तेलाच्या भांडणात, सद्दामच्या सुवर्णकाळात, इराकने कुवैतवर आक्रमण केले, त्या काळात कुवैतमध्ये अडकलेल्या भारतीयांना सोडवण्यासाठी कदाचित मानवी इतिहासातील सगळ्यात मोठी सुटका मोहीम (Evacuation) आखण्यात आली होती. जरा इकडे-तिकडे वाचन करण्याची सवय असेल तर या मोहिमेचे कौतुक बरेच ठिकाणी बघितले असेल. या कथेपासून प्रेरित होऊन अक्षय कुमार त्या कथेवर बेस्ड सिनेमा घेऊन आला असून एक मनापासून केलेला चांगला प्रयत्न असे याचे वर्णन करता येईल. या मोहिमेत जवळपास दिड लाख लोकांना सुरक्षित स्थळी म्हणजे भारतात २०० विमानांच्या सहाय्याने आणण्यात आले होते असे मी वाचले होते, म्हणून मला उत्सुकता होती कि तितकी adjustment शुटींग मध्ये दिग्दर्शकाने कशी केली असेल पण चित्रपटात हजाराच्या आसपास व्यक्ती होते. कदाचित तितका practical बदल cinematic लिबर्टी म्हणून दिग्दर्शकाने घेतला असावा.
कहाणी:
१९९० साली १५ बिलियन डॉलरचे कर्ज इराकवर कुवैतचे होते. या कर्जाला चुकवणे तर दूरच पण वेगवेगळ्या कारणांना उकरून काढून इराकने कुवैतवर आक्रमण केले होते. त्या काळात बरेचसे भारतीय पोटापाण्यासाठी कुवैतमध्ये गेले होते, साहजिकच ते युद्धात फसले. त्या लोकांना सोडवून सुरक्षितपणे परत आणण्यासाठी "ऑपरेशन सेफ होमकमिंग" नावाची जी मोहीम आखण्यात आली होती त्या मोहिमेचे पडद्यावर रेखाटन करण्याचा प्रयत्न म्हणजे एयरलिफ़्ट.
अभिनय:
अक्षय कुमार यात रणजीत कट्याल या व्यावसायिकाच्या भूमिकेत आहे जो सगळ्यांना व्यवस्थित सोडवून परत आणतो. हि बहुधा काल्पनिक भूमिका असावी कारण मी तरी या व्यक्तीचे नाव कुठेही वाचले नाही. अक्षय कुमार एक खरा प्रोफेशनल अभिनेता कारण तो या मोहिमेचे नेतृत्व करणारा व्यावसायिक म्हणून शोभून गेला चित्रपटभर. एक उच्चपदस्थ दुसर्या देशात जाऊन प्रसंग आल्यावर भारतीय म्हणून भारतीयांच्या मदतीला धावून गेलेला व्यक्ती हि विचित्र सिच्युएशन अक्षय कुमारने एका अभिनेत्याच्या सराईतपणे हाताळली. नेतृत्व करत असताना त्याला येणारे अनेकानेक प्रॉब्लेम्स, ते सोडवताना त्याची दमछाक इत्यादी व्यवस्थित साकारले अक्षयने. आधीच्या काळात मनोज कुमार प्रसिद्ध होता कि जो फक्त देशभक्तीपर कहाणी असलेले चित्रपट आणून चालवून दाखवायचा. सध्याच्या पिढीत मला वाटते अक्षय कुमार त्याच मार्गावर चालायला लागलेला आहे.
दिग्दर्शन:
राजा कृष्ण मेनन हे दिग्दर्शक आहेत एयरलिफ़्टचे, त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. पहिल्याच चित्रपटात खूप मोठा विषय हाताळण्याची हिम्मत त्यांनी दाखवलेली आहे आणि त्यात कुठेही ते कमी पडत नाहीत. दीड लाखांची व्यक्तीसंख्या शुटींगसाठी सोयीचे म्हणून हजारावर खाली आणणे हि सगळ्यात मोठी adjustment त्यांनी केली. या चलाखीला कोणी आक्षेप घेण्याचा प्रश्नच नाही कारण १९९० म्हणजे जवळपास २६-२७ वर्षे मागे जाऊन उकरून काढण्याइतका उत्साह कोणीही दाखवणार नाही. पण त्या मोहिमेत श्री.बेदी नावाचे केंद्र सरकारचे विदेश मंत्रालयातील एक आयएएस अधिकारी होते. त्यांनी प्रचंड मेहनत/मदत/भारतातील नेतृत्व इत्यादी केले होते असे वाचल्याचे मला पक्के आठवते. त्यांचा सिनेमात उल्लेख नाही. हे मला चुकीचे वाटले कारण सुरवातीला तुम्ही रियल लाइफ़ बेस्ड अशी पाटी देता आणि अशी कन्नी मारता. पण कदाचित माझा जो सोर्स होता तो fulty असेल किंवा यांचे महत्व कहाणीत तितकेसे नसेल.
संगीत:
सुरवातीचे एक आयटम सॉंग सोडले तर चित्रपटात गाणेच नाही. पण ती कमी दोन्ही संगीत दिग्दर्शक अंकित तिवारी आणि अमाल मलिक यांनी पार्श्वसंगीतात भरून काढलेली आहे कारण पार्श्वसंगीताचा मुबलक वापर चित्रपटभर आहे.
