मिपा लंडन कट्टा सालाबाद प्रअमाणे ठरला
एकदा कट्टा करायचे ठरले की ठरले. मिपाकर अडचणींकडे क्षुल्लक महणून पहातात.
कट्टा करायचे ठरले मात्र स्थळ ठरत नव्हते. वर्हाडी जमा झाले मात्र कार्यालयाचा पत्ता ठाउक नाही असे काहीसे सुरवातीला झाले.
त्याचे काय झाले. विजुभाउ लंडन मधे आले याची आदुबाळाला कुणकुण लागली. त्याने व्यनीफीनी तुन फोनाफोनी करुन विजुभाऊना सम्पर्क केला. आणि कट्टा करायचअ घात घातला. स्वाती राजेश या अनाहिता मधील जबरदस्त सदस्यानी ती आयडिया उचलून धरली. आदू बाळ आणि अस्वस्थामा ने कुठे कुठे जायचे याची चर्चा करत जुने मध्य लंडन नेहमीच बघतो राणीचा राजवाडा , राजाची बाग , ती कसलीशी घंटा आणि रोज मोडणारा लंडन ब्रीज , यांचे अस्सल मिपाकराला कसले आले कौतूक. खरा मिपाकर हा गप्पा नवी माहिती , खादाडी आणि देशी इतिहासात रमतो. जगात तो कुठेही असू द्या मनाने तो शिवरायाच्या महाराष्ट्रातच असतो. गप्पा मारता मारता असे कळाले की इथे लंडन मधे एक सुवर्णदूर्ग नावाचा किल्ला आहे. साहेबाने त्याचे नाव सोवेनदुर्ग असे मोडले आहे . पण ते असो. सुवर्णदूर्गाच्या आठवणीत रमायचे म्हणून त्याचे नाव तसे ठेवले गेले अशी एक माहिती उडत उडत कानावर आली. झाले ठिकान मुक्रर झाले. तारीखही पक्की झाली.
थेम्स काठावरील ग्रीनीच जवळ हा किल्ला आहे. शनिवारी जमायचे ठरले. त्यानुसार लअंडन मधील मिपाकराना निरोप गेले. वाचनमात्र असणारे एक सदसय श्री लोथार यानी कटट्याला जायचे म्हणून धावपळ करून सदस्यत्व घेतले. त्याना अस्सल मिपाकर पहायचे होते.
स्वपनील ( अस्वस्थामा ) बाथ जवळच्या एका गावाहुन येणार होते.आदूबाळ स्लाव मधून , स्वाती राजेश सनबरी हुन तर विजुभाऊ फेल्टम हुन येणार होते.
सर्वाना सोयीचे व्हावे म्हणून स्थळ मुक्रर झाल्यानंतर ते पुन्हा एकदा बदलण्यात आले. पण त्यातही अडचणी होत्याच. बर्याच चर्चेनंतर ते पुनः मूळ ठिकाणावर आले.
त्यानुसार ग्रीनीच ला जमा झाले, ट्यूब ने ओव्हरग्राउंडने , गाडी ने ,बस ने, बोटीने अशा वेगवेगळ्या वहानानी प्रवास करत एककेक जण जमा झाले.
ग्रीनीच म्हणजे शून्य रेखाम्शाचे ठिकाण. येथून जगाची वेळ ठरवली जाते. शाळेत शिकलो होतो तो भूगोल आता प्रत्यक्ष अनुभवायला मिळत होता. ग्रीनीच रेखांश आणि जगाची वेळ यांचे जवळचे नाते आहे.
इथे घड्याळी वेळ स्थानीक वेळ आणि जागतीक वेळ अशा अनेक वेळांची संगती लागते. नौवहनासाठी सोय व्हावी म्हणूउन जागतीक वेळ ही संकल्पना आली. त्यावरून ठिकाण निश्चित करण्यासाठी अक्षांश रेखांश या संकल्पना कशा आल्या याचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा केला जातो.
मिपाकर या माहितीचा आनंद घेत होते , इथली वेधशाळा , विल्यम हर्शेलची दुर्बीण आणि वेळ मोजण्याच्या विवीध पद्धती विवीध यंत्रे यांची भरभरून माहिती मिळत होती. मिपाच्या या कट्ट्यावर अशी माहितीची खादाडी चालू होती. त्या गडबडीत
जेवण बीवण करायचे कोणाच्याच लक्षात आले नाही.
