काही वर्षांपूर्वीची गोष्ट, दिल्लीच्या दत्त विनायक मंदिरात सत्यनारायणाची कथा सुरु होती. मंदिराच्या प्रांगणात एक ग्रहस्थ काही लोकांसोबत सत्यनारायण कथेचा माखौल उडवित होते. मी हि तिथे पोहचलो. थोड्यावेळातच लक्ष्यात आले, हे ग्रहस्थ नुकतेच पुण्याहून परतले आहे, आणि तिथल्या एका महाविद्वानाची मुक्ताफळे आपल्या तोंडाने फेकत आहे. मी हि त्या चर्चेत शामिल झालो. एखादी कथा हजारों वर्षांपासून जनमानसात रुजलेली आहे, तर निश्चितच त्या कथेत सामान्यांना भावणार काही तरी असणारच. सत्यनारायणाची कथा सामान्य माणसाला सत्यमार्गावर चालण्याची प्रेरणा तर देतेच शिवाय सामाजिक समरसतेचा संदेश हि देते. समाजातील सर्व वर्गांना हि कथा एक सूत्रात बांधते.
हिंदू धर्मात सदैव दोन प्रवाह राहिले आहे. एक प्रवाह स्वत:चे वर्चस्व स्थापित करण्यासाठी समाजात दुही माजविण्याचे कार्य करतो, ज्याला आपण आसुरी शक्ती म्हणू शकतो तर दुसरा प्रवाह समाजात सौख्य निर्माण करणारा अर्थात दैवीय शक्ती म्हणू शकतो. सत्यनारायण कथा सामान्य लोकांसाठी आहे. सत्यनारायणाची कथा लोकांना सत्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देते व समाजात सौख्य हि निर्माण करते. नवीन कामाची सुरुवात लोक सत्यनारायणाची कथा करून सुरु करतात. नवीन विवाहित जोडपे या कथेचे श्रवण करून आपला संसार सुरु करतात. सत्य आणि परस्पर विश्वास हे सुखी जीवनाचे सार आहे.
सत्यनारायण कथेतील पहिले पात्र एक दरिद्री ब्राम्हण आहे. हा ब्राम्हण दरिद्री का बरे असेल हा विचार मनात आलाच. जर ब्राम्हण जास्ती दक्षिणेच्या लालचाने पूर्व निश्चित यजमान सोडून दुसरी कडे जाईल तर काय होईल. त्याला पहिल्या यजमानाशी खोटे बोलावे लागेल. काही काळ ब्राम्हणाला जास्त दक्षिणा मिळेल. पण नंतर अधिकांश यजमान त्याला बोलावणे सोडून देतील. ब्राह्मण दरिद्री होईल. अश्याच एका दरिद्री ब्राम्हणाला नारद मुनींनी सत्याचरणाचा उपदेश केला. ब्राम्हणाची परिस्थिती बदलली. तो श्रीमंत आणि समृद्ध झाला.
दुसरे पात्र एक मोळीविक्या आहे अर्थात आजच्या पुरोगामी भाषेत म्हणायचे तर दलित समाजातला. तो ब्राम्हणाचा घरी येतो, कथा ऐकतो आणि प्रसाद हि भक्षण करतो. याचा अर्थ त्या काळी ब्राम्हणाच्या घरी हि दलिताचे स्वागत होत होते. दुसर्या शब्दांत सत्यनारायण कथेत अस्पृश्यतेचा निषेध केला आहे.
या कथेत अंगध्वज नावाचा राजा हि एक पात्र आहे. राजा म्हणजे क्षत्रिय. जंगलात गवळी समाजाचे लोक (वनवासी) सत्यनारायणाची कथा करीत आहे. राजा अंगध्वज त्यांच्या हातून प्रसाद स्वीकार करीत नाही. जातीपातीच्या भेदभावावर विश्वास ठेवणारा राजाच्या हातून प्रजेचे कल्याण संभव नाही. राजा प्रजेचा विश्वास गमावतो. परिणाम, राजाचे राज्य नष्ट होते. राजा अंगध्वजाला त्याची चूक उमगते. तो वनात राहणार्या गवळी लोकांसोबत सत्यनारायणाची पूजा करतो आणि त्यांच्या सोबत प्रसादाचे भक्षण करतो. अर्थात राजा अंगध्वज सामाजिक भेदभावाच्या नीतीचा त्याग करतो व जनतेचा विश्वास पुन: संपादित करतो. राजाने सामाजिक भेदभाव सोडून समस्त प्रजेशी भातृभाव ठेवला पाहिचे याचा बोध या कथेतून मिळतो.
