साहित्य संमेलनाच्या निमित्ताने

प्रचेतस's picture
प्रचेतस in काथ्याकूट
15 Jan 2016 - 10:02 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून म्हणजे दि.१५ जानेवारी २०१६ पासून सुरुवात होत आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीपासून माध्यमांना खाद्य मिळायला सुरुवात झालेली असते आणि पुढे जे काही सुरु झालेले असते, होत असते, ते आपण सर्वच वाचत असतो. डॉ. श्रीपाल सबनीस हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले आता त्यांच्या निवडीला आव्हान देणे, नाराज साहित्यिकांनी निवडणूक कशी अवैध आहे वगैरेसाठी पोलीसात तक्रार देणे इथपर्यंत आपण सर्वांनी माध्यमातून वाचलं आहे. आता या सर्व गोष्टींच्या पुढे साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात झाली आहे. आज दुपारी ग्रंथदिंडी निघाली होती, त्यास काही जाता आले नाही, नंतर ध्वजवंदन झाले व त्यापाठोपाठ ५ वाजण्याच्या सुमारास ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन झाले. त्याला मात्र वेळेत पोचलो. ग्रंथप्रदर्शन प्रचंड मोठे आहे. जवळपास ४०० स्टॉल्स आहेत.
नंतर एका मंडपात काही ज्येष्ठ साहित्यिकांचा सत्कार मा. सुशिलकुमार शिंदे ह्यांच्या हस्ते झाला. मधु मंगेश कर्णिक, रा. ग. जाधव आदि साहित्यिकांना प्रत्यक्ष बघता आले. तिथे मात्र जास्त न थांबत ग्रंथप्रदर्शन बघण्यास प्राधान्य दिले.
आता उद्यापासून परिसंवाद, निमंत्रितांचे कवीसंमेलन, बहुभाषिक कविसंमेलन, मुलाखती, अभिजात कथावाचन, कथाकथन, असा भरगच्च कार्यक्रम तीन दिवस चालणार आहे.

स्वागताध्यक्ष पी डी पाटील ह्यांनी प्रचंड खर्च केल्याचे जाणवते आहे. संमेलनस्थळाचे प्रवेशद्वार, मुख्यमंडप, उपमंडप, ग्रंथदालन, भोजनगृह सारेच काही नेत्रदीपक झाले आहे.

मराठी साहित्यप्रेमीसाठी हा एक मोठा सोहळा असतो. आता अनेकांना अशा सोहळ्याबद्दल आक्षेप असेलही तो आपण सोडून देऊ. मिपाकरांसाठी हा सोहळा तितकाच मोठा असेल असे मला वाटते. अनेक मिपाकर या साहित्य संमेलनाला हजेरी लावतील. अनेक कार्यक्रमाचा आस्वाद घेतील. दैनिकातून बर्‍याच गोष्टी वाचायला मिळतीलच परंतु थेट कार्यक्रमाला उपस्थित राहुन कोणता परिसंवाद चांगला झाला ? कोणाची कविता कशी होती ? मुलाखत कोणाची रंगली ? मराठी साहित्यातील विविध प्रवाहांची चर्चा कशी झडली ? अध्यक्षीय भाषण कसं होतं ? या आणि विविध साहित्यिक गोष्टींची चर्चा या निमित्ताने मिपावर व्हावी, श्रोता म्हणुन आपला अनुभव मिपाकर इथे लिहितील म्हणुन हा काथ्याकूट प्रपंच. तेव्हा उद्यापासून सुरु होणार्‍या सांस्कृतिक सोहळ्याबद्दल आपण या धाग्यावर लिहित राहू सर्वांना मकर संक्रातीच्या खुप खुप शुभेच्छा.

अ.भा.साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळावर कार्यक्रम पत्रिका दिलेली आहे.

सोहळ्याची आज मी घेतलेली काही छायाचित्रे (भ्रमणध्वनीद्वारे घेतलेली असल्याने स्पष्टतेच्या मर्यादा आहेत)

१. संमेलनस्थळाचा प्रमुख मार्ग
a

२. रसिकजनांची गर्दी
a

३. ही दोन्ही ग्रंथदालने आहेत.
a

४. बोधचिन्ह
a

५. एक प्रतीकृती
a

६. ज्ञानबा
a

७. तुकाराम
a

८. माझी ग्रंथप्रदर्शनातली आजची किरकोळ खरेदी
a

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

15 Jan 2016 - 10:04 pm | यशोधरा

मस्त!

जरा जळजळ होतेय वाचून.फार इच्छा होती एकदा तरी साहित्य संमेलन अनुभवावे .
पुस्तक प्रदर्शन कसे वाटले?

प्रचेतस's picture

15 Jan 2016 - 10:14 pm | प्रचेतस

खूपच छान आणि खूपच भव्य आहे.
कॉन्टिनेन्टल, मॅजेस्टिक, मेहता अशाविविध प्रकाशन संस्था, अक्षरधारा, साहित्यदर्शन, ज्ञानगंगा अशा प्रदर्शन संस्था, बुकगंगा, डेलीहंट असे ऑनलआईन पुस्तक विक्रेते, मराठवाडा, विदर्भ आदी साहित्य परिषदा, महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळ, नॅशनल बुक ट्रस्ट, महानुभव साहित्य मंडळ अशा संस्था आणि त्यांची दुर्मिळ पुस्तके अशा विविध संस्थांच्या दालनांनी सजलेले पुस्तकांचे सुमारे ४०० स्टॉल्स आहेत. एकाच फेरीत पाहए शक्य होणार नाही इतके प्रचंड आहे.

स्रुजा's picture

15 Jan 2016 - 10:19 pm | स्रुजा

अरे वा.. मी ९वीत की १० वीत असताना गेले होते साहित्य संमेलनाला. पुस्तक प्रदर्शन तेंव्हा ही भव्य च होतं. त्यानंतर आताच छायाचित्रं बघायला मिळतायेत. खरंच बराच खर्च केल्याचं जाणवतंय. छान समयोचित धागा, आता ३ दिवस निदान तुम्हा सर्वांतर्फे तरी हजेरी लावता येईल.

मुक्त विहारि's picture

15 Jan 2016 - 10:09 pm | मुक्त विहारि

आजकाल, साहित्य संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणूकी मुळे गाजायला लागल्यामुळे, इथे जाणे नकोसे वाटते.

पैसा's picture

15 Jan 2016 - 10:12 pm | पैसा

कार्यक्रमांपेक्षा पुस्तक प्रदर्शनात जास्त इंटरेस्ट असतो. कितीही वेळ घालवता येईल तिथे!

पद्मावति's picture

15 Jan 2016 - 10:14 pm | पद्मावति

मस्तं वृत्तांत.

कविता१९७८'s picture

15 Jan 2016 - 10:18 pm | कविता१९७८

वाह , मस्त

चांदणे संदीप's picture

15 Jan 2016 - 10:21 pm | चांदणे संदीप

मी १७ तारखेला कविकट्टा कार्यक्रमात इथे मिपावरच प्रकाशित केलेली "अंबाडा" ही कविता सादर करणार आहे.