त्यातच गप्पाना ही रंग भरला. जुने नवे लेख आठवले. रामदास काका, आनंदयात्री , तात्या , डयांबीस काका , बयाटमयान,
प्रचेतस , वल्ली , ट का , आदिती, गणपा, जेनी, क्लिंटन सर्वांचे ले़ख पुन्हा पुन्हा वर आले.
गप्पांचा मस्त फड जमला. मधेच धमाल मुलाने फोनवर हजेरी लावली.
आपण कोणाला पहिल्यांदाच भेटतोय असे वाटतच नव्हते.
कट्टा पुन्हा करायचा. पुढच्या वेळेस लंडन बाहेर बाथ ला कट्टा करुया असे भरघोस आमंत्रण सौ व श्री अस्वस्थामा यानी दिलय.
##### नाही म्हणायला थोडिशी खादाडी झालीच. आदुबाळाने " गव्हाची बीयर " या प्रकारची ओळख करुन दिली. त्या बद्दल पुन्हा कधीतरी.
"मल्हार आदुबाळ " या नव्या भन्नाट अफलातून आईनस्टाईन दोस्ताची मात्र झकास जानपहचान झाली. त्याबद्दल ही सविस्तर पुन्हा कधीतरी.
डावीकडून उजवीकडे:
मल्हार, चैत्रबन, प्रश्नलंका, अस्वस्थामा, लोथार मथायस, विजुभाऊ, आदूबाळ
विजुभाऊ आणि बेल्जियन गव्हाची बियर
ग्रीनिचचा रेखांश आणि मुंबईचा अक्षांश
प्रतिक्रिया
23 Jun 2016 - 3:15 am | विजुभाऊ
येतहे शून्य रेखांश रेशेवर उभे रहाता येते. जगातील हे बहुतेक एकमेव ठिकाण असेल की जेथे रेखांशाची रेश आखलेली आहे.
23 Jun 2016 - 10:36 pm | अभ्या..
फोटोतल्या लाइनीपासले पाय मिपाकराचे नव्हेत.
25 Jun 2016 - 12:31 pm | भीडस्त
तुम्हि काय २२१ बी बेकर स्ट्रीट लंडन हिथं र्हात्या काय??
25 Jun 2016 - 1:23 pm | अभ्या..
एलिमेण्टरी डॉ. भिडस्त. ;)
फॉटोशॉपने लावली सवय बारीक बघायची.
25 Jun 2016 - 1:59 pm | गामा पैलवान
विजुभाऊ,
ब्रायटनच्या जवळ पीसहेवन नावाच्या नगरात असेच एक स्थळ आहे :
http://www.peacehavencouncil.co.uk/attractions/meridian-monument-cliff-t...
वरील लेखानुसार ग्रीनिचव्यतिरिक्त अनेक स्थळे आहेत.
आ.न.,
-गा.पै.
23 Jun 2016 - 3:33 am | अश्विनी वैद्य
व्रुत्तान्त छान. या वेळी नाही जमले... पुढच्या कट्ट्याला नक्की येणार. फोटो नाहीत का ?
23 Jun 2016 - 5:10 am | अनिवासि
अरेरे! यायची इच्छा होती पण वेळ सोयीस्कर नव्हती- . पुढच्या वेळेस. पण लंडन कट्टा बाथ ला ? खूपच लांब आहे!
तसे ग्रिनिच पण उत्तर लंडन पासून दूरच आहे तेथे जाण्याचे कारण आज कळले. किल्ला पाहिला का?पुन्हा एकदा शुभेच्छा ! त्या दिवशी आदूबाळ ह्यांना फोन केला होताच.
23 Jun 2016 - 5:33 pm | अस्वस्थामा
ऑं.. लंडनकर लांब वगैरे काय म्हणताय हो. सगळेच जण किमान १ ते ३ तास प्रवास करुन आलेले कट्ट्याला. हे म्हंजे पुणे-सातार्यावरुन लोक्स कट्ट्याला मुंबईत यावे आणि दादरकरांनी बोरिवली लांब आहे असे म्हणावं असं झालं. :)
बाथ लांब आहे हे तर आहेच पण फक्त दिड तास आहे ट्रेनने. तेव्हा लंडनच्या बाहेर पण भेटुयात की जमेल तेव्हा.
