खुशबू (एकत्रित कथा, पुनःप्रकाशित)

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
10 Jan 2016 - 3:06 am

उपोद्घात

आज: १७ फेब्रुवरी २०१५

'पाकिस्तानविरोधात क्रिकेट सामना जिंकणं म्हणजे युद्ध जिंकण्यासारखं आहे. माझा मुलगा पाकिस्तानविरुद्धच्या 'या' युद्धात शूर सैनिकासारखा लढला. त्यानं दाखवून दिलं की भारतीय मुसलमान हा आधी भारतीय असतो, मग मुस्लिम असतो!' हे उद्गार आहेत भारतीय क्रिकेट संघातील उद्योन्मुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी याचे अब्बाजान मोहम्मद तौसिफ यांचे. गेल्या रविवारी पाकिस्तानविरुद्ध झालेला विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना भारताने मोठ्या फरकानं जिंकला.-----पेपरातली ही बातमी वाचता वाचता, खुशबूचे मन भूतकाळात मागे गेलं.

प्रारंभ

१३ वर्षांपूर्वी

माय नेम इज 'खुशबू सलीम बागवान' सर, झोपडपट्टीत राहणारी असली तरी आली होती व्यवस्थित. स्वच्छ, नीटनेटकी, दोन वेण्या चपचपीत तेल लावून घातलेली. छोटीशी चिमणीसारखी जिवणी असलेली. एरवी कुपोषणाचा बळी वाटणारी पण डोळे पाणीदार, नाक धारदार. तिला अशी तयार करून पाठवलं होतं तिच्या आईनं. नाव विचारल्यावर स्पष्ट स्वरात म्हणाली, 'खुशबू सलीम बागवान'..... इतर प्रश्नांनाही चांगली उत्तरं दिली.
दरवर्षी झोपडपट्टीतील किंवा अगदी खालच्या उत्पन्न गटातील किमान दोन मुलांना आमच्या संस्थेत प्रवेश द्यायचाच असं व्रतच आम्ही घेतलं होतं. त्यांना सक्षम बनवून इतर सुस्थितीतील मुलांशी निरोगी स्पर्धा करण्याची संधी देणं हे आम्हांला आवडतं आव्हान असे. जवळजवळ सर्व अशी मुलं अभ्यास, क्रीडा, इतर उपक्रम यात इतरांपेक्षा सरस ठरायची. खूप समाधान मिळायचं यातून. खुशबू तर आपल्या गुणवत्तेनं संस्थेत आली होती, बिच्चारी मागच्या दंगलीमध्ये तिची माय आपल्या लेकीला, जीव मुठीत ठेवून पुण्यात आश्रयाला आल्या होत्या. म्हणते कशी ‘दाभोलकर सर अगदी पहिल्या दिवशी तुम्ही डोक्यावर हात ठेवलाना तेव्हापासूनच तुम्ही हेडसर नाही तर मित्र वाटू लागलात.’ स्पर्शाची जादू मला अगदी आतून जाणवली. आणखी एक गोष्ट लक्षात आली…खुशबूचं उर्दुप्रमाणे, हिंदी बोलणंही खूप स्पष्ट व बर्यापैकी फ्ल्युअंट होतं. हिला पत्रकारितेत तयार करता येईल असा एक विचार त्यावेळी मनात तरळून गेला.

तीन वर्षांपूर्वी

अचानक उसळलेल्या दंगलीमुळे अनेकांवर रात्रीतून काळाने घाला घातला. छावणीत भेटणारा प्रत्येक जण कुटुंबियांच्या, नातेवाईकांच्या, मित्रांच्या, आठवणीने गहिवरून येत होता. फातिमाच्या डोळ्यासमोर तर तिच्या प्रत्येक मुलाचा चेहराच रोज रात्री फिरत असायचा. आपल्याच लेकरांच्या प्रेतांवरून, कशीबशी धाकट्या मुलीला घेऊन रात्रीतून तिथून निसटून, सलग ३ दिवस मृत्यूला चकवा देत निसटलो आणि कश्या भारतीय सैन्याच्या छावणीत पोहोचलो, याचाच शॉक काही केल्या सलग झोप येवू देत नव्हता. वर्षे झाली त्याला ….
'१० साल गुजर गये उस रातको फातिमाआपा, ताभिस्से मैनेभी नही देख्या मैने अपने ऐकलोते लाडकेकू, फिटरका कामके वास्ते हररोज की तरह सुबह को बाहर गया, लेकिन वापीस आयाच नै…... कहा होगा मेरा जब्बु….. तू नसीबवाली तेरी एक लडकीतो बच गयी. अभी उसकेवास्ते तेरेकु जिना चाहिये. जा सो जा…
हां फरीदा… खुशबू अभी आतेही होगी…

पाच वर्षांपूर्वी

पुणे विद्यापीठ परिसरात, एका जुन्या ब्रिटीशकालीन दगडी इमारतीबाहेर तवेरा येउन थांबते, ड्रायविंग सीटवरील व्यक्ती तवेरामधून, बिल्डींगवर लावलेल्या बोर्डकडे नजर टाकते. 'सेंटर फॉर साउथ ऐशियन इकोनोमी स्टडी ग्रुप'. इमारतीतील एका विशेष रूममध्ये एका लांबलचक टेबलाभोवती काही व्यक्ती बसलेल्या होत्या, थोड्या वेळाने त्या रूममध्ये कार मधून उतरलेल्या दोन व्यक्ति आल्या. त्यातील एक व्यक्ती मध्यमवयीन होती तर दुसरी तरुण होती. ती मध्यमवयीन व्यक्ती म्हणजे दहशतवाद विरोध पथकप्रमुख हेमंत कोकरे होते. त्या बसलेल्या व्यक्ती त्यांना ओळखत होत्या. त्यांना बघताच त्या व्यक्तींनी उठून सॅल्यूट ठोकला. कोकरेनी, त्यांच्या सोबत आलेल्या तरुणालाही एका खुर्चीवर बसायला सांगितले. मग ते स्वत: टेबलाच्या एका कडेला असलेल्या खुर्चीवर जावून बसले. ‘लेट मी इंट्रोड्यूस धिस यंग गाय.. कॅप्टन प्रीतमसिंग. हा आपल्या सिक्रेट मिशनचा प्रमुख असणार आहे. ही इज फ्रॉम मिलिटरी इंटेलिजन्स सर्व्हिस. खास आपल्या मोहिमेसाठी मी त्याला तिथून इकडे ट्रान्स्फर करून घेतले आहे’, मग कोकरे कॅप्टनकडे बघत म्हणाले, ‘या लोकांच ब्रीफ प्रोफाईल तुला माहितच आहे. तरीही तुला जे मिशन पूर्ण करायचे आहे त्यात यांचा कसा आणि कुठे उपयोग करून घ्यायचा आहे हे तू ठरवायचे आहे’. प्रीतमसिंग विचार करू लागला कमांड सेंटर कोणाला हाताळायला द्यावे बर ?…. काही विचार केल्यावर प्रीतमची पाऊले मग व्हीलचेयरमधे बसलेल्या व्यक्तीकडे वळाली …

चार वर्षांपूर्वी

दैनिक खबरनामा मधे जाहिरात आली होती, “पाहिजे : अर्धवेळ पत्रकार, उर्दू भाषेवर प्रभुत्व संपर्क जि टी वी … वै. वै”, मी चार्लीज् बेकरीचे मालक ज्युलियस वाझ यांना भेटले, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्याची सूचना दाभोलकर सरांनी दिली होती.' घरची प्रतिकूल परिस्थिती असतानाही माणसे स्वकार्तुत्ववान व मोठी कशी होतात हे तुला त्यांच्याकडून कळेल ' असं सुद्धा सरांनी सांगितलं होतं. मला दाभोलकर सरांच्या संस्थेच ब्रीद आठवलं, 'आपण मोठ होऊ शकू' असं म्हणू शकणारं मन घडवतं तेच खर शिक्षण, तोच खरा शिक्षक. वाझ यांची भेट तशी तर ३-४ मिनिटाचीच, हेच आपलं नाव, गाव, काय शिकलीस, घरी कोण असतं वै. काहीच विशेष नव्हत भेटीत. लक्षात राहण्यासारख्या दोनच गोष्टी, भिंतीवरच भव्य सागवानी क्रॉसवरचा येशु आणि वाझ ज्यावरून वावरत होते, ती व्हीलचेअर …

घरात अठरा विश्वे दारिद्र्य, आई कॅन्सरने आजारी, त्या धक्क्याने आकस्मिक गेलेले वडील, अश्या हलाखीच्या परिस्थितीत अमर उपाध्याय काय करतो ???? काहीच नाही…… करण्यासारखं फार काही नसतंच त्याच्याकडे… फक्त त्याच्या नेटवर्किंगच्या अभ्यासा… आणी विद्यापीठातल्या नोकरीखेरीज ……
ऑफिसमधून लवकर निघता आल्यामुळे अमर खुश होता. मेंटली न दमता घरी येण्याचा हा अपवादात्मक दिवस. आज संध्याकाळसाठी काही स्वयंपाकही करायचा नव्हता. रात्रीच्या जेवणासाठी त्यानं दाल-खिचडी सकाळीच करून ठेवलं होती. सकाळी उशीरा कामाला जायचं असल्याच आठवून तिला एक टेक्स्ट मेसेज करावासा वाटला फेसबुकवर. बघतो तर आधीच एक मेसेज तिच्याकडून आलेला, आश्चर्य वाटलं त्याला याचं. "आय लव्ह युवर कुकिंग स्किल" असं लिहून दोन स्मायली टाकल्या होत्या. मनात गाणं गुणगुणत ऑफिसचे कपडे बदलून, सोसायटीच्या गच्चीवर बनियन पायजम्यावर अवतरला तो. मस्त चाय करून, पुस्तकाचं कपाट उघडलं. छोटंसं पुस्तक काढलं. ते निघालं मॉर्गन काफ्मानच वायरलेस नेटवर्क सिक्युरिटी ...हम्म म्हणत किंचित हसला,
कारण तिचं आणि आपलं, ते आताआता कुठे ओळख-फ्रेंडशिप वरून पुढच्या स्टेजपर्यंत येतय असं वाटायला लागलेलं होतं.… आत्ता कुठे आपला टिफिन शेअरची फळे दिसू लागली होती. तेवढ्यात फोन वाजला, पलीकडून प्रश्न, 'निघण्यापूर्वी ती प्रोसेस व्यवस्थित रन केली होती नं ?',
'हो सर… ',
'जस्ट चेकिंग अमर',
'नो प्रोब्लेम सर …. '
'बाय टेक केअर'
चरफडत अमरने फोन कट केला, मनाशीच विचार केला, सर्वर जरी थोडाकाळ डाऊन झाला जरी, अस्स काय आकाश कोसळणार आहे ? त्या 'सेंटर फॉर साउथ ऐशियन इकोनोमीक स्टडी ग्रुपचं'.......

सार्वजनिक फोन बूथवरून, तो फोन नंबर डायल करून, ५ वेळा रिंग ऐकल्यावर, मीराने फोन कट केला.
पुन्हा ५ सेकंदानी तो फोन नंबर डायल केला, पलीकडून फोन उचलला गेला.
मीरा: हलो, ये टोर्नेडो वाक्कुम क्लिनर हेल्पलाइन है ना, मुझे मॉडेल २१५ की कम्प्लेंट करांनी है जी ;
पलीकडून: राँग नंबर; फोन कट; मीरेन फोन क्रेडलवर ठेवला, ती फोनजवळच उभी राहिली; १५ सेकंदांनी फोन खनखनला;
मीरा: आप तैयारी शुरू करो
पलीकडून : क्यूं?
मीरा : काम हो गया है. अभी सेलिब्रेशन जारी है. पहले उसने नहीं कहा था, लेकिन मैने उसे अच्छी तरह समझा दिया. रेडी कर दिया. विडीओ दिखाया, अब वह हजार टका करेगा.
पलीकडून : फेसबुक अकौंट बंद करदो, कोई सबूत पीछे नही छोडना.

दरम्यान कतार येथील एका हॉटेलमधे……
‘भाईजान तैय्यार हो जाव, फायरअप यौर मशिन्स, कुछही दिनोमे आय पी अड्रेस, प्रोक्सी डीटेल्स, और बहुत कुछ हाथ आनेवाला है’.
‘हात आये तब बोलना, फिलहाल तो मै रानीमुकर्जी की फिल्मे डाऊनलोड माररिया हु, और हां, जबीभाईसे भी बात कर लेना’ …

आज इंटरव्युव्ह आले, तेव्हा वाटलं नव्हत, सगळ एवढ्या झटदिशी होईल म्हणून…...
जी टी वीच्या ऑफिसमधून बाहेर पडताना खुशबूच्या मनात आलं. सकाळी मगरपट्टातील काचेच्या बिल्डींग्स पाहून, थोडस दडपण वाटलं खर. आणी त्यात रिसेपशन मधे आल्यावर आजूबाजूला पाहिल्यावर तर, उगीचच मनात आपले कपडे, आपली चप्पल, आपली पर्स सगळच कस दळभद्री असल्याची जाणीव करून देत होत्या. थोड्यावेळाने उर्दू विभागाचे संपादक सिद्दिकी आले, मला म्हणाले , ‘काल वाझ तुझ्याविषयी बोलला होता.
चल तुला काही मी यु ट्यूब वर दाखवतो, तुला मी त्याच्यावर काही प्रश्न विचारेन’. त्यांनी मला पीटीवी वरच्या एका शरिया विषयक चर्चेची २७ मिनिटांची फिल्म दाखवली, आणी त्यावर त्यांनी मला बरेच प्रश्न विचारले, खर तर मला वाटत, त्यांना चर्चे पेक्षा, मी ती माहिती कशी आणि किती ग्रास्प करते, इंटरप्रेट करते, ह्यातच रस होता. जाताना म्हटले कि पगार तसा ओके-ओके च असेन, काम मात्र भरपूर… मुलगी आहेस पण कामाला रात्र अपरात्र अस काहीच लिमिट नाही …माझ त्यांना एकच उत्तर होत … उद्यापासून जॉईन केलं तर चालेल का सर ?
सकाळी भयावह वाटणाऱ्या त्याच काचेच्या बिल्डींगमधून बाहेर पडताना हातात ऑफर-लेटर होत.

तीन वर्षांपूर्वी

'सेंटर फॉर साउथ ऐशियन इकोनोमीक स्टडी ग्रुप'. इमारतीतील त्या विशेष रूममध्ये मिटिंग चालू होती.
सुरेश मेनन: यु नो अमरने इतक्या छानपने मशीन सेटअप केली ना…
प्रीतम: गुड, सुरेश, कीप इन माइंड, ही इज जस्ट सपोर्ट, नॉट कोर मेंबर ऑफ धीस टास्कफोर्स.
वाझसर मागच्या वेळी तुम्ही म्हणाला होता, यु हाव गुड कॅन्डीडेट अज फुट सोल्जर, हु इज ही ?
वाझ: आक्चुली नॉट ही बट शी, हर नेम इज खुशबू ….

सोळा वर्षांपूर्वी

कॅप्टन, मला मिळालेल्या इंस्ट्रक्शन नुसार, तुम्ही व तुमचे दाढीवाले रोमिओज् युनिट आजपासून डिसमेंटल करण्यात येत आहे, तुम्ही आता १६ ग्रेनेडीअर च नेतृत्व करायचं आहे, तुमचे दाढीवाले रोमिओज, G (घातक) प्लाटून म्हणून ग्रेनेडीअरस मधे विलीन होतील…….बराच वेळ तो अधिकारी कॅप्टनला सूचना देत राहिला … संभाषणाचा शेवट करणार वाक्य त्याचा तोंडी आलं ……..कोई शक ?
नो सर, अंडरस्टुड सर !
जयहिंद…
जयहिंद सर…

कॅप्टन विचार करू लागला, सगळ्यात पहिले रोमिओजना तात्पुरत्या बदललेल्या परिस्थितीची कल्पना द्यायला हवी. आता आपण स्पेशल फोर्स युनिट नाही आहोत, युद्धानंतर भारतिय आर्मी परत आपलं गठन करून आपल्याला आपली कर्मभूमी म्हणजे, खोर्यात पाठवेलच, म्हणूनच आपण व रोमिओजने 'ही वितभर कमावलेली दाढी तशीच मेंटेन ठेवायची आहे' अशी अधिकाऱ्याकडूनची सूचना रोमिओजना द्यायची खुणगाठ मनाशी बांधायला तो विसरला नव्हता, कॅप्टनला माहित होत की आपलं हे दहशतविरोधी युनिट, भारतीय सैन्यातील काही ठरविकच स्पेशल फोर्स युनिटपैकी होतं, की जिथे शीख नसूनही लांब दाढी ठेवायला आर्मीची परवानगी होती, नव्हे.. तर तशी ताकीद होती. रोमिओज मधील ज्यांना माहिती नाही त्यांना (फक्त ५ % सैनिकांना), नमाज पढण्याबाबत, थोडफार उर्दू बोलण्याच ट्रेनिंग अटेंड कराव लागे, त्यांना 'नाजूक सर्जरी' करून शरीराच्या एका विशिष्ट भागावर संस्कार करावे लागत, कारण बाकीच्या ९५% सैनिकांना जन्मतः या गोष्टी मिळालेल्या असे. सरासरी या फोर्समधे येण्यासाठी इच्छुक १०० उमेदवार सैनिकांपैकी, खडतर चाळणी निवड पद्धती नंतर फक्त ४ च युनिटमधे येत. आणि त्यापैकी फक्त २ धडधाकट पणे निवृत्त होण्यापर्यंत जिवंत राहत…..

