गणपती विसर्जन सोहळा - पुणे

मिंटी's picture
मिंटी in कलादालन
18 Sep 2008 - 4:14 pm

नमस्कार मंडळी.....

आत्ताच काही दिवसांपुर्वी गणपती विसर्जन सोहळा पार पडला.
आपण सर्वांनी आपल्या लाडक्या गणरायाला साश्रु नयनांनी भावपुर्ण निरोप दिला.

पुण्यातला गणपती विसर्जन सोहळा हा सर्वश्रुत आहे तो त्याच्या भव्यतेमुळे.

याच सोहळ्याची काही क्षणचित्रे मी आज इथे देत आहे.
तुम्हाला ती आनंद देतील अशी आशा करते.

मानाचा पहिला गणपती - कसबा गणपती

मानाचा तिसरा गणपती - गुरुजी तालिम

मानाचा चौथा गणपती - तुळशीबाग

मानाचा पाचवा गणपती - केसरी वाडा

मानाच्या गणपतींसमोर काढलेली रांगोळी

मानाच्या गणपतींसमोर पारंपारिक वाद्य वाजवणारे कलाकार -

पुण्याचा प्रसिद्ध गणपती - श्रीमंत दगडु शेठ गणपती

मंडईचा गणपती -

पुण्यातील मिरवणूकीत सामिल झालेले काही गणपती -

मंडईचा गणपती विसर्जन मिरवणुकीत येताना -


दगडु शेठचा गणपती विसर्जन मिरवणुकीत सामिल होताना-

छायाचित्रण

प्रतिक्रिया

जैनाचं कार्ट's picture

18 Sep 2008 - 4:21 pm | जैनाचं कार्ट (not verified)

वा ! सर्व फोटो मस्त आले आहेत ! धन्यवाद तुमच्यामुळे येथे बसल्या बसल्या पुण्यातील महत्वाच्या गणेश मुर्तींचं देखील दर्शन झालं !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Sep 2008 - 6:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वा ! सर्व फोटो मस्त आले आहेत ! धन्यवाद तुमच्यामुळे येथे बसल्या बसल्या पुण्यातील महत्वाच्या गणेश मुर्तींचं देखील दर्शन झालं !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऋचा's picture

18 Sep 2008 - 4:24 pm | ऋचा

मिंटे मस्त आलेत ग फोटु!!
बसल्या बसल्या दर्शन झाले :)

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

टारझन's picture

18 Sep 2008 - 4:26 pm | टारझन

धन्यवाद मिंटे ..... दगडुशेट भाऊ फार फार फार सुरेख दिसताहेत :)
क्लास ....फोटू

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

स्वाती दिनेश's picture

18 Sep 2008 - 4:29 pm | स्वाती दिनेश

मिंटी,
मानाचे ५, मंडई आणि दगडूशेट ह्या गणपतींचे दर्शन घडवलेस..फार छान वाटले.
फोटो सुंदरच आहेत,
स्वाती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Sep 2008 - 4:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

झकास फोटो!

(अवांतरः मला गर्दीत जाण्याची गरजच नाही आता!)

मदनबाण's picture

18 Sep 2008 - 4:37 pm | मदनबाण

सर्वच फोटो मस्त आहेत...

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

प्रियाली's picture

18 Sep 2008 - 4:38 pm | प्रियाली

मन प्रसन्न झाले फोटो पाहून. इथे चिकटवल्याबद्दल धन्यवाद.

आनंदयात्री's picture

18 Sep 2008 - 4:43 pm | आनंदयात्री

फोटोग्राफर मिंटे .. सगळे फोटो छान आलेत !
:)

बेधुन्द मनाची लहर's picture

18 Sep 2008 - 4:45 pm | बेधुन्द मनाची लहर

छान आहेत सगळेच फोटो.....

निशा's picture

18 Sep 2008 - 5:11 pm | निशा

गणपतीचे सर्वच फोटो छान आहेत.
घर बसल्या दर्शन झाले.
धन्यवाद

मनिष's picture

18 Sep 2008 - 5:12 pm | मनिष

फक्त कसबा आणि तांबडी जोगेश्वरी म्हणून सेम गणपतीचा फोटो दिलास बघ! :)

प्रमोद देव's picture

18 Sep 2008 - 5:50 pm | प्रमोद देव

:)

अनामिक's picture

18 Sep 2008 - 5:59 pm | अनामिक

+१

मनस्वी's picture

18 Sep 2008 - 5:31 pm | मनस्वी

मस्तच!

>मंडईचा गणपती विसर्जन मिरवणुकीत येताना -

च्या वरचा "जिलब्या मारुती मंडळ" चा गणपती आहे.

मनस्वी
*उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही .*
आलं लसूण मिक्सरवर/पाटा-वरवंट्यावर वाटून घ्यावे. (काहीच नसल्यास बारीक तुकडे करून पोळपाटावर ठेवून लाटण्याने च्चेप्पून घ्यावेत).

शितल's picture

18 Sep 2008 - 6:08 pm | शितल

सर्वच फोटो सुरेख.
धन्यवाद मिंटी.

इनोबा म्हणे's picture

18 Sep 2008 - 8:05 pm | इनोबा म्हणे

मस्तच गं!
झकास फोटो आलेत.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

सर्वसाक्षी's picture

18 Sep 2008 - 8:20 pm | सर्वसाक्षी

मन प्रसन्न करणारी चित्रे! धन्यवाद!

