चाहुली...(चित्रपट गीत लिहिण्याचा छोटासा प्रयत्न)

सुमित_सौन्देकर's picture
सुमित_सौन्देकर in जे न देखे रवी...
13 Apr 2016 - 4:07 pm

काळजी वाटी मजला
तुज्याच प्रीतीने-2
चाहुली दाटी भोवती
तुझ्याच प्रीतीने-2

तुज्या वीन राहु कसा
गीत हे गाऊ कसा
स्वप्न हे पाहू कसा
तुज्याच प्रीतीचे
काळजी वाटी मजला
तुज्याच प्रीतीने-2
चाहुली दाटी भोवती
तुझ्याच प्रीतीने-2

भास सारे हे छळती
भाव मजला न कळती
साद का ऐकू येते
सांग ना रे......
का कुठे मी हरवतो
मीच मजला मिरवतो
चाहुली का पुन्हा या
सांग ना रे
परतुनी ये तू ग पुन्हा...
सांग वेडे माझा गुन्हा
ये पुन्हा...तू प्रिये...वाट बघते ही मीठी...

आज बेधुंद वारा
साथीला गार गारा
भान नाही मनाला
साजणी ग...
स्पर्श पुन्हा करुदे
हात हाती धरुदे
आज मिटूदे अबोला
सजणी ग....
जिव माझा आतुरला
ध्यान नाही माझे मला...
ऐकुदे....मज पुन्हा...आज प्रेमाची कथा...

प्रेमकाव्य

प्रतिक्रिया

तर्राट जोकर's picture

13 Apr 2016 - 4:11 pm | तर्राट जोकर

(चित्रपट गीत लिहिण्याचा छोटासा प्रयत्न)
कोणता चित्रपट? सिच्युएशन काय आहे? त्याच्या आधी व नंतर काय होते? गीताच्या चित्रिकरणात काय होते?

तुषार काळभोर's picture

13 Apr 2016 - 4:34 pm | तुषार काळभोर

आज बेधुंद वारा
साथीला गार गारा
भान नाही मनाला
साजणी ग...
स्पर्श पुन्हा करुदे
हात हाती धरुदे
आज मिटूदे अबोला

प्रचेतस's picture

13 Apr 2016 - 4:14 pm | प्रचेतस

क्या बात है...!
दाटी वाटी, छळती कळती, पुन्हा गुन्हा, वारा गारा, करुदे धरुदे...
एकापेक्षा एक सरस.

येउं द्या अजून.

तर्राट जोकर's picture

13 Apr 2016 - 4:17 pm | तर्राट जोकर

सुक्ष्म रसग्रहण, व्वा!. आणखी एक, हे चित्रपट गीत कितीतरी मजल्यांचे आहे हे लक्षात आले का वल्लीसाहेब?

प्रचेतस's picture

13 Apr 2016 - 4:20 pm | प्रचेतस

प्रेमात पुढे पुढे जाताना करावी लागणारी मजल दरमजल आहे ही.

नाखु's picture

13 Apr 2016 - 4:32 pm | नाखु

"लिफ्ट" न मिळाल्याने करावी लागणारी मजल दरमजल आहे काय? कारण आजकाल प्रेमातही "लिफ्ट " (कधीमधी गिफ्ट) मिळू शकते असे पोपशास्त्रींचे म्हणणे आहे.

पोपवचन नितवाचक नाखु

होबासराव's picture

13 Apr 2016 - 4:32 pm | होबासराव

आज बेधुंद वारा
साथीला गार गारा

ओ भौ भाइर गारा पडतायत....टकुर फुटल ना र बाबा.

तर्राट जोकर's picture

13 Apr 2016 - 4:41 pm | तर्राट जोकर

स्वारी, वारा ला यमक लागलं नाही म्हणुन गारा टाकल्या.

हे बघा कसं वाटतंय?

आज बेधुंद वारा
कढईत गरम झारा

किंवा

आज बेधुंद वारा
निवृत्त झाला लारा

किंवा

आज बेधुंद वारा
आकाशी एक तारा ( हायला, हे जमलं की चूकून ;-))

विजय पुरोहित's picture

13 Apr 2016 - 5:17 pm | विजय पुरोहित

_/\_ तजोसाहेब...

सुधीरन's picture

13 Apr 2016 - 5:29 pm | सुधीरन

१. आज बेधुंद वारा
साथीस पाऊसधारा

२. आज बेधुंद वारा
मज तूच किनारा

३. आज बेधुंद वारा
प्रितरंग हा न्यारा

४. आज बेधुंद वारा
बोल तुझा मज प्यारा

५. आज बेधुंद वारा
खुला आसमंत सारा

६. आज बेधुंद वारा
सहवास तुझा प्यारा

७. आज बेधुंद वारा
विसरु ज़माना सारा

इ.

तर्राट जोकर's picture

13 Apr 2016 - 5:44 pm | तर्राट जोकर

होबासराव, बघा. बरसल्या की नाही गारा? =))

सुमित_सौन्देकर's picture

13 Apr 2016 - 6:05 pm | सुमित_सौन्देकर

आहे विचित्र थोड़ी तरी समर्पक वाटते म्हणून लिहिली...सुचनांचा जरुर विचार करेंन

सुधीरन's picture

13 Apr 2016 - 4:38 pm | सुधीरन

छान जमले आहे!

नुस्त्या उचापती's picture

13 Apr 2016 - 5:45 pm | नुस्त्या उचापती

आज बेधुंद वारा
वाढला उन्हाचा पारा
येऊ दे पावसाच्या धारा
.
.
.
[ पुढे काय बरे ? हं ' आठवले ' ]
चला आता घरी जाऊ .

सुधीरन's picture

13 Apr 2016 - 5:47 pm | सुधीरन

आठवले म्हणून पाठवले!

होबासराव's picture

13 Apr 2016 - 6:30 pm | होबासराव

आज बेधुंद वारा
वाढला उन्हाचा पारा
येऊ दे पावसाच्या धारा
मग बसु घेउन व्हिस्कि आणि खारा

विजय पुरोहित's picture

13 Apr 2016 - 6:33 pm | विजय पुरोहित

मस्तच होबासराव!