तसे पावसाळ्याचे वेध मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच लागलेले असतात. नैऋत्येहून निसटलेले चुकार काळे ढग इकडे लहानसं आकाश व्यापून टाकत असतात. बाजूंनी पांढरे, कापसांसारखे गुंतागुंतीचे, थराथरांचे आणि मध्यभागी काळसर असलेले ढग येथे दिसू लागलेले असतात. हे तसे दरवर्षीच सुरुवातीला दिसतात. मागाहून येणाऱ्या जलाने संपृक्त झालेल्या काळ्याभोर मेघांच्या लाटांची ते जणू वर्दी द्यायला आलेले दिसतात. कधीतरी एखादा वळीव बरसून गेलेला असतो, तेव्हा स्वच्छ झालेल्या निळ्याभोर आकाशात ते ढगांचे पुंजके मोठे खुलून दिसत असतात.
संध्यारागोत्थितैः ताम्रैः अंतेष्वपि च पाण्डुभिः ।
स्निग्धैरभ्रपटच्छेदैः बद्धव्रणमिवांबरम् ॥
कधी संध्यासमयीच्या ताम्रवर्णी आकाशात हे कधी श्वेत तर कधी स्निग्ध दिसणारे ते मेघखंडांनी आच्छादित झालेले आकाश व्रणावर बांधलेल्या लालभडक पट्टीसारखे दिसते आहे.
हळूहळू आकाशात मेघांची दाटी होऊ लागते. मेघखंडातनं मोकळं राहिलेलं आकाश काळ्याशार मेघांनी भरुन जाऊ लागतं. मधूनच दर्शन देणारा सूर्यही आता दिसेनासा होऊ लागतो. आकाशरुपी तरुणी सूर्याच्या किरणांद्वारे समुद्राचा रस पिवून नऊ महिने धारण केलेल्या गर्भरुपी जलाला जणू जन्म देत असते.
सारथी जसा चाबकाचे तडाखे उडवून घोड्यांना जसा पुढेपुढेच दौडवत असतो , तसा हा सुसाटणारा वारा आपल्या मेघरूपी सेवकांना गोळा करून ते आपल्या दृष्टीस पडतील असे करतो आणि हे गगनमंडळ मेघांनी ग्रासून टाकले कीं त्या सिंहरुपी मेघांच्या गर्जनेचा गडगडाट दूर अंतरावरुनही ऐकू येत असतो. उत्तररात्रीही काजव्यारुपी प्रकाशशलाकांनी वृ़क्षच्या वृक्ष चमकू लागलेले असतात.
अयं स कालः संप्राप्तः समयोऽद्य जलागमः ।
संपश्य त्वं नभो मेघैः संवृतं गिरिसंनिभैः ॥
हा जलाची प्राप्ती करुन देणारा पावसकाळ जवळ आलाय, पर्वतासमान भासणार्या मेघांनी हे आकाशमंडळ जणू झाकोळून गेले आहे. काही मेघ वांझ गाईप्रमाणे उदकरहित आहेत तर काही वृष्टीजल प्रसवत आहेत अशा रितीनं हा पर्जन्य आपल्या मनासारखे रूप धारण करीत आहे.
संवत्सरं शशयानाः ब्राह्मणाः व्रतऽचारिणः
वाचं पर्जन्यऽजिन्वितां प्र मण्डूकाः अवादिषुः ॥
एखादा ब्राह्मण जसं व्रतपालन करण्यासाठी वर्षभर मौन पाळतो तद्वतच हे बेडूक वर्षाकाळ सुरु होताच आनंदित होऊन डरांव डरांव असा कोलाहल सुरु करतात. त्या कृष्णवर्णी मेघांच्या गर्जना ऐकून नऊ मास रोखून धरलेल्या निद्रेचा त्याग करून जागे झालेले अनेक प्रकारच्या रूप, आकार, वर्ण आणि बोली असणारे बेडूक नवीन जलाच्या धारांनी अभिहत होऊन जोरजोराने बोलत असतात. जणू एखादा गायक समेवर येतो तद्वतच उत्तररात्री त्यांचा हा नाद तीव्रतम झालेला असतो.
