ओळख

सिरुसेरि's picture
सिरुसेरि in जनातलं, मनातलं
29 May 2016 - 7:48 pm

ओळख

तिला पिक्चर खुप आवडतात . विशेषकरुन जर प्रेमकथा असेल तर ती अगदी गुंग होउन जाते . हिरो हिरॉईनच्या सुखात हसते , त्यांच्यावर संकट आले तर तिच्या डोळ्यात पाणी येते . असे पिक्चर पार टायटलपासुन ते दि एंड पर्यंत बघायचेच असा तिचा नेम असतो . असे पिक्चर परत परत बघायलाही ती नेहमीच तयार असते . या रविवारचे प्लॅनिंग तिने आधीच मनाशी ठरवले होते . तो खास दिवस त्याच्याबरोबर पिक्चर पाहुन तिला सेलीब्रेट करायचा होता . त्यासाठी आमीरखानच्या "कयामतसे.."चे बुकिंग ती करणार होती . यामधली एकुण एक गाणी तिला पाठ होती . आमिरखान हा तिचा फेव्हरेट हिरो बनला होता .

तो अगदी उलट आहे . तो पिक्चर फारसे बघत नाही . प्रेमकथा तर त्याला अजिबात आवडत नाहित . अश्रूभरल्या डोळ्यांची पिटपिट करत हिरॉईन जेव्हा " इस दिलमें तुम्हारे प्यारके अलावा...." असले काही बोलु लागते तेव्हा त्याला झोपच येते . हिरो जेव्हा कातर आवाजात "इस जालिम जमानेको दिखाना है..." असले काहि डायलॉग नाही तर गाणे म्हणतो तेव्हा त्याला चक्कर येते . असे "दिल विल प्यार व्यार" वाले पिक्चर बघणे तो नेहमीच टाळतो .

त्याचा भर आहे तो हॉलिवूडच्या अ‍ॅक्शन मुव्हीजवर . ब्रुसली , जॅकी चॅन , अर्नॉल्ड , स्टॅलोन हे त्याचे खास आवडते अ‍ॅक्शनस्टार . यांचे पिक्चर तो कधीच चुकवत नाही . एंटर द ड्रॅगॉन , प्रोजेक्ट ए , कमांडो , रॅम्बो हे पिक्चर त्याने आवडीने पाहिले आहेत . या रविवारी जॅकी चॅनचा पोलीसस्टोरी बघायला जाण्याचा त्याचा बेत होता . आपल्या काहि मित्रांशी त्याचे बोलणेही झाले होते .

तेवढ्यात त्याला तिचा फोन आला . ती फोनवर खुप खुश होउन उत्साहाने बोलत होती .

"या रविवारच्या खास दिवशी आपण एखादा पिक्चर बघुया . आपण आमीरखानचा "कयामतसे.." बघायला जाउ."

त्याला काय बोलावे तेच सुचेना . तो थोडावेळ विचार करुन बोलु लागला . हा थोडावेळ तिला मात्र जास्तच खटकला .

" या रविवारी माझा जॅकी चॅनचा पोलीसस्टोरी बघायला जाण्याचा बेत आहे . मी एक दोन मित्रांशी बोललोही आहे."

" पण या रविवारी आपण दोघांनी एकत्र पिक्चर बघावा अशी माझी खुप इच्छा आहे . तु पोलीसस्टोरी नंतर कधीतरी बघ ." तिने सुचविले . त्याला प्रेमकथा टाइपचे पिक्चर आवडत नाहित हे ती उत्साहाच्या भरात विसरली होती . तो टाळाटाळ का करत आहे हे आता तिला परत लक्षात येत होते .

"पण मला असले रडके ड्रामेबाज पिक्चर आवडत नाहित . तुला ते चांगलं माहित आहे . आणी एकत्रच पिक्चर बघायचा असेल तर तु माझ्याबरोबर पोलीसस्टोरी बघायला ये . मी मित्रांबरोबर जाण्याचे कॅन्सल करतो . आपण दोघे जाउ पोलीसस्टोरी बघायला . कदाचित तुलाही तो पिक्चर आवडेल. " तो सहज म्ह्णुन म्हणाला .