'कॅप्टन, नॉर्थ थीअटर मधील या फिचरवरील पोईंट २७९९ वर, शत्रूच्या बंकरला उद्ध्वस्त करत, कब्जा मिळवण्याच सौभाग्य आपल्या बटालियनला मिळालं आहे' …. कर्नल येलमामे लेसर बीमने नकाशावर दाखवत म्हणाला. …. '
'रोमिओस आर ऑनर्ड सर फॉर यौर ग्रेशियस्नेस सर…. '
'केअरफुल कॅप्टन, धिस ऑप मस्ट फिनिश बाय ०४०० अवर, अदरवाइज यु अंड योर जोकर्स, विल बी प्रेटी मच सिटींग डक्स इन सनलाईट फॉर देम फ्रॉम अबोव, एज चेरी पिक', कोई शक ?….
'नो सर'...
'दँट विल बी ऑल कॅप्टन'…
जयहिंद सर...
जयहिंद...

रोमिओज्, घातक कंपनी यहासे और यहासे असौल्ट करेगी, चार्ली कंपनी हमे यहासे कवरफायर देगी, अल्फा कंपनी यहापे घात लगाकर बैठेगी, और अगर दुश्मनको यहासे कोईभी मदतकी हरकत होती है, या रीऐनफोर्समेंट मिलती है, तो अल्फा कंपनी उसे इंटरसेप्ट भी करेगी…… असौल्ट ०१०० पे शुरू होगा, ०२३० तक हम ये, ये और ये लोकेशनपे कब्जा करेंगे, ०३०० पे पोईंट २७९९ से दुश्मनका खात्मा होगा, घातक इस टीलर पोस्टपें पैठ जामैयेगी, ०३३० पे अल्फा कंपनी २७९९ के पिछवाडेसे फिचरको सीक्यूर करेगी और क्लिनिंग शुरू करेगी, ०४०० पे पोस्टपे तिरंगा लहरायेगा, सभी सिन्क्रोनाईज टाइम नाऊ, अभी १९१५ है…. और हा रोमिओज नो फोरप्ले, जस्ट पेनेट्रेट … डू नॉट इंटरटेन ऐनी … कोई शक ?…
नो कॅप्टन…
जयहिंद…

टाईम ०३३५
धिस इज ४३ नॉर्थन लाईट …जनाब, वी आर अंडर हेवी ऐनिमी फायर …मदतकी जरुरत है …आय रिपीट वी आर अंडर हेवी ऐनिमी फायर …मदतकी जरुरत है …

कुई ऊ ऊउ … कीर किस्च ऊ ऊउ कुई …….

साला… कम्युनिकेशन भी अभीही फोत होना था … गिलगीटने हमे सुना भी होगा या नही ….

लेफ्टनंट रौफ चरफडत होता … दानिश देखाना गिलगीट औरसे कोई रीऐनफोर्समेंट आ रही है क्या ….
हा जनाब … लग रहा है, नॉर्थवेस्ट से एक हमारी कंपनी आ रही है …
नॉर्थवेस्टकडून येणारे गोळीबाराच्या फ्लाशमधे दिसत होते … चांगली वितभर दाढी …येताना ते घोषणा देत होते … नारे तकबीर… अल्लाहू अकबर ….या क्रिटीकल सिच्युएशनमधे रीऐनफोर्समेंट, या अल्ला … खैर है.. दानिश देखो , उनको हात दो, पेरीमीटरके अंदर उतार लो उन्हे, चलो... मैभी उनका इस्ताक्बाल करता हु, अभी देखना हिंदुस्तानियोको पुश करेंगे, बस २ घंटेकी बात है, सनलाईट आनेमे …

"आओ भाईजान मेरा हात पकडके उपर आओ" … क्या ये मुझेही लग रहा है …मैने हात बढाया तो आनेवाले एक सेकेंडके लिये सरप्राईस्ड लगे … छोड दे रौफ ज्यादा मत सोच … हिंदुस्तानियोने हौवित्झार के दमपे तुझे और तेरे लडको को लगातार ३ दिन ३ राते सोने नही दिया है, तू सिधा सोच नही रहा है …

"अरे भाईजान क्यू मेरे सिरपे गन रख रहे हो ?", रौफ मनात विचार करत होता, हिंदुस्तानी थे ये, मदत नही थी, लेकिन ये नामुमकीन है, हिंदुस्तानी फौज कैसे 'नारे तक़्बिर' के हवालेसे लड सकती है… रौफ मनातून पुरता खचून गेला गयावया करू लागला, "भाईजान इसबारी माफ करो, गलती हो गयी, अब वापस नही आयेंगे"
त्या दाढीवाल्याने सेफ्टी कॅच बाजूला केलेलाच होता, समोरच्याच्या डोक्यावर रीवॉल्वर ठेऊन, त्याच्या गयेवयेकडे दुर्लक्ष करून त्याने चाप ओढला, व स्वतःशीच म्हणाला " नो फोरप्ले, जस्ट पेनेट्रेट … डू नॉट इंटरटेन ऐनी …"

पंधरा वर्षांपूर्वी
२६ जानेवारी

कारगिलकी में दुश्मन का सामना करने के लिए १६ ग्रेनेडीअर के जिला काठियावाडके हवलदार सलीम फरीद बागवान को जिम्मेदारी सौंपी गई। दुश्मनके हमले में भारी घमासान के बाद सलीम बागवान के प्लाटूनके सभी साथी मारे गए और वे स्वयं भी बुरी तरह घायल हो गए। पाकिस्तानी ठिकाने पर कब्जा करने मोहीम समाप्त होने की घोषणा तक बुरी तरह से घायल सलीम बागवान दुश्मन से मुकाबला करते रहे। मरने से पूर्व उन्होने कई दुश्मन सैनिकों को मौत के घाट उतारा। इस 23 वर्षीय जवान को मरणोपरांत शौर्यचक्र से नवाजा जा रहा है । गुजरातके काठीयावाडमें जन्मे इस होशियार ने अपनी वीरता एवं रणकौशल का परिचय देते हुए इतिहास में अपना नाम अमर कर लिया है ।

भारतीयसैन्य इतिहास में अपनी बहादुरी-बलिदान और नेतृत्व का अनूठा उदाहरण पेश किया महाराष्ट्रके गांव जालनाके कॅप्टन ज्युलियस वाझ ने। उन्होने एक अधिकारी के रूप में कारगिल युद्धमें अपनी वीरता एवं रणकौशल का परिचय देते हुए, पाकिस्तानी ठिकाने पर कब्जा करने के लिए दी जिम्मेदारी, कुशलतापूर्वक निभायी, १६ ग्रेनेडीअर के इस रणबांकुरेने दुश्मनपर तीन दिशाओं से हमला कर दिया और उन्हें पीछे हटने को मजबूर किया। उनके इसी अदम्य साहस व नेतृत्व के लिए उन्हें वीरता के वीरचक्र से सम्मानित किया जा रहा है;

राम्पवरून ताठ मानेने कॅप्टन ज्युलियस वाझ राष्ट्रपतींच्या दिशेने निघाले …. …. आपल्या नव्या व्हीलचेयर वरून …।

तीन वर्षांपूर्वी

'मुस्लिम व भारतनिष्ठा याबाबत तुझं काय मत आहे मुली ?'…
कॉफीचा घुटका घेता घेता अडखळत ती म्हणाली 'एक्सक्यूज मी … ?' रागाची एक सूक्ष्म छटा तिच्या चेहेर्यावरती उमटून गेली … 'सर माझ्या मुस्लिम असण्याबद्दल, हा टॉन्ट होता का ?'
'अजिबात नाही पोरी, तुला माहित नसेल, पण तुझ्या बापाला जवळून ओळखायचो मी, एक सच्चा सपूत होता तो मातीचा'
'बर... मग..., मी ऐकतेय, पुढे बोला', तिच्या कपाळावरची नस अजूनही पूर्णपणे तडतडायची थांबली नव्हती.
'मला कल्पना आहे, काही काही लोकांच्यात वावरताना, तुला यामागेही टोमणे ऐकावे लागले असणार, मला हेही माहिती आहे, मागच्या दंगलीच्यावेळी तू, तुझी अम्मा कुठल्या दिव्यातून गेल्या असाल', तिच्या डोळ्यात आताशा पाणी येवू लागलं, पाणी कसलं, शब्दच होते ते तीचे ? तोंडावाटे येण्याचं ते बिचारे विसरूनच गेले होते जणू. 'खुशबू, लाईफबद्दल तुझ्या काय अपेक्षा आहेत ?'
आतापर्यंत बर्यापैकी सावरत ती म्हणाली, 'सर, खर सांगू, माझ्या अम्मीकडे रोज बघते, तिला सतत त्या दिवसांची आठवण होतना, तिच्या डोळ्यात नेहमी त्या रात्रीचे ढग काळवंडून दाटून आलेले बघते, तिच्या दचकण्यात त्या दृशांच्या विजा कडाडताना दिसतात मला, तिच्या आवळलेल्या मुठी, मनात खदखदलेल्या, दुनियेची राखरांगोळी करू शकणाऱ्या तळतळाटा बद्दल ओरडून सांगत असतात मला. मरणाशिवाय तिची या यातनांतून सुटका नाही याची जाणीव आहे मला,…तिच्या अश्या परिस्थितीकडे पाहून सर, मी स्वतःला वचन दिलंय …. नाही, आपण अस तीळातीळाने मारायचं नाही! का मारायचं ? आपली काय चूक आहे ? परिस्थितीच आव्हान स्विकारून, जीवनाला, माझ्या सर्वशक्तीनिशी सामोरी जाईल, लोकांच्या टॉन्टकडे लक्ष देणार नाही, तसल्यांच्या वागण्याला धूप घालणार नाही… कुठल्याही परिस्थितीत मी डिसकरेज होणार नाही. स्वतंत्रपणे माझ लाइफ़ मी जगेन, अगर गर्दिशमें होंगे तारे, तब्भी इंशाल्ला एकटी जगेन …… और अगर लोगोंका साथ मिला … तो काबिले-ऐ-दिदार जगेन … '
'मुली, मी तुला देशाकार्य करायला सांगितलं, तर करशील का ? नाही म्हटलीस तरी मी नकार समजू शकेन'
'काही मुठभर धर्मांध लोकांमुळे सगळ्या देशाला शत्रू समजणारी मी नव्हे, आणी माझ्या वडिलांप्रमाणे मी फौजी नाही, मी काय मदत करणार देशाकार्यात'
'देशाकार्य करण्यासाठी फक्त फौजी-व्हायचीच गरज नसते, दुसर्या प्रकारे तू ते काम करू शकतेस '
'फक्त 'या बेकारीचे मालक', एवढच कार्यक्षेत्र नसावं, बहुदा तुमचं … '
'माझ्या जीवनकार्याचे क्षेत्र, सर्वस्वी हि बेकारीच आहे… असंच आणि एवढंच, याक्षणी मी जगाला सांगू शकतो,… '
'ठीक आहे सर, मी तयार आहे'
'पण तू माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही पोरी … '
'सर तुमच्या मनात माझ्याबद्दल जराही किंतुपरंतु असती, तर तुम्ही हा प्रश्न विचारलाच नसता '
'जाताना, कौन्टरवरून तुझ्यासाठी मावा केक घेऊन जा, माय ट्रीट… कॅम्पमधे अशी कॉफी आणि मावा केक कुठेच मिळणार नाही तुला ! '
'बाय वाझ सर'
'टेक केअर खुशबू बेटी'

आपल्या मेंदूवर चढलेले मीरेच्या नशेचे एक एक थर साठू लागलेत असं अमरला वाटत होतं. त्याला मीरेसोबतचा एक एक प्रसंग आठवत होता. तिची ती खोडकर नजर...तिचे ते गोड हास्य...तिचा त्याच्या हाताला मुद्दाम होणारा स्पर्श...पहिल्यांदा पुस्तक देताना झालेल्या स्पर्शानंतर, आपल्या या ३५ वर्षाच्या सडाफटिंग आयुष्यात असा सौंदर्यवान हाताचा स्पर्श कितीवेळा अनुभवला होता ? कधीच नाही … आणि आज एवढा सुंदर सहवास लाभतोय …. याचा तो विचार करत होता. खरतर तिच्या सायबर सिक्युरिटीच्या शैक्षणिक प्रोजेक्टला खरा आकार आणून देण्याची कामं तोच करत होता. तेही तो ही कामं इतक्या आपलेपणांन आणि आपसूकपणे करीत होता की त्याला हे लवकर लक्षात आलेच नाही. आणि ही सर्व कामें त्याने स्वत:च आपल्या अंगावर ओढवून घेतली होती. त्यातला त्याचा गुप्त हेतू हा, की त्या निमित्ताने तो तिच्या जास्तीत जास्त सानिध्यात राहील. तिने कधीही स्वत:हून त्याला कोणतेही काम सांगितले नव्हते. फक्त तिने ती कामं आपण स्वत:होऊन आपल्या अंगावर ओढवून घेण्यास पोषक वातावरण तयार केले होते.… एवढंकी आपण सायबर सिक्युरिटीच्या क्षेत्रात किती डॉन माणूस आहोत हे दाखवण्यासाठी … तीला त्याने हँन्डस-ऑन सिक्युरिटी लेयर उलगडून दाखवली होती …. तीचा पहिले विश्वासच बसत नव्हता, ह्या अफलातून सिस्टीमचा कर्ता धर्ता तो एकटा आहे … तेव्हा पासून दोघांनी ठरवलं जेव्हा जेव्हा त्यांची भेट होईल … ती त्याची परीक्षा घेईल … जस की …सांग पाहू अमुक अमुक सर्विससाठी तू कुठलं पोर्ट कॉनफिगर करशील व तेच का ? तसंच का कॉनफिगर करशील ?… आणि जेवढ विस्तृत विवेचन त्याकडून येई … तेवढी ती इम्प्रेसड दिसे … मग तिच्या ओठांची साखर , तो चाखत असे.
खरंच, आपलं 'सेंटर फॉर साउथ ऐशियन इकोनोमीक स्टडी ग्रुपच' काम आणि तिच्या प्रोजेक्टचा विषय, या समान धाग्यामुळे ओळख झालेलो आपण … तिच्या रसिल्या ओठांपर्यंत जाऊ, असा विचार त्याच्या आतापर्यंतच्या रटाळ आयुष्यात, त्याला स्वप्नातही आला नसता ! … असंच अमरला राहून राहून वाटत होत.

'अरे हरदीप आज नयी बाइक'.
'हा पाजी, आज वो कनद्दा से आई सुसान, मेरे नाल आई, अपनी बाइकको ग्राउंड पे छोड, उपरसे अपनी टीशार्ट, जीन्स, सारे कपडे उतार कर ग्राउंड पे फेक देके, बोली, हरदीप- I am offering you ANYTHING you want !'
'तो तुने क्या किया'.
'क्या करता पाजी, बाइक उठाके चला आया '.
'अच्छा किया हरदीप, वैसेभी वो जीन्स तुझे फिट नही होती '

एकच हास्याचा धबधबा उसळला तिथे, 'प्रीतम तुम्ही सरदारजी असून, सरदारजीवरचे जोक्स सांगता ? ' खुशबू हसत हसत आश्चर्याने म्हणाली. मागच्या आठवड्यात, वाझनि प्रीतमची आणि खुशाबुची ओळख करून दिल्यापासून, आजपर्यंत खुशाबुची बरीचशी भीड चेपली होती. मागच्या आठवड्यात खुशाबुला सांगितलं गेल होत, तुझी पत्रकाराची नोकरी सांभाळून तुला, सांगण्यात येणारी कामं करायची आहेत. नोकरीच्या ठिकाणचे बॉस सहकारी, नातेवैकांना आई बाप नवरा बायको भाऊ बहिण मित्र परिचित, अगदी कोणालाही कळता कामा नये, या नवीन जबाबदारी बद्दल. तुमचा बुरखा फाटला तर मिलिटरी इंटेलिजन्स कोणतीही ओळख दाखवणार नव्हत. इंस्त्रक्शन प्रीतमसिंग देईल, तोच ह्यांडलर असणार आहे टास्क फोर्स चा , वाझ हे मेंटोर म्हणून मार्गदर्शन करतील. … सध्यातरी तिला रुकी म्हणून साध्याच असाइनमेंट होत्या, पत्रकारिता करता करता, तीला 'हरकत ऐ इत्तेहादुल मोमीन ', या सेमी राजकीय- सेमी सामाजिक संघटनेबाबत जास्तीत जास्त माहितीच संकलन करून, त्यावर पृथ्करण करून प्रीतमला ह्यांडओवर करायची…

तेरा वर्षांपूर्वी

दिवसा भूमी म्हणजे कच्छ तप्त वाळवंट, आकाश म्हणजे रखरखित सूर्याचा गोळा, म्हणून रात्रीचा बी एस एफ पासून छुपा प्रवास, पोटात भुकेचा आगडोंब, डोक्यात घणाचे घाव, कोणत्याही क्षणी कोसळून इथेच संपू, प्रत्येक पाऊल उचलून पुढे टाकताना त्याला नरकाचा प्रत्यय मिळत होता, आणि शरीर किती वेदना सहु शकतं, तरीही जीव जात नाही, हे अनुभवून आश्चर्यचकित सुद्धा होत होता. जगलो वाचलो तर त्यांचा "सूड" घ्यायचाच, आणी तेवढ्याकरताच त्याला आता जगायचं होत……. सध्या चालायचं होत, तर कधी उंटावरून पुढे जायचं होत … मीरपुराकडे…. आणि भेटायचं होत "चाचाजान ला", …… सर्वांचाच चाचा होता तो तिथे. चाचाजानच एक फेवरिट वाक्य त्याच्या कानांवर इथून पुढे नेहमी पडणार होत… 'सौ सालकी इबादतसे ज्यादा, चार दिन के जिहादकी, आज इस्लामको जरुरत है '