23 Jun 2016 - 6:52 am | पिलीयन रायडर
Foto??
23 Jun 2016 - 8:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फोटो शिवाय वृत्तांत खरा वाटत नाही. असे काल्पनिक वृत्तांत आम्ही कितीही लिहु शकतो. विजु भौ कडून तरी अशी काल्पनिक कट्टयाची अपेक्षा नव्हती. तीव्र निषेध व्यक्त करतो. आणि दोन शब्द संपवतो.
-दिलीप बिरुटे
-
23 Jun 2016 - 8:48 am | अभ्या..
एवढ्या बहुचर्चित कट्टयाचा इतका सपक वृत्तांत विजुभाऊ कडून अपेक्षित नव्हता. आदूबाळा किंवा अस्वस्थाम्याने पुरवणी प्लस फोटो वृत्तांत जोडावा. मल्हार आदूबाळ हे प्रकरण पहायचेच आहे.
23 Jun 2016 - 8:52 am | नाखु
होय आणि यात कुठेही आडवळणाका होईना पुण्याचा उल्लेख नाही त्यामुळे हा व्रूत्तांतच विजूभाऊंनी लिहिला नसावा असा पक्का अंदाज आहे.
माझ्यासारख्या नवशिक्या मिपाकराने फोटोशिवाय गड किल्ले भटकंती टाकली तर एकवेळ समजू शकतो पण....
नित वाचक नाखु
23 Jun 2016 - 11:14 am | टवाळ कार्टा
वृत्तांत फर्मास...पण फटू नैत त्यामुळे मनाचे श्लोक असणाचाही संभव आहे =))
या दिग्गज लेखकांच्या यादीत माझे नाव बघून अंह झालो...माझ्या जिल्ब्यांची आठवण काढल्याबद्दल धण्यवाड :)
ते "बयाटमयान" लैच आवडल्या गेले आहे =))
23 Jun 2016 - 12:13 pm | मुक्त विहारि
आता "बाथ"च्या वृत्तांताच्या प्रतिक्षेत.
23 Jun 2016 - 7:40 pm | आदूबाळ
https://s32.postimg.org/bno5pwq1x/IMG_20160622_WA0014.jpg
https://s32.postimg.org/rsxanrb9h/IMG_20160619_WA0014.jpg
https://s31.postimg.org/uayheexiz/IMG_20160622_WA0007.jpg
23 Jun 2016 - 12:26 pm | टवाळ कार्टा
अरे वा? अता ओळख परेड द्या
23 Jun 2016 - 1:15 pm | एस
वा! फारच छान! मिपाकरांना पाहून आनंद वाटला.
23 Jun 2016 - 1:35 pm | आदूबाळ
सर्व शंकासुरांनी फटू बघून घ्यावा.
23 Jun 2016 - 2:04 pm | सूड
दिसंना झालाय.
23 Jun 2016 - 1:38 pm | चैत्रबन
झकास :)
23 Jun 2016 - 2:36 pm | विशाखा राऊत
मस्त झाला कट्टा पण जायला मिळाला नाही. पुढच्या वेळी जरा लंडनमध्ये कट्टा झाला तर जमवु भेटायचे.
किल्ला बघितला की नाही? सगळे वर्णनतर ग्रीनिचबद्दल आहे. किल्ला तिथुन लांब आहे.
23 Jun 2016 - 2:37 pm | पद्मावति
मस्तं!
23 Jun 2016 - 3:09 pm | जगप्रवासी
मस्त झाला कट्टा
23 Jun 2016 - 3:17 pm | अभ्या..
लंडनकर सगळे मिपाकर हँडसम आहेत असे निरीक्षण नोंदवतो. अस्वस्थामा तर बॉलिवूड सोडून तिकडे गेला असावा. मल्हारराव आपला आवलीपणा फोटोत सोडाया तयार नाहीत. पोरगे डॅशिंग आहे.
