अमिताभच्या "द लास्ट लियर" या चित्रपटाचा खेळ प्रेक्षकांअभावी रद्द !!!!!

मिंटी's picture
मिंटी in काथ्याकूट
13 Sep 2008 - 11:55 am
गाभा: 

सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या "द लास्ट लिअर' या नव्या चित्रपटाचा "फर्स्ट डे फर्स्ट शो' प्रेक्षकांअभावी रद्द झाला!

अधिक माहितीसाठी खालची लिंक वाचा :-

http://www.esakal.com/esakal/09132008/Specialnews00E0164861.htm

प्रतिक्रिया

जैनाचं कार्ट's picture

13 Sep 2008 - 11:59 am | जैनाचं कार्ट (not verified)

=))

चांगलीच जिरली म्हाता-याची 8} ... महाराष्ट्राशी पंगा... मंहगा पडेगा B)

O:)

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

देवदत्त's picture

13 Sep 2008 - 3:37 pm | देवदत्त

एकच चित्रपटगृह ना? मग काय फरक पडतो?
आणि ह्यात 'अमिताभ निषेध' पेक्षा मनसे बद्दलची भीती (ज्याची आता गरज नाही कारण त्यांनी आंदोलन मागे घेतले आहे.) आणि सिनेमाची टिव्हीवरील झलक हेही कारणीभूत असू शकतात.

ह्या सिनेमाबद्दल किंवा अमिताभ बद्दल काही बोलणे नाही.
परंतु असाच प्रकार इतर वेळाही उपयोगाचा ठरू शकतो. उदा. मल्टीप्लेक्स वाल्यांचे अवाजवी जास्त पैसे आकारणे वगैरे गोष्टींकरीता लोकांनी त्या मल्टीप्लेक्स मध्ये जाणे बंद केले (वरीलप्रमाणेच) तर त्यांनाही हिसका दाखविल्यासारखे होईल.

विसोबा खेचर's picture

13 Sep 2008 - 3:39 pm | विसोबा खेचर

उदा. मल्टीप्लेक्स वाल्यांचे अवाजवी जास्त पैसे आकारणे वगैरे गोष्टींकरीता लोकांनी त्या मल्टीप्लेक्स मध्ये जाणे बंद केले (वरीलप्रमाणेच) तर त्यांनाही हिसका दाखविल्यासारखे होईल.

हा मुद्दा पटला...

तात्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Sep 2008 - 4:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सहमत.

देवदत्त, तुमचे सगळेच मुद्दे पटले.

मिंटी's picture

13 Sep 2008 - 3:43 pm | मिंटी

देवदत्त यांच्याशी सहमत............

शिशिर's picture

16 Sep 2008 - 2:25 pm | शिशिर

सध्य। च्य। परिस्थितित सिने निर्मत्य। ल। फारसे फरक पड्त नाही. भारता बाहेर सिनेमा रिलिज करुन, सि.डी., कॅसॅट पासुन त्यानी अर्थकारण बरोबर जमविलेले असते.

विकास's picture

16 Sep 2008 - 7:11 pm | विकास

सध्य। च्य। परिस्थितित सिने निर्मत्य। ल। फारसे फरक पड्त नाही. भारता बाहेर सिनेमा रिलिज करुन, सि.डी., कॅसॅट पासुन त्यानी अर्थकारण बरोबर जमविलेले असते.

अगदी मान्य . फक्त असे जेंव्हा एका ठिकाणी घडू शकते तेंव्हा त्या कल्पनेचा इतरही वापर/परीणाम होइल, असा संदेश (मेसेज) इतरांपर्यंत जाऊ शकतो ही भविष्यात स्वतःला वाचवण्याची (सर्व्हायवलची)भिती जास्त असते आणि त्यातून जरा बदल घडू शकतात. "उचलीलेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा खचला पाया" ह्या वाक्यात जरा अतिशयोक्ती असली (म्हणजे केवळ तेव्ह्ढ्यानेच, गांधीजींमुळेच असे झाले असे मला वाटत नाही) तरी त्याला ब्रिटीश प्रचंड घाबरले कारण त्यातून "घाटा" दिसत होता. तेच त्या आधी टिळकांनी सांगितलेल्या स्वदेशी मुळे झाले...

बाकी वर देवदत्तने म्हणलेले पण मान्य