जबिउद्दिन, एक फिटर, त्यादिवशी तो घराबाहेर पडला, आपल्या प्रियतमेला भेटण्यासाठी.. त्याचं गँरेज… डिप्लोमा नंतर उमेद्वार्या करतानाचं गँरेज… नेहमी प्रमाणे आज सुद्धा अनेक गाड्या त्याची वाट पाहत असतील… ग्रीस ऑईल पाना …. अनेक गोष्टींनी डोक्यात फेर धरला होता …
गँरेजचे मालक रसिकभाईनी त्याच्या कळकट जांभळ्या डंगरिची बाही पकडून आतमधे नेलं, सांगितलं 'जबी आज गावात वातावरण गरम आहे, लफडा होऊ शकतो, इथे थांबू नको, मागच्या दाराने लवकर निघ… '
जबी झपाझप सायकलवर पेडल मारत घराकड निघाला, वस्तीजवळ पोहोचण्या आधी असलेली बेकरी जळताना पाहून, शंकेची पाल मनात चुकचुकली …
जबीने जेव्हा गल्लीच्या दिशेने पाहिलं, त्याच्या छातीत धस्स झालं, धुराचे लोट तिथूनसुद्धा यायला सुरवात झाली होती … तेवढ्यात कोणीतरी ओरडलेलं त्याने ऐकलं, “अरे वो देखो उधर उपरवाले रोड पर … और एक लंबी दाढी … पकडो उसको … बचके नही जाना चाहिये ….”
लटपटत्या हातापायाने धडपडत जबीने सायकल उलट्या दिशेने फिरवली……. जीव खाऊन दामटायला सुरवात केली… दोन दिवस जबी लपून छपून राहिला, नंतर माती वाहून नेणाऱ्या ट्रकच्या मागे लपून तो … ओळखीच्या इमामाकडे उतरला, बातम्यातून त्याला कळलं … मागे उरलीय फक्त ...राख ….
सिमीचा एक कार्यकर्ता त्याला 'सरहद के पार' घेऊन जायला तयार झाला…

सहा वर्षापूर्वी

सकाळच्यापारी मिरज जंक्शनमधे नेहमीप्रमाणे वर्दळ... रेल्वे कर्मचाऱ्यांची व विविध कामानिमित्त येणाऱ्या प्रवासी नागरिकांची गडबड... गोव्याच्या दिशेने होणारी विदेशी पर्यटकांची होणारी वर्दळ, त्यातही इस्त्राईली नागरिकांचा असलेला वावर… पुण्याहून मिरजेकडे येणाऱ्या गोवाराणी एक्सप्रेसची पप्पू अस्वस्थ मनानं वाट पाहत होता. त्याला स्टेशनवर येऊन बराच वेळ झाला होता, पण अजूनही गाडीचा पत्ता नव्हता. रेल्वे सावकाश स्टेशनमध्ये शिरताना दिसली. ती सावकाश प्लॅटफॉर्मला लागली तेव्हा त्याच्या मनाची अस्वस्थता थोडी कमी झाली. डब्यात चढणार तोच डब्यातून कुठूनतरी अचानक समोर आलेला तो म्हणाला, 'मुझे उतरने दो पहले !', आश्चर्य म्हणजे त्याच्याकडे काहीच लगेज नव्हत. …….
दुपारी मिरजेच्या स्टेशनबाहेर हि झुंबाड पब्लिक लोटली होती, अशातच अचानक विश्रामबागच्या दिशेने आलेला पोलिसांच्या गाड्याचा ताफा, त्या बघ्यांच्या गर्दीतून वाट काढत रेल्वे स्टेशन च्या दिशेने येवू लागल्या होत्या, आधीच तंग असलेलं वातावरण गाडीच्या सायरनमुळे अजूनच गंभीर झालं होत, रस्त्यातले लोक पटापट गाडीला वाट देत होते, भीतीयुक्त नजरेने ते स्टेशनकडे तर कधी पोलिसगाडीकडे बघत होते.
एक पोलिसांचा फॉरेन्सिक टीममेंबर प्लाटफॉर्म १ च्या वेटिंगरूमच्या दरवाज्याजवळ, जाड भिंगातून जमिनीवर काही सापडते का ते शोधत होता, तेवढ्यात शिस्तीत चालणार्या बुटांचा 'टाक टाक' असा आवाज आला, वळून पहायच्या आधीच त्याला करड्या आवाजात विचारलेला सवाल कानी पडला,
'कुठे झाला ब्लास्ट ?'
'सर इकडे आत … 'तो टीममेंबर आदबीन उठून उभा राहत म्हणाला.
डीऐसपी मगदूम … वय चाळीशीत, कडक शिस्त, उंचपुरा, जयसिंगपुरच्या मातीत कसलेलं शरीर, …. टीम मेंबरने दाखवलेल्या दिशेने तो गेला. त्यादिवशी दुपारी १ च्या सुमारास मिरज जंक्शनमधे ब्लास्ट झाल्याचा रिपोर्ट आल्यावर तातडीने सांगलीहून सुपरवाइस करायला तो आला होता….
सहजच त्याने, स्फोटाच्या जागच्या वर्हांड्याच्या छताकडे नजर मारली …. थोडावेळ टक लावून … तो फोटोग्राफरकडे पाहत म्हणाला, इथला काढ अजून एक, काहीच सुटलं नाही पाहिजे तुझ्या लेन्समधून …. दुसर्या टीम मेंबरच्या कानात तो काही पुटपुटला … तो टीममेंबर शिडी घेऊन आला, स्क्रापरने त्याने छताचा भाग खरवडून, सीलबंद लखोट्यात भरला …. छताला चिकटलेला, फ्रुटीच्या टेट्राप्याकचा पिवळा तुकडा …

साक्षीदारांशी बोलून झाल्यावर…. मगदूम म्हणाले… 'पाटील, ताब्यात घेतलेला बसव्प्पाला पाठव आत.', मिरज रेल्वे स्थानकात शीतपेय विकणारा कीडमीडित बसव्प्पाला समोर आला,
'काही आठवतंय का भडव्या, कालचं, का टाकू परत आत ? ',
'नाय वो, मालक, … नेहीमिप्रमानेच धंदा करत व्हतु, कालपन ' काकुळतीला येवून बसव्प्पा हात जोडून म्हणाला…
अचानक काहीतरी त्याला क्लिक झालं. 'सायेब, आत टाकू नका, घरात कमावणार कोन नाही, काल अन् आजचाबी धंदा बुडाला, सकाळच्यापारी फलाटाला गोवाराणी गाडी लागल्या लागल्या आत चढलो, बोगीत कुनीबी नव्हत, तरीबी सिटाखाली एक ब्याग होती … साहेब ती ब्याग घेऊन १ नंबर फलाटावर गेलो , तिकड फिस्के हवालदार डूटीवर होते, तेनला सांगितलं, ते म्हनाल, बाजूला ठिव, डूटीसंपल्यावर ब्यागेतल आपापसात वाटून घेऊ, म्हणून सायेब ती ब्याग तशीच उचलून म्या हालजवळ ठेवली, कोणाच्या लक्षात यायला नग म्हून त्यावर माझा धंद्याचा माल- फ्रूट्या, पेपर, मासिक रचून ठिवली, बास सायेब, अजून काय नाय'

मगदूम म्हणाले 'पाटील या भडव्याला सोड, कॉ. फिस्केला आत पाठव, चौकशीसाठी … '

त्यासंध्याकाळी दहशतवाद विरोध पथकप्रमुख हेमंत कोकरेंचा मोबाईल वाजला, थोडावेळ ते काहीतरी पलीकडच्याच ऐकत राहिले, नंतर कॉल संपल्यावर, ते वळून म्हणाले, "कालचा स्फोट अमोनियम नायट्रेट वापरून झालेला दिसतोय, आणि … वुई हँव रिजन टू बिलिव , बॉम्ब गोवाराणीनं मिरजेला पोहोचला … वाझ चेक करशील का..की मागचे २ स्फोट झाले होते, ज्यात अमोनियम नायट्रेट वापरलेलं आणि टार्गेट रेल्वेस्थानक होती… त्या स्थानकावर आलेल्या गाड्या, त्यांची रूटवरची स्टेशन्स , आणि गोवाराणीची मिरजेपूर्वीची अपसाईडची स्टेशनस, यात काही को-रीलेशन मिळतंय का ? "
थोडा वेळ अभ्यासून वाझ म्हणाले
'यस सर, तिघींचे रुट्स एकाच स्टेशनमधे इंटरसेक्ट होतात,…. पुण्यामध्ये '

याचा अर्थ उघड होता कोणत्या तरी दहशतवादी संघटनेच बेस ठिकाण होत .... 'पुणे'

तीन वर्षांपूर्वी

आज एक नवीन दिवस उजाडला,ती आज लवकरच उठली होती कारण आज तो दिवस उजाडला होता ज्या दिवसाची ती वाट पाहत होती. आज जीटीवी साठी, तिला मुलाखत घ्यायची होती म्हणून, खशबु जरा लवकरच उठली, सकाळची आंघोळ आवरुन ती आरशासमोर आली. आरशात बघुन स्वतःशीच म्हणाली,
'घाबरण्याच काहीच कारण नाही खुशबू, तू हे करू शकतेस', मनातल्या मनात ती थोडी धाकधुकीतच होती कारण तिला आज मुलाखत घ्यायची होती, 'अकबरउद्दीन कुरेशी ची'. हो तोच 'हरकत ऐ इत्तेहादुल मोमीन ' संघटनेचा वाचाळ प्रवक्ता. रोज बरोब्बर ७ वाजता, तिला मगरपट्ट्यातील जीटीवी च्या कॅम्पसमधे पिकअप बस येई, ती लगबगीने पिकअप लोकेशनकडे निघाली, आज एक वेगळीच स्फुर्ती तिच्यात आली होती. काल तिने त्याला दुपारी फोन करून वेळ ठरवली होती 'जनाब, माझ नाव खुशबू आहे, जीटीवी ची पत्रकार आहे, तुमची या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार मोहिमे संधर्भात मुलाखत घ्यायची होती, मुलाखत द्याल न ?'. तो खुश झाला, हा तर पब्लिसिटीचा अजून एक चान्स, सभांना गर्दी वाढण्याचे चान्सेस, परवानगी मिळाली खुशबूला
… नामचीन पत्रकार होण्याच्या इच्छेन अनेक मुल मुली मुलाखत घेण्यासाठी येतात … त्यात अजून एक. हि एक ट्रिक त्याला मस्त जमलेली, सभेत जाहीरपणे भडकाऊ वाक्य टाकायाची…फ़ुल्ल टाळ्या घ्यायच्या, मुलाखतीत पत्रकारांच्या ठराविक प्रश्नांना तीच साचेबद्ध उत्तर द्यायची … हा. का. ना. का.

खुशबूची मुलाखत सुरु झाली, त्याने तीच वाक्य फेकायला सुरु केली,
'माझा विरोध कुठल्या धर्माला नाही तर काही लोकांच्या हेकेखोरीला आहे, आपल्या कौमला स्वतःच्या उद्धारासाठी जागं व्हावं लागेल, विकासाच्या बाबतीत आपला समाज खूप माग आहे, शिक्षणाचा दर्जा कमी आहे, आपल्या क़ौमने पिक्चर सिरिअल्स अश्या गोष्टी दूर सारून त्यावर खर्च होणारा पैसा आमच्या संघटनेला दिला तर, आपल्या समाजाच्या गरजा आपल्याला भागवता येईल व इतरांपुढे हात पसरण्याची गरज उरणार नाही … वै वै ', तो अशी वाक्य झोपेतून खडाखड उठवल्यावर देखील सहजतेन म्हणू शकला असता…
खुशबूची या संघटनेतल्या इतर लोकांवर सुद्धा धावती नजर होती… मुलाखत झाल्यावर इतरांमधे मिसळून ती संघटनेत ओळखी वाढवत होती, सेक्रेटरी, खजिनदार, एवढच काय ड्रायवर लोकांशी सुद्धा तिने गप्पा मारल्या, गप्पा मारतामारता, आपण मुळचे गुजरातचे आहोत, सध्या इकडे विस्थापित झालो आहोत, हे सुद्धा ती सांगायला विसरली नव्हती…
ड्रायवरबरोबरच्या गप्पा बर्याच रंगल्या तिच्या, सुरवातीला शांत वाटणारा तो, मुद्दे मात्र निकराने मांडत होता. जसे की "इस्मुहुमा अकबरु मिन नफ़इहीमा" मतलब नफे से नुकशान ज्यादा है. हमारा नौजवान आज उसमे डूब गया है. इस्लामी अहकामसे दूर दूर हो रहा है. आज हमारे पास चेटिंग करनेका, गेम खेलनेका तो वक्त है लेकिन अल्लाहके किताबकी तिलावत करनेका, नमाज़ पढनेका वक्त नहीं. ख़ास करके हमारे भाई-बहेने मौसिकीके गाना-बाजानेके शोखीन हो रहे है. मेरी बहन ! हमको सोचना चाहिए की हम ये सिनेमा म्यूजिकी गाना बाजाने करके, ये यहूदी, अमरीकी कम्पनियोकी मिल्कतको कितना बढ़ा रहे है ! इस आवक को वो लोग इस्लामको मिटानेमें इस्तेअमाल कर रहे है. इसलिये आज़िजाना दरख्वास्त है की ये सिनेमा म्यूजिकी गाना बाजाने का बायकाट, आप आपने टीवीके जरीये करे.
खुशबुने त्या ड्रायवरला वरवर सहानुभूती दाखवली, सांगितलं की 'मला जस जमेल तशी मी मदत करेन, अश्या विचारांच्या प्रसारासाठी', मनात मात्र या ड्रायवरची नोंद ठेवायला ती विसरली नाही…
काही दिवसांनी खुशबूला न्यूज कवर करताना, त्या ड्रायवरशी पुन्हा संपर्क आला, तो म्हणाला मी ड्रायवर, माझ्यासारखे माझे मित्रपण ड्रायवर, आमचा कायमचा पत्ता नसतो, पोटासाठी फिरतीची नोकरी हि अशी, सीम कार्ड वैगरे घ्यायला गेलो की नेहमीची कुचंबना…… वै वै...खुशबू म्हणाली 'बघते मला काही करता येत का याबाबतीत' …
३-४ दिवसात खुशबूने, त्याला १० सीम कार्ड पर्स मधून काढून दिली, म्हणाली 'अरे मी पत्रकार आहे, बरीच जानपेहेचान आहे, तुझ्या या पवित्र कामात अजून काही मदत लागली तर सांग '
त्यासंध्याकाळी प्रीतमसिंगच्या मोबाईलवर ऐस एम ऐस आला, 'दहा लाडू मुलांमधे वाटले'.

सहा वर्षापूर्वी

तो संध्याकाळी निवांत बालगंधर्वपुलावर रेलींगला टेकून बसला होता… खांदा मानेचं धनुष्य ताणून, बोटांना सिगरेटचा शेवट जाणवत असताना, वारा पाठीच्या पन्हाळीतून त्याचे मानेवरचे केस भुरूभुरू कुरवाळत होता, उद्या सकाळी उठून परत रटाळ रुटीनने जीवनाला भिडावे लागणार होतं…ड्युटी संपल्यावर खत्रीच्या टपरीवर एक गोल्डफ्लेक एक कटिंग मारल्यावरच त्याच्या दिवसाचं सार्थक व्हायचं… त्याची नजर रस्ता क्रॉस करणाऱ्या झब्ब्यावर स्थिरावली…. …रस्त्याच्या उतारावरून झपाझप चालत, बसस्टेशन गर्दीत झब्बा उतरला…. झब्ब्यानं एक मोठी पॉलीथिनची पिशवीभरून आणलेलं त्याचं सामान, फलाटावर बाकड्याजवळ ठेवलं…. तेव्हड्यात मोबाईलवर बोलत बोलत पानटपरीकडे जाऊ लागला … वाय झेड अस सामान ठेवून कोणी जात का फुकायला…. चोरीला जाइल सामान … बस बोंबलत म्हणावं …निसर्गनियमांची अटळता रेखलेला त्याचा चेहेरा होता झब्ब्याचा …. गालांची उभट ठेवण असलेल्या त्या चेहेर्यावर घाऱ्या रंगाचे डोळे होते, संथ, थंडगार नजर…त्याच्या बंद जीवणीवर पुसटशी तुच्छतादर्शक रेष होती,…. हम्म… असा चेहेरा एखाद्या विरक्त संयास्ताचा असू शकेल किंवा एखाद्या निर्मम मारेकर्याचा…….

आज आपली शेवाटची भेट तुळशीबागेला… याची संगीताला पुसटशी देखील कल्पना नसेल, चितळेसमोरच्या गल्लीतून रमतगमत फुटपाथवरचा माल बघत चाललेल्या लोकांच्या भाऊगर्दीतून कशीबशी वाट काढत ती 'तुलसी' च्या दिशेन घाईघाईन चालली होती. गडबडून जाऊ नकोसं अस दहावेळा तरी तिने स्वतःला बजावलं असेल…नवीन संसार थाटायला लागणारी भांडीकुंडीच तर आज फायनल करायची आहेत आपल्याला … ती पुढच्या कोपर्यावर आली, तेव्हा चौकात लाल दिवा लागलेला होता. रहदारी थांबलेली होती …. ती थबकली … आणि तेवढ्यात गर्दीतल्या कोणीतरी तिला धक्का दिला… ती एकदम धडपडत रस्त्यावरच आली असती पण तिने तोल सावरला … 'शी ! काय ही गर्दी ! बेशिस्त कुठले ' … तीन शनिवारपेठी स्टाईल नं मनातल्या मनात शिवी हासडली, त्याचं वेळी तिला धक्का देऊन जाणारा झब्बा, हातातली भली थोरली गच्च पॉलीथिनची पिशवी फुटपाथच्या कडेला ठेवून, इकडे तिकडे बिल्डिंगकडे मान वर करून बघत होता … 'कुठनं कुठनं पुण्यात येतात अशी लोकं देव जाणे, धक्का दिला तरी सॉरी म्हणायचे म्यानर्स नाही… पूर्वीसारखं पुणे आता राहिलं नाही आता ….' असं म्हणून ती तुलसीची पायरी चढली …….