सम्मेलनपूर्व सम्मेलनातही माझा सहभाग होता!

मिपाकरांपैकी कोणी तिथे असल्यास कळवा. भेटूयात.

@प्रचेतस: तुम्हाला भेटायची खूप उत्सुकता आहे. शक्य असल्यास गरीबाला दर्शन द्या तिथे रविवारी!

धन्यवाद,
Sandy

प्रचेतस's picture

15 Jan 2016 - 10:26 pm | प्रचेतस

ग्रेट.
रविवारी भेटूच. माझा भ्रमणध्वनी क्रमांक व्यनि करतोय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jan 2016 - 10:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खुल्या कवी संमेलनात आहात की निमंत्रितांच्या ?

-दिलीप बिरुटे

तुम्ही सम्मेलनात सादर केलेली कविता इथे पण लिहाल का?

कपिलमुनी's picture

18 Jan 2016 - 4:59 pm | कपिलमुनी

अंबाडा
बहुधा हीच कविता

चांदणे संदीप's picture

18 Jan 2016 - 5:11 pm | चांदणे संदीप

सही पकडे है!

Sandy

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jan 2016 - 10:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वल्ली सॉरी प्रेचेतस मस्त धागा. छायाचित्रही मस्तच. साहित्य संमेलन एक उत्सव असतो. गावाकडे जशा जत्रा भरतात त्या प्रमाणे मला हा उत्सव वाटतो. मला साहित्य संमेलनातल्या गोष्टी आवडतात त्या म्हणजे उद्घाटन आणि मान्यवरांची भाषणं. कवी संमेलन, त्या नंतर पुस्तक प्रदर्शन. खुप दुर्मीळ पुस्तकं घेता येतात. लेखकांच्या भेटी होतात त्यांना जवळुन पाहता येतं. पुणे विद्येचं माहेरघर तेव्हा येथील अनुभव वेगळा ठरावा असे वाटते. जवळपास पाचशे पानांचं अध्यक्षीय भाषण आणि गेल्या पन्नास वर्षात असं अध्यक्षीय भाषण झालं नसेल अशा बातम्यांनी माझी उत्सुकता वाढली आहे.

प्रचेतस मोठेपणा तुम्हाला नै सांगायचा तर कोणाला सांगायचा. साहित्य संमेलन अध्यक्ष निवड होते ना त्याचा मी मतदार आहे. आमच्या मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद या घटक संस्थेच्या कार्यकारणीचा मी सदस्य आणि मतदार आहे. डॉ. श्रीपाल सबनीसांनी मला फोनही केलेला आणि आम्ही बोललोही आहे. आता ते प्रत्यक्ष भेटीत ओळख देतील की माहिती नाही. पण साहित्य संमेलनाचा आपण एक घटक असतो तो आनंद वेगळा असतो. साहित्य संमेलनात मी हजेरी लावत असतो. पुण्यात मी जर हजेरी लावली तर काही मतं इथे धाग्यात लिहिनच. धन्स.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

15 Jan 2016 - 10:37 pm | प्रचेतस

काय सांगताय सर, जबरीच. संमेलनाध्यक्ष निवडणूकीतलं राजकारण तुम्ही जवळून पाहिलेलं असणार. ह्यावरही लिहा.
अगदी मोजक्या हजार बाराशे मतदारांपैकी तुम्ही एक आहात हे पाहून खरंच छान वाटलं.

बाकी सबनीसांचं लिखित भाषण ५०० नव्हे तर जवळपास पावणेदोनशे पानांचे आहे. ते फ़क्त छापील आवृत्तीतच मिळेल. उद्या उद्घाटन समारंभातील त्यांचे भाषण हे लिखित नसून ते वेगळे उत्स्फूर्त भाषण करणार आहेत असे समजते.

>>> संमेलनाध्यक्ष निवडणूकीतलं राजकारण तुम्ही जवळून पाहिलेलं असणार. ह्यावरही लिहा.

नाय नाय. आत्ता आपण काय बोलायचं नाय. बघायचं, शिकायचं. आणि समजून घ्यायचं. मी नाय लिहिणार काही.
बाकी, डॉ. सबनीस तसे हुशार आहेत. साहित्यातील विविध प्रवाह, लेखकांकडून काही अपेक्षा, समाज आणि साहित्य यावर काय लिहितात त्यावर आपण इथे चर्चा करुच. बाकी, कालच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची त्यांच्या छापील भाषणाची तयारी चालु आहे असं वाचलं होतं. बाकी, ते उत्स्फुर्त भाषण करणार म्हणजे दैनिकांना काही तरी नवं खाद्य सनसनाटी बातमी पुरवणार यात काही शंकाच नाही. बाकी, धाग्यावर लिहित राहुच.

-दिलीप बिरुटे

स्रुजा's picture

15 Jan 2016 - 10:42 pm | स्रुजा

वाह !! तुमचे मतदान पद्धती बद्दल आणि साहित्य संमेलनाच्या पडद्यामागच्या प्रचंड नियोजनाबद्दल अनुभव वाचायला आवडतील.

संदीप चांदणेंचं पण अभिनंदन !

एस's picture

15 Jan 2016 - 10:47 pm | एस

+१

संदीप भौ अभिनंदन. रेकाॅर्ड करा कविता वाचन आणि इथे टाका जमलं तर.
पुस्तक प्रदर्शनाचे वर्णन वाचून फारच जळजळ वाढली :(
रविवारी चक्कर मारावी तर फार गर्दी असेल :(

बोका-ए-आझम's picture

15 Jan 2016 - 10:48 pm | बोका-ए-आझम

पुस्तक प्रदर्शन हे एकमेव कारण आहे साहित्य संमेलनाला जायचं. मुंबईत झालेल्या संमेलनातली पुस्तकं अजून वाचतोय.
संदीपभौ, अभिनंदन. कविता जरुर मिपावर टाका!
प्रचेतसभौ, ते दिव्य कुरआन विनोबा भाव्यांचं आहे का?

प्रचेतस's picture

15 Jan 2016 - 10:55 pm | प्रचेतस

भाव्यांचं नाही. मला वाटते भाव्यांनी कुरआनचे भाषांतर केले नसून प्रेषितांवर आणि इस्लामवर काही लिखाण केले होते.

मी घेतलेले कुरआन इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्टचे असून सय्यद अब्दुल मौदुदी ह्यांनी भाषांतरीत केलेले आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jan 2016 - 11:15 pm | अत्रुप्त आत्मा

इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्टचे असून सय्यद अब्दुल मौदुदी ह्यांनी भाषांतरीत केलेले आहे.

हेच आत्ता सर्वोत्तम आहे,मराठी भाषान्तरितात! ग्रेट! उत्तम खरेदी.

