मला कळलेला "अद्वैत सिद्धांत - ओळख "

मन's picture
मन in जनातलं, मनातलं
14 Sep 2008 - 7:02 pm

एक होता नाडा

एकदा काय झालं; नाड्याची गाठ सुटेना. तशी सुटणं अवघड नव्हतं. कुठलही एक टोक मागं सरलं तर गाठ सुटण्यासारखी होती.
पण कुठल्याच टोकाला मागं जाणं मंजुर नव्हतं. त्यापेक्षा,मोकळं होण्यासाठी एक्मेकाला ते खेचु लागले. पण झालं उलटच. ताण वाढला. गाठ आणखी पक्की झाली.
खेचुन काहिच होत नाही म्हाल्यावर ते एकमेकाला ढकलु लागले.
त्यानं गाठीचा पीळ आणखीनच वाढला. आता तर गाठ सुटायची काहिच चिन्ह दिसेनात.
सुटका करुन घेण्यासाठी त्या दोन्ही टोकांनी आता जोर वाढवला. प्रचंड ओढाताण सुरु झाली. आणि यातच...
यातच एक टोक तुटलं. गाठ एकदाची तुटली. दुसरं टोक खुश झालं .
"हुस्श्श सुटलो" म्हणुन त्यानं एक निश्वास टाकला. आणी विजयाचा अमप आनंद त्याच्या इवल्याश्या मनात मावेना.आणि एवढ्यात...

एवढ्यात एक जीवघेणी कळ त्याच्या पाठितुन गेली. जणुन काही त्याचं शरीर कुणा अति शक्तिशाली ताकदीनं हिसका देउन तोडल्यासारखं त्याला वाटलं. कुणीतरी करवतीनं त्याच्या शरीर कापल्यासारखं त्याला झालं. मरणप्राय कळा सुरु झाल्या.
आणि त्याच्या डोक्यात विचार गेला चमकुन :-
"अरेच्चा ..आपण कुठं वेगळे होतो. आपण दोघही त्या एकाच नाड्याची टोकं.
एक अखंड , संपुर्ण पण जणु निद्रिस्त्/भ्रमित/स्वप्नाभासी नाडा. त्यातच तर आपण सामावलोत. आपण ,म्हणजे हे टोक, सुरु तरी कुठं होतं आणि संपतं तरी कुठं? .....
आपलं खरं रूप नाडा. भ्रमित रुप टोकं.सत्य रुप अखंड्.स्वप्नावासी रुप खंडित.
कुठलही टोकं तुटलं तरी तुटणार आपणच होतो. आपलाच जीव कसनुसा करुन विजय आपण साजरा करणार होतो.आपल्याल आपण वेगळे असल्याचा झाला निभ्रम. निव्वळ भ्रम. त्यातुनच आल्यात ह्या कळा. असह्य वेदना"
हे जाणवत असतानाच अति तीव्र वेदनेनं त्याला ग्लानी येउ लागली. तो बेहोश होउ लागला.
.......

इकडं तुटलेल्या नाड्यालाही दोन टोकं शिल्लक होतीच. एकमेकांना पाहुन बोल्तं झाली.
एकमेकांना वेगळं समजु लागली.
द्वित्वाचा भास जन्माला आला होता.
त्या नाड्याला (स्वतःला ती दोन टोकं समजुन)तो त्यांचाच जन्म वाटत होता.

तर मित्रहो, ह्या सिद्धांतातुन कळतय ते बरोबर आहे का?
की काही वेगळच मी समजुन बसलोय?
की अंशतः बरोबर लिहिलय?
हे मला स्वतःला अलिप्त राहुन सांगता येत नाहिये. पण कळल्य ते असय.

कथा

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Sep 2008 - 7:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मला काय ते अद्वैत वगैरे समजत नाय ... पण मनोबा, तुमचा सिद्धांत वाचताना हहपुवा झाली.

यशोधरा's picture

14 Sep 2008 - 7:14 pm | यशोधरा

>>द्वित्वाचा

द्वैत?? भारी लिहिलय हो मनोबा!! :)

अवलिया's picture

14 Sep 2008 - 7:29 pm | अवलिया

एकदा काय झालं; नाड्याची गाठ सुटेना. तशी सुटणं अवघड नव्हतं.

ब्रह्म माया यांची गाठ अशीच असते. सोडणे सोपे असते पण मायेचा प्रभावाने अवघड वाटते

कुठलही एक टोक मागं सरलं तर गाठ सुटण्यासारखी होती.
पण कुठल्याच टोकाला मागं जाणं मंजुर नव्हतं. त्यापेक्षा,मोकळं होण्यासाठी एक्मेकाला ते खेचु लागले. पण झालं उलटच. ताण वाढला. गाठ आणखी पक्की झाली.

बरोबर आहे. माया ब्रह्माला ढकलुन वर्चस्व गाजवते तर ब्रह्माचे औत्सुक्य पुरातन आहे

खेचुन काहिच होत नाही म्हाल्यावर ते एकमेकाला ढकलु लागले.
त्यानं गाठीचा पीळ आणखीनच वाढला. आता तर गाठ सुटायची काहिच चिन्ह दिसेनात.
सुटका करुन घेण्यासाठी त्या दोन्ही टोकांनी आता जोर वाढवला. प्रचंड ओढाताण सुरु झाली. आणि यातच...