" बरं .. ठिक आहे ." अखेर ती थोडा वेळ विचार करुन तयार झाली .

"गुड.. मी आजच रविवारच्या शोची तिकिटे बुक करतो . " तो उत्साहाने म्हणाला .

रविवारी उगाच नंतर उशीर नको म्ह्णुन शोच्या अर्धा पाउण तास आधीच ती दोघं थिएटरवर पोचले . सिनेमा हॉलमध्ये पोलीसस्टोरीचा आधीचा शो सुरु होता . तेव्हा थिएटर मध्येच इकडे तिकडे फिरणं असा त्यांचा टाइमपास चालु होता .

तो आज खुप दिवसांनी थिएटरमध्ये पिक्चर पाहायला आला होता . त्याचे लक्ष सिनेमाहॉलच्या बाहेर भिंतीवर लावलेल्या फोटोंकडे गेले . पिक्चरमधले काही महत्वाचे सीन त्या फोटोंमध्ये होते . तो आवडीने ते फोटो पाहु लागला . पुर्वी शाळा , कॉलेजला असताना मित्रांबरोबर पिक्चरला गेले की असे फोटो पाहायचे आणी त्यावरुन स्टोरीचे अंदाज लावायचे हा त्या सर्वांचाच आवडता कार्यक्रम होता . सर्व मित्रांचे पिक्चरला जायचे ठरले की सर्वजण सुरक्षिततेसाठी आधी थिएटरपासुन थोडं लांब बाहेर कुठेतरी झाडाखाली नाहितर एखाद्या टपरीपाशी जमत असत . मग त्यांच्यातला एकजण पुढे जाउन तिकीटं काढत असे . त्याने इशारा केला की सगळेजण पळत पळत थिएटरमध्ये शिरत असत .

या मेथडचा फायदा असा की व्हिजुअलाईज होण्याचा धोका खुप कमी असे. त्यामुळे "तुमच्या राजुला काल आम्ही अमुक तमुक टॉकिजपाशी पाहिलं . त्याच्यावर थोडं लक्ष ठेवा ." असे हितचिंतकांचे निरोप फारसे घरी येत नसत .

अशा अ‍ॅक्शन मुव्हीज पाहिल्या की , शाओलीन टेंपलला जाउन मार्शल आर्ट शिकण्याचे बेत रचले जात असत . तर मित्रांबरोबर बरेचदा वाद विवादही होत असत . "निंजा जास्त भारी का सामुराई ?" , " स्नेक स्टाईल जास्त चांगली का ईगल स्टाईल ?" असे त्या वादाचे मुद्दे असत . बरेचदा या स्नेक स्टाईलचे आणी ईगल स्टाईलचे एकमेकांवर अगदी लाथा बुक्क्यांसकट / किक आणी पंचेससकट प्रयोग होत असत . पुढे मग बरेच दिवस सगळ्यांचेच अंग ठणकत असे .

आज हे सर्व आठवुन त्याला हसु आले . तो का हसतो आहे हे तिला समजेना . तिला हॉलिवूडच्या अ‍ॅक्शन मुव्हीजची थोडी माहिती असावी म्ह्णुन तो आठवेल तेवढे आपले ज्ञान पाजळु लागला .

" तु जर ब्रुसलीचे 'बिग बॉस' , 'फिस्ट ऑफ फ्युरी' आणी कुठलेही पिक्चर बघशील तर तुला लक्षात येइल की तो खुप आक्रमक , अ‍ॅटॅकिंग असतो . कधीच माघार घेत नाही ."

" जॅकी चॅन हा तसा डिफेन्सिव्ह आहे . तो वेळ प्रसंगी शत्रुचे चार फटके खातो . आणी वेळ बदलली की दहा फटके देउन परतफेड करतो . "

"रोनीन म्ह्णजे मालक नसलेला सामुराई . सामुराईंमध्ये हे खुप अपमानास्पद मानले जाते ."