या कथेत साधूवाणी (वैश्य समाजातला) हि एक पात्र आहे. हा व्यक्ती दिलेला शब्द न पाळणारा आणि सदैव खोटे बोलणारा आहे. हिंदीत एक म्हण आहे 'काठ कि हांडी बार बार नही चढती'. साधुवाणीला खोटे बोलण्यचे फळ भोगावे लागतात. कैद हि भोगावी लागते आणि व्यापारात नुकसान हि होते. शेवटी साधुवाणीला सत्य मार्गावर चालण्याचे महत्व कळते. वैश्याला (व्यापारीला) हि सत्य मार्गावर चालायला पाहिजे हा बोध या कथेतून मिळतो.
सारांश सत्यनारायणाच्या कथेत समाजातील सर्व वर्णांचे पात्र -ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, दलित आणि वनवासी आहेत. सामान्य माणसाला कळावे म्हणून कथेत अनेक चमत्कार हि आहेत. पण या चमत्कारांच्या मागचे कारण समजून सत्यनारायण कथेकडे बघितले तर कळेल हि कथा सर्वांनी सत्य धर्माचे आचरण करावे आणि जातिगत भेदभावाचा मार्ग सोडून बंधुभावाने राहण्याचा संदेश देते. त्या गृहस्थाना सत्यनारायण कथे कडे पाहण्याची वेगळी दृष्टी मिळाली. बिना वाचता, समजता पुरातन कथांचा विरोध करणे हि एक प्रकारचे अज्ञान आहे.
प्रतिक्रिया
29 Apr 2016 - 8:36 pm | DEADPOOL
मस्त लिहिले आहे!
29 Apr 2016 - 8:40 pm | विजय पुरोहित
सहमत...
29 Apr 2016 - 8:41 pm | तर्राट जोकर
काका मिशनवर आहेत जणू...? चलुद्या.
29 Apr 2016 - 8:48 pm | DEADPOOL
हो ना तजो!
मला वाटतं काही लोक जिहाद करायलाही निघालेत!
30 Apr 2016 - 6:40 pm | मितभाषी
=))
तजो किमान शब्दात कमाल अर्थ.
29 Apr 2016 - 8:48 pm | विजय पुरोहित
काका अप्रतिम लेख लिहिला आहेत. सत्यनारायण कथेकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टीकोन दिला आहे तुम्ही.
धन्यवाद.
29 Apr 2016 - 8:49 pm | mugdhagode
मोदीसर आता बॉलीवुडच्या तीन खानांना घेऊन दोन वर्षाचा सत्तानारायण घालणार आहेत.
29 Apr 2016 - 8:56 pm | विजय पुरोहित
मुग्धे नक्की काय म्हणायचंय तुला? जरा सपष्ट सांग की!
29 Apr 2016 - 9:03 pm | विजय पुरोहित
ओह साॅरी! मुग्धाताई म्हणतो! तुम्हाला मुग्धे फक्त प्रचू सर म्हणू शकतात. साॅरी हां!!!
29 Apr 2016 - 9:00 pm | अनुप ढेरे
सत्यनारायण हजारोंवर्षांपासून चालत आलाय?
29 Apr 2016 - 9:15 pm | स्पा
गावडे आणि प्रगो ककांच्या प्रतिक्षेत
29 Apr 2016 - 9:23 pm | सतिश गावडे
सत्यनारायण कथेईतकाच भंपक लेख. सत्यनारायण व्रताचे मुळ शोधण्याचा एक प्रयत्न इथे केला गेला आहे.
माझा व्यक्तीश: लोकांच्या सत्यनारायण पूजेला विरोध नाही. मात्र त्यांनी पुजेचा मंडप भर रस्त्यात घालून वाहतूकीचा खोळंबा करू नये आणि ध्वनिवर्धक लाऊ नये एव्हढीच माफक अपेक्षा आहे.
29 Apr 2016 - 9:29 pm | तर्राट जोकर
तुम्ही आसुरी शक्ती व जिहादी आहात गावडेसर...
29 Apr 2016 - 9:40 pm | सतिश गावडे
आजच दुपारी माझ्या मित्रवर्यांनी मला "माझे विचार दुराग्रही आहेत" अशी खरड केली आहे.
ज्याअर्थी माझ्यावर अशी टिका होत आहे त्याअर्थी मला अजूनही स्व गवसलेला नाही. मला पुर्णत्वाचा उलगडा झालेला नाही. मला वाटते मी पाश्चिमात्य लेखकांनी लिहीलेली अजून दोन चार पुस्तके वाचायला हवीत.
29 Apr 2016 - 9:59 pm | तर्राट जोकर
मला कसलाच उलगडा झाला नाही तुमच्या प्रतिसादावरुन.
29 Apr 2016 - 10:03 pm | सतिश गावडे
फार लोड घेऊ नका. सोडून द्या =))
29 Apr 2016 - 10:08 pm | DEADPOOL
तुम्ही तजोना न समजणारा प्रतिसाद देऊन त्यांचा अपमान करत आहात!
;)
29 Apr 2016 - 10:27 pm | तर्राट जोकर
तुम्हाला आमच्या दोघांमधे पचकायची गरज?
30 Apr 2016 - 11:48 am | विवेकपटाईत
गावडेजी तुमच्याच भाषेत लोकसत्तेतील एक भंपक लेख एवढेच म्हन्टेल.
सत्यमेव जयते पासून अनेक सुभाषिते वेद आणि उपनिषदात आहे. सत्य धर्मा बाबत अनेक कहाण्या वेद उपनिषद आणि पुराणात आहेत. आपल्याला माहिती असतीलच. या शिवाय आपल्या प्रत्येक धार्मिक कार्यात 'ऋतं वदिष्यामि, सत्यम वदिष्यामि' आपण म्हणतोच. सत्यम वद धर्मं चर. केवळ सत्य बोलण्यानेच धर्माचे पालन होते. इस्लाम मध्ये सत्य आचरण म्हणजे धर्म नाही. बहुतेक काही मुस्लीम पिराना हिंदू धर्माचा सत्य आचरण म्हणजे धर्म हा सिद्धांत आवडला असावा आणि त्यांनी त्यांचे पालन केले असावे. एवढाच अर्थ लेखातून निघतो. या हून अधिक अर्थ काढणे म्हणजे मूर्खपणाच.
30 Apr 2016 - 3:31 pm | mugdhagode
मुसलमान खोटं बोलतात !
हिंदुंच्यात खरे बोलणे म्हणजे धर्म. खोटे बोलू नये !
........
गृहपाठ :
मुसलमान कसाई - हिंदू साधू व पळणारी गाय ही कथा वाचा.
30 Apr 2016 - 7:13 pm | माहितगार
विवेकजी, वाक्य ठळक करून नेमके काय साध्य करावयाचे आहे ? काय सत्य हे माझे / आमचे विश्वास या पलिकडे असूच शकत नाही का ? पारंपारीक सत्यनारायण कथेचा आधार घेऊन सत्य न्याय इत्यादी तत्वे विस्कटून सांगू शकाल का ?
29 Apr 2016 - 10:34 pm | वैभव जाधव
तीर्थ प्रसादाची सोय धागा वाचनमात्र केल्यानंतर इथेच केली आहे.
पंचामृत आणि केळ घातलेला साजूक तुपातला शिरा हेच अनुक्रमे तीर्थ आणि प्रसाद आहेत.
इच्छुकांनी लाभ घ्यावा ही विनंती.
प्रत्येकी एक मूद शिरा मिळेल.
प्रसाद खाऊन हात कनातीच्या पडद्याला पुसू नयेत.
21 ची पावती फाडल्यास मोतीचुराचा दीड लाडू मिळेल. अधिक हवे असल्यास दीड च्या पटीत हिशोबाप्रमाणे रोख रक्कम देऊन घेऊन जाणे.
पैसे सुटे देणे.
सत्यनारायणाचा प्रसाद प्यारे1 विथ प्यारी 2 यांचे सौजन्याने आहे. अजय आपलं जय सत्यनारायण भगवान की!