बालेंद्रगोपांतरचित्रितेन
विभाति भूमिर्नवशाद्वलेन ।
गात्रानुपृक्तेन शुकप्रभेण
नारीव लाक्षोक्षितकंबलेन ॥
नूतन हिरव्यागार गवताने आच्छादित झालेल्या ह्या भूमीला लहान लहान रक्तवर्णी इंद्रगोप कीटकांमुळे, अंगावर लाखेच्या रंगाने रंगवून विचित्र शोभेने संपन्न केलेल्या स्त्रीप्रमाणे शोभा प्राप्त होत आहे. हे मखमली मृगाचे किटक केवळ पावसाळ्याच्या सुरुवातीलाच दिसत असतात.
-
मेघकृष्णाजिनधरा धारायज्ञोपवीतिनः ।
मारुतापूरितगुहाः प्राधीता इव पर्वताः ॥
कशाभिरिव हैमीभिः विद्भिरिव ताडितम् ।
अंतः स्तनितनिर्घोषं सवेदनमिवांबरम् ॥
मेघरूपी काळे मृगचर्म, जलधारारूपी यज्ञोपवीत धारण केलेले, वायुने परिपुरीत हृदय असणारे हे पर्वत, ब्रह्मचार्याप्रमाणे जणु वेदाध्ययनास आरंभ करीत आहेत. सोन्याच्या चाबकाप्रमाणे भासणार्या ह्या विद्युल्लतांच्या नादाने तडित झालेले आकाश मेघांच्या गंभीर गर्जनेच्या रुपात आर्तनाद करु लागलेले आहे. आकाशामध्ये सर्व बाजूस मेघ विस्कळित झाले आहेत. कोठेतर त्या ढगांनी झाकले जाण्याने आकाश दिसतच नाही आणि काही ठिकाणी त्याला छिद्र पडल्यामुळे ते स्पष्ट दिसून येत आहे.
ग्रीष्माच्या उन्हाने तापली गेलेली भूमी वर्षाकालच्या नूतन जलाने भिजून शोकसंतप्त सीतेप्रमाणे अश्रूपात करीत आहे. मेघरूपी घोडे जोडलेल्या, विद्द्युल्लतेरुपी चाबूक घेतलेल्या आकाशरुपी रथात बसून सर्वत्र संचार करणारी पर्जनरुपी देवता आपल्या पखालीचे टोक उलटे धरुन जमिनीवर सर्व खळगे पाण्याने भरुन टाकत आहे. कधी त्या देवतेच्या ध्यानी येतं की ह्या रानात बेडूक बोलू लागले नाहीत, काजवे लुकलुकू लागले नाहीत, खाचरं पाण्यानी तुडुंब भरली नाहीत अशा वेळी ही देवता आपल्या मेघरुपी पक्ष्यांचा थवा तिकडे धाडून पर्जन्यधारा बरसवू लागली आहे.
वर्षोदकाप्यायितशाद्वलानि
प्रवृत्तनृत्तोत्सवबर्हिणानि ।
वनानि निर्वृष्टबलाहकानि
पश्यापराह्णेष्वधिकं विभांति ॥
पहा ह्या वर्षाकाळात या वनांची शोभा अधिकच वाढत आहे. पावसाच्या पाण्यामुळे यांच्यात हिरवेगार गवत उगवले आहे. मोरांच्या झुंडीच्या झुंडींनी आपल्या नृत्योत्सवाचा आरंभ केला आहे आणि मेघ या वनात निरंतर जल वर्षाव करीत आहेत.
चहूकडे हिरवं हिरवं होत आहेत, गाईगुजी जोगवू लागल्या आहेत, खाचरं जलांनी तुडुंब भरुन जात आहेत. डोंगरांवर भारंबीचे ठोंब, चवेणीला धुमारे फुटू लागले आहेत, रानकेळी उमलू लागलेली आहेत. कड्यांवरुन कोसळणारे प्रपात शुभ्र हिमासारखे भासू लागले आहेत, ह्या प्रपातांनी पहाडातून नद्या उगम पावू लागलेल्या आहेत. कोसळणारं शुभ्र जल जमिनीवर येताच गेरूसारखं लालभडक होऊन दर्याखोर्यांतून वाहू लागलेलं आहे. सार्या सृष्टीत अवघं चैतन्य पसरलेलं आहे.
