गंगाधर गाडगीळ यांचे निधन

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जनातलं, मनातलं
15 Sep 2008 - 10:32 am

प्रसिद्ध साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांचं निधन!

मटामधील बातमीचा दुवा.

साहित्यिकसमाजबातमी

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

15 Sep 2008 - 10:55 am | प्रभाकर पेठकर

त्यांची, लोकमान्य टिळकांवरील 'दुर्दम्य' ही कादंबरी वाचनिय आहे.
देह नश्वर असला तरी, त्यांचे साहित्य कायम समाजाच्या नजरेसमोर राहिल.

विसोबा खेचर's picture

15 Sep 2008 - 2:59 pm | विसोबा खेचर

त्यांची, लोकमान्य टिळकांवरील 'दुर्दम्य' ही कादंबरी वाचनिय आहे.

हेच म्हणतो!

गाडगीळ साहेबांच्या स्मृतीस आमचीही आदरांजली...!

तात्या.

विकास's picture

15 Sep 2008 - 4:22 pm | विकास

त्यांची दुर्दम्य कादंबरी खूप प्रभावि आहे. त्यामुळे मला प्रथम टिळकांची खरी ओळख झाली.

गाडगीळांना विनम्र श्रद्धांजली!

विसुनाना's picture

15 Sep 2008 - 11:20 am | विसुनाना

आमच्या पिढीचे प्रिय कलाकार/लेखक एकेक करून निघून चालले.
गंगाधर गाडगीळ म्हटले की 'बंडू, नानू आणि गुलाबी हत्ती' आठवते.
खुमासदार विनोदी शैलीत मध्यम-मध्यमवर्गाचे दैनंदिन जीवन मांडण्यात त्यांचा हातखंडा होता.
प्रवासवर्णनेही सुंदर होती.

मला आठवते तसे ते लोकप्रभेत अर्थकारणाचे साप्ताहिक समालोचनही लिहीत असत.

त्यांना माझी विनम्र आदरांजली.

मेघना भुस्कुटे's picture

15 Sep 2008 - 11:30 am | मेघना भुस्कुटे

मला त्यांची 'लिलीचे फूल' आठवली. माझीही आदरांजली.

वेलदोडा's picture

15 Sep 2008 - 11:37 am | वेलदोडा

गंगाधर गाडगीळांना विनम्र आदरांजली

नंदन's picture

15 Sep 2008 - 11:50 am | नंदन

गंगाधर गाडगीळांना माझीही नम्र श्रद्धांजली. मराठी नवकथेच्या जनकांपैकी एक असणार्‍या गाडगीळांनी 'कडू आणि गोड' सारख्या कथासंग्रहातून मध्यमवर्गीय मुंबईकराची सुखदु:ख साहित्यात मांडली.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

राघव's picture

15 Sep 2008 - 3:06 pm | राघव

असेच म्हणतो.
माझीही त्यांना विनम्र आदरांजली.

मुमुक्षू

सुनील's picture

15 Sep 2008 - 11:55 am | सुनील

प्रामुख्याने चुरचुरीत ललित लेखन करणारे गाडगीळ हे अर्थशात्राचे प्राध्यापक होते. त्यांचे अर्थशात्रावर काही लिखाण प्रसिद्ध झाले आहे काय?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

बेसनलाडू's picture

15 Sep 2008 - 1:59 pm | बेसनलाडू

(शोकाकुल)बेसनलाडू

टारझन's picture

15 Sep 2008 - 2:09 pm | टारझन

मी २ मिनीटे काहीही करणार नाही (इव्हन नो मिपा) .. २ मिनीटे स्तब्ध राहून श्रद्धांजली ... ते एक उत्तम लेखक होते.शाळेत मराठीच्या अभ्यासात त्यांचे धडे असतं
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

भडकमकर मास्तर's picture

15 Sep 2008 - 2:34 pm | भडकमकर मास्तर

दुर्दम्य आणि कडू आणि गोड वाचलंय...
त्यांना श्रद्धांजली

_____________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

केशवराव's picture

15 Sep 2008 - 3:30 pm | केशवराव

माझी गाडगीळांना विनम्र आदरांजली !

डॉ.प्रसाद दाढे's picture

15 Sep 2008 - 3:56 pm | डॉ.प्रसाद दाढे

माझीही श्रद्धा॑जली. आ॑म्हा॑ला शाळेत त्या॑च्या गोपूरा॑च्या देशात पुस्तकातला एक लेख होता (बहुतेक म्हैसूरच्या कृष्णसागर तलावावर) आणि एक काश्मिरच्या केशराच्या शेतावरचासुद्धा (प॑पूर गाव) धडा आठवतोय.