त्याचं घर म्हणजे एक हवेशीर प्रशस्त ड्यूप्लेक्स अपार्टमेंट होती …. स्वप्नशिल्प ४ थ्या मजल्यावरच. सुंदर भलामोठा हॉल, ६ फुटी प्रशस्त खिडक्या, मार्बल टाइल्स, ऐल शेप सोफा, ४५ इंच फ्लाट स्क्रीन एल इ डी, लस्टर पेंट … पलीकडे मास्टर बेडरूम , बाथरूम, स्टडीरूम, हवेशीर व प्रशस्त , भरपूर सूर्यप्रकाश येणारा… भिंतीवर छान डीकॅल … लहानखोर चणीच्या चटपटीत दिसणाऱ्या गोगटे काकांची बुद्धी अतिशय कुशाग्र होती, म्हणूनच पेठेतल्या वाड्यातल्या घराला सोडचिठ्ठी देण्याच्या मोबदल्यात… काकांनी फक्त बांधकामाच्या खर्चातच बिल्डरकडून कोथरूडमधे त्यावेळी फ्लाट मिळवला …. खिडकीतून दिसणाऱ्या पलीकडच्या सुंदर इमारती संध्याकाळी न्याहाळणे, चहाचा कप हाती घेऊन, हे एक नित्य कर्म ….रिक्षातून उतरून हातातल्या जड पिशव्या सांभाळत, तोल सांभाळत एक झब्बा त्यावेळी बिग बझार च्या दिशेन जाताना त्यांना दिसला …. 'अजून खरेदी शिल्लक राहिली वाटतं …. ' अस म्हणून काकांनी चहाचा सुरका मारला …...

न्यूज @ रात्री १० …
पुण्यात डेक्कन जिमखाना परिसर, तुळशीबाग, कोथरूड अश्या गजबलेल्या तीन ठिकाणांवर झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्यात अमोनियम नायट्रेड वापरण्यात आले असून नेमका कोणत्या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला या संदर्भात आम्ही चौकशी करीत आहोत. त्यामुळे सर्व शक्यता पडताळून पाहिल्यावरच हे कृत्य कोणी केले, हे निश्चित होणार असल्याचे दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत कोकरे यांनी सांगितले आहे. झालेल्या स्फोटांचा तपास एटीएस आणि क्राइम ब्रांच करीत असून केंद्रीय तपास यंत्रणाही या कामात आम्हांल मदत करीत असल्याचे त्यांनी सांगितले. फॉरेन्सिक तपास सुरू असून त्यानंतरच हा हल्ला कोणी केला, त्यासाठी कोणते मॉड्युल वापरले गेले, याचा तपास सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
रात्री सव्वासातच्या सुमारास येथे स्फोट झाल्यावर रात्री गृहमंत्री हे विशेष विमानाने पुण्याला आले. नऊ वाजता त्यांनी घटनास्थळाला भेट दिली. नंतर ससून हॉस्पिटल, जहांगीर हॉस्पिटल, रूबी हॉल, इन्लॅक बुधराणी हॉस्पिटलला भेट दिली. महाराष्ट्र पोलिस, केंद्रीय पातळीवरील गुन्हे अन्वेषण दल, सैन्याचे गुन्हे तपासणी दल यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री, पुणे जिल्हा संपर्क मंत्री हे होते.
त्याचवेळी हा स्फोट म्हणजे गुप्तचर संघटनेचे अपयश असल्याचा आरोप गृहमंत्र्यांनी फेटाळून लावला आहे. दरम्यान, बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या नऊ जणांपैकी दोन जण, तसेच जखमींपैकी अकरा जण परदेशी नागरिक आहेत. या स्फोटात जखमी झालेल्या ६० जणांवर शहरातील विविध रुग्णांलयामध्ये उपचार सुरू आहेत. झालेल्या बॉम्ब स्फोटांनंतर शहराच्या विविध भागात बॉम्ब असल्याच्या अफवा पसरत होत्या. मात्र, अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये असे त्यांनी यांनी नागरिकांना आवाहन केले.

बी… प, बी…प, तो सेलफोन स्क्रीनवरचा नंबर पाहू लागला. नंबर ओळखीचाच होता. तसा तो नसता, तर हा फोन त्याच्यापर्यंत आलाही नसता. मुळात अड्रेसबुकच्या बाहेरचे अनोळखी फोनच त्याला येतच नसत. त्याने सेलफोन आपल्या कानाला लावला. पलीकडून बोलणारा अतिशय उत्तेजित होऊन बोलत होता.
"अबू फैसल, तीनो निकाह मुबारक हो
"शुक्रिया " आणि तो थंडपणे आपल्या भारदार खर्जातल्या हस्की आवाजात पुढे म्हणाला, "किसीको मालूम अभी तीनो भाई कैसे है ?" ……
"तीन्हो दुल्हे बखैरियत है …अलसुबह से ही बारातें आने शुरू हो गई थी, आपकी सख्त तक़िद के हवालेसे दूल्हा-दुल्हन के निकाह की अलग-अलग व्यवस्था की, और फिर दूल्हा व दुल्हन का निकाह कराया। जैसे ही निकाह हुआ पाण्डाल में मुबारक हो मुबारक हो का शोर गूंजने लगा" पलीकडून बोलणारा म्हणाला…
"ठीक है" म्हणून त्याने कॉल कट केला….

कानावरचा हेडफोन बाजूला ठेवत प्रीतमसिंग म्हणाला "आत्ताचा कॉल पुण्याजावळून, बिहार नेपाळ बॉर्डर जवळ होता …. आपला संशय खरा आहे म्हणजे, अबू फैसल आणि दरभंगा मॉड्यूल यात सामील दिसतंय", "आतापर्यंत बिहारमधून तो नेपाळ मार्गे पाकिस्तानात पोहोचला असेल"
"अबू फैसल बद्दल फार काही माहिती आपल्याकडे नाही, गेली कित्येक महिने तो हुलकावणी देत आहे आपल्याला, त्याचा साधा फोटो सुद्धा नाही आपल्याकडे " वाझ म्हणाले "सध्यातरी आपण हे सर्व टँप संभाषण, ट्रान्सस्क्रिप्टसकट व्यवस्थित सिस्टीममधे आरकाईव करत आहोत, म्हणजे गृहखात्याला आपल्याला विकली रिपोर्टमधे त्याची समरी देता येईल '
तेव्हा हेमंत कोकरे म्हणाले, "असं नाही चालणार, आपण हे खास टास्कफोर्स त्याच्यासाठी, मिरज-स्टेशन बॉम्बब्लास्ट नंतर, इथे विद्यापीठाच्या आवारात सुरु केल, …. काही तरी प्रोग्रेस मला गृहसचिवानां दाखवावी लागेल, जर प्यासा कुंयेके पास नही आ रहा है, तो अभी वक्त हो चला है, की कुआ प्यासे की तरफ बढे, जर इतके महिने आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहोत, तर त्याला आपल्याकडे येण्यासाठी मजबूर केलं गेलं पाहिजे "

दरम्यान कतार येथील एका हॉटेलमधे…..
"भाईजान कुछ मिला ?"
"हा कुछ खास नही, बहोतसी चीजे इंक्रीप्टेड है, फिर भी अपने कामकी कुछ समरी-रिपोर्ट्स मिली है, मेजर इक्बाल अभी तो खुश होगेही. "

आय ऐस आय चा मेजर इक़्बालच्या टेबलावर जेव्हा ते समरी-रिपोर्ट्स पोहोचले, तेव्हा त्याला कळून चुकले कि आता भारतीय सुरक्षा यंत्रणानां माहिती आहे, की त्या साखळी बॉम्बस्फोटांमागे अबु-फैसल आहे…. अबू फैसल हे नाव त्यांच्या कानावर कसं आलं, याचा तो विचार करू लागला, कारण त्याच्या हातातल्या भारतीय सुरक्षा यंत्रणानांच्या समरी-रिपोर्ट्स मधल्या सध्याच्या माहितीवरून फक्त तो तेव्हडाच तर्क करू शकत होता.

दोन वर्षांपूर्वी

'१० साल गुजर गये उस रातको फातिमाआपा, ताभिस्से मैनेभी नही देख्या मैने अपने एकलोते लाडकेकू', फिटरका कामके वास्ते हररोज की तरह सुबह को बाहर गया, लेकिन वापीस आयाच नै. कहा होगा मेरा जब्बु. तू नसीबवाली तेरी एक लडकीतो बच गयी. अभी उसकेवास्ते तेरेकु जिना चाहिये, जा सो जा…
'हा फरीदा… खुशबू अभी आतेही होगी…' अस म्हणून फातिमा आपल्या घरात गेली खरी ….
पण इकडे फरीदा घरात येवून अस्वस्थपणे विचार करत बसली … आजही तिला तिचा मुलगा जबिउद्दिन त्यादिवशी सकाळीच गँरेजकडे जाताना दिसला… तो शेवटचाच…गावच्या मेळ्यामधे त्याच्या ओरीजनल भारदार खर्जातला आवाजत म्हटलेला फिल्मी डायलॉग 'कितने आदमी थे… तेरा क्या होगा कालिया' …सगळा मेळा खुश व्हायचा, म्हातारपणामुळ मेळ्या जाऊ शकलो नाही तर, शेजारच्या मुलाने त्याच्या आवाजात रेकोर्ड केलेली कॅसेट घरी आणून दिली होती ……. तीच कॅसेट आणि तोच आवाज, म्हातारपणाचा आधार आहे आपला …. असा विचार करत, तिचा हात टेपरेकोर्डकडे वळाला …

'माशाल्ला क्या डायलॉगबाजी है, कौन है ये चाची ?' खुशबुने विचारलेल्या प्रश्नामुळे फरीदा तंद्रीतून भानावर आली ….'मेरा बेटा जबी, दंगोमें उसे मैने खो दिया, अल्ला जाने वो अभी जिंदा है या नही …. ' फरीदा उत्तरली …
'जैसेही ऑफिससे आज घर आई, तो आपके घरसे ये आवाजे सुनकर मै यहां देखने के लिये आई, कि आज चाची कोनसा प्रोग्राम देख रही है , इतनी देरशामतक' ……

गोखले नगर मधील सिम्बीऑसीस इन्स्टीट्यूट ऑफ कम्पुटर रिसर्च च्या कॅम्पसमधे फिगो आत शिरली, फिगोमधल्या व्यक्तीने टीचिंगस्टाफ कार पार्किंग मधील एका जागेवर नजर फिरवली, त्याजागी त्याला आपेक्षित सांट्रो दिसली, त्यावाक्तीने आगंतुक पार्किंग मधे फिगो लावून, गेटपासच्या फॉर्मालिटी पूर्ण करून संस्थेच्या वर्तुळाकार इमारतीकडे चालायला सुरवात केली, या वर्तुळाकार इमारतीच्या उजव्या बाजूस असलेल्या एका इमारतीमधे संस्थेचे मुख्य प्रवेशद्वार आहे. यामधून प्रवेश केल्यावर आत परत एक डावीकडे जाणारा एक पॅसेज लागतो या पॅसेजने गेल्यावर संस्थेच्या एका इमारतीत तो पोचतो जी वर्तुळाकार इमारतीच्या बरोबर मागे आहे. दर्शनी भागाची सजावट, कमालीची सौम्यता शांती दर्शवणारी असते. मुख्य प्रवेशद्वाराजवळ परत एक धातू शोधक फ्रेम बसवलेली आहे, शेजारी गार्ड उभा आहे. या फ्रेम मधून जाताना बीप बीप वगैरे आवाज आले तरी फारसे कोणी त्याकडे लक्ष देत नाही. तिथून थोडं पुढे गेल्यावर टीचिंग स्टाफरुम सेक्शन चालू होतो. यात अनेक कक्ष असतात, त्यांच्या दरवाजावर क्रमांक दाखवणारी पाटी. चकचकणारी धातूची. क्रमांक 301. आणि दरवाजाची ती तसली आकर्षक आधुनिक वळणाची मूठ. त्या बंद अलिशान वातानुकूलित खोलीच्या दरवाजावर नॉक करून ती व्यक्ती दरवाजा थोडासा उघडते, व म्हणते 'मे आय ?',
'येस हेमंत प्लीज कम'… प्रा. पांडुरंग सदाशिव साने म्हणतात व आपल्या जागेवरून हँडशेकसाठी हात पुढे करतात. तो हात हातात घेत हेमंत कोकरे विचारतात…. 'कधी येतोस मग ?'

अंगात लांब बाह्यांचा शर्ट, जेमतेम मध्यम उंची, धारदार नाक त्यावरचा जाड भिंगाचा चौकोनी चष्मा, त्यातून लुकलुकणारे घारे तेजस्वी डोळे पण त्याच डोळ्यांनी रोखून पाहिल्यावर अनेकदा समोरच्याला घाम फोडायला पुरेसे ठरत. म्हतारपणामुळे चालताना आधारासाठी सदा सर्वकाळ हातातली काठी लँपटॉपकडे तोंड करून ठेवलेली तिरकी खुर्ची. तिच्या पाठीवर आपली पाठ व डोकं न टेकता साने सर बसले. दोन क्षण डोळे शांतपणे मिटलेले. हात दुमडून घेऊन बोटं एकमेकांना जुळवलेली, ठेवून साने म्हणाले. 'परत एकदा सांगशील हेमंत ?'
हेमंत कोकरे बोलू लागले 'काल मोबाईलवर सांगितलं तसं, माझ्या आमच्या सिस्टीमबद्दल काही शंका आहे, म्हणून मला सेकंड ओपिनियन हवं आहे, तुझ्यासारख्या विश्वासू व्यक्तीकडून, माझ्या बघण्यात असं आलं आहे की आमच्या काही एन्क्रिप्शन अल्गोरिदम युसर मान्युअलसना आक्सेस करण्याचा प्रयत्न झाला आहे, तू माझ्या कामाच्या जागी आलास कि तुला मी लॉग देतो, तो तपासून तुझ मत मला सांग, तसं मी माझ्या निष्कर्षाजवळ आलेलो आहे, पण तुझंसुद्धा ओपिनियन हवं आहे '
"ठीक आहे उद्या सकाळीच येतो, मला पिकअप कर बाणेरमधे घरासमोर."
"आणखी काय, काय म्हणतोय शैक्षणिक पेशा तुझा, आपल्या पहिल्या करीयरची, जुन्या थरारक दिवसांची आठवण येते का ? "
"खूप येते, पण तुला तर माहिती आहे, आपण त्याबद्दल अक्षर उच्चारू शकत नाही, नॉस्टाल्जिक झाल्यावर हे पुस्तक उघडून डोळ्यापुढे धरतो" असं म्हणून, प्रा. पांडुरंग सदाशिव सानेनी एक पुस्तक टेबलावर हलकेच भिरकावले…टेबलावर पुस्तक गिरकी घेत हेमंत कोकारेंच्या पुढ्यात येवून थांबले …. त्याच्याकडे बघून… क्षणभरच कोकारेच्यासुद्धा चेहेर्यावर नॉस्टाल्जिक मंद स्मित तरळले…पुस्तक होतं ….
कावबॉईज ऑफ आर एंड ए डब्ल्यू : डाउन मेमरी लेन

दुसर्या दिवशी पांडुरंग साने, हेमंत कोकरे यांच्या सोबत पुणे विद्यापीठ परिसरातील 'सेंटर फॉर साउथ ऐशियन इकोनोमीक स्टडी ग्रुप' च्या इमारतीतून बाहेर पडले …. त्याच्या दुसर्या दिवशी पुण्यातील प्रसिद्ध दै. धडाकेबाज मधील पान ७ खालील उजव्या कोपर्यात एक बातमी अंग चोरून उभी होती .

पुणे दि. २७ : पुणे विद्यापीठात कार्यरत असलेल्या, सहायक अभियंता असलेल्या व्यक्तीला पुणे पोलिसांनी, ऑफीशियल सिक्रेट अॅक्ट अंतर्गत अटक केली असून काल स्थानिक न्यायालयात त्यास उपस्थित केले असता त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव अमर उपाध्याय असून, काही संवेदनशील व गोपनीय कागदपत्रे गोळा केल्याचा त्याचावर आरोप ठेवण्यात आलेला आहे. पुढील तपास चतुर्श्रुंगीठाण्याचे निरीक्षक पी.ए. उईके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

आय एस आय च्या आपल्या ऑफिसमधे मेजर इक़्बाल, स्याटेलाईट फोन कानाला लावून, डोळे बंद करून, काळजीपूर्वक पलीकडच्याच ऐकून घेत होता. 'ठीक, जो होनी वो देखी जायेगी' म्हणून त्याने कॉल कट केला. दोन मिनिट डोक दोन्ही हाताने गच्च पकडून विचार केला आणि इंटरकॉम वरून त्याने फर्मावलं 'फयाजको अंदर भेजो'. युनिफोर्ममधील फयाज आत आला त्याने स्यालुट मारला……
'पासपोर्ट ऑफिसमे अपना कोनसा बंदा है अभी'
'जनाब, सभी बंदे अपनेही है, अगर आप हुक्म करे तो वजीर-ए- दाखला खुद पेश हो जाये '
छद्मीपने हसून त्याने, नोटपॅडवर काही खरडले, व म्हणाला 'ये डिटेल के साथ नया पासपोर्ट बनवाओ, उसके बाद, अबु-फैसलको कहना की, ये पासपोर्टपे उसे सौदी जाना होगा, तुरंत …. और उसको नया प्रोफाईल समझा देना '….

