देवाचे स्थान कुठे ।।

माहीराज's picture
माहीराज in जे न देखे रवी...
2 Apr 2016 - 10:22 pm

मान कुठे, सन्मान कुठे, सद्भावाचे भान कुठे,
ज्याने निर्मिली सारी सृष्टी त्या देवाचे स्थान कुठे..

पुजा आमची नित्याची, नैवेद्य ही नित्याचेच
श्रद्धेपोटी उगाच आमुचे वादविवाद ही नित्याचेच
वाटून घेतले देवही आम्ही माणुसकीचे गान कुठे
ज्याने निर्मिली सारी सृष्टी त्या देवाचे स्थान कुठे..

जाती धर्माची वर्गवारी करून घेतली आम्ही
जागा प्रत्येक मंदिराची वाटून घेतली आम्ही
एक नियती सार्‍यांसाठी आम्हा त्याचे भान कुठे
ज्याने निर्मिली सारी सृष्टी त्या देवाचे स्थान कुठे..

अहिराणीकविता

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

2 Apr 2016 - 10:37 pm | चांदणे संदीप

खत्रा! आवडलीच!

Sandy

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

2 Apr 2016 - 10:51 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

तो एकच आहे न् चराचरामध्ये आहे.
निर्गुण,निराकार
बाकि कविता छान.

सतिश गावडे's picture

3 Apr 2016 - 1:00 am | सतिश गावडे

जिकडे तिकडे शोधीत का रे फिरसी वेडयापरी, वसे तो देव तुझ्या अंतरी

गावडे काका देव नाहीच तर तो अंतरी तरी कसा असेल?

सतिश गावडे's picture

3 Apr 2016 - 9:11 pm | सतिश गावडे

तसं आपण मानायचं असतं. नाहीतरी देव ही मानण्याचीच गोष्ट आहे की नाही.

रच्याकने, मी वर दिलेली ओळ ही प्रल्हाद शिंदेंनी गायलेल्या गाण्यातील आहे. हेच गाणे अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातही आहे. छान वाटते ऐकायला हे गाणे.

कविता पोचली. अहिराणीचा संबंध उलगडल्यास आवडेल.

चौकटराजा's picture

3 Apr 2016 - 5:41 pm | चौकटराजा

लाखो वर्षे अस्तिक लोकाना न सुटलेले हे हे कोडे आहे. नास्तिकाना ते पडलेलेच नाही.
एक नियती सार्‍यांसाठी आम्हा त्याचे भान कुठे
ज्याने निर्मिली सारी सृष्टी त्या देवाचे स्थान कुठे..

आमचा निष्कर्ष देव जर असलाच तर त्याचे स्थान नियति इतके मोठे खचितच नाही. देव हा अंडर सेक्रेटरी असून
नियति हा मन्त्रि आहे. सबब नास्तिकही नियति शरणतेचा अनुभव घेत असतातच.

माहितगार's picture

3 Apr 2016 - 5:43 pm | माहितगार

:) उत्तम निरीक्षण

सतिश गावडे's picture

3 Apr 2016 - 9:19 pm | सतिश गावडे

सबब नास्तिकही नियति शरणतेचा अनुभव घेत असतातच.

नियती हा शब्द नकारात्मक अर्थाने वापरला जातो. काही नकारात्मक घडले तर "नियतीपुढे कोणाचे चालत नाही" असे आपण सहजतेने म्हणतो.

मानवी जीवनाची असहायता किंवा हतबलता म्हणजे नियती असे म्हणता येईल. माणूस आस्तिक असो वा नास्तिक त्याला ही परिस्थितीची अपरिहार्यता चुकत नाही. काही वेळा परिस्थिती हाताबाहेर जात असताना जर देवाचा धावा केला तर देव धावून येतो मदतीला असे म्हणतात. अशा भाग्यवंतांचा मला हेवा वाटतो. मात्र देव धावून आला नाही तर देवाला दोष न देता नशिबाला दोष देणारे लोक जास्त पाहण्यात येतात.

विजय पुरोहित's picture

3 Apr 2016 - 9:21 pm | विजय पुरोहित

क्लासच सगाण्णा!!!

चौकटराजा's picture

3 Apr 2016 - 9:48 pm | चौकटराजा

नियति हा केवळ नकारात्मक वापरला जाणारा शब्द नाही. एकच उदाहरण देतो. जोशी अभ्यकर हत्याकांडात आरोप्पी पोलीस॑ स्टेशनला जाउन सारखे अमुक चा काही शोध लागला का अशी चौकशी करीत. असेच ते बाहेर पडत असताना एका तिर्हाइताने त्याना पाहिले व त्याना काही दिवसापूरवी पोलिस स्टशनच्या भागात पाहिल्याचे पोलिसाना सांगेतले. त्यावरून पोलिसानी धागा पकडून एका गहन प्रकरणाचा छाडा लावला. त्या अरोपीना चौकशीची बुद्धी व त्या तिर्हाहिताने त्याचे वेळी तिथे येणे व त्यातून जोशी अभ्यन्कर गोखले हेगडे कुटूंम्बियाना न्याय मिळणे ही नियतीने घडवलेली कटू नव्हे तर गोड योजना आहे.

माहीराज's picture

2 Feb 2017 - 1:22 pm | माहीराज

एक नियती सार्यांसाठी .....
. ...त्या देवाचे स्थान कुठे।।

या ओळींसाठी माझा एकच सरळ अर्थ होता , तो म्हणजे आपण जे भाषिक, प्रांतीय आणि धार्मिक गठ पाडून आपापसात भांडतो पण सार्यांचा जन्म आणि मृत्युची परिसीमा एकच आहे, सार्यांवर अंकुश ठेवणारी नियती ही एकच आहे .... आणि अध्यात्मिक दृष्टा पाहीलंतर प्रत्येकाच्या देवाने या पृथ्वीची रचना केलेली आहे ..... म्हणुन सर्वांना माझा हाच प्रश्न आहे कि नक्की त्या देवाचे स्थान कुठे आहे ?