30 Apr 2016 - 11:37 am | सतीश कुडतरकर
30 Apr 2016 - 12:45 pm | माहितगार
हा बांग्लादेशच्या अधिकृत एनसायक्लोपिडीयाचा संदर्भ पहाता किमान इस्वीसनाच्या १६व्या शतकापासून या कथापूजेचे अस्तीत्व दिसते
१) कथेत आंतर-धर्मीय अॅडाप्टॅबीलीटी आहे.
२) पादुका पुजा, पुस्तक पुजा जशा अमुर्त मुर्तीपुजन आहे तसे सत्यनारायण/सत्यपीर/सत्यअंबा कथेतही मुर्ती शिवाय केवळ कलश पुजन म्हणजे अमुर्त-मुर्तीपुजन शक्य आहे.
३) पुजेत रिच्युअल्स आणि अंधश्रद्धा आहेत पण उपरोक्त धागा लेखक म्हणतो तसे धर्म आणि जातींची बंधने ओलांडून नेण्याची क्षमता या कथेत आहे असे वाटते.
४) अधिक पुरोगामी अडॅप्टेशन्स तयार करण्याची क्षमता या कथेच्या फॉर्मॅट मध्ये असावी अर्थात ते तसे प्रयत्न करणार्यांवर अवलंबून असावे असे माझे व्यक्तीगत मत.
30 Apr 2016 - 2:09 pm | सतीश कुडतरकर
सामाजिक समरसतेची कथा
yavarunach lekhkachi disha kalate. Jya pujela unepare 100-150 varshancha sandarbh aahe tyavishayi lekhak, हजारों वर्षांपासून as lihun saral saral sandarbhhin lihit aahe.
पुजेत रिच्युअल्स आणि अंधश्रद्धा आहेत पण उपरोक्त धागा लेखक म्हणतो तसे धर्म आणि जातींची बंधने ओलांडून नेण्याची क्षमता या कथेत आहे असे वाटते.>>>>
yapeksha ya kathetil ECONOMICS lihile asate tar Economic Times/CNBC ne nakkich dakhal ghetli asati.
30 Apr 2016 - 2:13 pm | वैभव जाधव
त्यामुळे तर काही भटजी मनास पटत रुचत नसून देखील अशा पूजा नाईलाजाने सांगत असतात.
होमिओपॅथी न पटणारा एखादा होमिओपॅथी वाला निव्वळ लोकांना हवं म्हणून साबुदाणा गोळ्या देतो किंवा हातभट्टी वाला निव्वळ लोक मागतात म्हणून हातभट्टी बनवून विकतो तसंच काहीसं!
30 Apr 2016 - 3:07 pm | अत्रुप्त आत्मा
@ त्यामुळे तर काही भटजी मनास पटत रुचत नसून देखील अशा पूजा नाईलाजाने सांगत असतात.››› आम्ही अश्या अश्या भटजींनहूनही वेगऴा मार्ग निर्माण केला, आणी स्विकारला. मूऴ कथेतील हीण काढून त्यात सत्व मिसळले.
ऐका सत्य नारायणाssssची कथा!
30 Apr 2016 - 3:08 pm | सतीश कुडतरकर
girhaik aslyavar maal vikla janarach.
Majha akshep tya sandarbh hin 'hajaro varsh' ya shabdala aahe.
30 Apr 2016 - 4:25 pm | सतिश गावडे
>> girhaik aslyavar maal vikla janarach.
नुसता विकलाच जात नाही तर आम्ही "सुधारीत" उत्पादन विकतो असे म्हणून स्वत:ची "प्रगत दुकानदार" म्हणून पाठ थोपटून घेणारे दुकानदारही असतात.
30 Apr 2016 - 4:16 pm | माहितगार
तुमचे तिकडे व्यक्ती लक्ष्य असल्यास चालू ठेवावे -काही भटजी अर्थार्जन करताना पुरोगामी दृष्टीकोण बाळगण्याचा प्रयत्न करत असतील तर मी तरी टवाळीत सामील होणार नाही; माझ्या स्मरणात ही कथा जेवढी आहे त्यानुसार ही कथा-रिच्युअल कुणालाही करता येणे अभिप्रेत असावे. बाकी व्यापार, इकॉनॉमीक्स आणि व्यवस्थापन या सोबत ह्या कथेचे अडॅप्टेशन करणे मलाही आवडू शकेल पण तत्पुर्वी ती मला युनिकोडात कॉपीराईट फ्री स्वरुपात हवी आहे.