महांतं कोशं उत् अच नि सिञ्च स्यंदंतां कुल्याः विऽसिताः पुरस्तात् ।
घृतेन द्यावापृथिवीइति वि उंधि सुऽप्रपानं भवत्व् अघ्न्याभ्यः ॥
हे पर्जन्या, तू मोठा निनाद करुन जेव्हा दुष्ट अवर्षणाचा नाद करत असतोस तेव्हा ह्या पृथ्वीवर जे जे काही आहे ते सर्व आनंदाने डोलू लागलेले असते. काळसर, तांबडी झालेली जमिनी हिरव्यागार गवताने भरुन जाते. काळ्याकभिन्न छातीचे पर्वत हिरवा साज नेसू लागतात, मेघ पर्वताला धडकू लागतात, नद्या जलाने भरुन वाहू लागतात, पक्ष्यांचे थवेच्या थवे आकाशात आनंदाने भरारी मारु लागतात, हरणं यथेच्छ जलपान करु लागतात, वानरं कल्लोळू लागतात, मोर नाचू लागतात, वाघ डुरकू लागतात.
वर्षप्रवेगा विपुलाः पतंती
प्रवांति वाताः समुदीर्णवेगाः ।
प्रनष्टकूलाः प्रवहंति शीघ्रं
नद्यो जलं विप्रतिपन्नमार्गाः ॥
घनघोर वृष्टी होत आहे. मरुतही जोराने वहात आहे, आणि नद्या आपल्या तटांना तोडून अत्यंत तीव्र गतीने जल वाहून नेत आहेत. आपल्या तीव्र जलौघांनी त्यांनी यात्रिकांचे मार्ग रोखून धरले आहेत. मेघांच्या समुदायानी समस्त आकाश आच्छादित झालेले आहे. रात्री तारे दिसत नाहीत, दिवसा सूर्य दिसत नाही. दिशा अंधःकाराने वेष्टिल्या गेल्यामुळे त्यांचे भान जणू नाहिसे झालेले आहे.
दरीतून धुकटाचे लोट उठत आहेत. त्या मेघांच्या पर्वतांवर आदळणार्या झुंडी जणू एखाद्या सैन्यावर मत्त गजराज जाऊन कसे आदळावेत तशा भासू लागल्या आहेत. त्या पर्वतांतून वाहणारे प्रपात एखाद्या मदमस्त गजाच्या गंडस्थळातून वाहणार्या मदाप्रमाणे दिसत आहेत.
अभि क्रंद स्तनय गर्भं आ धाः उदन्ऽवता परि दीय रथेन ।
दृतिं सु कर्ष विऽसितं न्यञ्चं समाः भवंतु उत्ऽवतः निऽपादाः ॥
पर्जन्य आपल्या गर्भातील उदकाने भूमीवर दिव्य घृताचे सिंचन करीत आहे. मोकळे केलेले झालेले निर्झर दुथडी भरून पुढे वहात जात आहेत. आपल्या मार्गात येणार्या सर्व सृष्टीला ते जणू तृप्त करत आहेत. ही पर्जन्यवृष्टी सकळ जनांना आनंदित करीत आहे. तिची ही कृपा आमच्यावर अशीच चालू राहात आहे.
प्रतिक्रिया
21 Jun 2016 - 10:50 pm | अनिरुद्ध.वैद्य
फोटो अन वर्णन सुपर्ब!! शेवटला फोटो कुठला?
21 Jun 2016 - 10:55 pm | राघवेंद्र
शेवटचा फोटू अप्रतिम :)
21 Jun 2016 - 11:02 pm | गवि
अरे वल्लीशेठ.. काय कातील फोटो आहेत..!!!
21 Jun 2016 - 11:04 pm | किसन शिंदे
दंडवत घ्या मालक!
शेवटचा रोहिडाय बहुतेक कि कोरीगड? आणि उभा राह्यलेला तो गणेशा आहे माझ्या आठवणीप्रमाणे..
21 Jun 2016 - 11:18 pm | प्रचेतस
रोहिडा आहे. गणेशा नाही तो. कुणी अनामिक आहे. सहज टिपलेला फोटो तो.
21 Jun 2016 - 11:11 pm | धनंजय माने
ख़ास च फोटो प्रचुर ;)
हे 'झाड' 2000 वर्षापूर्वी हरवलेलं ऐतिहासिक कोणीतरी आहे याबाबत खात्री पटु लागली आहे.
21 Jun 2016 - 11:14 pm | अत्रुप्त आत्मा
वाह!
असा यायला हवा पाऊस. !
=======
अवांटर-
@ अंतेष्वपि च पाण्डु"भिः ››› =))
21 Jun 2016 - 11:19 pm | रातराणी
_/\_ फक्त!!
21 Jun 2016 - 11:24 pm | एस
हे कोणी लिहिलेय हे पुन्हा एकदा वर जाऊन पाहिलं. :-) अतीव सुंदर!