23 Jun 2016 - 5:16 pm | अस्वस्थामा
:))
बास का अभिदादा, झाले का सुरु तुमी. मल्हाररावांनी उकेमध्ये राहून चक्क चक्क "सदृश्य" हा शब्द बोलताना वापरला आणि आम्ही सद्गदित झालो राव (पालकांचे क्रेडिट तर आहेच). कट्ट्याचे उत्सवमूर्ती विजूभाऊ होते तरी सगळे फुटेज या छोट्या मिपाकराने घेतलेले मस्तपैकी. :)
23 Jun 2016 - 5:29 pm | अभ्या..
आयायायाया
ते आदूबाळाचे बाळ आहे, असली व्यामिश्र वैय्याकारण्याच्यावर वरची भाषाच वापरणार. लंडनच्या एखाद्या सेंट अमुक्तामुकाच्या फादराला झीट आणणार एक दिवस.
23 Jun 2016 - 6:35 pm | जव्हेरगंज
फोटोंबाबत एवढी कंजुशी का?
23 Jun 2016 - 9:06 pm | पीशिम्पी
क्षमस्व मंडळी, मनात असूनही आणि लंडन मध्ये नसल्याने येता नाही आले, पण पुढच्या कट्ट्याची तारीख थोडी आधी जर जाहीर केली तर वेळापत्रकाचे योग्य नियोजन करण्यास मदत होईन आणि कट्ट्याला हजरही राहून थोरामोठ्यांच्या दर्शनही होईल आणि सहवासाचे पुण्यही लाभेल :)
23 Jun 2016 - 9:45 pm | आदूबाळ
आता बाथच्या कट्ट्याला या.
23 Jun 2016 - 10:33 pm | अभ्या..
एखादा बाथकट्टा पुण्यात करायला हरकत नै. ते मुळशी बिळशी ड्यामात.
24 Jun 2016 - 3:20 pm | महासंग्राम
होऊन जाऊ द्या एखादा कट्टा आता पुण्यात अभ्या भौ काढा धागा एखादा
25 Jun 2016 - 1:25 pm | अभ्या..
आम्ही कसा पुण्याच्या धाग्याचा कट्टा काढायचा मंदारभो?
आमचे आधारकार्ड तर सोलापुरातले.
23 Jun 2016 - 9:09 pm | स्वाती दिनेश
कट्टा मस्त झालेला दिसतो आहे,
स्वाती
23 Jun 2016 - 10:01 pm | खटपट्या
वा, दीवस कट्ट्याचे दीसतायत....
23 Jun 2016 - 10:06 pm | प्रचेतस
विजूभौंनी खूप कंजूसी केली वृत्तांत टाकण्यात.
अजून सविस्तर येऊ द्यात.
23 Jun 2016 - 10:34 pm | डॉ सुहास म्हात्रे
वा, वा ! मस्तं झालेला दिसतोय कट्टा ! आता फोटो पाहिल्यावर विश्वास बसला ;) :)
24 Jun 2016 - 9:47 am | श्रीरंग_जोशी
थोडक्यात लिहिलेला वृत्तांत आवडला.
प्राडाँच्या विजुभाऊंनी लिहिलेला काल्पनिक वृत्तांत हा उल्लेख वाचून खालचा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला.
विजुभाऊ उवाच -
इंग्लंडातल्या माझ्या पहिल्या मिपा कट्ट्यासाठी जोरदार तयारी केली. तंदुरुस्तीच्या प्रत्यक्ष नमुना दाखवण्यासाठी सायकलने जायचे ठरवले. अगोदरच्या संध्याकाळीच भाड्याची सायकल आणून ठेवली. तसेच जुन्या वस्तूंच्या दुकानातून सेकन्ड हॅन्ड हवा भरायचा मिनि पम्प पण आणून ठेवला.
भल्या पहाटे उठून शिकरण व मटार उसळ यांची न्याहारी करून सायकलवर टांग मारून ग्रिनिचच्या रस्त्याला लागलो. रस्ता चांगला रुंद होता व रविवारची सकाळ असल्याने अगदीच जेमतेम वाहतूक होती. तेवढ्यात एक जुनाट रणगाडा मला ओव्हरटेक करून गेला. सायकलचा वेग वाढवून त्याला ओव्हरटेक करून खुन्नस देण्याची खूप इच्छा झाली पण मिपा कट्ट्याला निघालो असल्याने नको त्या भानगडीत पडायचा मोह टाळला.