सहा वर्षापूर्वी

मिरज जंक्शनमधे शेकडो गाड्या विविध दिशेने, विविध वेळेला येतात, व विविध दिशेने, विविध वेळेला जातात, पण फ्रुटीच्या टेट्राप्याकचा एका तुकड्या वरून, तो उंडगीचा बसवप्पा, आणि त्यांने ज्या ट्रेनमधून पेटी लंपास केली, त्यावरून ती ट्रेन, तिची दिशा ठरवता आली म्हणूनच, पुण्याला केलेला मोबईल कॉलनंतर, त्याने ऑफिसमधला टीवी चालू केला त्यावर …. ब्रेकिंग न्यूज येत होती.

ब्रेकिंग न्यूज
काल झालेल्या मिरज जंक्शन बॉम्बस्फोटा नंतर सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्रीपदी असलेले श्री विजय देशमुख यांना पक्षश्रेष्ठी, नैतिक जबाबदारी घेऊन पायउतार होण्यास कधीही सांगतील, असे आमचा दिल्लीस्थित सूत्राने सांगितले आहे, श्री विजय देशमुख हे आजरा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांच्याजागी सध्याचे कृषीमंत्री व संगमनेरचे आमदार श्री बाळासाहेब थोरवे याचं नाव चर्चेत आघाडीवर आहे, निष्ठावंत गटातील श्री थोरवे हे आजच आपला इस्त्राईलचा कृषीदौरा आटोपून दिल्लीत परतले असताना त्यांना तडक १० ध्यानपथ इथे पाचारण करण्यात आले होते. त्यावेळी इस्त्राईलचे भारतातील दूत बेंजामिन लेवी हेही उपस्थित होते, मिरज जंक्शन बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानाबरोबर झालेल्या चर्चेत त्यांनी भारतातील इस्त्राईलच्या नागरिकांच्या सुरक्षेविषयी आपली मते मांडली
कंटाळून त्याने टीवी बंद केला, गेले कित्येक तास झोप नाही, की जेवण नाही, अश्या अवस्थे नंतर डीऐसपी मगदूमला एकाचवेळी तीव्र झोपेची व भुकेची जाणीव होऊ लागली………

त्याच संध्याकाळी, १० ध्यानपथ
व्हरांड्यात दोन व्यक्ती चर्चा करत होत्या.
"मिनिस्टर, त्या हल्ल्यात जे २ इस्त्राईलचे नागरिक मारले गेले, त्याचं पोस्टमोर्टेम होऊ न देता, त्याचं पार्थिव आमच्या हवाली करावं, अशी माझ्या देशाची विनंती आहे."
"परंतु गुन्हा घडल्यावर पोस्टमोर्टेम होऊनच पर्थिवाचा ताबा दिला जातो, असा नियम आहे"
"मला कल्पना आहे, पण तेल-अवीव वरून माझ्यावर थोडा दबाव आहे, हे पहा याविनंतीमागे पूर्णतः भावनिक कारण आहे"
"योर एक्सेलंसी, उद्या मी तुमच्या जागी असलो व तुम्ही माझ्या, आणि जर माझ्या देशाकडून काही विनंती केली गेली, तर तुम्हीही तीचा मान ठेवाल, अशी आशा मी बाळगू शकतो का ?"
"जरूर, तेल-अवीव ह्याची दखल नक्की घेईल"
"ठीक आहे, मी वचन देत नाही, पाहतो काही करता येत का ! "
"Thank you "
यानंतर दोघेही वेगवेगळ्या दिशेला चालू लागले…… त्यातली एक व्यक्ती पोर्चपुढील गार्डनमधे एकांतात उभी राहिली व त्या व्यक्तीने नंतर मोबाईल नंबरवर कॉल लावला, "हलो डी आय जी ओझा, मी बाळासाहेब थोरवे बोलतोय, तुमच्याकड एक काम होत…. "

रात्री मोबाईल वाजू लागल्याने, डोळे चोळतच स्क्रीनकडे पहिले, थोडं अलर्ट होऊन कॉल एक्सेप्ट केला,
'सर डीऐसपी मगदूम हियर'
'मगदूम, डी आय जी ओझा स्पिकिंग '
'सर'
'मगदूम ते २ परदेशी नागरिकांचं पोस्ट मोर्टेम होणार नाही, बॉडीज रेफरिजरेटर कॅरीअरमधून लगेच मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल ५ कडे पाठवण्याची आरेंजमेंट करा. '
--------------------------------
वाचकांनी कथेदरम्यान विचारलेला प्रश्न, पोस्ट्मॉर्टेम शिवाय कुणाची बॉडी जाऊ देतात ?
लेखकाला आपेक्षित कथासूत्र मीमांसा : मिरज-जंक्शन बॉम्बब्लास्ट मधे गोव्याला जाणार्या दोन परदेशी (इस्रायली ज्यू ) नागरिकांचा मृत्यू होतो, त्यानंतर त्याचं पार्थिवाची अजून चिरफाड होऊ नये असे त्यांच्या कोठल्यातरी नातेवाईकांना (इस्रायल मधील प्रभावशाली कुटुंबियांना) भावनिक दृष्ट्या वाटते. ते त्यांच्या इस्रायेलमधील प्रभावाचा वापर करून, भरताकडे आपली मागणी मांडतात. ('I owe you one' style favour). नियमानुसार पोस्ट्मॉर्टेम शिवाय कधीही पार्थिव त्याब्यात देत नाहीत, परंतु भारतीय उच्चपदस्थ त्यांच्या डीस्क्रेशनरी पॉवरस वापरून, इस्रायेलवर फेवर करतात (भारताच्या राष्ट्रीय हिताला बाधा न आणता). हेतू हा, कदाचित उद्या भारताला इस्रायेलच्या अश्या डीस्क्रेशनरी मदतीची गरज पडली तर अश्या केलेल्या उपकारांची आठवण त्यांना करून देऊन, त्यांच्या कडून काही कार्यभाग साधता येईल.

-----------------------------------

त्या दिवशी संध्याकाळी पांडुरंग साने, हेमंत कोकरे यांच्या सोबत पुणे विद्यापीठ परिसरातील 'सेंटर फॉर साउथ ऐशियन इकोनोमीक स्टडी ग्रुप' च्या इमारतीतून बाहेर पडले, व बोलू लागले ….
'मला वाटतं, हेमंत तूला ज्या व्यक्तीवर संशय आहे, माझ्याही मते तोच मोल आहे सिस्टीममधला'
'ठीक आहे, साधारणपणे सिस्टीम किती व कुठे वल्नरेबल आहे, याचा तुला अंदाज आला आहे का ?'
'अंदाज आहे पण, तू मला १ अठवडा दिला पाहिजे, कारण मुलांची प्राक्टीकल्स एक्साम चालू आहेत २-३ दिवस मला हलता येणार नाही, पण त्यानंतर मी व एक माझा सहकारी येवून, तुझी सिस्टीम पूर्णपणे स्वीप करून देऊ'
'वेट अ मिनीट …वेट अ मिनीट … तुझा सहकारी ????'
'अरे काळजी करू नकोस …. माझा शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी आहे एक … मुळचा नागपूरचा …गौतम मेश्राम … पठ्ठ्या एक्स्पर्ट आहे … वेब टेक्नोलॉजी क्लाउड … ऐनक्रीपशन… यु नेम इट …. अंड ही डझ …'
' तुझा सहकारी ????' अजूनही हेमंत आपल्या कपाळावरील आठ्या कमी करत नव्हता .
'अरे मी बाणेरला राहत असलो म्हणून काय झालं, … माझ्या सदाशिव पेठी नजरेने मी त्याला कधीच पारखला आहे, विश्वास ठेव माझ्यावर … '
'आर यु शुअर ?'
'ट्रस्ट मी, गुगलू इज बेस्ट फीट हिअर … '
'नाऊ हु इज गुगलू ? '
'अरे तोच गौतम !… काय आहे ना… शेवटच त्याचं वर्ष पूर्ण होण्याआधीच गुगल ने त्याला ऑफर दिली, म्हणून मग त्याचे मित्र त्याला गुगलू म्हणतात'
'ओ के, त्याची मदत घे… तुला माहिती आहेच … कुठल्या प्रकारची माहिती असते सिस्टीम मधे …'
'डोंट वरी हेमंत, योर बेबी इज लाईक माय बेबी…'
प्रा सानेंना आपल्या कारने घरी ड्रांप केल्यावर… हेमंत कोकारेंनी मोबाईल नंबरवर कॉल लावला, "हलो प्रीतमसिंग, सिक्युअर कलप्रिट, आणि इनीशीएट 'प्रोटोकॉल अहिल्या' “…

''प्रोटोकॉल अहिल्या' ??? …… हे काय असतं वाझसर ?'
'खुशबू बेटा, कधी लहानपणी विषअमृत खेळलीस का ?'
'हो खेळले ना. का ?'
' 'प्रोटोकॉल अहिल्या' इनीशीएट केला गेला म्हणजे…. आपल्या टीमलीडरने सर्व टीममेंबरनां एकाच वेळी सरसकट 'ब्लांकेट विष' दिल आहे या डावामधे, प्रिकॉशन म्हणून …… नाऊ टाइमबीइन्ग, वी ऑल आर स्टोन्स … टील … टीमलीडरने सर्व टीममेंबरनां एकाच वेळी सरसकट 'ब्लांकेट अमृत' दिल पाहिजे, म्हणजे 'प्रोटोकॉल अहिल्या' विड्राव केला पाहिजे'
‘म्हणजे काय ? असं का करतात सर ?'
'जेव्हा कधीही एखादा सिक्युरिटी ब्रीच किंवा लूपहोल, एखाद्या सक्षम अधिकार्याच्या निदर्शनात येतो वा आणून दिला जातो, तेव्हा तो, ती सिस्टीम फ्रीज करून टाकतो, कुठलीही माहिती त्या सिस्टीमच्या आत वा बाहेर येत-जात नाही, एवढंच काय आता आपलं मोबाईल कम्युनिकेशन सुद्धा आपण थांबवावं लागेल, ब्याटरी काढून सीम सकट सर्वांनी मला त्यांचा मोबाईल द्यायचा आहे , तू सुद्धा'
खुशबूने तसं करून मोबाईल वाझ यांच्याकडे दिला …
'आज संध्याकाळी सर्वांचे सीम कात्रीने कापून ठेवणार आहे, ते व मोबाईल फोन्स माझ्या बेकरीच्या भट्टीत डीस्त्रोय करणार आहे, आपल्या सर्वांना टीमलीडकडून जो पर्यंत ऑलक्लियर येत नाही तोपर्यंत…… आपण काहीच करणार नाही आहोत …. नो सर्वेलन्स …. नो नथिंग …. कळल ?'
'कळल सर… जेव्हा जेव्हा टीमलीडला कामाचा खूप कंटाळा येतो …. तेव्हा तेव्हा 'प्रोटोकॉल अहिल्या' इनीशीएट केला जातो'…. खुशबू गमतीने म्हणाली.
'हा हा हा, गुड वन खुशबू, नाऊ गुडबाय '
'गुडबाय सर'

सकाळपासूनच सौदी अरेबियाच्या दम्माम शहराच्या २० कि मी पश्चीमोत्तर दिशेला असलेल्या किंग फहाद इंटरन्याशनल एयरपोर्टवर नेहमीप्रमाणेच गर्दी होती. अनेक वेगवेगळी विमानं तीथे येऊन पोहोचत होती. अनेक विमानं वेगवेगळ्या दिशांना उड्डाण करत होती. वेगवेगळ्या विमानांतून आलेले प्रवासी इमिग्रेशन आणि कस्टम्सच्या अधिकार्यांसमोर तपासणीसाठी रांगा लावत होते. पासपोर्ट आणि व्हिसा तपासणी केल्याविना अर्थातच कोणालाही प्रवेश मिळू शकत नव्हता! कोणत्याही आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिसणारं हे नेहमीचंच दृष्यं होतं. दुपारच्या सुमाराला पाकिस्तानमधून येणारं पीआयऐ च एक विमान रनवेवर उतरुन नुकतंच थांबलं होतं. विमानातील प्रवासी आपापले पासपोर्ट आणि व्हिसा याच्यासह इमिग्रेशन आणि कस्टम्सच्या अधिकार्यांसमोर रांगा लावत होते. एकेका प्रवाशाची तपासणी करुन अधिकारी त्याला प्रवेश देत होते. एक माणूस असाच एका इमिग्रेशन अधिकार्यासमोर जाऊन उभा राहीला. आपला पासपोर्ट त्याने तपासणीसाठी त्या अधिकार्याच्या हवाली केला. अधिकार्याने तो पासपोर्ट पाहीला आणि तो पासपोर्ट पाकिस्तानचा होता…
तो माणूस सुमारे साडेपाच फूट उंच आणि मध्यम बांधा होता. त्याने दाढी राखलेली होती. साधा पठाणी पोशाख त्याने घातलेला होता. वयाने तो साधारण तिशीत असावा!
सौदी अधिकार्यांनी इमिग्रेशन काऊंटरवरुन त्याच्याकडे चौकशीस प्रारंभ केला. "तुझं नाव काय?"
'लियाक़त अली'
"तू कुठून आलास?"
"मी मूळचा पाकिस्तानचा रहिवासी आहे!" तो म्हणाला, अधिकार्यांनी त्याचा पासपोर्ट नीट तपासला. पासपोर्ट नवा कोरा होता, नुकताच इस्लामाबाद इथून तो जारी करण्यात आलेला होता, इस्लामाबादेतून कालच्या तारखेची एक्झीट शिक्का शिवाय पासपोर्टवरील कुठल्याही शिक्क्यांची नोंद नव्हती, सौदीचा व्हिसा अर्थात त्याला देण्यात आला होता. 'पर्पज ऑफ योर विसिट ?'
'फळांचा एक्स्पोर्टचा बिसिनेस आहे माझा, त्या संधर्भात सौदीत बिसिनेस वाढवण्याच्या दृष्टीकोनातून काम करणार आहे'
'ठीक आहे, सर्वशक्तिमान अल्ला तुझ भलं करो'… असं म्हणून सौदी इमिग्रेशन अधिकार्याने त्याचा पासपोर्ट वर सौदी एंट्री शिक्का उमटवला…….

"होणार होणार म्हणून कधी गाजत असलेला तर कधी कुजबुजत असलेला केन्द्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तार आणि खातेबदलाचा बहुप्रतीक्षित सोहळा या आठवड्यात, किंबहुना आज-उद्यालाच, पार पडेल अशी चिन्हे आहेत. पंतप्रधानांनी मागच्या वेळी आपण संसदेच्या अर्थ-संकल्पीय सत्रानंतर मंत्रिमंडळात व्यापक फेरबदल करणार असल्याचे सांगितले होते. काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात झालेल्या दहशतवादी कारवायांमुळे केवळ सरकारच्या अडचणीच वाढलेल्या नाहीत तर पंतप्रधानांच्या कर्तबगारीवरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. विरोधीपक्ष त्यांचा 'आत्तापर्यंतचा सर्वात कमजोर पंतप्रधान ' म्हणून हिणवण्याची संधी सोडत नाही आहे. आता मंत्रिमंडळ विस्तार आणि काही प्रमाणात खातेबदल करवून सरकारची प्रतिमा उजळ करण्याचा प्रयत्न होत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री बाळासाहेब थोरवे यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, त्यांच्या जागी माजी मुख्यमंत्री विजय देशमुख यांची मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली आहे.बाळासाहेब थोरवे यांची केंद्रात गृहमंत्री पदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. सकाळी झालेल्या पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या "बदली'नंतर मुख्यमंत्रिपदासाठी अनेक नावे पुढे येत होती; पण, राज्याचे माजी मुख्यमंत्री विजय देशमुख यांनी यामध्ये बाजी मारली. विधिमंडळाच्या त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्तेतील आघाडीतील घटक पक्षांमधील दिलजमाई करण्याचं "कसब", त्यांच्या या नेमणूकीमागे मुख्य कारण आहे, असे आमचे राजकीय विश्लेषक सांगतात." …………एवढी बातमी उर्दूमधे ड्राफ्ट करून खुशाबुने आपला टी ब्रेक घेतला.