22 Jun 2016 - 2:23 am | पद्मावति
फारच सुरेख लिहिलंय. नेहमीप्रमाणेच क्लास!!
फोटो छान आहेत. फोटोंची जोड देण्याची कल्पना मस्तं!
22 Jun 2016 - 2:52 am | चांदणे संदीप
.
___/\___
Sandy
22 Jun 2016 - 5:18 am | डॉ सुहास म्हात्रे
लेखन आणि फोटो एकमेकाला पूरक... आणि एक नंबर !
22 Jun 2016 - 6:39 am | उल्का
अप्रतिम फोटो!
22 Jun 2016 - 6:57 am | दीपा माने
निसर्गाच्या अनंत, उदात्त रूपापुढे त्याला मानव त्या लाल रंगाच्या किटकाएवढाच किंमतीचा!
22 Jun 2016 - 7:14 am | शरद
नवयौवनसंपन्न युवतीला अलंकारांनी सुशोभित करावे तसे छायाचित्रांनी लेखनाला अलंकृत केले आहे. वा ह वा.
शरद
22 Jun 2016 - 7:14 am | चौकटराजा
मान गये आपकी नजर .....
22 Jun 2016 - 7:17 am | स्पा
झकासच
22 Jun 2016 - 8:30 am | नाखु
दुसरे शब्दच नाहीत .
नुसते मोती जसे कुशल कारागीराने साधेच पण मोहक हारात गुंफावेत तसा लेख आणि छायाचित्र मेळ आहे.
जोडचित्र (एकाखाली एक) केवळ प्रत्ययी आहेत.
आपल्या मनातल्या पावसालाही अशीच वाट फुटू दे,आणि मळ्भ निराशेची रखरख दूर होवो हीच आई जगदंबेकडे प्रार्थना.
भीजपावसातला नितवाचक नाखु
22 Jun 2016 - 8:36 am | जेपी
मस्त..
22 Jun 2016 - 8:40 am | प्रदीप साळुंखे
भन्नाट लिहलय!!!
22 Jun 2016 - 8:47 am | कंजूस
बालकवी
22 Jun 2016 - 9:14 am | टवाळ कार्टा
कहर
22 Jun 2016 - 9:39 am | गणामास्तर
फोटो लै म्हणजे लैचं भारी.
22 Jun 2016 - 10:18 am | ५० फक्त
वरवर भिजवणारा पाउस हल्ली आतपर्यंत जातो..
खोल दडलेल्या बिजाला अंकुरुन वर आणतो..
..
..
..
.
बाकी लेखन आणि फोटो दोन्ही भारी रे..
22 Jun 2016 - 10:50 am | सस्नेह
रम्य फोटो आणि रसभरीत वर्णन.
एक निरीक्षण : प्रचेतस सर अलीकडे दगडे सोडून काव्यात रमू लागले आहेत.
(कोण तो विचारतोय, 'आता ही काव्या कोण' म्हणून )
22 Jun 2016 - 10:51 am | अभिजीत अवलिया
मस्त ...
22 Jun 2016 - 10:52 am | अनिरुद्ध प्रभू
भाउ....
22 Jun 2016 - 10:56 am | शान्तिप्रिय
मस्त लेखन
22 Jun 2016 - 11:01 am | सतिश गावडे
भारीच रे...
22 Jun 2016 - 11:19 am | पैसा
सुरेख
22 Jun 2016 - 11:21 am | महासंग्राम
जबरा फोटो आणि लिखाण लिखाणाला फोटोंमुळे जणू अलंकार चढवला आहे असे वाटते. इतके जिवंत आहेत फोटो.
22 Jun 2016 - 11:33 am | पिशी अबोली
वाह!!!
22 Jun 2016 - 11:52 am | प्रीत-मोहर
अतिशय सुरेख लेखन आणि फोटो
22 Jun 2016 - 12:08 pm | प्रसाद गोडबोले
सुंदर !!
22 Jun 2016 - 12:59 pm | अनिता ठाकूर
अप्रतिम!
22 Jun 2016 - 1:02 pm | मुक्त विहारि
आता बहूदा ह्या वर्षी वल्ली सहकुटुंब होणार असे दिसतेय.
22 Jun 2016 - 2:12 pm | नीलमोहर
__/\__
22 Jun 2016 - 2:28 pm | जगप्रवासी
फोटो कहर आहेत त्याला शोभतील अशी संस्कृत काव्ये आणि त्याचा सुंदर असा अनुवाद (भावानुवाद). प्रचेतस सर तर आधुनिक कालिदास झालेत.