ती सुन्न होउन त्याचे बोलणे ऐकत होती . त्यातली निम्मी अधिक माहिती तिच्या डोक्यावरुन जात होती . आपल्याला पुढे दोन तास काय दंगा बघावा लागणार आहे याची तिला थोडी फार कल्पना येउ लागली होती . पण आता काही उपयोग नव्हता . हि वेळ तिनेच आपण होउन आणली होती .

पलिकडच्याच सिनेमा हॉलमध्ये "कयामतसे.."चा शो सुरु होता. त्यामधले गाणे तिला पुसटसे ऐकु येत होते .

" अकेले है , तो क्या गम है ....चाहे तो हमारे बसमें क्या नहीं ..
बस इक जरा , साथ हो तेरा ...तेरे तो है हम .. कबसे सनम .."

हे गाणे ऐकुन तिचे मन त्या सिनेमाहॉलकडेच ओढ घेत होते . पण आज तरी ते शक्य नव्हते . इकडे याचे तिला माहिती सांगणे चालुच होते . तो आपल्याच नादात होता .

" अर्नॉल्डचा टर्मिनेटरचा भाग दोन - जजमेंट डे हा पहिल्या भागापेक्षा जास्त क्लासिक आहे ."

तेवढ्यात पोलीसस्टोरीचा आधीचा शो संपला . सिनेमा हॉलचे दार पुढच्या शोच्या प्रेक्षकांसाठी उघडले गेले . आत जाण्यासाठी लोकांची दारापाशी बरीच गर्दी झाली . बरेच जण गडबड करु लागले .

"थोडी गर्दी कमी होउ दे . मग आपण आत जाउ ." तो तिला म्ह्णाला . तिलाही बरे वाटले .

थोड्याच वेळात पलिकडच्या सिनेमा हॉलचेही दार "कयामतसे.." च्या पुढच्या शोच्या प्रेक्षकांसाठी उघडले गेले . प्रेक्षक आत मध्ये जाउ लागले .

"चल ..आपण जाउ आता .." तो तिला म्हणाला . दोघे मिळुन सिनेमा हॉलकडे चालु लागले .

अचानक तिला जाणवले की तो सरळ न जाता पलिकडच्या सिनेमा हॉलकडे जात आहे .

"अरे ,तु या हॉलकडे का जातो आहेस ? इथे तर 'कयामतसे..'चा शो आहे ना ?" तिने त्याला थांबवुन विचारले .

"आपल्याला आज 'कयामतसे..'च बघायचा आहे . मी त्याच शोची तिकिटे बुक केली आहेत." तो हसत म्ह्णाला .

तिचा अजुनही विश्वास बसत नव्हता . तेव्हा त्याने तिला खिशातुन "कयामतसे.."ची तिकिटे काढुन दाखवली .

"आपलं फोनवर बोलणं झालं , तेव्हाच ठरवलं कि तुला जरा सरप्राईज द्यावं .." त्याच्या डोळ्यात खोडसाळ हसु खेळत होतं .

"अच्छा .. म्ह्णजे एवढा वेळ जी बडबड चालली होती ती सगळी बनवाबनवी होती तर..." ती रागाने म्हणाली .

तिला त्याचा खुपच राग आला होता . त्याला एखादी ब्रुसली सारखी सॉलिड किक मारावी किंवा जोरदार ठोसा मारावा असे तिच्या मनात येत होते . पण त्याचा हेतु चांगला होता .. आणी समोर तिचा आवडता पिक्चर सुरु होण्याच्या बेतात होता . त्यामुळे तिने आपला बेत तात्पुरता पुढे ढकलला .

---------------------- समाप्त ---------------------------------

जीवनमानलेख

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

29 May 2016 - 8:35 pm | प्रचेतस

साधंसुधंच पण सुंदर लेखन.

