गुरु (मराठी)
मराठीतले करिष्माई दिग्दर्शक संजय जाधव त्यांच्या ‘दुनियादारी’ आणि ‘तू ही रे’या मागील वर्षीच्या सिनेमांच्या यशानंतर आता ‘गुरू’ हा नवा सिनेमा घेऊन आलेले आहेत. मराठी सिनेमाचा एकूणच प्रेक्षकवर्ग बघता हा सगळा इत्यंभूत विचारशील प्रेक्षकवर्ग असतो त्यामुळे दक्षिण भारतीय पद्धतीच्या कथा पडद्यावर मांडल्यावर प्रेक्षक कितपत प्रतिसाद देतील हे बघण्यासारखे राहील. दुनियादारी अन तू हि रे बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करून गेले. कदाचित त्यामुळे या चित्रपटाची पब्लिसिटी इतर मराठी सिनेमांपेक्षा भरपूर होत असल्याचे जाणवले. त्यात दिग्दर्शक संजय जाधव हेच स्वत: निर्माता जोडीपैकी एक निर्माता बनलेत या सिनेमासाठी त्यामुळेही कदाचित फरक पडला असावा. कारण काहीही असो पण पब्लिसिटी इतक्या प्रमाणावर आहे कि बस.
संजय जाधव यांनी दुनियादारी मध्ये तरुणाई अन तू हि रे मध्ये प्रेम व्यवस्थित हाताळल होत. इतर मराठी दिग्दर्शकांपेक्षा निश्चितच उत्तम रीतीने. गुरु मध्ये संजयजी स्वत:च लेखक जोडीपैकी एक (आशिष पाठारे सोबत) असल्यामुळे कि काय पण कहाणीत एकदम नवीन विषय निवडला आहे. पहिल्या पंधरा मिनिटात "गुन्हेगारी विश्वाकडे" वळणारी कथा असे इम्प्रेशन देणारी कहाणी नंतर उर्मिला कोठारेच्या कथेतल्या आगमनानंतर "प्रेमाकडे" वळली असे वाटते आणि मध्यंतरापर्यंत पोचेपर्यंत स्थलांतरितांच्या प्रश्नांना हात घालते. कितीही नाही म्हटल तरी इतक्या शिताफीने इतक transformation आणि ते हि मराठीत हे निश्चितच कौतुकास्पद आहे. वेगवेगळ्या या विषयांना मांडणी करून प्रेक्षक कुठेही कन्फ्युज होणार नाहीत याची काळजी ही संजयजींनी घेतल्याचे बरेचदा जाणवते. या कहाणीचा शेवट कसा होतो हे निश्चितच बघण्यासारखे आहे कारण त्यातही मुरली शर्मा या हिंदीतल्या कसदार रंगमंच अभिनेत्याला खलनायक म्हणून मराठीत संजयजींनी गळाला लावून बाजी मारलेली आहे. मुरली शर्मा मराठी उच्चारात कोठेही कमी पडत नाही आणि खलनायक म्हणून छाप सोडून जातो.
संजयजिचा मराठी चित्रपट म्हणजे स्वनिल जोशी अन सई ताम्हणकरची जोडी अस आजवर समीकरण होत. त्यांनी एकाच वर्षात दोनदा तिकीटबारीवर हे समीकरण गाजवूनही दाखवल. पण गुरु मध्ये मात्र समीकरण बदलून दुनीयादारीतला दिग्या म्हणजेच सुपरस्टार अंकुश चौधरीला मुख्य अभिनेता म्हणून पुढे आणलेले आहे. अंकुश चौधरीचे कौतुक कारण त्याने दिग्दर्शकाच्या नवीन प्रयोगाला साथ देत मराठी चित्रपटात दक्षिण भारतीय पद्धतीचे फायटिंग सिक्वेन्सेस पेलून दाखवले. फायटिंग सिक्वेन्सेस बघून असे वाटले कि दक्षिण बारतीय पध्दतीप्रमाणे नायकप्रधान शेवट असेल पण तेथेच कदाचित संजयजी मधलं मराठीपण जागलं आणि मराठी पद्धतीप्रमाणे त्यांनी कथेचा शेवट करवला. दुनियादारी मधल्या मीनूचे म्हणजेच उर्मिला कानेटकरचे ओवी या नावाने नायिका म्हणून प्रेक्षकांना दर्शन घडते. तिने तिचा वाटा व्यवस्थित निभावला असून एका मुख्य अभिनेत्रीचे पात्र व्यवस्थित निभावलेले आहे.पण विशेष कौतुक अभिनयासाठी खलनायक मुरली शर्माचे कारण त्याने मराठीतला नसूनही मराठीत व्यवस्थित सगळ हाताळलेल आहे.
संगीत हा मराठी प्रेक्षकांसाठी जिवाभावाचा विषय कारण मराठीत संगीत असते ते गाण्यांना म्हणजेच बेसिकली कवितांना आणि झुक्या रोजच दर्शन घडवतो कि मराठीत कवी-कवियित्री किती मुबलक आहेत याचे. पण सांगण्यास खरोखर आनद कि अमितराज-पंकज पडघन आणि प्रफुल्ल कार्लेकर असे तीन संगीत दिग्दर्शक असूनही संगीत उच्च पातळीचे आहे. दुनियादारी आणि तू हि रे मध्ये संगीत हे उच्च दर्जाचे होते. तीच संगीताची क्वालिटी संजयदाने गुरु मध्येही मेंटेन केली आहे स्वत: निर्माता बनल्यावर सुद्धा. "फिल्मी" आणि "mango डॉली" या दोन गाण्यांचा विशेष उल्लेख संगीतासाठी होइल.
फिल्म इंडस्ट्रीत गुरु म्हटला कि आधी आठवायचा मणिरत्नमचा आणि अभिषेक बच्चनच गुरु जो रहमानने सजवला होता. आपला मराठीतला गुरु अगदी तितका उच्च पातळीवर पोचला नसला तरी नेहमीसारखा विस्मृतीतही जाणार नाही. मला हा चित्रपट दिग्दर्शन-कहाणी आणि विशेष म्हणजे संगीत या साठी आवडला म्हणून मी चित्रपटाला ३.५ * देईन, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर
प्रतिक्रिया
25 Jan 2016 - 12:30 am | कट्टप्पा
मुरली शर्मा गुंटूरचा आहे. त्याची बायको आपलीच मराठी आश्विनी काळसेकर आहे. ती हैद्राबादला तेलुगु मुव्ही करु शकते. मुरली शर्माला मुंबईत राहून काहीच अडचण नसावी.
25 Jan 2016 - 2:12 am | संदीप डांगे
नेमकं कशाचं परिक्षण आहे? दुनियादारी, तूहिरे की गुरू?
25 Jan 2016 - 6:30 am | रेवती
जालावर आल्यास कदाचित बघितला जाईल. धन्यवाद.
26 Jan 2016 - 12:52 am | समीर_happy go lucky
सगळ्यांचे धन्यवाद