रंग बदलताना (प्रकाशचित्र)

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in कलादालन
16 Sep 2008 - 10:00 pm

झाडावरून उतरून लाल मातीच्या जमिनीवर येताच मातीचा रंग अंगावर धारण करणारा सरडा. तोंड , मान, गळा, पुढचे पाय वगैरे लाल झालेले आहे. मागचे अंग भुरकट आहे; तो रंग बहुधा झाडावर असताना झाडाच्या खोडात मिसळुन जायला सोयिस्कर असावा.

अंगावरचे खवले चिलखताची आठवण करुन देतात तर पायाच्या नख्या अणकुचीदार शस्त्रासारख्या दिसतात. पळताना एकवार चोहोकडे पाहणार्‍या डोळ्यात 'सावधान' चे भाव आहेत.

कलाछायाचित्रण

प्रतिक्रिया

मनिष's picture

16 Sep 2008 - 10:02 pm | मनिष

सुरेख कॅप्चर!

यशोधरा's picture

16 Sep 2008 - 10:04 pm | यशोधरा

मस्त फोटो!

शितल's picture

16 Sep 2008 - 10:10 pm | शितल

नाईस क्लीक. :)

विसोबा खेचर's picture

16 Sep 2008 - 10:17 pm | विसोबा खेचर

केवळ चिकणा सरडा आहे! :)

साक्षिदेवा,

हे सरडे तुलाच रे बरे दिसतात! :)

असो, अप्रतीम फोटू....

आपण तिच्यायला पुन्हा या सरड्याच्या प्रेमात आहोत! :)

(सरडे, पाली हे प्राणी खूप आवडणारा) तात्या.

मुक्तसुनीत's picture

16 Sep 2008 - 10:19 pm | मुक्तसुनीत

खल्लास चित्र ! सुरेख !

भाग्यश्री's picture

16 Sep 2008 - 10:29 pm | भाग्यश्री

अप्रतिम!! हे असले प्राणी काय वाट पाहात थांबतात का हो तुमच्यासाठी? हा सरडा म्हणजे अगदी 'सर्वसाक्षींना फोटोसाठी पोझ दिल्याखेरीज रंग बदलणार नाही' अशा थाटात उभा आहे !! :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Sep 2008 - 10:38 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

भाग्यश्रीच्या प्रतिसादाशी सहमत.

किती वेळ वाट पहायला लागली हो या पोझसाठी?

(डायनोसॉरप्रेमी) अदिती

ऋचा's picture

17 Sep 2008 - 11:36 am | ऋचा

भाग्यश्री शी सहमत!!

हा सरडा फेविकॉलवर उभा होता का?
हलला कसा नाहीये??

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

बेसनलाडू's picture

18 Sep 2008 - 5:20 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

राघव's picture

18 Sep 2008 - 6:22 pm | राघव

असेच म्हणतो! मस्त आलाय फोटु :)
खारीच्या फोटुची वाट पाहतोय.

मुमुक्षु

ऋषिकेश's picture

21 Sep 2008 - 12:46 am | ऋषिकेश

अगदी ह्हेच म्हणतो..
केव्वळ अप्रतिम!!!!!

-(खारूताईच्या प्रतिक्षेत) ऋषिकेश

स्वाती दिनेश's picture

16 Sep 2008 - 10:42 pm | स्वाती दिनेश

सरडा आवडला,मस्त!
स्वाती

देवदत्त's picture

16 Sep 2008 - 10:48 pm | देवदत्त

मस्त एकदम :)

(हा सरडा सूर्यनमस्कार घालत आहे का? :? ;) )

विसोबा खेचर's picture

16 Sep 2008 - 10:54 pm | विसोबा खेचर

हा सरडा सूर्यनमस्कार घालत आहे का?

देवदत्ता, सह्ही रे! :)

रामदास's picture

16 Sep 2008 - 10:48 pm | रामदास

आधीचा सरडा तुमचाच होता ना?
पाळीव आहे का काय?

http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

चतुरंग's picture

16 Sep 2008 - 10:54 pm | चतुरंग

केवळ उच्च फोटू! फोकस कमालीचा सुंदर झालाय.

चतुरंग

झकासराव's picture

17 Sep 2008 - 11:32 am | झकासराव

मस्तच आहे सरडा :)

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

मिंटी's picture

17 Sep 2008 - 11:42 am | मिंटी

मस्त फोटो.........

