गैरसमज हे परस्पर आणि दुतर्फा संवादाने दूर होतात.
वादविवादाने गैरसमज वाढतात.
संवादाने आणि एकमेकांचे ऐकून घेतल्याने गैरसमज संपतात.
संवादच होवू दिला नाही तर गैरसमज कधीच दूर होणार नाहीत.
गैरसमज हा रुसलेला असतो. हटून बसतो. जातच नाही!
त्याचे रुसणे दूर करायला संवाद हवा असतो.
गैरसमज हा शेवटी "गैर" असतो. परका असतो. आपला नसतो!
त्याच्या नावातच परकेपणा आहे. "गैर"समज!
म्हणजे तो कधी ना कधी गैर होतोच आणि उरतो फक्त समज!
ही समज ज्याला जितक्या लवकर येते तितक्या लवकर तो संवादाला तयार होतो आणि गैरसमजाला कायमचे "गैर" करतो आणि समजाला समजून घेतो.
समजलं का?
प्रतिक्रिया
6 Feb 2016 - 11:40 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
गै गै गै गै!! विकांत. फुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र फुस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स!!
6 Feb 2016 - 11:42 am | टवाळ कार्टा
खिक्क
6 Feb 2016 - 12:06 pm | निमिष सोनार
वाक्क !! झक्क !!
6 Feb 2016 - 12:20 pm | अन्नू
गैरसमज अनेक प्रकारचे असतात.
एक- मुलाने सुंदर तरुणीला बघून स्मित केले तर त्यातून होणारा (भयानक) गैरसमज
दुसरा- तेच त्या मुलीला आवडणार्या मुलाने तिच्याकडे पाहण्याने तिचा होणारा (गोड) गैरसमज
तिसरा- रात्री थेटरात बाजुला एक बाई- मग ती आजीबाई का असेना पण अंधारात तिला चिकणी तरुणीच आहे असा मनाचा होणारा (पोपट!) गैरसमज
चौथा- अगोदरच दोन बायका असूनही लोचट इम्रानहाशमी टाईप मुलाला इतर तरुणीं आपल्याला लाईन देत आहेत असा बहुतांश वेळा नवीन तरुणींना बघून होणारा (हावरट) गैरसमज
पाचवा- समोरच्या ... ची सुंदर बायको आपल्यावरच भाळून असते असा (टक्कल असूनही) नवरोबांचा होणारा (येडपट) गैरसमज
सहावा- रस्त्याने चालताना नवर्याने बाजुच्या साधं किराणा दुकनाकडे जरी पाहिलं तरी- मेला तिथे उभी असलेल्या टवळीलाच डोळे फाड-फाडून बघतोय असा बायकांचा होणारा (स्फोटक- शक्की) गैरसमज...
मग नक्की कोणता गैरसमज?
6 Feb 2016 - 4:22 pm | निमिष सोनार
आता काय करायचे?