एक व्हॅलेन्टाईन

सुरवंट's picture
सुरवंट in जनातलं, मनातलं
14 Feb 2016 - 12:39 pm

काल :
स्मशानात जाऊन मी बसतो. नेहमीच बसतो. आजही बसलो होतो. थडग्यावर बसून तंबाखू खायला फार बरं वाटतं. एकदा किक बसली का तुझ्या आठवणीत शिरता येतं.

तुझ्या केसातला मोगऱ्याचा गजरा आणि त्याचा तो गंध,
बांगड्यांची किणकीण आणि छमछम ते पैंजण,
ढळढळीत दुपार आणि ऊसाचं रान.

तुझ्या वैभवाचा मला स्पर्श झाला...

काय पण व्हॅलेन्टाईन, मी इथं वर बसलोय बार भरत, आणि तू थडग्यात..

आज:
मी व्हिस्की पीत नाही पण हा ग्लास फक्त तुझ्यासाठी. मला आवडतात म्हणून ही गुलाबाची फुलंही सोबत. तुलाही आवडतील याची खात्री आहे.
काल रॉजर म्हणत होता, वील यू बी माय व्हॅलेन्टाईन?
हाऊ क्यन आय डिल विथ धिस्?
मी इथे ऊभी फुलं घेऊन आणि तू थडग्यात...

वावरशुभेच्छा

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Feb 2016 - 2:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्वा... आवडलं. तो गजरा, तो गंध, बांगड्यांची किणकिण आणि पैंजनाचीही आठवण आली.
दुसरा भाग नै पटला पण असंही होऊ शकतं. असाही एक व्हेलेंटाईन डे असू शकतो.

हॅपी व्हेलेंटाइन डे, लव यु सो मच गं. असं कबरीजवळ जावू नै म्हणत का ?

उस शक्स से फकत इतना सा ताल्लुक है मेरा
वो परेशान होती है तो मुझे निंद नही आती.

-दिलीप बिरुटे

काल रॉजर म्हणत होता, वील यू बी माय व्हॅलेन्टाईन?
हाऊ क्यन आय डिल विथ धिस्?

ये बात कुछ हजम नहीं हुई.