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jan 2016 - 11:11 pm | अत्रुप्त आत्मा

खूप इच्छा असूनही कुठेहि येता येणार नाहीये! :(
पण तरीही इथे बघून समाधान मिळणार आहे, म्हणूनच हा धागा काढल्या बद्दल आगोबा चे आभार!

नक्की कुठे आहे?पिंपरी/चिंचवड?

प्रचेतस's picture

16 Jan 2016 - 6:22 am | प्रचेतस

पिंपरी.
एचए मैदान.

गुलजारसाहेबांचे भाषण सुरू आहे. त्यांनी विविध भाषांतील साहित्याच्या देवाणघेवाणीच्या आवश्यकतेवर भर दिलाय.

नांदेडीअन's picture

16 Jan 2016 - 2:18 pm | नांदेडीअन

आचार्य अत्रे नाट्यगृहात कथावाचन आहे अडीच वाजता.

प्रदीप साळुंखे's picture

16 Jan 2016 - 3:49 pm | प्रदीप साळुंखे

श्रीपाल सबनीस यांच भाषण ऐकलं,छान बोलले ते.
संतांची जातीय विभागणी,उजवे-डावे,प्रतिगामी-पुरोगामी-विद्रोही वगैरे वगैरे.

आज नेमके ऑफिसमध्ये महत्वाचे काम असल्याने दुर्दैवाने अध्यक्षीय भाषण पाहता आले नाही.
आता निघालोच आहे तिथे जायला.

श्रीपाल सबनीस यांची साहित्यिक कामगिरी नक्की काय आहे? यापूर्वी कधीच त्यांचे नावही ऐकलेले नाही.

संस्कृती समीक्षेची तिसरी भुमिका
फारस आवडल नसल्याने पुर्ण वाचुन संपवु शकलो नाही.
बाकी श्रावण मोडक यांच सबनीस नावाच व्यक्तीचित्रण तुम्ही वाचल असाव.
ते बाकी छान आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Jan 2016 - 10:26 pm | बिपिन कार्यकर्ते

भाषण भारी होते, पहिल्यांदाच साहित्य संमेलन अनुभवतो आहे. थोड्या फार रेकॉर्डींग सुद्धा केल्या आहेत

पुणेकरांचा नेहमी हेवा वाटतो तो याचसाठी.
साहित्य आणि साहित्यिक यांच्या मांदियाळीत विहार करतात बेटे.
विशेष वृ मिपाकरांकडून ऐकण्यास उत्सुक

प्रचेतस सरांच्या धाग्याने पुस्तक प्रदर्शनाला जाण्यास प्रवृत्त केल्या गेले आहे!
उद्याच जाणार!

तिमा's picture

16 Jan 2016 - 7:51 pm | तिमा

घरबसल्या ताजा वृत्तांत वाचायला मिळणार, हे वाचून आनंद झाला. मुख्य म्हणजे तो वृत्तांत वर्तमानपत्रीय नसेल, तर अस्सल प्रचेतसी असेल.

सचिन कुलकर्णी's picture

16 Jan 2016 - 8:32 pm | सचिन कुलकर्णी

प्रचेतसचे नाव बघितले आणि मोठ्या अपेक्षेने धागा उघडला आणि (अर्थातच) अजिबात निराशा झाली नाही. घरबसल्या संमेलनाचा वृत्तांत मिळणार हे वाचून छान वाटले.

आजचे अध्यक्षीय भाषण दूरदर्शनवरून ऐकले आणि ते चक्क आवडले.

उगा काहितरीच's picture

16 Jan 2016 - 8:45 pm | उगा काहितरीच

साहित्य संमेलनाविषयी अजून वाचायला आवडेल .

चांदणे संदीप's picture

16 Jan 2016 - 10:30 pm | चांदणे संदीप

सकाळी साडेदहाला बायकोला 'डि-मार्ट ला थोडी खरेदी करून येऊया' असे म्हणून संमेलनाच्या ठिकाणी घेऊन गेलो. त्याशिवाय ती आलीच नसती! ;-) मग संमेलनच्या अमाप गर्दी असलेल्या मुख्य दरवाजावर जाऊन पोचलो आणि तिच्या लक्षात आले, पण तोपर्यंत उशीर झालेला! :) जीतम! जीतम! जीतम!

मग प्रचेतस यांनी इथे दिलेले सारे फोटो एक एक करुन प्रत्यक्ष पाहिले. माझा सहभाग असलेला कविकट्टा हा कार्यक्रम नेमका कुठे असणार ते शोधून काढले. तिथे जाऊन जरा चौकशी केली तर समजले की आंगतुकांना(नावनोंदणी न करता आलेले) आज आधी संधी दिलेली आहे, कविता वाचण्याकरिता! मग तिथेच बाहेर आजच्या नियोजीत कवींची आणि त्यांच्या वेळेची एक यादी लावण्यात आली. उद्याची यादी तिथे उद्या लागेल. ज्यात मला किती वाजताची वेळ दिली आहे ते समजेल.

दरम्यान, मुख्य मंडपात श्रीयुत शरदचंद्रजी पवार साहेबांचे उत्स्फूर्त नर्मविनोदी आणि खुसखुशीत(तसे ते बऱ्याचदा असतेच!) असे भाषण सुरू होते. पण मला त्यात रस आणि तिथे बसायला जागा नसल्याने आम्ही जोडीने ग्रंथप्रदर्शन पाहायला गेलो.

पण पहिल्या दुसऱ्याच स्टॉलवरच मी पुस्तकात गुंतून पडतोय असे दिसताच हिने पायांच्या संप आधिक पोटातल्या कावळ्यांची वाढती संख्या अशा कारणांना पुढे करून मला तिथून खाण्याच्या मंडपाकडे नेले.

हा विभागही बऱ्यापैकी विस्तृत आहे! मग तिथे असलेल्या बऱ्याच स्टॉलवाल्यांना हिने नाराज केले नाही आणि आम्ही यथेच्छ खादाडी केली! म्हणजे ते दृश्य असे होते की, जणू एखादी माहेरवाशीण बऱ्याच दिवसांनी सासरहून माहेराला आली आहे आणि गावतल्या प्रत्येक गल्लीतून तिला खुशाली विचारणारी एक हाक येतीये आणि ती त्या प्रत्येक उंबऱ्यावर घटकाभर थांबून गुजगोष्टी करीत घराकडे निघाली आहे!!

या सगळ्यात फ्रूट प्लेट, शेगांवची प्रसिद्ध(च्या नावाखाली!) कचोरी, महाराष्ट्र स्नॅक्स(असं लिहिलेल तिथे) थालीपीठ, खमंग भाजलेला आणि शेव भुरभुरवलेला हुर्डा आणि शेवटी एक ग्लास थंडगार ताक असे सारे जिन्नस पोटात ढकलून आम्ही उभयतांनी तिथून काढता पाय घेतला.