केवळ अप्रतिम फोटो.... :)

गणा मास्तर's picture

17 Sep 2008 - 1:52 pm | गणा मास्तर

चांगला फोकस केला आहे
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

सुनील's picture

17 Sep 2008 - 2:21 pm | सुनील

फोटो सुंदरच आहे!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रभाकर पेठकर's picture

17 Sep 2008 - 6:00 pm | प्रभाकर पेठकर

मिसळपावात दूसरा सरडा.

देवदत्त's picture

20 Sep 2008 - 6:51 pm | देवदत्त

दुसरा? :?

देवदत्त's picture

20 Sep 2008 - 6:58 pm | देवदत्त

उत्तर अपेक्षित नाही. जाऊ द्या :).

वारकरि रशियात's picture

17 Sep 2008 - 6:15 pm | वारकरि रशियात

मुक्तसंगः अनहंवादि
सरिस्रुप !!!

सर्वसाक्षी's picture

17 Sep 2008 - 10:38 pm | सर्वसाक्षी

मिसळपावकरांनो,

अभिप्रायांबद्दल आभारी आहे.

सरडा अचानक समोर आला. लाल मातीचा रस्ता ओलांडताना जागीच थबकला. मी टिपला.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Sep 2008 - 9:46 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> सरडा अचानक समोर आला. लाल मातीचा रस्ता ओलांडताना जागीच थबकला. मी टिपला.

मला किती वेळा प्रयत्न करूनही खारींचे फोटो नाही मिळाले चांगले आणि तुम्हाला रस्ता ओलांडतानाच .... तुम्ही रस्त्यातून जातानाही कॅमेरा गळ्यात अडकवून चालता का तुमचं आणि सरड्यांचं काही पेसल कनेक्सन आहे?

सर्वसाक्षी's picture

18 Sep 2008 - 4:15 pm | सर्वसाक्षी

आपल्याकडे खारपण आहे. टाकु पुन्हा कधीतरी.

हे चित्र सुट्टीत भटकायला गेलो असता घेतलेले आहे. सकाळी घरच्यांची आवराआवरी सुरू होती, मी जरा भटकायला म्हणुन बाहेर पडलो. विश्रामगृहाचे आवार मोठे होते, ते पार करुन बाहेर आलो होतो. सकाळी पक्षी, फुलपाखरे वगैरे टिपता येण्याची शक्यता असल्याने गळ्यात कॅमेरा होताच. बाकी घरातसुद्धा माझा कॅमेरा कायम सज्ज असतो हो!:)

धनंजय's picture

17 Sep 2008 - 10:53 pm | धनंजय

फोकस, पोझ कमाल आहे.

नंदन's picture

21 Sep 2008 - 1:43 pm | नंदन

सहमत आहे. अप्रतिम फोटो.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मदनबाण's picture

18 Sep 2008 - 9:50 am | मदनबाण

सरडे महाशयांनी सॉलिड पोझ दिली आहे व तुम्ही ती सुंदरपणे टिपली आहे..

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

विसुनाना's picture

18 Sep 2008 - 5:04 pm | विसुनाना

इतके घाईचे छायाचित्र वेगाने घेण्यात प्रकाशचित्राचे यश आहे. फोटोचा फोकस परफेक्ट. रंगही लाजवाब!

आपला आभि's picture

18 Sep 2008 - 5:09 pm | आपला आभि

खरच फोटो घेनार्‍याला मानलं बुवा............तुमची समयसूचकता लाजवाब....

मिंटी's picture

18 Sep 2008 - 5:56 pm | मिंटी

मी खुप पुर्वी काढलेला फोटो आहे हा.....त्यावेळी मी शिकत होते फोटोग्राफी करायला.....त्यामुळे फार चांगला नाही आलेला हा फोटो पण एक प्रयत्न :)

विनायक प्रभू's picture

20 Sep 2008 - 7:07 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
सरडे मेरे साथी मधे हिरो शोभेल हा भाउ
वि.प्र.

विसोबा खेचर's picture

21 Sep 2008 - 8:55 am | विसोबा खेचर

सरडे मेरे साथी मधे हिरो शोभेल हा भाउ

हे बाकी मस्त! :)

तात्या.

स्वगत : ह्या विनायकला एकदा भेटलं पाहिजे! :)

लिखाळ's picture

20 Sep 2008 - 7:10 pm | लिखाळ

उत्तम चित्र.. अभिनंदन !
फारच छान ....
--लिखाळ.