मराठी नवकथेच्या जनकांपैकी एक असणार्‍या गाडगीळांनी 'कडू आणि गोड' सारख्या कथासंग्रहातून मध्यमवर्गीय मुंबईकराची सुखदु:ख साहित्यात प्रभाविपणे मांडली.मी त्याना एकदाच बघितले होते.एक साहित्यकर कसा घडतो हे तेव्हाच जाणले. गंगाधर गाडगीळ म्हटले की 'बंडू, नानू आणि गुलाबी हत्ती' आठवते.खुमासदार विनोदी शैलीत मध्यम-मध्यमवर्गाचे दैनंदिन जीवन मांडण्यात त्यांचा हातखंडा होता.प्रवासवर्णनेही सुंदर आहेत.त्यांची, लोकमान्य टिळकांवरील 'दुर्दम्य' ही कादंबरी वाचनिय आहे. त्यांच्या जाण्याने साहित्यविश्व आज पोरके झाले .

माझी गाडगीळांना विनम्र आदरांजली !

योगी९००'s picture

15 Sep 2008 - 6:57 pm | योगी९००

माझीपण गाडगीळांना विनम्र आदरांजली !

सुमीत भातखंडे's picture

15 Sep 2008 - 9:15 pm | सुमीत भातखंडे

गाडगीळांना माझ्यातर्फे विनम्र आदरांजली !

चित्रा's picture

16 Sep 2008 - 1:35 am | चित्रा

गाडगीळांचे इतर लेखन वाचण्याआधी कसे माहिती नाही पण त्यांचे बंडू आणि स्नेहलता आधी वाचनात हाती आले. वाचून खूप करमणूक झाली. नंतर त्यांचे गंभीर लिखाण हाती लागते, तेव्हा त्यांचे पकड घेणारे इतर ललित आणि गंभीर लेखन कळले. त्यातलेच एक तलावातले चांदणे नावाचा संग्रह होता, एवढे आठवते की लहान वयात त्यांच्या त्यातील तरल लिखाणाचा चांगलाच पगडा पडला होता.

गाडगिळांना आदरांजली.

मुक्तसुनीत's picture

16 Sep 2008 - 1:54 am | मुक्तसुनीत

गाडगीळांच्या जाण्यामुळे पन्नाशीच्या दशकापासून ज्यांना नवकथेचे मानकरी मानले जायचे त्या पीढीतला शेवटचा मानकरी काळाच्या पडद्याआड गेला आहे. भावे , माडगूळकर, गोखले , जी ए , मोकाशी ही मातबर नावे आणि श्री पु भागवत यांच्यासारखे चोखंदळ संपादक यांच्या काळातला एक सर्वात महत्त्वाचा दुवा निखळला आहे.

गाडगीळांच्या जाण्याने एक महत्त्वाची गोष्ट अधोरेखित होते असे मला वाटते. ती ही, की महायुद्धोत्तर झपाट्याने बदलणार्‍या जगाचे पडसाद ज्यांच्यामुळे मराठी विश्वात आपल्याला पहायला मिळाले, त्या काळाचा आलेख मांडण्याची महत्त्वाकांक्षा ज्यांनी बाळगली , समर्थपणे पेलली ती नावे आता अस्तंगत होत आहेत. आपल्या काळाला चितारणारे , "स्कल्प्टिंग अवर टाईम्स" असे कुणी निर्माण होत आहेत काय ? गाडगीळांनी परंपरा मोडल्या ; नवता आणली. गाडगीळांसारख्यांनी निर्माण केलेल्या परंपरा मोडणारे नवे गाडगीळ निर्माण होत रहावेत ; हीच त्यांना श्रद्धांजली.

दुर्दैवाने, माझ्यासाठी गाडगीळांची एवढीच ओळख राहिली. त्यांचे लिखाण आवर्जून वाचले गेल्याचे आठवत नाही. त्यांच्या कथा वेगळ्या धाटणीच्या आणि मनात काही वेगळे विचार निर्माण करणार्‍या होत्या एवढे मात्र नक्की आठवते.
त्यांची पुस्तके वाचणे ही माझ्याकडून त्यांना खरी श्रद्धांजली ठरावी.
तोवर मी इथेच आदरांजली अर्पितो!

चतुरंग