बायकोला घरी सोडून मी पुन्हा 'पडद्यांची' चौकशी करायच्या नावाखाली बाहेर पडलो आणि संमेलनाच्या ठिकाणी बरोबर साडेचारला पोचलो. आता इथे गुलजार यांची मुलाखत होती. पण माझ्या एका मित्राला शोधण्यात ती मुलाखत संपून गेली! :( पण नंतर त्यांच्या दोन-चार रचना अगदी पुढे बसून निवांत ऐकता आल्या! शेवटची त्यांची रचना एका नेत्याच्या जलशात आलेल्या गरीब माणसाची होती जी मी माझ्या मोबल्यावर व्यवस्थित रेकॉर्ड करून घेतली.

मग माझा मित्र आणि मी ग्रंथप्रदर्शनाच्या एका बाजूच्या मंडपात गेलो. बराच वेळ फिरूनही त्या अर्ध्या प्रदर्शनाच्या अर्ध्या भागासही आम्ही पूर्ण करू शकलो नाही! शिवाय, हवी असणारीच पुस्तके महाग असतात याचा पुन्हा प्रत्यय आला आणि आम्ही तिथून आज काहीही न घेता बाहेर पडलो. :(

गुलजार यांना याची डोळा भरून पाहून अन् ऐकून घेतले. भारलेल्या क्षणात होतो मी तेव्हा! शेवटी त्यांना रेंजरोव्हरमधून जाताना पाहिलं आणि मी माझ्या CD100 ला किक मारली.

इतिवृत्तांत!

आता उद्याच्या माझ्या काव्यवाचनाची तयारी करतो. धन्यवाद!

Sandy

प्रचेतस's picture

16 Jan 2016 - 11:36 pm | प्रचेतस

मस्त वृत्तांत.
बाकी मी तुम्हाला सोलापूरहून येणारे आहात असे समजत होतो. तुम्ही तर चक्क चिंचवडकर निघालात की. उद्या साधारण दोनेक पर्यंत संमेलनस्थळी पोहोचतच आहे.

चांदणे संदीप's picture

16 Jan 2016 - 11:59 pm | चांदणे संदीप

सोलापूरवरनं येऊन लय टाईम झालाय. म्हंजी बगा २३-२४ वर्स तरी झाल्येच! ;-)

Sandy

यशोधरा's picture

16 Jan 2016 - 11:40 pm | यशोधरा

मस्त लिहिलाय वृ.

किती वाजता आहे तुमचे काव्यवाचन?

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Jan 2016 - 12:11 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर वृतांत ! अजून पुढचे भाग टाका आणि फोटो म्हणजे आम्हाला घरबसल्या त्यांचा आनंद घेता येईल.

कंजूस's picture

17 Jan 2016 - 6:08 am | कंजूस

आज गर्दी फार होणार.कुंभमेळ्यासारखी.

चंदने Sandy वृ मस्त.मी असल्या ठिकाणी शक्यतो एकटाच जातो.तिथे जे आनंदाने, वेळ काढून आले असतील त्यांच्याशी गप्पा करायच्या.

चांदणे संदीप's picture

17 Jan 2016 - 7:21 am | चांदणे संदीप

कंजूसकाका तुमचं बरोबर आहे. आवड आणि जाण असणाऱ्या लोकांसोबतच ठराविक गोष्टी केल्या की त्याचा आनंद आधिकच मिळतो. जसे की, एखादे पुस्तक शेअर करणे, एखादा क्लासिक सिनेमा पाहणे, गडकिल्ले किंवा प्राचीन स्थळांना भेट देणे इ.

हे पुढचे लक्ष्मीकांत बेर्डे स्टाईलने वाचा:
काय सांगू आता
तुम्हाला माझी व्यथा
बायको नावाची बेडी
सदा पाय ओढी

म्हणून तर डि-मार्ट आणि पडद्यांची चौकशी वगैरे क्लृप्त्या योजाव्या लागतात! ;-)

Sandy

लै डयांजर किस्सा झाला आत्ता. संध्याकाळी टंकतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jan 2016 - 3:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:/

-दिलीप बिरुटे

चांदणे संदीप's picture

17 Jan 2016 - 5:55 pm | चांदणे संदीप

मी सुद्धा एका वेगळ्याच किश्श्याच्या मधोमध आहे आत्ता! :(

रात्री निवांत टंकतो!

Sandy

अरे, लवकर सांग. आपले धनाजीराव संमेलनात जखमी झाले अशी अंतर्गत बातमी आली. ठीक आहे ना सर्व आता?

अजया's picture

17 Jan 2016 - 5:30 pm | अजया

आमचीही क्षणचित्रे!
अकरा वाजता प्रदर्शन स्थळीच थेट पोहोचलो.कारण धाग्यात उल्लेख केलेले पुस्तकांचे अनेक स्टाॅल्स! हे म्हणजे खादाड माणसाला बार्बेक्यु नेशन ;)
सर्वच स्टाॅलवर अमाप गर्दी होती.एक छान गोष्ट म्हणजे तरुण मुलं भरपूर पुस्तकं खरेदी करताना दिसली.
बाजीराव मस्तानी सिनेमामुळे ना सं इनामदारांना बरे दिवस आले असल्याचे सर्वत्र अगदी वर असणाऱ्या त्यांच्या पुस्तकांवरुन दिसत होते.गोडशांचे बाजीराव मस्तानी पण रिप्रिंट होऊन झळकत होते!
जाताना वाटेत आम्ही मिपावरील आय डीचे नाव घेऊन बडबडत जात असताना एका ताईंनी आम्हाला तुम्ही मिसळपावच्या का असे विचारून पकडले! आमची आय डी नावं त्यांना माहित होती.त्या वामा असूनसुद्धा! यापुढे मिपाचं कोणीही कुठेही भेटु शकतं म्हणून तोंडाला कुलूप घालून पुढची पुस्तक खरेदी केली!
अक्षरधाराच्या स्टाॅलला सर्वाधिक गर्दी होती.तिथे अरुंद जागेत नुसतीच पुस्तके चाळणार्या लोकांनी वैताग आणला होता.स्पिकरवर त्याच वेळी बहुधा कवि संमेलन सुरु होते.कोणा अज्ञात कवीने सुरेख कविता वाचली.
मौजेच्या आणि नॅशनल बुक ट्रस्टच्या स्टाॅलने निराशा केली.फारशी पुस्तके नव्हती.
समोरच्या दालनात माजी सासं अध्यक्षांच्या पुस्तकांचे वेगळे दालन होते.त्या माजी अध्यक्षांची नावे बघून आणि आता पैशावर चालणारे साहित्य संमेलन आणि वादग्रस्त अध्यक्ष (नेमकी त्याचवेळी पालखी गेली म्हणे! अध्यक्ष पैलवानांच्या संरक्षणात होते!)आणि त्यांची कोण वाचतं ही पुस्तकं टाईप ग्रंथसंपदा बघून विषाद वाटला :(
एक साहित्यिक झोळ्या आणि मगचा स्टाॅलपण छान होता.
बर्याच पुस्तकांची मनसोक्त खरेदी झाली हा मूळ हेतू बर्यापैकी साधला गेला याला कारण हा धागा! यातला अनेक स्टाॅलचे उल्लेख वाचून गेल्याशिवाय राहावले नाही एवढे खरे!