ज्ञान, कर्म , भक्ती व योग यांचे द्वंद्ब सतत मनात चालु याची खुण

यातच एक टोक तुटलं. गाठ एकदाची तुटली. दुसरं टोक खुश झालं .
"हुस्श्श सुटलो" म्हणुन त्यानं एक निश्वास टाकला. आणी विजयाचा अमप आनंद त्याच्या इवल्याश्या मनात मावेना.आणि एवढ्यात...

गुरुकृपा किंवा भक्ती किंवा योगसाधना यांचे सहाय्याने अनुभुतीचा स्पर्श

एवढ्यात एक जीवघेणी कळ त्याच्या पाठितुन गेली. जणुन काही त्याचं शरीर कुणा अति शक्तिशाली ताकदीनं हिसका देउन तोडल्यासारखं त्याला वाटलं. कुणीतरी करवतीनं त्याच्या शरीर कापल्यासारखं त्याला झालं. मरणप्राय कळा सुरु झाल्या.
आणि त्याच्या डोक्यात विचार गेला चमकुन :-
"अरेच्चा ..आपण कुठं वेगळे होतो. आपण दोघही त्या एकाच नाड्याची टोकं.
एक अखंड , संपुर्ण पण जणु निद्रिस्त्/भ्रमित/स्वप्नाभासी नाडा. त्यातच तर आपण सामावलोत. आपण ,म्हणजे हे टोक, सुरु तरी कुठं होतं आणि संपतं तरी कुठं? .....
आपलं खरं रूप नाडा. भ्रमित रुप टोकं.सत्य रुप अखंड्.स्वप्नावासी रुप खंडित.
कुठलही टोकं तुटलं तरी तुटणार आपणच होतो. आपलाच जीव कसनुसा करुन विजय आपण साजरा करणार होतो.आपल्याल आपण वेगळे असल्याचा झाला निभ्रम. निव्वळ भ्रम. त्यातुनच आल्यात ह्या कळा. असह्य वेदना"
हे जाणवत असतानाच अति तीव्र वेदनेनं त्याला ग्लानी येउ लागली. तो बेहोश होउ लागला.
.......
अहंचा त्याग करताना माझे काय होईल हा मनाचा विचार आत्म्याला अद्वैत साधण्यापासुन परावृत्त करतो

इकडं तुटलेल्या नाड्यालाही दोन टोकं शिल्लक होतीच. एकमेकांना पाहुन बोल्तं झाली.
एकमेकांना वेगळं समजु लागली.
द्वित्वाचा भास जन्माला आला होता.
त्या नाड्याला (स्वतःला ती दोन टोकं समजुन)तो त्यांचाच जन्म वाटत होता.

पारमार्थिक स्तरावर जरी अद्वैत असले तरी व्यवहारीक पातळीवर द्वैत पाळावेच लागते याची सुचकता

अजुन काही शंका ?

अर्चिस's picture

14 Sep 2008 - 8:16 pm | अर्चिस

पीळ काही सुटता सुटेना..........................................

सोडवता येणार नाही अश्या गाठी न मारणारा
अर्चिस

ऋषिकेश's picture

14 Sep 2008 - 8:34 pm | ऋषिकेश

मला कळलेला "अद्वैत सिद्धांत - ओळख "
-(ढ) ऋषिकेश

भडकमकर मास्तर's picture

14 Sep 2008 - 11:42 pm | भडकमकर मास्तर

हू आर यू?
ही इज द यू इन द आय ऑफ द यू इन व्हिच यू ऑफ द यू इन द आय इन द यू आर यू इन द यू......

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

धनंजय's picture

15 Sep 2008 - 9:15 pm | धनंजय

हू आर यू, मनोबा?

मस्त टोलवाटोलवी!

विसोबा खेचर's picture

15 Sep 2008 - 2:57 pm | विसोबा खेचर

मनोबा, जियो यार...!

च्यामारी त्या द्वताद्वौत शिध्धांताची सह्हीच करून टाकली आहेस... :)

आपला,
तात्याभैय्या देवासकर,
देवासकरांचा वाडा, इंदौर.

वारकरि रशियात's picture

15 Sep 2008 - 5:23 pm | वारकरि रशियात

बद्ध (ते ) मुक्त
"अरेच्चा ..आपण कुठं वेगळे होतो. आपण दोघही त्या एकाच नाड्याची टोकं. एक अखंड , संपुर्ण पण जणु निद्रिस्त्/भ्रमित/स्वप्नाभासी नाडा. त्यातच तर आपण सामावलोत. आपण ,म्हणजे हे टोक, सुरु तरी कुठं होतं आणि संपतं तरी कुठं? .....
आपलं खरं रूप नाडा. भ्रमित रुप टोकं.सत्य रुप अखंड्.स्वप्नावासी रुप खंडित. कुठलही टोकं तुटलं तरी तुटणार आपणच होतो."

(वेगळ्या अनुभवातून) योग्य निश्कर्श! अभिनन्दन!!!