दोन तीन किमी पलिकडे गेल्यावर पाहतो तर काय रणगाडा रस्त्याच्या शेजारी थांबलेला दिसला. पुढे जाऊन पाहतो तर काय? चक्क आदूबाळ रणगाड्यापुढे डोक्यावर हात मारून बसले होते. त्यांचे कुटूंब आत रणगाड्यातच होते. मी सायकल थांबवून स्टँडवर लावली अन आदूबाळांजवळ गेलो व स्वतःची ओळख दिली. आपला मिपावरचा माणूस भेटला हे पाहून त्यांचा चेहरा खुलला. मिपाकरांना सरप्राइझ देण्यासाठी आदूबाळांनी पहिल्या महायुद्धात निवृत्त झालेला रणगाडा व्हिंटेज रेन्टल स्टोरमधून भाड्याने घेतला होता. पण ऐन प्रवासात त्याचे पुढचे चाक पंक्चर झाले होते.
जवळपास कुणी पंक्चरवाला नव्हता. तेवढ्यात मी सायकलला बांधलेला मिनि पम्प आदूबाळांच्या नजरेस पडला. त्यांनी तात्पुरता उपाय म्हणून पंक्चर झालेल्या चाकात थोडी थोडी हवा भरून मार्गक्रमण करायचे ठरवले. मग मीच हवा भरून दिली व दोघेही पुन्हा ग्रिनिचकडे मार्गस्थ झालो. रस्त्यात पुन्हा दोनदा हवा भरावी लागली.
ऐन कट्ट्यास्थळाच्या जवळ पोचल्यावर इंधन संपल्याने रणगाडा बंद पडला. कितना देता हैं हा प्रश्न न विचारताच आदूबाळांनी तो भाड्याने घेतला होता. मग काय करणार, माझ्या सॅकमध्ये असलेल्या रेड बुल इन्स्टंट एनर्जी ड्रिंकच्या ४ कॅन्स गटागटा पिल्या अन जीन्सला बांधलेला कंबरेचा पट्टा काढून त्याचे एक टोक रणगाड्याच्या गोळाफेक करायच्या नळीला लावले अन दुसरे माझ्या सायकलच्या मडगार्डला. हळू हळू करत कट्टास्थळी पोचलो तर इतर कट्टेकरी तोवर न आल्याने आमचा जरा हिरमोडच झाला.
24 Jun 2016 - 10:10 am | जेपी
=))
24 Jun 2016 - 10:16 am | नीलमोहर
जबर वृत्तांत =))
24 Jun 2016 - 11:06 am | जिन्गल बेल
खिक्क....
24 Jun 2016 - 11:38 am | आदूबाळ
कहर! पंपाने हवा भरणारे विजुभाऊ आणि जुनाट रणगाडा डोळ्यासमोर आला!
24 Jun 2016 - 11:44 am | चतुरंग
"श्रीरंग्_मोजी" यांचा वृत्तांत आवडला!! ;)
(रणगाडाप्रेमी)रंगाडा
24 Jun 2016 - 12:47 pm | विशाखा राऊत
हा हा हा भारीच
24 Jun 2016 - 1:40 pm | पद्मावति
=))
24 Jun 2016 - 1:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चांगलं जमलंय !
-दिलीप बिरुटे
24 Jun 2016 - 6:25 pm | जव्हेरगंज
हाहाहा!!!
24 Jun 2016 - 6:31 pm | विजुभाऊ
हा हा हा.
आरे ते टाईपायचे राहिले की. आदुबाळाने बीयरच्या बाटलीत भरून गव्हाची खीर आणली होती. तर अस्वस्थामा ने फिरकीच्या ताम्ब्यात बीयर आणली होती. ;)
मधेच आलेल्या पावसाने रणगाडा भिजला होता आणि त्याच्या स्पार्कप्लग मधे पाणे जाऊन रणगाड्याला सटासट शिंका येत होत्या. लोक चुकून त्या फायर ला मिसफायर समजत होते
24 Jun 2016 - 11:13 am | पियुशा
भारी !!!