माहितगार's picture

17 Jan 2016 - 6:23 pm | माहितगार

जाताना वाटेत आम्ही मिपावरील आय डीचे नाव घेऊन बडबडत जात असताना एका ताईंनी आम्हाला तुम्ही मिसळपावच्या का असे विचारून पकडले! आमची आय डी नावं त्यांना माहित होती.त्या वामा असूनसुद्धा! यापुढे मिपाचं कोणीही कुठेही भेटु शकतं म्हणून तोंडाला कुलूप घालून पुढची पुस्तक खरेदी केली!

मायबोली आणि मिपाचे सर्वाधीक वाचक चिंचवडातून येतात याची आकडेवारी गूगलट्रेंडच्या साहाय्याने विश्लेषणकरून अस्मादिकांनी मागे या धाग्यातून मांडली होती.

अजया's picture

17 Jan 2016 - 6:48 pm | अजया

:) हो की!

अविनाश लोंढे.'s picture

17 Jan 2016 - 6:08 pm | अविनाश लोंढे.

धन्यवाद … फोटो अन मांडणी आवडली … :)

दिपक.कुवेत's picture

17 Jan 2016 - 6:18 pm | दिपक.कुवेत

धागा आणि प्रतिसाद. असं वाटतय लाईव्ह संमेलनच सुरु आहे.

संमेलनाला अफाट गर्दी होती. अजूनही वाढतेच आहे. मिपाकर संदीप चांदणेचा क्रमांक २३९ होता पण आम्ही ३३८ क्रमांकापर्यंत काव्यवाचन आल्यावर पोहोचलो. अगदी थोडक्यात त्यांना काव्यवाचन करताना पाहायची संधी हुकली. मग पुस्तकप्रदर्शनाच्या दालनांतून भटकलो. अक्षरधारावाल्यांचे दालन लहान आणि गर्दी बेक्कार. मॅजिस्टिक आणि मौज यांच्या दालनांमध्येही गर्दी होती. सूट फारच कमी देत होते. मेहता पब्लिशिंग हाऊसच्या दालनात काही छान पुस्तके मिळाली.

तरुणाई भरपूर होती आणि काही अमराठी भाषिकही होते. मुख्य कक्ष फारच मोठा आहे. आणि सगळा भरला होता इतकी गर्दी. बाकीचे दोन छोटे कक्षदेखील चांगले भरले होते व प्रेक्षक दालनांबाहेर उभे राहून परिसंवाद ऐकत असल्याचे दृश्य दिसले.

पी. डी. पाटलांचे संयोजन नेटके आहे. श्रीमंत संमेलन वाटले. स्वच्छता व पाण्याची सोय ठिकठिकाणी केलीय. पार्किंगची व्यवस्था मात्र आता कोलमडतेय असे वाटले.

खाद्यपदार्थांचे स्टॉल फारच महागडे वाटले!

प्रसाद भागवत's picture

17 Jan 2016 - 7:35 pm | प्रसाद भागवत

कट्यार ...आणि नटसम्राट या दोन रिमेक्स च्या अभुतपुर्व यशानंतर हमखास रंगणारे तिसरे एक नाटक नवीन संचात आपल्यासमोर....... भाऊबंदकी !!!

http://www.loksatta.com/lekha-news/vishwas-patil-lust-for-lalbaug-novel-...

खरेतर या धाग्याच्या मुळ विषयाशी म्हणजे 'मराठी साहित्य संमेलनाशी' याचा संबंध नाही, पण 'मराठी साहित्याशी' नक्कीच आहे हा बादरायण संबंध लावुन 'वैयक्तिक धुणी मिपाच्या सार्वजनिक पाणवठ्यावर धुवायला नको' ही भावना प्रबळ झाल्याने येथे प्रतिक्रियेत हा मुद्दा मांडला आहे. क्षमस्व..

पैसा's picture

17 Jan 2016 - 8:24 pm | पैसा

या लेखावरून सुरेश पाटलांना अजून त्रास होऊ शकतो.

माहितगार's picture

17 Jan 2016 - 10:04 pm | माहितगार

सुरेश पाटीलांची हवा संमेलनातील राजकारण्यांच्या घरी लागेल, तर महाराष्ट्राला यल्लम्मा पावण्याचा योग येईल का ? पण असे कधी त्या क्षेत्रात होताना दिसत नाही.

-प्रचेतस भौ अवांतरासाठी क्षमस्व.

प्रसाद भागवत's picture

17 Jan 2016 - 8:17 pm | प्रसाद भागवत

..............ही भावना प्रबळ झाल्याने नवीन धागा काढ्ण्याऐवजी येथे प्रतिक्रियेत हा मुद्दा मांडला आहे. क्षमस्व..असे वाचावे.

दोन ड्यान्जर किश्शांच्या प्रतिक्षेत.

शैलेन्द्र's picture

17 Jan 2016 - 10:10 pm | शैलेन्द्र

मित्रा , पुरोगामी खरेदीबद्दल शुभेच्छा रे..

प्रचेतस's picture

17 Jan 2016 - 10:31 pm | प्रचेतस

बिरुटे सर कुठल्याश्या परिसंवादाला गेले होते आणि सह्याद्रीबुक्सच्या स्टॉलवर मी आणि धन्या पुस्तकं बघत उभे होतो. अचानक खुप मोठ्ठा आवाज ऐकू येउ लागला आवाजाच्या दिशेने पाहू लागताच समोरील बाजूने मंडपाचे आख्खे छतच वर वर उचलले जात असल्याचे दिसू लागले. संपूर्ण मंडपच कोसळण्याची चिन्हे दिसू लागली. प्रतिक्षिप्त क्रियेने क्षणार्धात पळापळ सुरु झाली. डाव्या बाजूचे ओपनिंग अगदी जवळ असल्याने आम्ही लगेच त्या दिशेने पळालो. मी पळता पळता मागे वळून पाहिले तर पत्रे हवेतून उडत उडत आमच्याच दिशेने येत होते. परत थोडा पळालो. पाठीमागे पत्रा पडल्याचा जोरात आवाज ऐकू आला. माझ्या पाठीमागे असलेल्या एका माणसाच्या हातावर जोरात लागलं होतं बहुधा फ्रैक्चर झाले असणार. तो प्रचंड घाबरलेला होता आणि 'आई, माझा हात मोडला' असं अक्षरश: गुरासारखं ओरडत चालला होता. पुढे पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेउन त्याला उपचारासाठी नेलं. तर त्याच्या पाठोपाठ चपल अर्धवट निघाल्यामुळे धन्या पडला. त्याच्या पाठिमागची लोकं त्याला तुडवत पळाली ह्यात त्याची प्यांट गुडघ्यावर फ़ाटली. दोन्ही गुडघे सोलवटले गेले तरर तळहात रक्ताळले, पण थोडक्यात निभावलं..पुढे मग तिथल्या वैद्यकीय सेवेच्या ठिकाणी जाऊन धन्याच्या जखमेवर ड्रेसिंग करून घेतलं तिथेच २ माणसांना हॉस्पिटल मधे एडमिट केल्याचं कळलं. मग काय जरा थोडावेळ मुख्य मंडपात बसून परत ग्रंथदालनात शिरलो. नंतर मग नाखुकाका आले मग यशोधरा आली, सर, धन्या निघून गेले आणि पुढे अचानक गणामास्तर भेटला.
तत्पूर्वी संदिप चांदणेला भेटून छान वाटले..आपला एक मिपाकर संमेलनात कविता सादर करतोय ह्याचा अभिमानही वाटला.