घाटावरचे भट's picture

18 Sep 2008 - 8:28 pm | घाटावरचे भट

सर्व फोटो उत्तम आहेत....घरबसल्या सगळे मानाचे गणपती पाहायला मिळाले, हे आमचं भाग्यच!!!
धन्यवाद, मिंटी!!!

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

विसोबा खेचर's picture

18 Sep 2008 - 10:39 pm | विसोबा खेचर

सर्व चित्रे अतिशय सुरेख...!

लालबागच्या राजाचा विजय असो...!

आपला,
(गणेशभक्त) तात्या.

प्राजु's picture

18 Sep 2008 - 10:46 pm | प्राजु

इथे परदेशात गणपती विसर्जन मिरवणूकीचे दर्शन घडवलेत...
धन्यवाद..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

रेवती's picture

19 Sep 2008 - 5:01 am | रेवती

चित्रे पाहून आनंद झाला. धन्यवाद मिंटी!

रेवती

एकलव्य's picture

19 Sep 2008 - 5:27 am | एकलव्य

मोरया~

सुंदर चित्रे! धन्यवाद!!

नंदन's picture

19 Sep 2008 - 11:50 am | नंदन

असेच म्हणतो. सुरेख फोटोज, धन्यवाद!

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मृगनयनी's picture

19 Sep 2008 - 10:12 am | मृगनयनी

मिंटे....... मिंटे........ कुठे मिळवलंस हे पुण्य!!!!!!!

खूप सुंदर आहेत गणपती, तू आनि तुझा कॅमेरा!!!!!

मिंटे.... तू पुण्याची शान आहेस!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
एखादं परदेशातलं छाया-चित्रणाचं सम्मेलन असेल ना...... तेव्हा तिथे पाठव हे फोटो...... तिथले भारतीय..... खूप खुष होतील्.....स्पेषली तिथले "पुणेकर"!!!!!!!!

भरुन पावले.......बाप्पाच्या दर्शनाने............:)

:) गणपती बाप्पा मोरया! :)
:) पुढच्या वर्षी लवकर या :)
:) आणि मिंटीच्या कॅमेर्‍यात सामावुन आम्हाला वर्षभर दर्शन द्या! :)

जयमोल's picture

19 Sep 2008 - 12:43 pm | जयमोल

मस्तच ! !
पण मानाचा दुसरा गणपती कुठाय ?

फोटो चढवायचा राहिला की काय ?

प्रकाश घाटपांडे's picture

19 Sep 2008 - 7:42 pm | प्रकाश घाटपांडे

Ganapati Bandobast 2008 003
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांचे बिनतारी यंत्रणेचे जाळे तयार आहे. दिल्लीच्या बाँब स्फोटाच्या पार्श्वभुमीवर पोलिसांवर जरा अधिक ताण आहेच. टिळक रोड ,स.प महाविद्यालय बिनतारी स्थानक तयार करुन वॉकीटॉकीवर सहा पो.उपनिरिक्षक बिनतारी संदेश (अभियांत्रिकी) श्री विजय ललवाणी नियंत्रण कक्षाच्या संपर्कात. शहराची संपुर्ण मिरवणूक पार पाडल्या नंतर मगच स्थानक बंद करुन कर्तव्यावरुन घरी जाणार. मग कितीही काळ लागो. अशा अतिरिक्त व तात्पुरत्या बिनतारी स्थानकांची उभारणी शहरात मिरवणुकिंच्या मार्गावर ठिकठिकाणी होते. तसेव वाहनांनाही बिनतारि संच बसवले जातात. त्याचे एक स्वतंत्र नेटवर्क असते. प्रत्येकाला एक कॉलसाईन दिली असते. त्याला कॉल दिला कि त्याने ताबडतोब उत्तर दिलेच पाहिजे.
[स्वे. नि. स.पो.उप निरिक्षक बिनतारी संदेश (अभियांत्रिकी)]
प्रकाश घाटपांडे

लिखाळ's picture

26 Sep 2008 - 4:19 pm | लिखाळ

मिंटी,
सर्व फोटो मस्त आहेत.
कसबागणपतीला पाहून आनंद झाला. मी आणि काही मित्र कसबा गणपती आला की त्या गर्दीत शिरुन त्याचे जवळून दर्शन घेत असु. त्या गर्दीत शिरुन दर्शन घेण्याची मजा वाटे. तुला इतके चांगले फोटो इअत्क्या धक्काबुक्कीत मिळाले याचे कौतूक वाटले. त्या पालेखी भोवती इतकी माणसे असतात आणि पालखी वेगाने पुढे नेत असतात की कॅमेर्‍यात योग्य क्षण टिपणे अवघडच आहे.
फोटो पाहुन मजा आली.
-- लिखाळ.

अनिल हटेला's picture

26 Sep 2008 - 4:28 pm | अनिल हटेला

गणपती गेले गावाला !!

चैन पडेना आम्हाला !!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

झकासराव's picture

26 Sep 2008 - 5:06 pm | झकासराव

वा!
सगळेच फोटो मस्त आहेत. आणि माझ्यासारख्या आळश्याला खुर्चीत बसुन सगळे मानाचे गणपति पहायला मिळाले. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao