस्ट.
अशा सर्व कल परिक्षा "सर्वसकटीकराण" ह्या सदरात मोडतात. ग्रॉस जनरायलेझशन.
एक पेपर, सर्वांना सारखा.
त्या पेपरातल्या मार्कांवरुन कॉमर्स, आर्ट्स, सायन्स कसे काय ठरु शकते?
मुलांना त्यांचे क्षेत्र निवडायची मुभा असते, असावी.
गोंधळ असेल तर माहीती द्यावी.
पण कुणी तरी ३ रा एका पेपर वरुन तुमचे भविष्य ठरवणार आणि तुम्हाला सांगणार की मुलगा उपकरण अभियंता होणार?
कहर आहे कळप प्रव्रुत्ती चा.
.........
" ए बाबा तुला काय करायचे आहे? जे काय करायचे त्याची माहीती गोळा कर.फक्त एक कर. ११वी १२ वी मधे मिळणार्या फ्रीडम चे फ्री डूम नकोस. दहावी चे यश(?) राखुन ठेव. सर्व संधी आपोआप चालुन येतील" संपले काउंसेलींग. ह्या बाहेरचे जे काही सांगितले जाते ते कॉन सेलींग.
१. कुठल्याही अ‍ॅप्टीट्युड टेस्ट ची गरज नाही.
२. काही ही गोंधळ असल्यास संपर्क साधा.(कृपया कुठला क्लास लावावा हा प्रश्न विचारु नये.)
३. कसल्याही मानधनाची अपेक्षा नाही.
४. क्षमता ही १० वी च्या मार्कां वर ठरत नाही.
५. नियमाला अपवाद असतात पण अपवादाला नियम मानुन त्याच्या मागे धाउ नका.
६. अमुक क्षेत्राला स्कोप आहे असे सांगणार्या नॉस्टॅडॅम्स ला दुरुन नमस्कार करा.
७. करियर गायडन्स कार्यक्रम १० वी च्या सुट्टी पर्यंत टाळा.
८. ९० टक्के आणि राष्ट्रीय पातळी वरच्या परिक्षांचा संबंध जोडताना विचार पुर्वक निर्णय घ्या.
९. विद्यार्थ्याच्या यशामधे क्लासचा भाग फक्त २०% असतो हे लक्षात ठेवा.
१०.जेवढे जास्त हायपर तेवढी किंमत जास्त मोजावी लागते हे विसरु नका.
.........
मुंबई मधले एक मोठे कॉलेज. सुमारे ३००ओपन विद्यार्थी सायन्स ला प्रवेश घेतात. टक्के ९४ ते ९९. ह्या मधील दहावी चे यश १२ वी त टीकवणारे किती असे तुम्हाला वाटते.फक्त सहा. पण राहीलेले २९४ अपयशी धरायचे का?

शिक्षणप्रकटन

प्रतिक्रिया

सतिश गावडे's picture

29 Jun 2016 - 11:43 pm | सतिश गावडे

"चो..पली" म्हणजे काय?

तुमचं हे प्रकटन वाचून भगवद्गीतेतील सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणम व्रज। अहम् त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामी मा शुचः।। या श्लोकाची आठवण झाली. :)

विनायक प्रभू's picture

30 Jun 2016 - 9:53 am | विनायक प्रभू

कुणी कुणाला शरण जायची गरज नाही आणि शरण जावे अशी अपेक्षा नाही.
चर्चा झाल्यावर शिळ्या भज्याची सुद्धा किंमत नसते हो स.गा.

चतुरंग's picture

29 Jun 2016 - 11:47 pm | चतुरंग

बरेच दिवसांनी पायधूळ झाडलीत..
उगीच इकडमतिकडम न करता नेहेमीप्रमाणेच थेट इंजेक्शनची सुई टोचणारे लेखन.

(बाकी क्षमता ही दहावीच्याच नव्हे तर कोणत्याही मार्कांवरच ठरते असे वाटत नाही. परंतु व्यवहारिक जगात काही वेळा मार्कांची रेस खेळावी लागते हे अपरिहार्य आहे.. :( )

एस's picture

30 Jun 2016 - 12:39 am | एस

वाचतोय.

संदीप डांगे's picture

30 Jun 2016 - 1:23 am | संदीप डांगे

७. करियर गायडन्स कार्यक्रम १० वी च्या सुट्टी पर्यंत टाळा.

ह्याबद्दल आपल्याशी मतभेद आहे.

विनायक प्रभू's picture

30 Jun 2016 - 9:55 am | विनायक प्रभू

मिपा सदस्यांकरिता का ची चर्चा होउन जाउ दे.

संदीप डांगे's picture

30 Jun 2016 - 10:14 am | संदीप डांगे

अवश्य.

नाखु's picture

30 Jun 2016 - 10:21 am | नाखु

१. कुठल्याही अ‍ॅप्टीट्युड टेस्ट ची गरज नाही.

पण दहावीत असलेला पाल्य स्वतःची क्षमता/कल आणि गुणवत्ता यांच्या विचार करून निर्णय घेऊ शकतो का? अश्या वेळी पालकांनी नक्की काय करावे.(अभ्या सारखा जन्मजात कलाकार दहा हजारी एखादाच्,बाकी सगळे कल्लाकार)

२. काही ही गोंधळ असल्यास संपर्क साधा.(कृपया कुठला क्लास लावावा हा प्रश्न विचारु नये.)

नक्की संपर्क करणार आणि क्लास बद्दल अज्जिबात विचारणार नाही

३. कसल्याही मानधनाची अपेक्षा नाही.

धन्यवाद तरी ही चिंचवडला एक "पालक (मनाची जळमट निवारण) व्याख्यान द्यावेच आपण (आपली हरकत नसेल आणि परवानगी असेल तर) (स्थानीक व्य्वस्थेचा +आप्ला प्रवास खर्च) मी आनंदाने करीन. माझ्या सारख्याच इतर मध्यमवर्गीय पाल्कांनाही आप्ल्या सल्ल्याचा फायदाच होईल (कुचंबणेमुळे/सामाजीक दडपणामुळे) कधी कुठे बोलतही नाहीत आणि नातल्गांचा दबाव्/तुलना याचा वेगळाच त्रास.

४. क्षमता ही १० वी च्या मार्कां वर ठरत नाही.

रास्त आहे पण तरीही सगळे प्रवेश निकष हे मार्कांभोवतीच फिरतात हे वास्तव कसे नाकारून चालेल.

५. नियमाला अपवाद असतात पण अपवादाला नियम मानुन त्याच्या मागे धाउ नका.

तंतोतंत सहमत

६. अमुक क्षेत्राला स्कोप आहे असे सांगणार्या नॉस्टॅडॅम्स ला दुरुन नमस्कार करा.

बिनशर्त स्वीकृती

७. करियर गायडन्स कार्यक्रम १० वी च्या सुट्टी पर्यंत टाळा.

नक्की काय कारण.

८. ९० टक्के आणि राष्ट्रीय पातळी वरच्या परिक्षांचा संबंध जोडताना विचार पुर्वक निर्णय घ्या.

माझ्या अल्प्मतीला समजला नाही आपण आणि राष्ट्रीय पातळी वरच्या परिक्षांसंबधीत व्य्क्तींनी उकल केल्यास आभारी राहीन.

९. विद्यार्थ्याच्या यशामधे क्लासचा भाग फक्त २०% असतो हे लक्षात ठेवा.

बिनशर्त स्वीकृती

धन्यवाद

स्नेहल महेश's picture

30 Jun 2016 - 11:06 am | स्नेहल महेश

वाचतेय

विनायक प्रभू's picture

30 Jun 2016 - 10:25 am | विनायक प्रभू

कसल्याही व्यवस्थे ची गरज नाही. माझे किडे मी सांभाळीन.पिंची मधे असा कार्यक्रम योग्य वेळी करुच.त्यात एखादा गरजु विद्यार्थी असेल तर १२ वी नंतर च्या शिष्यव्रुत्ती चे पण बघुन घेइन. फोन व्य. नी करतो.

राजाभाउ's picture

30 Jun 2016 - 10:54 am | राजाभाउ

मुलांना त्यांचे क्षेत्र निवडायची मुभा असावी - मुलांना आपले क्षेत्र/कल माहित असेल तर प्रश्नच नाही मग कुठल्याही अ‍ॅप्टीट्युड टेस्ट ची गरजही नाही. पण बर्याच वेळेला मुलांना पण हे क्लिअर नसते त्यावेळी कदचित अ‍ॅप्टीट्युड टेस्टचा पर्याय निवडला जात असावा.

आता मुल हा निर्णय का घेउ शकत नाहीत तर त्यांना त्या पध्दतीने वाढ्वलेले नसते. त्यांना निर्णय घेणे, त्याची जबाबदारी घेणे हे फारस करु दिल जात नाही आणि मग तो गुण त्यांच्या मध्ये तयारही होत नाही.

उलट्या बाजुने विअचर केला आणि सर्व निर्णय त्यांचे त्याना घेउ दिले तर त्याचेही काही दुष-परिणाम असतातच. त्यामुळे दैनंदिन पालकत्वा मध्ये अनेकवेळा प्रचंड गोधळुन जायला होतं.

दुसरा मुद्दा असा की जी मुल आता १० पास झालीत आणि स्वता: निर्णय घेउ शकत नाहीत किंवा आपल्या निर्णयाचे योग्य कारण देउ शकत नाहीत (उ.दा. माझ्या मित्रानी अ ब क करयचे ठरवले आहे तर मी पण तेच करतो वगैरे) तर, पालक आता मुलांनी स्वता: निर्णय घ्यावा म्हणुन काहीही करु शकत नाहीत. (जी चुक व्हायची ती होउन गेली आहे) मग अशा वेळी मुलांनी/ पालकांनी काय करावे, क्षेत्र कसे निवडावे.

सर याबद्दल काही मार्गदर्शन करु शकाल का ?

टिप : वरील पालकत्वाचा विषय मुळ धाग्याच्या विषयाशी थेट संबधित नसला तरी त्यावर थेट परिणाम करणारा आहे त्यामुळे हे अवांतर नसावे असे वाटते.

विनायक प्रभू's picture

30 Jun 2016 - 11:04 am | विनायक प्रभू

फार मोठा विषय आहे. लिहीता येणार नाही. व्यक्तिशः फोन वर बोलु शकतो.

पैसा's picture

30 Jun 2016 - 11:14 am | पैसा

उत्तम धागा आणि प्रतिसाद.

हा हा हा.. कॉन सेलींग.. मस्त लिहीता तुम्ही... पुभाप्र