पैसा's picture

17 Jan 2016 - 10:33 pm | पैसा

नशीबच थोडक्यात निभावले.

आता गोव्याच्या स्टॉलचा किसा लिही =))

प्रचेतस's picture

17 Jan 2016 - 10:40 pm | प्रचेतस

हाहा.
गोव्याचा स्टॉल पाहिल्यावर यशोधरा एकदम खूश. स्टॉलवाल्या काकांनी हे पाहून तुम्ही गोव्याच्या का वैगेरे चौकशी केली मग काय दोघेही कोकणीत बोलायला लागले. आम्ही आणि आजूबाजूचे लोक अवाक..काकांनी लगेच काजू आणून दिले (पैताईकडचे काजू अजूनही मिळालेले नाहित हे येथे लक्षात घेणे)
मग तिथे काही कोकणी पुस्तके घेतली गेली. धमाल आली.

पैसा's picture

17 Jan 2016 - 10:49 pm | पैसा

अन्याच्या लग्नात तुम्ही पळून गेलात मग मी नेलेले काजू परत आणले. तुला नंतर फोन केला होता की! =))

प्रचेतस's picture

17 Jan 2016 - 10:50 pm | प्रचेतस

=))
हो पण नुसत्या फ़ोननं काय होतंय, काजू कुठे मिळालेत?

यशोधरा's picture

17 Jan 2016 - 10:51 pm | यशोधरा

हो, खरेच मज्जा आली =)

श्यामची आई हे पुस्तक कोकणी भाषेत बघून मजा वाटली.
त्या काकांनी काजू आणून दिले तसे मी लग्गेच मी गोव्याची होऊन, बघा आमच्या गोव्याकडे कसे कवतिक होते, तुमच्या पुण्यात असे आहे का, असे विचारून घेतले!! ते ऐकून शेजारी उभ्या असलेल्या एक मौशी खूप आश्चर्यचकित होऊन हसल्या! त्यांचे लक्ष काजूकडे होतेच पण तोवर मी पुणेरी बनले होते =))

पैसा's picture

17 Jan 2016 - 10:55 pm | पैसा

=))

पिशी अबोली's picture

18 Jan 2016 - 12:37 am | पिशी अबोली

ब्रेंडा मिनेझिसनी अनुवादित केलेलं का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Jan 2016 - 10:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुदैवाने धन्याला फार इजा झाली नाही. पण...

समोरील बाजूने मंडपाचे आख्खे छतच वर वर उचलले जात असल्याचे दिसू लागले.

म्हणजे नक्की काय झाले ?

यशोधरा's picture

17 Jan 2016 - 10:40 pm | यशोधरा

पत्रे उडाले आकाशी!

चार मिपाकर भेटले म्हणून पत्रे उडून जाण्याएवढा दंगा !!!!!!!!!

(खरंच थोडक्यात निभावलं म्हणायचं !)

नाखु's picture

18 Jan 2016 - 8:55 am | नाखु

सदरहू स्थळी भेट दिली...

पत्रे नक्की कश्याने उडाले असावेत यावर एक कौल काढावा काय असा कार्यकारीणीचा विचार चालू आहे!

कार्यकारीणीत कोण आहे याची चौकशी थेट प्रचेतस याचेकडे करावी (आप्ल्या जबाबदारीवर)

संमेलन वारकरी मिपाकर नाखु

ता.कः आजही संध्याकाळी कंपनीतून जातान एक्डाव भेट देणार आहे संमेलनाला


अतिदूरवांतर : दिलखुलास बिरुटे सरांबरोबर एका ऐतीहासीक्,एका प्राचीन आणि एका वैज्ञानीक स्थळाला भेट दिली त्याबद्दल नंतर कधीतरी.
ही धन्या-वल्लींसोबतच्या त्या मिनि कट्ट्याची जाहीरात आहे असे समजू नये असे नाही असे नाही.

एस's picture

18 Jan 2016 - 8:14 am | एस

अरे बापरे!

तो छत कोसळल्याचा भाग पाहिला. आम्ही नंतर पोहोचलो म्हणजे.

कंजूस's picture

18 Jan 2016 - 7:46 am | कंजूस

#काय म्हणता धन्याला ब्रम्हास्त्र आपलं साहित्यास्त्र लागलं? धन्य आहे.संजिवनी सापडली का रुग्णालयात?
#यशोधरा-गोवा स्टॅालपाशी मिपाकर साक्षीदार होते हे बरं झालं. आमच्या गोव्याच्या भूमीत घट फुटती-----हे गायन झालं का?
#बाकी तो काजूचा हिशेब पैसाताई आणि चा (अमृततुल्य) पाजण्याचं पुणेकरांचं वचन एकदा पुरं करून टाका थिबाच्या ऐतिहासिक महालात.

छप्पर फाडके पुस्तकं मिळवली म्हणजे!
@मितान ,आपण नुकतेच बाहेर पडलो असू त्यावेळात, त्याचा तर परिणाम नसेल ना;)

चांदणे संदीप's picture

18 Jan 2016 - 8:30 am | चांदणे संदीप

माझा रविवारचा वृत्तांत एकदम एकदिवशीय आत्मकथेतच रूपांतरित व्हायला लागलाय! ;-)

त्यामुळे आज त्याला व्यवस्थित एडीट वगैरे करून फोटोसहित दुपारपर्यंत टाकतो!

Sandy

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Jan 2016 - 11:59 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाट पाहतोय.

कवी कट्टा या मंचावर कवितांचा अखंड यज्ञ चालु होता तिथे मी धन्या वल्ली chandanesandeep यांना शोधायला गेलो. गर्दी खुपच होती. मी थेट संचलन करणार्‍याजवळ गेलो आणि संदीप चांदणे यांच्या नावाचा पुकारा करायला लावला. पण, कविता वाचन होऊन आपले कवी मठ्ठा प्यायला निघुन गेलेले होते. कवींची भेट झाली ते काय लिहितात त्या नंतर पुन्हा उपप्रतिसाद त्यांना लिहितोच.

-दिलीप बिरुटे

चांदणे संदीप's picture

18 Jan 2016 - 2:03 pm | चांदणे संदीप

तर मंडळी, आजही (रवी. दि. १७/१/२०१६) सकाळी साडेदहाला घरातून सौ.ना बरोबर घेऊन निघणे झाले. आज मात्र डी-मार्ट किंवा पडद्याञ्चा आधार घ्यावा लागला नाही! कारण मी सरळ सांगितले की माझे काव्यवाचन आहे आज अखिल भारतीय साहित्य संमेलनात! मग, घाबरतो का काय! असो.

अकराच्या सुमाराला संमेलनस्थळी पोचलो. शनिवारच्या तुलनेत तिप्पट(अंदाजे) तरी गर्दी झालेली. काव्यकट्ट्याच्या ठिकाणी जाऊन माझी वेळ पाहून घेतली जी १२ ते १ च्या दरम्यान होती. मग पटापट फोन फिरवून मित्र, मैत्रिणी आणि घरची मंडळी यांना कळवून झाले. खोकला नरड्याचे दार ठोठावत असल्याने जरा काळजीत होतो. म्हणून मग एका मित्राला स्ट्रेप्सिल्स आणायला सांगितल्या. पण तो वेळेत'च' आल्याने गोळ्यांचा फायदा नाही झाला पण तो आल्याने व्हिडिओ करायचा मार्ग मोकळा झाला. :)
वडीलही तितक्यात येऊन जागा पकडून बसलेच होते. इथे अगदी अनपेक्षितपणे माझे शाळेतील मराठीचे शिक्षक श्री. सूर्यवंशी सर आपल्या परिवारासोबत आलेले दिसले! संमेलनाने असा सुखद धक्का मला दिला आणि सुमारे पंधरा वर्षानंतर गुरू-शिष्याची भेट झाली! सरांचा आशीर्वाद घेऊन मी कविता वाचायला गेलो.

कविता वाचत असताना
a

आयोजकांकडून सन्मान स्वीकारताना
b

काव्यवाचनाला चांगला प्रतिसाद मिळाला. मंचावरून उतरून परत जागेवर जात असताना बऱ्याच जणांनी हस्तांदोलनं केली. दोन मिनिटे सेलिब्रिटी झाल्याचाच फील आला ;-)

पुढे माझ्या सौ. ला माझ्या सोडून इतर कुणाच्याही कविता आवडत नसल्याने तिने उरलेल्या काव्यकट्टा कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचे लगेच जाहीर केले. त्याला अनुमोदन देण्याशिवाय पर्याय नव्हता. :( मग मी सौ., वडील, सपत्निक व छोट्याला सोबत घेऊन आलेला मित्र व ऑफिसातला एक मित्र आम्ही बाहेर येताच भेटलेला असे सात फुल १ हाफ पुस्तक प्रदर्शनाकडे वळलो. आणि इथे लगेच तो वर्ल्ड फ़ेमस पत्रे उडायची घटना घडली!

प्रदर्शनात माझ्यासाठी पुस्तके नाही घेऊ शकलो पण माझ्या छकुलीसाठी दोन मस्त भरपूर चित्र असलेली गोष्टींची पुस्तके घेतली. इथे ऑफिसमधली एक कलीग आणि तिची रूममेट येऊन मिळाली तसेच एक कॉलेजपासूनचा जीवश्च-कंठश्च मित्रही आला. आता इतके सगळे एकत्र फिरताना सारखे पुढेमागे होऊ म्हणून मग सर्वानुमते खाण्याकडे मोर्चा वळवण्याचे ठरवले. तिकडे आजमात्र कालच्यासारखी कुणाची हाकही आली नाही आणि आमच्या हिला साऱ्या दुकानदारांना समान श्रीमंत करायची संधीही मिळाली नाही. कारण अलोट भुकेलेला जनसागर!

तिथे थोडंफार खाऊन झाल्यावर मठ्ठा पितच होतो की एका माणसाने माझा हातच पकडला! दुर्मिळ पण सत्य गोष्ट! खुणेनेच विचारता तो मला ओढत ओढत त्याच्या मित्रांच्या कंपूमध्ये घेऊन गेला आणि तिथे त्या सर्वांनी मला कविता आवडल्याचे सांगितले तसेच एक फोटोही काढून घेतला. साऱ्यानी छोटी मुलाखतही घेऊन टाकली. हा दुसरा सेलीब्रीटी झाल्याचा अनुभव!

उरलेला मठ्ठा संपवतच होतो की एक कॉल आला. घेतला तर पलीकडून, 'प्रचेतस' एवढे ऐकल्यावर पाय ताबडतोब ते थांबलेले त्या ठिकाणी जायला निघाले. तिथवर जाईतो आमची पलटण विखुरली आणि मी, सौ., ऑफिसातली कलीग, तिची मैत्रीण आणि ऑफिसातला मित्र असे एवढेच जाऊन पोचलो. तिथे जाऊन पाहतो तर त्रिमुर्ती उन्हात उभी! अमर-अकबर-एंथनी आपलं ते प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर, प्रचेतस आणि सतीश गावडे. तिघांना पाहून उर फुटेस्तोवर आनंद झाला! सगांना लागल्याचे पाहून अतिशय वाईट वाटले व त्याची नैतिक जबाबदारी वगैरे घेणार होतो पण माझ्यासोबतच्या मंडळींचा विचार करून तो विचार बाजूला सारला. प्रा.डॉ.नी भेदक नजरेनेच मला जाळून टाकले आणि असा एक हुकूम दिला की त्याची अंमलबजावणी होईस्तोवर मला त्यांचा लेखच काय, प्रतिसाद वाचायचीही भीती वाटेल! :-/ प्रचेतस यांना प्रत्यक्ष पाहून खूपच आनंद झाला. त्यांनी मला त्यांच्या चाहत्यामध्ये स्थाण द्यावं ही इथे यानिमित्ताने मी त्यांना विनंती करतो.

मला सूचना कम हुकूम देताना प्रा.डॉ. दिलीप बिरुटे सर
c

हा अजून एक
d

त्रिमुर्तीना भेटून आम्ही पुढे....

.
.
.
.
.

दमलो.... हा भाग-१ समजा वृत्तांताचा...भाग दुसरा नंतर टाकतो!

धन्यवाद,
Sandy

एस's picture

18 Jan 2016 - 3:11 pm | एस

गणेशा!

चांदणे संदीप's picture

18 Jan 2016 - 3:22 pm | चांदणे संदीप

फोटो नेहमीप्रमाणेच दिसत नाहीयेत! सं.मं. कृपया मदत करा. आणि कुणीतरी मला एकदाचे सांगा कुठल्या कुंडात अंघोळ करून यायला लागेल इथे फोटो पहिल्या प्रयत्नात चिकटवण्यासाठी?

