निशब्द

हरिदास's picture
हरिदास in जे न देखे रवी...
7 Mar 2016 - 1:21 pm

शब्दांनी आज बंड केले
होते नव्हते सर्व नेले
उरावे हाती असे जमवलेच नाही
क्षणभंगुर लालसेने षंड केले

वाटते वाचा पांगुळ झाली
निराशा आशेस वांझ झाली
ओहोटीने भरतीस दिला नकार
नकळे कोणती ही भूल झाली

प्रकाशाने रविसंगे घात केला
वसंताला ग्रिष्माने आघात केला
डोळ्यांनीच काळजाची वाट पुसली
लेखणीचा प्राण का गर्भात गेला

शायराच्या शायरीतून भाव गेला
काटयांनीच गुलाबाशी घाव केला
दिव्यास पतंगाने का बदनाम केले
शब्दांनी भावनांशी लपंडाव केला

शब्दास शब्दांनी हे शब्द द्यावे
शब्दांचे शब्द शब्दात ल्यावे
शब्दाविण ना आधार आम्हास कुणाचा
शब्दसुमने रसिकांनी निशब्द व्हावे

कविता माझीकविता

प्रतिक्रिया

गणेशा's picture

7 Mar 2016 - 2:30 pm | गणेशा

छान !

पहिली ४ कडवी आणि शेवटचे कडवे यात खुप विरोधाभास वाटला.
की वरील कवितेला , कवीने शब्दानी काय केले पाहिजे हे ५ व्या कडव्यात सांगितले आहे ?

बाकी