24 Jun 2016 - 12:05 pm | सनईचौघडा
हायला आदुबाळ मी तुम्हाला ५० शी च्या पुढचा समजत होतो. केस विरळ , चश्मा, असा काहीसा. आज फोटूमध्ये तर एकदम चिकना गडी दिसतोयस की. आणि कट्टा वृत्तांत आवडला.
24 Jun 2016 - 12:50 pm | आदूबाळ
तो फोटो मॉर्फ करून माझ्याजागी मुलाचा फोटो लावलाय.
24 Jun 2016 - 2:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वृत्तांतात फोटो टाकल्याबद्दल आभारी आहे. असवस्थामा भारी पर्सन्यालिटी वाटली. आदुबाळ यांना तिशीतले समजत होतो, ते पन्नास प्लस वाटतात.;) विजूभौ मित्र असल्यामुळे ते अजूनही सात आठ वर्षापासून २७ चेच आहेत. लोथार पण भारी. मल्हार आणि मंडळीही छानच. चला, कधी पोचलोच लंडनला तर आपलं खरं गणगोत हेच. सर्वांना भेटून आनंद झाला. मिपा कट्टा केलात एकमेकांना भेटलात खान पान केलं छान वाट्लं. कट्टा एक दोन तासाचा असतो पण त्यासाठी व्यक्तिगत नियोजन करावा लागतो. वेळ काढावा लागतो. म्हणून सर्वांचं कौतुक आहे. सर्वांचं मन:पूर्वक अभिनंदन. जगभर मिपाकराचे कट्टे झाले पाहिजेत ही श्रींची इच्छा... !
-दिलीप बिरुटे
24 Jun 2016 - 2:17 pm | अभ्या..
बघा जरा सर.
नुसते छान छान म्हणत बसू नकात.
मराठवाडा शांत का?
24 Jun 2016 - 5:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मराठवाड्यातील कट्टयाची लवकरच उद्घोषना करण्यात येईल. मिपाजाळं अजून मराठवाड्यात तसं फोफावलं नाही. मिपाचा मराठवाड्यात एकदा चांगला प्रचार प्रसार करून झाला की कट्टर मिपाकर तयार झाले की मग स्पेशल मराठवाडा कट्टा करू.
-दिलीप बिरुटे
-दिलीप बिरुटे
24 Jun 2016 - 6:16 pm | प्रचेतस
चार पाच वेळा मराठवाड्यात कट्टे झालेत की सर.
आता एकदा प्रतिष्ठानात केला की मी डोळे मिटायला मोकळा.
27 Jun 2016 - 9:22 am | नाखु
रा रा श्री श्री वल्ली सर
आजकाल आपले कधी डावा उजवा असे वारंवार डोळे मिटू लागले आहेत.(किंवा तसे वाटु लागले असावे) याकडे आमची बारीक नजर आहे.
अर्थात औरंगाबाद कट्ट्याबाबत सहमत आहे.
आप्ला विनम्र
सक्रीय पाठिंबा कार्यकर्ता बिरुटे सर मित्रमंडळ
24 Jun 2016 - 2:48 pm | धनंजय माने
असोस्थामा तुम नाम बदल दिए का?
स्वप्निल कधीपासून म्हणे?
कट्टयाची खादाड़ि न दिसल्याने बरे वाटले.
24 Jun 2016 - 4:17 pm | अस्वस्थामा
तरी म्हट्लंच कोणी कसं नै बोल्ल ते.. ;)
ती विजूभाऊंची टायपो मिश्टेक आहे राव. शेपरेट विचारू शकता त्यांना.
कळ्ळं का "बनवा बनवी"वाले माने ? का इंग्रजीत सांगू ?
25 Jun 2016 - 12:17 am | जुइ
छोटेखाणी वृत्तांत आणि फोटो आवडले.
25 Jun 2016 - 12:57 pm | खालीमुंडी पाताळधुंडी
अस्वस्थामा हॅण्डसम दिसतोस!!!!
नाव तेवढं बदला ते "मदनाचा पुतळा" वगैरे करून घ्या.