कोणताही मालमसाला नसलेले अन मुख्य म्हणजे संगीत विरहीत पूर्णपणे कहाणीवर अवलंबून असलेले चित्रपट खूप कमी असतात,एयरलिफ्ट त्यापैकीच एक. मला चित्रपट आवडला म्हणून मी चित्रपटाला ३(तीन) * देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर
प्रतिक्रिया
23 Jan 2016 - 10:17 am | चांदणे संदीप
परीक्षण अजून सविस्तर हवे होते.
मूळ चित्रपटापासूनच लेखन दुरावल्यासारखे वाटले!
परीक्षणाला = २.5 गुण!
Sandy
23 Jan 2016 - 10:27 am | कविता१९७८
कालच पाहीला, बेस्ट मुवी आॅफ द ईयर
23 Jan 2016 - 10:29 am | कविता१९७८
माझ्याकडुन या सिनेमाला *****
23 Jan 2016 - 10:29 am | एस
चित्रपट पाहण्यासारखा असणार यात शंका नाही.
उत्तम परीक्षण केलेय. थोडे विस्तृत आणि बहुपदरी असायला हवे होते.
23 Jan 2016 - 7:23 pm | कट्टप्पा
माझ्या मित्राचे वडिल इराकवरुन तशेच आले तेव्हा. त्यांच्याकडुन ऐकले होती कथा. आता कुटुंब सेट्ल झाले आहे.
अक्शयकुमारसाठि पाहनार ही मुव्ही.
23 Jan 2016 - 8:52 pm | सत्याचे प्रयोग
आजच पाहिला मसाला, हिरो हिरोईन ची नाच गाणी आवडणारांसाठी नाही हा सिनेमा. अतिशय सुंदर सिनेमा आहे.
विशेष म्हणजे शेवटी जे दाखवतात तेही आवडले
23 Jan 2016 - 9:39 pm | मुक्त विहारि
त्यामुळे त्या चित्रपटाच्या भाग्यात जर आम्ही प्रेक्षक म्हणून असलो तर काही सांगता येत नाही....
सध्या तरी आम्ही बरे आणि आमचे हॉलीवूड बरे.
23 Jan 2016 - 10:05 pm | बोका-ए-आझम
माझे वडील सौदी अरेबियामध्ये होते आणि ते युद्ध चालू होण्याच्या दिवशी म्हणजे १६ जानेवारी १९९१ या दिवशी भारतातून सौदीला गेले. तेव्हा त्यांना एअरपोर्टवर सोडायला गेलो असताना तिथून आलेल्या अनेक लोकांना एअरपोर्टवर पाहावं लागलं. आपल्या देशात असूनही कुठल्यातरी परक्या देशात आल्यासारखे भाव होते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर. हा चित्रपट त्या आठवणी जागवणारा नक्कीच आहे. मुळात या घटनेतच एवढं नाट्य आहे, की दिग्दर्शकाला काय दाखवू याऐवजी किती दाखवू असा प्रश्न पडलेला आहे या चित्रपटात. मी ३.५/५ देईन.
23 Jan 2016 - 10:12 pm | बिन्नी
या चित्रपटाबद्दल माहिती लिहा.
अशा दीर्घोत्तरी प्रश्नाचे उत्तर आवडले. गुण १० पैकी ८.
24 Jan 2016 - 10:43 am | असंका
-))
24 Jan 2016 - 11:14 am | जव्हेरगंज
+1
उत्तर मोठे दिसत आहे म्हणून न वाचताच गुण दिले असावेत. ८ जरा जास्तच वाटतायत.;-)
24 Jan 2016 - 8:01 am | के.पी.
काल पाहिला,आवडला.पण मी ३.५ * देईन.
व्यक्तिसंख्येचा मुद्दा चित्रपट पाहताना लगेच जाणवतो.
25 Jan 2016 - 4:59 pm | चौकटराजा
मूळ घडलेली घटना व हा सिनेमा याचा सम्बन्ध फ़क्त कथा सूत्र सुचण्यापुरता असावा असे या विषयावर जी माहिती जालावर आहे त्यावरून वाटते.माणूस सिनेमा पहाण्यासाठी येत असतो ते त्याच्या मनोरंजनाच्या व्याख्यॆ नुसार. ही व्याख्या ही वयानुसार बदलते अलिकडे वेडनेस डे,तलवार,स्पेशल 26, बेबी ,दृश्यम व् आता एयार्लिफ्ट हे मला आवडलेले.ही यादी पाहिली की आरके गुरुदत्त यश बी आर ई जुन्या लोकाच्या ठराविक दिगदर्शन शैली पासून अलिकडचे दिगदर्शक कथालेखक संकलक "मसाल्या"चे भान ठेवूनही किती सफाईदार झाले आहेत ते दिसून येते.हा सिनेमा असाच अनुभव आहे.त्यात निरनिराळी पात्रे निर्माण करून त्यान्च्या तोंडी खरेखोटे सन्दर्भ टाकून आपले मन पुरते गुंतवून ठेवले जाते.कसदार संगीत व पार्श्वसंगीत हे जोडीला आहेच.बारीक लक्ष ठेवल्यास कला दिग्दर्शकाला ही दाद देणे भाग पडते.अक्षयकुमार यानी निभावालेली ही एक उत्तम भूमिका आहे.आशा, निराशा ,रोमान्स विवशता सारे या नटाने मस्त दाखविले आहे.लव रोमान्स लार्जर दयां लाईफ नायक ज्याना आवडतो त्याच्यासाठी हां सिनेमा नाही.