Sandy

पद्मावति's picture

18 Jan 2016 - 10:23 pm | पद्मावति

संदीप, पीकासा वेब वर तुम्हाला हवा असलेला फोटो राइट क्लिक करून कॉपी इमेज अड्रेस करा आणि ती लिंक मिपावर प्रतिसाद देतांना इनसर्ट लिंक मधे टाका. रुंदी आणि लांबी ( साधारण ६००, ५००) ठेवा.

नीलमोहर's picture

18 Jan 2016 - 4:11 pm | नीलमोहर

काव्यवाचनासाठी अभिनंदन संदीपजी !! वृत्तांतही छान.
मिपाने इथे फोटो टाकण्यासाठी काहीतरी उपयुक्त सोय करावी ही यानिमित्ताने नम्र विनंती.

प्रचेतस's picture

18 Jan 2016 - 8:38 pm | प्रचेतस

गणेशा झालाय पण उपवृत्तांत आवडला. बाकी आमच्या आमच्या चाहत्यांमधे तुम्हास स्थाण आहेच तथापि खुद्द आम्हीच आमच्या गुरुजींच्या चाहत्यांच्या रांगेत केव्हापासून उभे आहोत पण ते काही स्थाणच देत नै ब्वा.

चांदणे संदीप's picture

18 Jan 2016 - 10:12 pm | चांदणे संदीप

___/\___
आता पुढच्या दर्पणसुंदरीला न्याहाळायला मीही सोबतीला असेन असे धरून चालतो. म्हणजे, तुम्ही निवांत न्याहाळा, मी हवं तर म्हसराकडं लक्ष ठेवतो! ;-)

बाकी, गुरूजींच्या चाहत्यांच्या रांगेतून तुम्हांला ब्लॅकचे तिकीट मिळून लवकरात लवकर स्थाण मिळावे यांसाठी णिसोंचे नवग्रह आणि दिनुच्या काळ्या मावशीला साकडं घालतो!

Sandy

चांदणे संदीप's picture

19 Jan 2016 - 11:30 am | चांदणे संदीप

कविता वाचत असताना
a

आयोजकांकडून सन्मान स्वीकारताना
b

मला सूचना कम हुकूम देताना प्रा.डॉ. दिलीप बिरुटे सर
c

हा अजून एक
d

हुर्रे...ततर ततर ततर....

Sandy

नाखु's picture

19 Jan 2016 - 11:34 am | नाखु

धन्याने फोटोसाठी खास छबीलकब (पोझ) दिल्याबद्दल कवतीक.

नाखु चिंचवडकर

स्व्गत : बिरुटेसर इंदीरा कॉन्ग्रेसचा प्रचार का करतायत !

पळालेला नाखु

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jan 2016 - 11:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>> स्व्गत : बिरुटेसर इंदीरा कॉन्ग्रेसचा प्रचार का करतायत !

अच्छे दिन दिसत नाही म्हणून :)

-दिलीप बिरुटे
(नाखु काकांच्या गप्पांचा फ्यान)

प्रचेतस's picture

18 Jan 2016 - 9:08 pm | प्रचेतस

आजही समारोपाचे दिवशी ग्रंथदालनात चक्कर मारली. शेवटचा दिवस असल्याने काही स्टॉलवर भरपूर सवलत जाहिर केली होती. खरेदी अशी केली नाही पण एक छोटेखानी दुर्मिळ पुस्तक अवघ्या १० ₹ ला मिळाले. "क्रिस्ताच्या वधस्तंभारोहण प्रसंगींचे विळाप" संपादक वि. वा. प्रभुदेसाई

१७ व्या शतकातील फादर स्टीफन्सच्या क्रिस्तपुराणातील हा अप्रकाशित भाग. १९७१ साली हे साहित्य प्रथम प्रकाशित केले गेले. तोवर ह्या ओव्या लोप पावल्या होत्या. फादर स्टीफ़न्स तो हाच ह्याचा कर्ता हे निर्विवादपणे सांगता येत नाही पण हा किंवा फादर क्रुवा हा कर्ता असावा असे ओव्यांच्या क्रिस्तपुराणातील असलेल्या साधर्म्यामुळे असे संपादक प्रभुदेसाई सांगतात.

मासल्यादाखल एक ओवी देतो.

देखुनियां फार मार लोळे रक्ताचिया झरीं |
सर्वांगिं जाहालासे जैसा कोस्टिय रोगिया सरीं ||

मकुटु कंटकांचा बिळिं (भाळीं) रौद्र वाहे बोंबाळिं |
ते पगळे जाउनिं डोळिं; खांदि थपथपे ||

चौकटराजा's picture

19 Jan 2016 - 6:18 pm | चौकटराजा

एकूणात आपल्याला मोठे उत्सव करून पोलीस, सार्वजनिक वहातुक यावर ताण आणायचा यात रस नाही. पण या उत्सवाला तरीही गेलो. कारण याचे यजमानपद कोणी एका पिवर उदद्योगपतीने स्वीकारले असते का याबाद्द्ल शंका आहे. डी वाय हे शिक्षण उद्योग पति असल्याने हे जमून आले. दारावरच साहित्यिक या शब्दाचे शुद्धलेखन चुकलेले पाहून मजा वाटली. दोन दिवस गेलो . पाहिल्या दिवशी बायको व मी हरवलो. दुसर्‍या दिवशी हरवलो तर काय करायचे हे ठरवून पुन्हा हरवलो. ग्रन्थ प्रदर्शन हा आता चिचवड कराना नाविन्याचा विषय राहिलेला नाही. तरीही हे ग्रन्थ वितरण पाहून हरखून गेलो. काही कविंच्या कविता ऐकल्या काही शष्प कळल्या नाहीत. आपल्याला परत मराठीच्या पहिल्या वर्गात कमल नमन कर , भैरूने कैरी खाल्ली असे शिकावयास हवे याची जाणीव झाली. शरद पवारांच्या भाषणातील एक उल्लेख आवडला तो असा की कादंबरी कथा याना स्पर्श करणे हेच खरे साहित्य. ( अगदी असे शब्द नाहीत ) .साहित्य संमेलनाचा अध्यक्ष मग एखादा प्रकाशक का होउ नये असा मला प्रश्न पडला. कादंबरी कथा, नाटक व कविता हे चार प्रकार हाताळणे हे येरा गाबाळ्याचे काम नाही. गायक असणे वादक असणे व संगीतकार असणे यात जो फरक आहे तो इतर व हे चार प्रकार हाताळणारे यांच्यात असतो अलिकडे हे अध्यक्ष कोण? असा प्रश्न पडतो. तो का पडावा बरे ?

चौथा कोनाडा's picture

5 Dec 2021 - 5:38 pm | चौथा कोनाडा

घराच्या एव्ढ्याजवळ अभा नाट्य संमेलन, अभा साहित्य संमेलन होते तरी उपस्थित राहू शकलो नाही. दोन्ही वेळा तातडीच्या कार्यालयीन कामांमुळे परस्थानी होते.
काय माहीत कधी योग येतात ते !