22 Jun 2016 - 2:37 pm | प्रचेतस
रूढार्थाने हा अनुवाद किंवा भावानुवाद नाही. श्लोकांचं अगदी स्वैर रूपांतर पहिल्या एकदोन ओळीत केलंय. त्याखाली त्याला जोडून जे वर्णन आहे ते स्वतंत्र आहे.
22 Jun 2016 - 4:03 pm | लॉरी टांगटूंगकर
__/\__
22 Jun 2016 - 4:27 pm | यशोधरा
सुरेख.
22 Jun 2016 - 4:57 pm | नया है वह
__/\__
22 Jun 2016 - 5:30 pm | स्मिता_१३
क्लास !!
22 Jun 2016 - 7:18 pm | अजया
अप्रतिम फँन्टॅस्टिक सुपर्ब क्लास....अजून आठवलं की लिहिन! फोटोंनी जादू केलीये लेखात.
22 Jun 2016 - 10:46 pm | भाग्यश्री कुलकर्णी
साहेबा दंडवत घ्या. खुप छान. शेवटचा फोटो तर कळस.जियो.
24 Jun 2016 - 6:09 pm | राजेंद्र मेहेंदळे
लेखन आणि फोटो..दोन्हीही सुंदर!! काय अधिक सुंदर हे सांगता येणार नाही.
बाकी शिल्पकला असो की निसर्गवर्णन..वल्लीची लेखणी तशीच तळपते. _/\_
21 Oct 2021 - 12:11 pm | श्वेता व्यास
अप्रतिम लेखन आणि अप्रतिम फोटो !
21 Oct 2021 - 6:46 pm | अनन्त्_यात्री
समसमा संयोग!
25 Oct 2021 - 5:03 pm | चौथा कोनाडा
वाह, क्लासिक !
💖
15 May 2023 - 8:49 am | कुमार१
फोटो अन वर्णन सुंदर !!
15 May 2023 - 10:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाह ! उन्हाळ्यात लाही लाही होत असतांना फोटो पाहून सुखद गारवा जाणवला.
-दिलीप बिरुटे
15 May 2023 - 10:54 pm | गवि
यातील मृगाच्या किड्यावरून तुम्ही किडे धागा काढला होता ते आठवले. शिवाय
तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही
तुला बोलावता पोहोचायचा पाऊसही
ही कविताही आठवली..
15 May 2023 - 10:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अहाहा...! च्यायला गेले ते दिवस. आता आठवणी.
असे ढग बीग भरुन आले की नुसते स्वप्नाळू व्हायचो.
कशी भर पावसातही आग माझी व्हायची
तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही.
-दिलीप बिरुटे
(पाऊस)
15 May 2023 - 11:00 pm | गवि
तपशील प्लीज. धन्यवाद.
15 May 2023 - 11:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तपशील बीपशील काही नाही. असेच ढग भरुन यायचे
आणि मग मागोमाग पाऊसही यायचा. भांडण मिटायचं.
बाकी, कै नै.
-दिलीप बिरुटे
15 May 2023 - 11:11 pm | गवि
इतकंच का? ब्बोर्र. ठेवतो विश्वास झालं.
15 May 2023 - 11:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पहले बारिश होती थी तो तुम याद आते थे
अब तुम याद आते हो तो बारिश होती है.
(धाग्यावर अवांतर केल्याबद्दल धागा लेखाची क्षमा मागतो)
-दिलीप बिरुटे
16 May 2023 - 8:49 am | प्रचेतस
तुम्ही दोघे ज्येष्ठ सदस्य धुवांधार पावसात चांगलेच भिजलेले दिसतायत.
16 May 2023 - 12:10 pm | टर्मीनेटर
ह्म्म्म्म... पण त्यांनी झेललेल्या पावसाच्या पाण्याचे तुषार इतरांवर उडवुन त्यांनी अनुभवलेले आनंदक्षण शेअर करण्यास मात्र ते तयार नाहीत 😀
असो... वाचनातुन निसटलेला माझ्या मिपावतारापुर्वीचा हा सुंदर सचित्र लेख आवडला 👍
16 May 2023 - 11:04 am | कर्नलतपस्वी
अब भी बरसात की रातों में बदन टूटता है
जाग उठती हैं अजब ख़्वाहिशें अंगड़ाई की
परवीन शाकिर
प्रचेतस बहोत खुब.
हर बात पर ताज्जुब ना करे
मशरूम भी बारीश मे ही खिलते है.