'प्रोटोकॉल अहिल्या' इनीशिऐट करण ही एक प्रीकॉशन होती, आणी आपल्या व्यावसायिक स्वभावानुसार एक पाऊल पुढे टाकतांना मागचं पाऊल सुरक्षित असल्याची खात्री झाल्याशिवाय पुढे जाणं मला आवडतही नव्हतं.… हेमंत कोकरे स्वतःशीच बोलत होते. प्रा. सानेनी सांगितलं की आता सर्व सिस्टीम सुरक्षित आहे… तरीही राहून राहून मनात विचार येतोच की किती माहिती शत्रूपर्यंत गेली असेल. त्या आठवडाभर सर्व काही फ्रीज होत पण आता आपण 'प्रोटोकॉल अहिल्या' विद्रॉव करून महिना झाला … इंटरसेप्टेड सर्वेलंसमधे अबू-फैसल कुठेच आढळून येत नाही…. भारतातून कॉल जाताहेत पण अबू-फैसल कुठेच नाही … हा एकदम हवेत विरघळून कुठे गेला ?…. मोठ्या मुश्किलीने इथवर पोहोचलो होतो…. माग थंड झाला कि परत पकडण अती मुश्किल …ड्याम इट… मला वाटतंय मायबाप केंद्राची अजून मदत घ्यावी लागेल…

मेजर इक़्बाल अजूनही त्याची सिगारेट दोन बोटांत ठेवून विचार करत होता… भारतीय सुरक्षायंत्रणेन त्याचा 'मोल' पकडला होता… त्यांना अबू-फैसल हे नाव ही माहिती झालं होत… आपल्याला फक्त काही समरी रिपोर्ट मिळाले होते त्याच्यामदतीने आपण हा तर्क केला ……तशी बाकीच काहीच माहिती मोलकडून मिळाली नाही आपल्याला, आत्तापर्यंत भारतीय सुरक्षायंत्रणेला संपूर्णपणे कळल असेल का अबू फैसल कोण आहे ते ?…. जर कळल तर ते पाकिस्तानवर परत आंतरराष्ट्रीय प्रेशर आणायला सुरवात करतील …. त्याआधीच आपण अबू-फैसलला सौदीला हलवलं … ते बर केलं …जा म्हणावं तिथं तुझ्यासारख्या भारतीय वंशाच्या मुसलमान कामगारांना जिहादच महत्व पटवून दे …. गुजरातच्या फिल्म्स दाखव……आपल्याला तुझ्या सारखे आणखी अबू भारतात तयार करायचे आहे.…

पंतप्रधान म्हणजे पब्लिकला वाटत तसं जोरकस बोलणारा, सॉलिड असा वागणारा, वेगाने निर्णय घेऊन कृती करणारा अस दिसलं म्हणजे खरा पंतप्रधान …. अर्थतज्ञ पंतप्रधान डॉ योगेंद्र यादव म्हणजे याच्या एकदम विपरीत… अत्यंत शांत, संथ, संयमी आवाजात, कुठेही आक्रस्ताळेपणा न करणारं, बाह्य करणी कधीही जोरकस, सॉलिड असे न वागणार, व्यक्तिमत्व. विरोधीपक्षातलं, किंवा पत्रकारांपैकी कोणी काही बोललं, अपमान केला, दुरुत्तर केली, प्रसंगी त्यांच्या कामावर संशय घेतला तरीही हा माणूस सगळ ऐकून घेतो पण उलटून बोलत नाही, प्रसंगी काही बोललेच तर किंचित शेरो शायरीत … तेही स्वतः पंतप्रधान असून … या माणसाच्या तोंडून एकही उणा शब्द जात नाही. पहिल्याच भेटीत माणसांना आपलेपणा वाटावा असं व्यक्तिमत्व. ४ वेळा बायपास होवूनही दिवसातले १६ ते १८ तास कामाच्या व्यापात जात … अश्या पंतप्रधानांचा चेहेरा थोडासा लाल झाला होता …
'या दहशतवादी कारवाया थांबल्या पाहिजेत '… 'भारतीय सुरक्षायंत्रणा एका दहशतवाद्याला का पकडू शकत नाही ? यापेक्षा जास्त नामुष्कीची गोष्ट माझ्या सरकार साठी काय असू शकते '…
१० ध्यानपथ वर ही बैठक चालू होती. हे पंतप्रधानांचे निवासस्थान व कार्यालय देखील होते. गृहमंत्री थोरवे, गृहसचिव मेहेता त्यांच्या सोबत आढावा बैठक चालू होती… गृहसचिव माहिती देत होते की या कारवायामागे 'अबू फैसल' या व्यक्तीचा हात आहे, पण सुरक्षायंत्रणेकडे त्याचा एखादा फोटो वा फिंगर प्रिंट वा काही सॉलिड माहिती नव्हती. काही दिवसापासून त्याचा ट्रेस पण जवळजवळ नाहीसा झाला होता, त्याचा माग काढण्याचा पूर्ण कसोशीने प्रयत्न चालू होता…
पंतप्रधानांनी आपल्या सरकारच्या अभीभाषणात घोषणा केली होती की 'या दहशतवादी कारवाया बंद करण माझ्या सरकारपुढील महत्वाची बाब आहे' पण वास्तविकता त्यांच्या आदर्श विचार व आशावादाशी सुसंगत नव्हती. बैठक संपली, सर्वजण निघून जाऊ लागले तरी, बाळासाहेब थोरवे आपल्या ब्लाकबेरी चा बॉल रोल करत कुठला तरी नंबर शोधत होते, बैठकी आधी हेमंत कोकरे यांनी त्यांना परिस्थितीची कल्पना दिली होती, त्यामुळे आता वेळ झाली होती आपण केलेले फेवर कॅश करण्याची …. थोड्याच वेळात त्यांना तो हवा असलेला नंबर सापडला …… बेंजामिन लेवी

'ठीक आहे सर'… अस म्हणून हेमंत कोकरेनी कॉल कट केला… पलीकडच्या बाजूने गृहमंत्री होते… त्यांनी सूचना केली होती त्याप्रमाणे … त्या व्यक्तीची भेट घ्यायची होती…
इंग्लिश गॉथिक या वास्तुकलेवर आधारित वीट बांधकामाचा वापर करून एक आगळी-वेगळी सौंदर्यपूर्ण इमारत उभी राहिली ती म्हणजे ज्यू धर्मीयांचे प्रार्थनास्थळ म्हणजेच "सिनेगॉग.' या वास्तूचे नाव फारसे कोणाला माहीत नाही किंवा नावावरून ही वास्तू कोणती, असा प्रश्न कोणालाही पडेल. ही वास्तू म्हणजे कॅंपमधील आंबेडकर रस्त्यावरील सुप्रसिद्ध "लाल देऊळ! एरवी शांत असणाऱ्या, थोडेसे गूढ वाटावे असे वातावरण असणाऱ्या लाल देऊळ म्हणजे ओव्हल डेव्हिड सिनेगॉगचा परिसर त्या दिवशी गजबजून गेला होता. प्रार्थना. श्रद्धा, अभिमान आणि उत्साह अशा वातावरणात या सिनेगॉगचा वर्धापन दिन समारंभ होत होता. आशिया खंडातील हे सर्वात मोठे सिनेगॉग स्थापत्यशास्त्राचा एक सुंदर नमुना आहे. सर डेव्हिड ससून यांनी या सिनेगॉगची उभारणी केली. ऐतिहासिक वारसा असलेल्या या इमारतीची पुण्यातील साधारण १०० ते १५० ज्यू कुटुंबांनी जपणूक केली आहे. या सिनेगॉगच्या वर्धापनदिनी शहरातील ज्यू नागरिकांबरोबरच मुंबई, इस्त्रायल, अमेरिकेतूनही ज्यू नागरिक या समारंभासाठी आले होते. सिनेगॉगचा परिसर रोषणाईने सजला होता. या सिनेगॉगच्या आजपर्यंतच्या प्रवासाच्या छायाचित्रांचे छोटेखानी प्रदर्शनही भरवण्यात आले होते. आणि या प्रदर्शनात हेमंत कोकरे शोधत होते 'त्याला', गृहमंत्र्यांच्या सुचनेनुसार ते कोणा 'डेविड कोहेन' या व्यक्तीची वाट बघत होते, ज्यु लोकांच्या गर्दीत ते लगेचच वेगळे उठून दिसत होते, तेवढ्यात एक म्हातारी व्यक्ती त्यांच्या दिशेने चालत आली, म्हातारी असली तरी पाठीचा कणा ताठ, चालीतली शिस्त, डोक्यावर किप्पाहः, आणि म्हणाली
'आपणास काही मदत हवी आहे का ?'… हेमंत कोकरे म्हणाले 'नाही मी कोणाची तरी वाट बघतोय'…. त्याने विचारले 'तुम्ही हेमंत का ? '… कोकरेच्या मनात विचार आला की 'यांना कसं ……', ' पण जाऊ दे ' म्हणून त्यांनी तो झटकला, 'आपण कोण ?' कोकारेंनी विचारले…
'मायसेल्फ 'डेविड कोहेन', And I believe you have something for me ?
'येस' म्हणून हेमंत कोकारेंनी त्याच्या तळहातात कागदाचे चिटोरे, कुणालाही लक्षात येणार नाही अश्या पद्धतीने शेकह्यांड करता करता सरकावले. त्याने ते चिटोरे हळूच हाताबरोबर त्याच्या प्यांटच्या पुढच्या खिशात ठेवले. कोकारेंना कल्पना होती त्या चिटोर्यावर दोनच शब्द त्यांनी लिहिले होते …'अबू फैसल'.
तिथून बाहेर पडताना, कोकारेंच्या डोळ्यासमोर त्याच्या हातावर पाहिलेलं, हिब्रू गोंदण, येवू लागले … त्याचं हिब्रू अगदीच तोकड होत, पण त्यांना ते गोंदण लक्षात होत 'मिझतावा एलोहिम'…. कधीकाळी काहीतरी वाचलेलं त्याना स्मरणात होत… ड्रायविंग करत बंड गार्डन सिग्नलला त्यांना त्याचा अर्थ एकाएकी आठवला … 'मिझतावा एलोहिम' म्हणजे 'देवाचा कोप'….

रात्रीच्या वेळेला बाहेर धो धो पाउस पडत होता … अंधार मी म्हणत होता ….
हेमंत कोकरे कंदिलाच्या उजेडात त्यांची डायरी लिहित होते … आज तिला जाउन १० वर्षे झाली…
सविता ही माझी पत्नी. तीही माझ्यासारखी लॉ ग्राज्युएट. पण गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, असे ध्येय असलेल्या एका ऐन जी ओ मधे उमेद्वार्या करण्याची धडपड ती त्यावेळी करत होती. दाभोलकर आणि त्यांच्या पत्नी यांनी त्यावेळी नुकतीच कुठे आपल्या सामाजिक कार्याला ऐन जी ओ द्वारे सुरुवात केली होती. तिच्या मनाचा गाभा एका संवेदनाशील कवयत्रिचा, अशाच एका काव्यमोहोत्सवात तिच्याशी भेटीचा योग आला, पुढे अनेक कवितांच्या कार्यक्रमात आमच्या ओळखित वाढ होउन, त्याचे घनीष्ठ मैत्रीत रुपांतर झाले, नंतर प्रेमबंध जुळून आल्यानंतर १९९० साली आम्ही दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. पण पुढील काही वर्षे आम्ही आनंदाच्या शिखरावर असतानाच, आमचा एकुलता एक मुलगा अतुलचे मोटार अपघातात निधन झाले. अचानक कोसळलेल्या या महासंकटाने सविता आणि मी, दोघेही पुरते कोसळलो. हताश झालो. आमच्या जगण्यातला आनंदाचा ठेवा हरपला. मुलाच्या निधनानंतर निराश झाल्यामुळे सविताने जीवनाकडे कायमची पाठ फिरवली. या घटनेनंतर कधीही ती नॉरमल जगलीच नाही. शेवटी काळाने दहा वर्षापूर्वी आजच्याच दिवशी तिच्यावरही 'ब्लड कॅन्सर' रूपाने झडप घालून, तिला माझ्यापासून हिरावून नेलं. तिच्या डायरीतील एका पानामुळे मलामात्र दु:खाचे ते विष धैर्याने पचवून, आपल्या वेदनांचा बाजार न मांडता, लष्करी सेवा आणखी जोमाने करायला लावली. तिच्या मृत्यूनंतर लष्करी सेवा व माळीण गाव हाच माझ्यासारख्या अभाग्यासाठी श्वास आणि प्राण ठरला आहे. त्या डायरीच्या पानावर तीने अतुलच्या जन्मानंतर काही ओळी लिहिल्या होत्या, आजही मला त्या आठवतात …
जगाला प्रेम अर्पिण्याची भावना असते उत्कट भावना …
प्रत्येक मनाचा असतो तो एक अविभाज्य भाग …
कारण हे कर्ज आहे मानवतेच …
कर्ज आहे आपल्याला घडविणाऱ्या हाताचं….
ते आहे न संपणारं, अन्यथा मागे उरते ती उपकृतता …
हे कर्ज फेडावे लागते आपल्याला समर्पणाने….
आत्मियतेच्या ओढीने…
मांगल्याचा स्पर्श झालेल्या मनाच्या मोठेपणाने …
कदाचित सविताने, अतुल मोठा झाल्यावर, त्याने वाचावी म्हणून लिहिली असेल का ती कविता ? अस त्यावेळी वाटलं होत मला. त्याक्षणी मी ठरविले…. माळीण गावात महिन्यातून एकदा तरी मुक्कामी चक्कर मारून मुलांना शिकवायचे.… गावातल्यांना माहिती नाही मी कोण आहे ते… त्यांना वाटत असेल, दर महिन्यातून येणारा हा सुद्धा असेल एखादा निवृत्त मास्तर किंवा एखादा एन जी ओ वाला, येत असेल पुण्याहून… मला 'मास्तरं' म्हणून दंडवत घालतात…. कोणाच्याही घरी रात्री मुक्कामाला ठेवून भाकर तुकडा खाऊ घालतात… खरंच यांच्या सहवासात, एकटेपणा छळत नाही कधी … आज या पावसात, माझ्या हातातल्या तिच्या फोटोकडे पाहून, तिच्या कवितेतली एक ओळ मनात येत आहे …
`तुझ्या खांद्यांवर माझी मान टेकलेली असावी ... अन् त्याच क्षणी माझा अखेरचा श्वास सरावा... कारण मला मृत्यूही कसा काव्यमय यायला हवा.…

आजचा दिवस तसा मस्त गेला, हेमंत काल म्हणाला, 'अरे सन्याशा उद्याचा काय प्लान तुझा ?'….
'अपने ना कोई आगे पीछे, आपको तो मालूम है हेमंत !'…
'चल माझ्याबरोबर, मस्त निसर्गाच्या सान्निध्यात, घेऊन जातो तुला … आज पहाटे निघू…दुसर्या दिवशी संध्याकाळी परत येवू … मस्त शांत वातावरणात
शहरी गोंगाटापासून दूर …. '
'ओ के … '

स्टीव जॉब चे पुस्तक वाचता वाचता वाझ यांच्या डोळ्यात आताशा मंद झोप यायला लागली.
हे शेवटच पान वाचून, आपण झोपी जायचं …. म्हणून ते वाचू लागले …
"मरण कुणालाच नको असते . ज्यांना स्वर्गात जाण्याची इच्छा असते त्यांना सुद्धा न मरता तिथे जायचे असते. आणि असे असले तरीही आपल्या सगळ्यांना मरण येणारच आहे. ते कुणालाच चुकलेले नाही . असे असेल तरी मृत्यू हे आयुष्यातला सर्वात चांगला शोध आहे. जुने नाहीसे करून नव्या साठी मोकळी जागा करण्याची ही क्रिया आहे. आता तुम्ही ते ‘नवे’ आहात पण थोड्याफार काळानंतर तुम्ही जुने होणार आणि नव्यासाठी तुम्हाला जावे लागणार . इतके स्पष्टपणे सांगितल्याबद्दल माफ करा पण हेच सत्य आहे. तुमच्या कडे खूप कमी वेळ आहे तो मौल्यवान वेळ दुसर्याचे आयुष्य जगण्यात घालवू नका. दुसर्यांच्या मतांच्या ओझ्यात तुमचे मत दाबून जाऊ देऊ नका. सगळ्यात महत्त्वाचे हे की तुमचे हृदय आणि तुमची अंतःप्रेरणा तुम्हाला काय सांगते ते ऐका. या गोष्टींना माहीत असत की तुम्हाला काय बनायचे आहे. बाकी कोणतीही गोष्ट महत्त्वाची नाही."
वाझने पुस्तक बंद करून ठेवलं आणि झोपण्याची तयारी करू लागले, बाहेर सोसाट्याचा वारा चालू होता, त्यातच माळीण गावात पावसाची आणखी एक जोरदार सर बरसून गेली …

सकाळी सकाळी मंचरहून निघालेली एस टी बस गावची हद्द ओलांडून कच्च्या रस्त्यावरून धाऊ लागली, तेव्हा गाडीमागे चिखल फवारू लागला. मुसळधार पावसामुळे जागोजागी पडलेले खड्डे चुकविण्याचा प्रयत्न तो ड्रायवर करत होता, पण एक खड्डा चुकवताना दुसरा मोठा खड्डा समोर येत होता. बस ड्रायवर त्या रूटवरचा अनुभवी ड्रायवर होता, पण पदोपदी असलेले खड्डे चुकवताना तो खूपच इरीटेट झाला होता. मनातल्या मनात त्यान तिथल्या राजकारण्याना शिव्या घातल्या, 'हरामखोर साले, साखरकारखान्याकडे ऊस नेणारे रोड फक्त हंगामापुरते मलमपट्टी करून ठेवतात, बाकी दिवस, बाकीचे रोड बोंब नुसती …. चायला … आमच्या मतावर निवडून येतात … पब्लिकच हाल दिसतं का न्हायी हेन्ला !'
रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या ब्रिटीशकालीन चिंचेच्या झाडीतून एस टी नदीबरोबर चालणार्या उतार रस्त्याला लागली, पुढे जाऊन वळण घेतलं, अन माळीणगावाच्या नदीपलीकडील तो पिंपळ दिसू लागला. मंचरहून, आसाणे गावाकडे जाताना वाटेत दोन ठिकाणी एस टी थांबायची, त्यातलं माळीण हे पाहिलं ठिकाण, थोडस डोंगर उताराच्या खळगीत वसलेलं गाव. गावाकडे येण्यापूर्वीच नदीच्या या बाजूने डोंगरावरची ८०-९० उंबरा असलेल्या गावातली कौलारू घरं, पाहणार्याच्या नजरेत भरायची. ….......
पण आज कंडक्टरन सिंगल बेल द्यायच्या आधीच, ड्रायवरनं करकचून ब्रेक दाबला…. मशीनची चित्रविचित्र घरघर होऊन एस टी जाग्यावरच थांबली, आश्चार्यान तोंडातला गाय-छापचा गोंडा घशात जाताजाता वाचला. कंडक्टरकड वळून जवळ जवळ तो ओरडला 'सोपान बग तिकड वर … आर घर कुट गेली तिथली ?', सकाळच्या उजेडात माळीण गावाच्या जागी भलामोठा चिखलाचा राडा दिसत होता … धडधडत्या हातानी ड्रायवरन मंचर डेपोचा नंबर आपल्या मोबाईलवर लावला …

मी अश्या प्रकारे घरी येवून ढसाढसा रडेन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं... पण आले... त्या दिवशी सकाळपासूनच पाउस होता.. मीही माझ्या ऑफिसच्या पिकअप बसची वाट बघत होते होतं... तेवढ्यात मोबाईलवर प्रीतमसिंगचा फोन आला.. "नेहमीप्रमाणे सुट्टीच्या दिवशी माळीणगावाला भेट द्यायला गेलेले हेमंतसर आणि वाझसरांचा पत्ता लागत नाही आहे" .. असं बरंच काही..रस्त्यावर तमाशा नको म्हणून, ऑफिसमधे मोबाईलवरून कळवलं की तबियत ठीक नाही ….बस पिकअप पॉइन्टवरून एकटीच परत घरी गेले..... पूर्ण दिवस घरातल्या खोलीत कोंडून घेतलं..अम्मा बिचारी माझी अवस्था बघून काळजीने घरात येरझर्या घालत होती … पण तिला तिच्या या खुशबूबेटीला अजून दुखवायचं नसेल म्हणून काही चाकर शब्दाने प्रश्न विचारला नाही मला … उपाशीपोटी तो दिवस ती रात्र काढली... मनात एकच विचार होता...सगळं संपलं ..