एस's picture

30 May 2016 - 6:18 pm | एस

+१.

आतिवास's picture

31 May 2016 - 10:06 am | आतिवास

कथा आवडली.

नीलमोहर's picture

31 May 2016 - 2:10 pm | नीलमोहर

हलकीफुलकी लवश्टोरी आवडली..

सस्नेह's picture

31 May 2016 - 2:45 pm | सस्नेह

हलकीफुलकी स्टोरी.

सरळ, सहज , मस्त

सिरुसेरि's picture

30 May 2016 - 10:32 am | सिरुसेरि

आपल्या प्रतिक्रियांबदल मनापासुन धन्यवाद .

यशोधरा's picture

31 May 2016 - 7:32 am | यशोधरा

मस्त!

नाखु's picture

31 May 2016 - 9:30 am | नाखु

ऐसी कयामत हमेशा आती रहे.

सुखद सुरेख झुळुक आवडली.

पिटातला नाखु

असंका's picture

31 May 2016 - 10:02 am | असंका

सुरेख!

धन्यवाद!

अभ्या..'s picture

31 May 2016 - 10:54 am | अभ्या..

मस्तच,
दिनबदिन तुमचे लेखन फ्रेश आणि फिनिश होत चाललंय. ग्रेट.

संजय पाटिल's picture

31 May 2016 - 11:54 am | संजय पाटिल

कथा मस्तच आहे.. पण ओळख काय पटली नाय.

चौथा कोनाडा's picture

28 Apr 2021 - 5:29 pm | चौथा कोनाडा

आम्हाला पटली बुवा ओळख ... त्याच्यातल्या हळूवार प्रेमभावनेची !

मराठी कथालेखक's picture

31 May 2016 - 1:44 pm | मराठी कथालेखक

त्यामुळे तिने आपला बेत तात्पुरता पुढे ढकलला .

अरेरे...म्हणजे इतक्या चांगल्या सरप्राईस नंतर पण त्याला मार पडणारच का ? :)

वेदांत's picture

31 May 2016 - 1:57 pm | वेदांत

मस्त ..

पद्मावति's picture

31 May 2016 - 6:13 pm | पद्मावति

:) खूपच मस्तं!

रमेश भिडे's picture

31 May 2016 - 7:20 pm | रमेश भिडे

सैराट आणि सिव्हील वॉर असे बदल करून वाचलं. नायिकेला सिव्हील वॉर आणि नायकाला सैराट... यावेळी नायक जिंकतो आणि तरी पुढचे चार आठ दिवस रदारडी होते....

सिरुसेरि's picture

1 Jun 2016 - 10:00 am | सिरुसेरि

सर्वांचे खुप आभार .

सिरुसेरि's picture

28 Apr 2021 - 4:37 pm | सिरुसेरि

२९ एप्रिल तारखेच्या निमित्ताने हा लेख आठवला .

रंगीला रतन's picture

28 Apr 2021 - 4:47 pm | रंगीला रतन

बोलेतो एकदम झक्कास! वाचुन मज्जा आली शेठ

चौथा कोनाडा's picture

28 Apr 2021 - 5:28 pm | चौथा कोनाडा

हाऊ रोमॅण्टिक !
त्याचा जॅकी चॅन आणि तिची आमीरवाली कयामत, लव्हली गोष्ट आवडली आपल्याला
💖

सिरुसेरी +१

चौथा कोनाडा यांच्या प्रमाणे माझेही मत, शिवाय ब्रुसली सारखी किक मारावी किंवा ठोसा द्यावा वाचून हसू लोटले आयडिया छान.

ब्रुसली सारखी किक मारावी किंवा ठोसा द्यावा ही आयडिया छान.

सिरुसेरि's picture

29 Apr 2021 - 10:33 am | सिरुसेरि

आपणा सर्वांचे प्रतिक्रियांबद्दल खुप आभार .

गॉडजिला's picture

2 May 2021 - 4:39 pm | गॉडजिला

एकदम वास्तववादी.