30 Apr 2016 - 4:47 pm | सतिश गावडे
अगदी त्रयस्थाच्या नजरेने या पुजेकडे पाहायचे झाल्यास या पुजेची पाळेमुळे जनमानसात घट्ट रुजली आहेत हे लक्षात येईल. आजच्या घडीला चार शेजारी पाजारी, नातेवाईक, गावकरी घरी बोलावण्याचा आणि सहभोजनाचा उत्तम मार्ग आहे.
कोकणात तर एक माणूस गेल्याचा प्रसंग वगळता लोक आनंदाच्या कोणत्याही प्रसंगी सत्यनारायण घालतात.
एकंदरीत पुजेचा विधी पाहता पुरोहीतानसाठीही ही सोयीची पूजा असावी असे वाटते. कथेत आणि एकंदरीत व्रतात फारसे तथ्य नसले तरीही ही पूजा व्यक्तिगत पातळीवर करण्यास आक्षेप असन्याचे कारण नाही. तेव्हधाच पुरोहितांना रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना.
वाहतुकीला अडचण होणार नाही, ध्वनिवर्धक लागणार नाही अशा पुजेला मी ही जाईन आणि प्रसाद घेईन.
धर्मसुधारक पुरोहितांनी "धार्मिक प्रसंगी ध्वनिवर्धक लावून ध्वनी प्रदुषण करु नका" असे समाज प्रबोधन करायला हरकत नाही.
30 Apr 2016 - 4:57 pm | माहितगार
"वाहतुकीला अडचण होणार नाही, ध्वनिवर्धक लागणार नाही...."
+१ डोक्यात जाते, वाहतूक अडचण आणि कानदुखे ध्वनी मलाही नकोसे होतात, अलिकडे माझ्या गाडीजवळून मला आवडणार्या कै. व्यक्तीमत्वाची रस्त्यावरुन मिरवणूक जाताना वेळेचा खोळंबा झाला तर ठिक पण बडवलेले ढोल दुरुन साजरे वाटले तरी जेव्हा कानाशी वाजले तेव्हा कान हाताने चोळून नीट करावा लागला. होणारा असला त्रास पब्लिकला सांगता येत नाही कारण त्यांना ते समजत नै आणि सहनही होत नाही ;)
धर्मसुधारक पुरोहितांनी "धार्मिक प्रसंगी ध्वनिवर्धक लावून ध्वनी प्रदुषण करु नका" असे समाज प्रबोधन करायला हरकत नाही.
+१०००० करावेच जो ध्वनी आपल्याला स्वतःला अथवा इतरांना प्रसन्नता देत नाही तो धार्मीक म्हणवून न घेता त्याज्य ठरवावा.
30 Apr 2016 - 4:59 pm | प्रचेतस
आणि भक्तांसाठी पण.
वार,मुहूर्त, सोवळं, ओवळं, जात पात ह्याची भानगड नाही, पक्वांनाची जरुर नै नुसत्या शिऱ्यावर काम भागतं. कमी खर्चात, कमी वेळेत काम भागतं.
भक्ताला देवकार्य केल्याचं समाधान, पुरोहिताला चार पयशे कनवटीला बांधून अजून चार घरी पूजा सांगितल्याचे समाधान.
30 Apr 2016 - 5:12 pm | नंदन
'तुका म्हणे त्यातल्या त्यात' आठवले. अर्थात, हाही लाखो वर्षांपासून प्रचलित असलेला अभंग असून, त्यातून आर्किटेक्चरपासून जेनेटिक इंजिनिअरिंगचे धडे (वाया गेलेली इ.) पुढची पिढी घेऊ शकते; अशा खयाली जिल्बीच्या प्रतीक्षेत आहे.
30 Apr 2016 - 6:54 pm | माहितगार
:)
30 Apr 2016 - 12:07 pm | माहितगार
शक्य तेवढ्या जुन्या आवृत्तीवरुन सत्यनारायण कथा https://mr.wikisource.org/wiki/ या विकिप्रकल्पास कॉपीराईट मुक्त स्वरुपात हवी आहे.
धन्यवाद.