"ओ के सर", अस म्हणून प्रीतमसिंगने मोबाईलवरचा कॉल कट केला तेव्हा त्याला आपल्या शरीरात आतून किंचीतशी थरथर जाणवत होती, भलेही जरी वर्षभर रगडून अभ्यास करून एखाद्या गुणी विद्यार्थ्याने परीक्षा दिल्यावर, त्याला नोटीस बोर्डावरचा निकाल पाहताना आतून जाणवते ना तशी थरथर होती ती…. ऑफिस फाईलमधे "ती" लेखी नोंद करण्यात आलेली आहे, असं त्याला खुद्द अतिरिक्त गृहसचिव गणपथि पिल्लै यांनी कळवलं होतं.
सुट्टीवर निघण्यापूर्वी हेमंत कोकारेंनी, प्रीतमसिंगला सुट्टीचे ठिकाण, कालावधी, संपर्क-माहितीची कल्पना दिली होती, म्हणजे तसा प्रोटोकॉलच सांगत होता, प्रीतमसिंग जरी कोकारेंचा ज्युनिअर असला तरी, ह्या टास्कफोर्सच्या ऑपरेशनमधे तो त्यांचा श्याडो अधिकारी होता, म्हणजे जे जे हेमंत कोकारेंना ऑप बद्दल माहिती होतं किंवा होत-होतं, ते त्यांना त्यांच्या ऑप फ़ाइलमधे नोंदवून ठेवावं लागत होत, ही त्या प्रोटोकॉलची रिस्क मिटीगेशन स्टेप होती. काही अनपेक्षित कारणांमुळे नेतृत्व करणारा सक्षम अधिकारी जर नेतृत्वाच्या जबाबदारीचे पालन करण्यास उपलब्ध नसेल तर केंद्रीय गृहसचिवांच्या आदेशानुसार त्या अधिकार्याचा श्याडो असेटवर नेतृत्व देण्यात येते. तशीच ती प्रीतमसिंगला या नव्या बदललेल्या परीस्थित देण्यात आलेली होती, आणि हेच ग. पिल्लै त्यांला फोनवर सांगत होते.
कोकारें आणि वाझ यांनी कोणीही नातेवाईक नाही, अशीच फाईलमधे नोंद होती, अहिल्या प्रोटोकॉल दरम्यानच्या फ्रीज पिरिअड मधे तर वाझ यांनी बेकरी विकून त्यात मिळालेले बरेचसे पैसे बेकरीच्या कर्मचार्यांना देऊन अलविदा केले होते, नाहीतरी त्यांच्या या महिना अखेरीस रिटायर होऊन, देश विदेशी टूरवर फिरण्याचा प्लान होता … पुढच्या वर्षी कोकरे रिटायर होऊन माळीणला जाउन तिथेच उर्वरित आयुष्य कंठनार होते … पण काळाने त्या आधीच दोघांना हिरावून नेलं होतं … एवढंच काय सुरक्षा यंत्रणेत ते काम करत होते, त्यामुळे सिक्रेसी अॅक्ट नुसार वर्तमानपत्रात किंवा मिडियामधे त्याचं खर नाव व फोटो कधीच आलेला नव्हता. त्यामुळे त्यांच्या बेपत्ता होण्यामुळे सध्यातरी उरलेल्या बहुतांश जगात काहीच फरक पडत नव्हता, भारतीय सुरक्षा यंत्रणा सोडून….
टी वी वर माळीणबाबत ब्रेकिंग न्यूज बघून प्रीतमसिंगने त्या दोघांना मोबिलफोन वर संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही… त्याने दोघांचेही मोबाईल ट्रेस करून बघितले तर दोघांच्याही मोबाईलचे शेवटचे लोकेशन माळीण गावच होते…. आणि त्यांच्या मोबाईलचा शेवटचा टॉवर संपर्काची वेळही मध्यरात्रीची होती …. दरड कोसळण्याच्या काही क्षण आधीची … पावसामुळे अजून तरी शोधकार्य दोन दिवस सुरु होऊ शकणार नव्हते….
दरम्यानच्या काळात प्रीतमसिंगने ऑप फाईल सेफ मधून बाहेर काढली, खुशबूबद्दल चांगले शेरे होते त्यात, शेरे वाचून त्याने ठरवून टाकल, की या ऑपमधे ती त्याची श्याडो अधिकारी असेल म्हणून …. त्याने तिला, पुणे विद्यापीठ परिसरातील 'सेंटर फॉर साउथ ऐशियन इकोनोमीक स्टडी ग्रुप' च्या इमारतीत बोलावून एकंदरीत परिस्थितीची कल्पना द्यायचे मनोमनी ठरवले .
पाउस थांबल्यावर माळीणमधे ४ जेसीबीच्या सहाय्याने शोधकार्य सुरु झाल्यावर दुसर्यादिवशी कोकरे आणि वाझ यांची पार्थिव स्थानिक प्रशासनाला हाती लागीली, पण गावातल्या रहिवाश्यांच्या कुठलाहि नातेवाईक त्यांना ओळखू न शकल्यामुळे, त्यांच्या पार्थिवाची रवानगी आंबेगावच्या शासकीय शवागारात झाली…. अर्थातच प्रीतमसिंगने आपला प्रभाव वापरून, ती पार्थिव ताब्यात घेऊन, त्यांच्यावर पुण्यातील एका विविक्षित जागी लष्करी इतमामात गुप्तपणे अंत्यसंस्कार केले.

तिने आपल्या खुर्चीतून मान वर करून प्रीतमसिंगकडे पाहिलं, तो टेबलाच्या दुसर्या टोकाला काळ्या लेदरच्या ऑफिस चेअरमधे बसला होता. समोरच्या टेबलावर विविध प्रकारची कागदपत्र आणि फायलींचा पसारा होता, शिवाय एक डायरी उघडी होती, डायरीच ते पान कोरं होतं, खुशाबुने प्रीतमसिंगच्या चेहेर्याकड एकवार पाहिलं. त्याच्या चेहेर्यावर कोणतीच भावना दिसत नव्हती, अगदी निर्विकार चेहऱ्याने बसला होता तो, राग नाही , दुख्ख नाही … काहीच नाही. 'हो मी तयार आहे' असं खुशबूने त्याला उत्तर दिलं. 'ऑपेरेशन टायफॉइड मेरी ' अस त्या मोहिमेच नाव होत, मिरज बॉम्बस्फोटानंतर एक कोकारेंच्या नेतृत्वाखाली एका टास्कफोर्सची स्थापना करण्यात आली, बॉम्बस्फोटामागील सूत्रधार असलेल्या दहशतवाद्याला पकडण्यासाठी तो टास्कफोर्स होता…सुरक्षा यंत्रणेकडे त्याचा फोटो, फिंगर प्रिंट्स … काहीच उपलब्ध नव्हत… एवढी माहिती तिला प्रीतमसिंग कडून त्या दिवशी मिळाली होती …

ऑप फ़ाइलनुसार प्रीतमसिंग ला आज लालदेवळात जाउन, कोणा 'डेविड कोहेन' ची भेट घेऊन काही माहिती घ्यायची होती. त्याप्रमाणे तो तिथ पोहोचला… तिथल्या गर्दीत त्याचा गुलाबी फेटा उठून दिसत होता… 'डेविड कोहेन' ला मिळालेल्या सुचणेप्रमाणे त्याला ती नोट गुलाबी-फेटेवाल्या शीख माणसाला द्यायची होती … ती नोट त्याने प्रीतमसिंगच्या हाती दिली… आपल्या कार्यालयात येवून त्याने ती नोट वाचली…. त्यावर काही शब्द होते,
अबू फैसल => लियाक़त अली, एक महिन्यापूर्वी इस्लामाबादइथून जारी झालेला पाकिस्तानी पासपोर्ट, LQ1490971

तिकडे बाळासाहेब थोरवेनां त्यांच्या ब्लाकबेरीवर एक एस.एम.एस आलेला होता बेंजामिन लेवीकडून ….'आय थिंक वि आर इवन नाऊ… '

जेवण झाल्यावर, सौफ खात खात गणपथी पिल्लै शांतपणे खुशाबुच्या समोरच्या बाजूच्या टेबलावर बसलेले होते. मग त्यांनी त्यांचे दोन्ही हाताचे कोपरे टेबलावर घेतले, आणि दोन्ही हाताची बोटे परस्परात गुंफून, तयार झालेल्या बेचक्यात, आपली हनुवटी टेकली, काही क्षण डोळे मिटून तसेच बसून राहिले होते. पिल्लैनां पाहून नाही म्हटलं तरी प्रीतमसिंगला, मनाच्या एका कोपर्यात कसंसच होत होत. आजच ते दिल्लीहून पुण्याला आले होते, जेवता जेवता प्रीतमसिंगनी त्यांना परिस्थितीचा रिक्याप दिला होता, की
१. आत्ता पर्यंत आपल्याकडे अगदीच जुजबी माहिती आहे अबुफैसल बद्दल
२. गेल्या काही दिवसात त्याचाकडून कसलाही संपर्क झाला नव्हता, आपल्याकडच्या मॉनीटर्ड सीम कार्ड्स वर …

यावर पिल्लैनी कोणताही प्रतिक्रिया आपल्या चेहेर्यावर उमटू दिली नाही, खुशबू त्याचं मनातल्या मनात निरीक्षण करत होती, पिल्लै म्हणजे मचाणावर वाट बघणाऱ्या शिकार्याच्या अंगी असतो तसा धीर असलेला माणूस, शरीरावर व मनावर पूर्ण ताबा असलेल्या व्यक्तीच्या ठिकाणी असतो तसा स्थितप्रज्ञपणा त्यांच्या ठायी आला होता, विशेषतः करीयरच्या सुरवातीला ३ वर्षे, कराचीतील भारतीय दुतावासात लियेसान ऑफीसर म्हणून व्यतीत केल्यानंतरचा स्थितप्रज्ञपणा. आपल्या द्राविडीय पूर्वजांचा वारसा त्यांना लाभला होता, रेखीव निग्रही भुवया, चकचकीत काळ्या रंगात उठून दिसणारे पांढरे कानाजवळ उरलेले कुरळे केस, बुद्धिमत्तेची चमक असलेले डोळे, उंची ५ फुटाहून कम, देह सडसडीत तरी सौष्ठवपूर्ण ढेरी…. त्याचं ऐकून व्यक्तिमत्वच तमिळनाडू बँकेतल्या अधिकाऱ्यासारखं होत.
'टिक है, प्रीतम, लेकिन हम लोग अभी नेक्स्ट क्या करने वाले है ? जस्ट वेट वॉच ? … खुशबू तुमको क्या लागता है ? हमको अभी क्या करना चाहिये ?' अचानक आपल्याकडे मोर्चा वळलेला पाहून खुशबू क्षणभर थबकली … पण मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळाव आधी करून, तीने आपला मनात गेले काही आठवडे घोळत असलेला विचार सांगू लागली …….‘शिकार टप्प्यात येत नसेल तर … एखाद लूसलुशीत कोकरू आपण पुण्यात मोकळ सोडावं ….’

रोजच्याप्रमाणे त्यादिवशी खुशबू आरशासमोर उभी राहून, स्वतःकडे बघत होती तेव्हा तिला तिथे एक गबाळी, खेडवळ मुलगी दिसत नव्हती तर बुद्धिमान, कल्पनाशक्ती असलेल, आपल यशस्वी रूप दिसत होतं, विशेषतः काल पिल्लैनी तिच्या योजनेला होकार दिल्यानंतर तर अगदी… हळूहळू मनातल्या आपल्या नव्या स्वप्रतिमेशी ती एकरूप होत होती. नोकरीनिम्मित राजकारणाच जवळून दर्शन, पत्रकारीतेसाठी सदैव अपडेट राहण्यासाठी करावं लागणार अफाट वाचन, चिंतन, मनन … दहशतवाद्यांच्या वर्तनाच काळजीपूर्वक खूप निरीक्षण केलं, त्यातलं खूप लक्षात ठेवलं आणि खूप काही ती शिकली त्यातून …जणू एखादा स्पंजच … एका वर्षात खुशबून एवढ काही आत्मसात केलं, इतकी प्रगती केली की प्रीतमसिंगलासुद्धा तिच्याबाद्दल एकप्रकारच कौतुक वाटू लागल… आता खुशाबुच्या प्लाननुसार त्यांच्या टीमला 3 बेवारशी पण सुस्थितीतील शवांची व्यवस्था करायची होती. ….

पुणेकरांसाठी तो दिवस असाच भाऊगर्दीचा होता, त्यामुळे संध्याकाळच्या वेळी ट्राफिक विविध रोखाने धावत होतं, अरुंद खड्डामय रस्ते विविध बनावटीच्यां आणि अनेकविध रंगांच्या मोटारींनी खच्चून गजबजलेले होते, त्यामुळे कॉन्स्टेबल तावडे काहीसा चिंताक्रांत होऊन गेला, त्याने घडाळ्यात पाहिले तेव्हा दुपारचे ४ वाजले होते आणि अद्यापही साहेबलोकांची मिटिंग संपलेली नव्हती, ही मिटिंग जितक्या लवकर संपेल तितके चांगले, म्हणजे साहेबांना लोहगावच्या लष्करी हेलीपॅडवर आपल्याला पोहोचवता येईल असे तो मनाशी पुटपुटत होता, सव्वाचार वाजले अन तरीही कौन्सिल हॉलच्या पोर्चपाशी कोणाचीही कोणाचीच वर्दळ आढळून येत नव्हती, लवकरच जर आपण लोहगावच्या दिशेन निघालो नाही तर नगररोडच्या संध्याकाळच्या ट्राफिकचा विचार येवून, अस्वथ मनःस्थितीत तो क़्वलिसपाशी येरझारा घालू लागला. त्याला फार वेळ थांबावे लागले नाही. तावडेंनी गृहसचिवांची गाडी पोर्चमधे आणून उभी केली. प्रथम पिल्लैसाहेब गाडीत बसले त्यांच्या पाठोपाठ गुलाबी पगडी घातलेला एक सरदारजी आत बसला, तावडेच्या शेजारी पुणेपोलिस प्रोटेक्शन टीमचा कॉ गावडे आपल्या इन्सास रायफल सकट बसला. गाडी कौन्सिलहॉलच्या दरवाजातून बाहेर पडली पण आताशा रस्त्यात गाड्यांची गर्दी व्हायला लागल्यामुले तावडेला आपेक्षित वेग घेता येत नव्हता…. तेवढ्यात गाडीच्या पाठीकडे सुटलेल्या कौन्सिलहॉलच्या दिशेने एक स्फोटाचा आवाज सर्वांच्या कानी पडला ………

मी पुन्हा रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागले . गेल्या कित्येक वर्षांच्या वैवाहिक जीवनात किती बरं फोडण्या दिल्या असतील बरे मी ? अंन तीही प्रेमाने… आजही मला माझा नवरा तेवढाच देखणा वाटत होता जेवढा पहिल्यांदा पाहण्याच्या कार्यक्रमाला आला होता तेव्हा भासला होता. तेल गरम होई पर्यंत टाइम पास म्हणून रिमोटच बटन दाबलं, च्यानेल माग पुढ करून 'जय देवा जय देवा जय शिवा मार्तंडा …. बानोचं काय होणार म्हणून ' पाहावं तर … दिसत होती ब्रेकिंग न्यूज…. स्फोटात ३ लोकांचा मृत्यू झाल्याची सूत्रांकडून माहिती हाती येत आहे… स्फोटाची बातमी असलेली चित्रफित पुन्हा पुन्हा दाखवली जात होती… पण बानो खंडेराया याचं काय होतंय आज हे जाणून घेण्यासाठी शेवटी मी बातम्यांच्या च्यानलवरून सिरियलच्या च्यानलवर आले.

