पहिले विडंबन

gsjendra's picture
gsjendra in जे न देखे रवी...
13 Jan 2016 - 5:57 pm

तिच्या मनात याच्याविषयी रागंच होता
तरी ह्यो पठ्ठया तिच्या मागंच होता

सेंडलकडं नजर टाकत तिने सहज पाहिले
तेवढयावरंच महाशयांनी तिला र्हदय वाहिले

महाशय गेले विचारात घरी
जाऊन पडले पत्रांच्या अरी

खिशात पैसे नसताना एसटीडी कॉल केला
फोनवर तिच्याऎवजी तिचा बापंच आला

हिंमत धरून घरी गेला पैलवान बापाने काळानिळा केला

जीभ चावत म्हणाला चूकला बेत
वाटेत दिसले तिरडीवर प्रेत

प्रेतावर पूष्प टाकून याने मोठ्याने गळा काढला
प्रेत म्हणाले गप्प मूर्खा मी तर या नादात जीव सोडला

कविता माझीकविता

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

13 Jan 2016 - 6:50 pm | जव्हेरगंज

प्रेरणा कुठाय?

चांदणे संदीप's picture

13 Jan 2016 - 7:48 pm | चांदणे संदीप

असेल इथेच कुठेतरी. येईल की मागून, काय घाई आहे आपल्याला!
;-)

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jan 2016 - 10:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

'ति'चंच नाव प्रेरणा असेल :)

पद्मावति's picture

13 Jan 2016 - 10:41 pm | पद्मावति

छान आहे. मजेदार कविता.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jan 2016 - 10:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

=))

पिंगू's picture

13 Jan 2016 - 11:00 pm | पिंगू

हाहाहा...