मैने सख्त हिदायत दि थी के, थोडा वक़्त थंडे रहो, फिरभी किसने किया ?
मालूम नहि है भाई, मुझे लगा आपकीही हौसलाआफ्जाई के बदोलत किसी भाईने ये पार्टी की होगी !
वैसे कितने आदमी अपनी पार्टीमें खुश हुं थे, ऐसा कहा था ?
तीन.
ठीक है पता लगाओ किसने कारवाई हुई ये पार्टी.

पुण्यातल्या नुकत्याच झालेल्या स्फोटानंतर अबू-फैसलच्या नेटवर्कमधे हडबड झाली होती, आता नेटवर्कच्या कानाकोपर्यात परस्परांकडून चौकशी होत होती. रेकॉर्डरवर परत परत हा इंटरसेप्टेड कॉल खुशबू एकाग्रतेने ऐकत होती, कारण हा कॉल सौदी अरेबियातून आला होता, आणि खुशाबुला नक्की आठवत नव्हत, परंतु असा आवाज कुठेतरी तीने आधी ऐकला होता … पण नक्की कुठे ? याचा ती विचार करत होती …
दरम्यान प्रीतमसिंग एक समरी रिपोर्ट तयार करत होता.
१. अबू फैसल => लियाक़त अली, एक महिन्यापूर्वी इस्लामाबादइथून जारी झालेला पाकिस्तानी पासपोर्ट, LQ1490971 => सध्या वास्तव्य सौदी अरेबिया आणि
२. मॉनीटर्ड सीम कार्ड्स वर येणारे कॉल व जाणारे कॉल, यांचे नंबर, त्या नंबरवरून पुढे जाणारे कॉल नंबर अश्या पुढच्या अनेक लेयर मधले नंबरचा डाटा सिस्टीममधे फीड करत होता. मागच्याच आठवड्यात मिळालेल्या, आय आय टी जयपूरच्या काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या शेवटच्या वर्षाच्या प्रोजेक्ट NIC साठी केलेला एक डेटामायनिंग अल्गोरिदमवर आधारित सॉफ्टवेअरमधे. या डेटामायनिंग अल्गोरिदममधे क्लस्टरिंग, नैव बायस, असोसिअशन वैगरे बेसिक अल्गोरिदमच्या वरच्या दर्जाचं अतिशय क्लिष्ठ अल्गोरिदम होता.
त्या सॉफ्टवेअरमधून आता प्रीतमसिंगला एक लिस्ट मिळणार होती, दहशतवादी कारवायात सामील असण्याची शक्यता ९५ % प्रोब्याबिलीटी व ९५% च्या वर कॉन्फीडन्स लेवल असणारे सीमनंबर्स….
आता भारतीय सुरक्षा यंत्रणा सज्ज झाली होती, पुण्यातल्या अबू-फैसलच्या नेटवर्कला अटक करण्यासाठी…
याचसाठी तर एवढा सापळा रचला होता त्यांनी कौन्सिल हॉलजवळ बॉम्बस्फोटाचा … ज्यात आधीच मृत झालेल्या बेवारस व्यक्तींची, कृत्रिम आयडेन्टीटीसह, स्फोटाचे बळी म्हणून जगाला ओळख करून देण्यात आली होती….

अमोनोराच्या मॉलमधे फिरताना फरीदाचे डोळे फिरू लागले.. अन काही क्षणात ते आश्चर्याने भरून देखिल गेले. सगळीकडे गर्दीच गर्दी माणसांची, दुकानांची ही ! जसं की काही घडलंय, घडणार आहे आणि त्यासाठी हे लोक गोळा झालेत. जिथे नजर टाकावी तिथे जिवंत गजबज. प्रत्येकाचं काहीतरी चाललंय. गर्दीतल्या इतरांशी सुसंगत किंवा विसंगत कसंही! .. कुठेतरी मधेच गाणी वाजतायत. या सगळ्याचा मिळून एक आवाज तयार झाल्यासारखा वाटतोय.. !!! तर फातिमा कौतुकाने हळवी होऊन त्या भरगच्च रोषणायीकड पाहत होती. खुशबून कालच सांगितलं होत, तिच्या ऑफिसतर्फे कुटुंबियांसाठी अमोनोराच्या मॉलमधल्या 'करीम्स करी' या रेस्टोरंटमधे बुफे लंचचे पासेस आणि त्या दिवशी दुपारच्या तिथल्याच मल्टीप्लेक्समधल्या शाहरुख आणि दीपिकाच्या, चित्रपटची तिकिटे दिली होती, आपल्याला सोबत म्हणून खुशाबुने फरीदामौसीला घेऊन येण्यास सुचवले होते, नव्हे तसा आग्रहच केला होता. जेवण झाल्यावर स्क्रीन ३ मधे, आपापल्या खुर्चीवर बसल्यावर, खुशाबुने तिच्या आईच्या कानात हळूच सांगितले की तुम्ही दोघी सिनेमा बघा, मी १५ मिनिटात माझ एक ऑफिसच काम करून आले…
ज्या घरात फरीदा राहत असे, त्याचं दार खुशाबुच्या घरामागच्या बाजूच्या खिडकीजवळ होत , आणि स्वतःच्या विसरभोळ्या स्वभावामुळे, बाहेर जाताना तिच्या खोलीच्या दारावरच्या कुलुपाची किल्ली फरीदा, आपली मैत्रीण फातिमाच्या घराच्या खिडकीच्या गजामधून, दाराच्या खाचेत ठेवत असे… खुशबू ती किल्ली घेऊन, तिच्या घरात आली, पाठीमागे दरवाजा लावून घेतला, तसं बघितलं तर तिथे फार काही तिला उचकापाचक नाही करावी लागली, कपडे वैगरे ठेवण्यासाठी एक कपाट, झोपण्यासाठी जुनी कॉट, आरसा असलेलं वेलबुट्टी नक्षीच टेबल, भांडीकुंडी, छोटा टी वी, जुना टू इन वन, काही क्यासेटस …. एवढ्याश्या सामानात, ती क्यासेट सापडायला कितीसा वेळ लागणार होता … सर्व क्यासेटस दोन्ही बाजूने थोड्या थोड्या ऐकताना तीला हवी असलेली क्यासेट सापडली. खुशाबुने ती साइड पूर्णपणे रीवाइंड करून घेतली, नंतर आपल्या पर्स मधून, एक केबल बाहेर काढली, त्या केबलच्या दोन्ही टोकांवर ३.५ मिमी चे मेल कनेक्टर होते, केबलच्या एका कनेक्टरला तीने टू इन वन च्या हेडफोन पोर्टमधे खुपसले, दुसरे टोक तीने आपल्याजवळच्या सोनीच्या पोर्टबल रेकॉर्डरच्या ऑडीओ इन मधे घातले, रेकॉर्डर चालू केला, टू इन वन चालू केला…तेव्हड्यात तिचं लक्ष कपाटात ठेवलेल्या फोटोअल्बमकडे गेलं…..

खुशबू अमनोराच्या मल्टीप्लेक्समधे परत आली, तेव्हा तिची अम्मी व फरीदा दोघीही इंटरवल झाला तरी आपापल्या खुर्चीतच बसून होत्या, खुशाबुला बघून, फातिमाने तिच्यावर प्रश्नांची सरबत्तीच सुरु केली, 'बेटी तुम कहा गयी थी, कितनी देर से तुम्हारी राह देख रही हु ?'…
'अम्मी बोला था न, १०-१५ मिनिटमे औंगी '… 'नही बेटा, इतनी थंडी हवा है यहां, हम दोनोको 'वहा' जाना था, बहुत देरसे रोकके रखी है … 'खुशबू ओशाळली, त्या दोघींना बिचार्यांना, मल्टीप्लेक्स मॉल हे वातावरण नवखं असल्यामुळे, आपल्या मुलीच्या मदतीशिवाय, टॉयलेटला टाळावे लागले याची तिला जाणीव झाली. खुशबू त्यांना तिकडून परत आणे पर्यंत चित्रपट परत सुरु झाला होता…

प्रीतम आपण ते वॉईसस्याम्पल चंडीगढच्या प्रयोगशाळेत पाठवणार आहोत का ? ….
नाही खुशबू, आपण ते पुण्यातल्या आपल्याच लोकांकडून तपासून घेत आहोत, इनफ्याक्ट आपण आत्ता तिकडेच निघालो आहोत…असे म्हणून प्रीतमसिंगने आपली कार, खराडी-हडपसररोड वरील रयाडीसन ब्लू समोरील शेवर्ले कारडीलरच्या बाजूच्या लेनमधल्या असलेल्या फोरेन्सिक ल्याबच्या कम्पाउंड मधे पार्क केली. ग्राउंडफ्लोरवर ऑडीओल्याबच्या दिशेने त्याची पावले झपाझप पडू लागली, खुशबू मागोमाग चालू लागली.
ऑडीओल्याब म्हणजे एखाद्या संगीतकाराचा स्टुडीओसारखाच होता, काचेच्या ४ भिंतीत बंदिस्त वेगवेगळी इलेक्ट्रोनिक उपकरणे, स्क्रीनवर नाचणाऱ्या साईनवेव्हज्, आतमधे खुशाबुला दोन व्यक्ती हेडफोन लाऊन बसलेल्या होत्या, पिवळ्या पट्याचं स्वेटर घातलेली व्यक्ती पाठमोरी बसलेली होती तर उपकरणांचा पसारा असलेल्या त्या टेबलाच्या विरुध्द बाजूला पोरसवदा व्यक्ती, ल्याबच्या दरवाजाकड तोंड करून बसली होती. प्रीतमसिंगला पाहताच तो पोरसवदा माणूस हेडफोन बाजूला काढून, दरवाज्याच्या दिशेने स्मितहास्य देत आला, दरवाजा साधारण एक दीड फुट उघडून तो प्रीतमसिंगला म्हणाला, 'हाय'…
प्रीतमसिंगसुद्धा मान हलवत स्माईल देऊन म्हणाला 'हाय बिस्वास, क्या है फिर तुम्हारा रिपोर्ट ?'

'प्रीतम, मैने तो सुबहही सिस्टीम रिसल्ट प्रिंट कराके रखा है, अभी हमारे हेड दोराबजी सर रिजल्ट को अपने कानोसे डबलचेक कर रहे है, तुम्हे तो पता है ही, उसके बाद वो तुम्हे रिपोर्ट देंगे'
तो पर्यंत दोराबजीनी हेडफोन बाजूला काढून ठेवला, विश्वास त्यांच्या कानात काहीतरी कुजबुजला … त्यांनी होकारार्थी मान हलवली, मग बिस्वासने सुद्धा प्रीतमकडे पाहून होकारार्थी मान हलवली. प्रीतम समजला, खुशबूने दिलेली डायलॉग टेप आणि सौदी वरून कॉल मधला आवाज, हे दोन्ही एकाच व्यक्तीचे होते. दोराबजीनां थ्यांक्स म्हणावं म्हणून प्रीतम व खुशबू काचेच्या भिंतीच्या रूममधे आले, त्यांच्या पावलांचा आवाज ऐकून, दोराबजीनी डोळ्यावरचा काळा गॉगल काढून शर्टला अडकवला, प्रीतमच्या डोक्यावरून अर्धाफुट वर स्थिर नजर ठेवत, त्यांनी शेकह्यांडसाठी हात पुढे केला, तेव्हा खुशाबुचे लक्ष, दोराबजीच्यां खुर्चीच्या पायाशी ठेवलेल्या फोल्डेबल पांढर्या छडीने वेधून घेतलं ……

सौदीत एका फ्रुट इम्पोर्ट कंपनीत मुलाखतीसाठी गर्दी झाली होती. ज्या पदासाठी मुलाखत द्यायची होती, त्याच पदासाठी जवळपास १५-२० उमेदवार आलेले. मुलाखतीसाठी एक अघोषित अट होती, उमेदवार भारतीय उपखंडातले असावे.....कारण मुलाखतकर्ता होता लियाक़त अली…
एक उमेदवार नुकताच मुलाखत देऊन बाहेर आला होता, मुलाखत दिल्यावर तो तडक आपल्या हॉटेलवर गेला, त्याने आपला ल्यापटॉप सुरु केला, आणि त्याने ब्राउसरमधे साईट उघडली, 'सेंटर फॉर साउथ ऐशियन इकोनोमीक स्टडी ग्रुप' ची, युसरनेम पासवर्ड वैगरे सोपस्कार आटोपून, त्याने आपला माउस वळवला 'मिडिया अपलोड' बटणावर, तिथे क्लिक झाल्यावर 'फाईल अड्रेस, अपलोड बटन' असलेला चितपरिचित पॉपअप आल्यावर, त्याने मुलाखती दरम्यान शर्टच्या खिशाला लावलेलं जाड फौंटनपेन बाहेर काढलं, टोपणाला धरून खसकन पेनाच धड उपसून वेगळ केलं, टोपणाच्या टोकाला आता यु एस बी पोर्ट दिसू लागलं, ते त्यान आपला ल्यापटॉपला जोडलं, त्यातले सगळे फोटो त्याने साईटवर अपलोड केले ….

खराडी-हडपसररोड वरील रयाडीसन ब्लू समोरील शेवर्ले कारडीलरच्या बाजूच्या लेनमधल्या असलेल्या फोरेन्सिक ल्याबच्या फर्स्टफ्लोर वर विडीओल्याबमधे महावीर शहा, सकाळपासून खुशबूने दिलेल्या फोटोच्या स्कानवरून इमेज सुपर इम्पोजीशनच काम करत होता, मागच्या सर्व अनुभवाच्या जोरावर सलग ९ तास तो मान मोडून हे अवघड काम करत होता. बेसिकली त्याला एका व्यक्तीच्या साधारण १२-१३ वर्ष जुन्या कॉलेजच्या फोटोवरून, तो आज कसा दिसत असेल, अस संगणकाच्या मदतीने, शोधून काढायाचं होत…

'सर, त्याचा इंटरसेप्टेड कॉल वॉईस स्यम्पल, आणि त्याचे फोटो इम्पोजीशन, या दोघांच्या अनालीसीसवर, आमच्या दोघांच्या मते, अबू फैसल म्हणजेच, लियाक़त अली म्हणजेच भारतीय नागरिक जबिउद्दिन अत्तारी आहे, आपण त्याचं भारतात एक्स्ट्राडीशन केलं पाहिजे' प्रीतमसिंग पिल्लैना कॉन्फ़रन्स कॉलवर सांगत होता.
'कितना सर्टन्टी के साथ तुम ये बोल राहे हो ?' पिल्लैचां त्यावर प्रश्न…
'सर साधारण ६६% सर्टन आहोत'…प्रीतमसिंग बोलला
'हम गृहमंत्रीके पास और वो प्रधानमंत्रीके पास, ६६% सर्टन्टी कोनसा मुह लेके जायेंगे ?, बहुत कम है ये, खुशबू तुमभी यही सोचथि हौ ?'… पिल्लै बोलले.
'सर मे आय स्पीक फ्रॉम माय हार्ट … '
'येस'…
'सर आप लोगोको, अच्छा लगे इसलिये हम लोग १०० % सर्टन है, ऐसा नही कह सकते, लेकिन मुझे तहेदिलसे लगता है, की ये जानकारी १०० % सर्टन है'

'भारतीय नागरिक जबिउद्दिन अत्तारीचं भारतात एक्स्ट्राडीशन केलं पाहिजे' हे सुरक्षायंत्रणेकडून ऐकून पंतप्रधान विचारात पडले, भारताचे इराणबरोबरचे पारंपारिक संबध बघता, सौदी आपल्या विनंतीला मुळीच मान देणार नाही, या शक्यतेची ते पडताळणी मनातल्या मनात करू लागले, भारतातल्या काही जातीय दंग्यामुले आंतरराष्ट्रीय मुस्लिम जगतात उमटणार्या तरंगाची सुद्धा त्यांनी मनातल्या मनात शक्यता जोखली होती, शेवटी भारताचे सौदीतले राजदूत डॉ साजिद हमीद, यांच्याबरोबर सिक्युअर हॉट लाईनवर चर्चा केल्यावर, साजिद सुद्धा तसंच आकलन मानत होते याची पुष्टी झाली होती, शिवाय आणखी एक शक्यता डॉ साजिद हमीद यांनी लक्षात आणून दिली की 'भारताने डायरेक्ट सौदीकडे संपर्क साधला आणि पर्सन ऑफ इन्टरेस्ट ची माहिती मागवली तर, कदाचित पाकिस्तानलासुद्धा भनक लागू शकत होती, म्हणून सौदीवर दबाव टाकू शकेल अश्या एका सिनेटरच नाव, त्यांनी पंतप्रधानांना सुचवलं होत.' मग विचाराअंती पंतप्रधानांनी अमेरिकेतील भारतीय दूतावासाचा सिक्युअर हॉट लाईन नंबर डायल केला.

६० मैल प्रती तास वेगाने जाणाऱ्या आपल्या प्रशस्त लिंकन लिमोसिनमधे बसून थिओडर स्माइल्स उर्फ टेड जॅक्सनविलेच्या भर गर्दीतही आपली सत्ता अन अधिकार अनुभवीत होता, एकतर गाडीची मूळ लांबी जास्त असल्यानं, बसणार्याला पाय सहज ताणता येत असे, त्यातच सीटची पाठ मागे नेण्याची व्यवस्था असल्याने आणखीनच आरामशीर स्थिती धारण करता यायची, विशेषतः इंटर्न मोनिका सोबत असताना, गाडीला टीन्टेड काचा असल्यामुळे बाहेरच्यांना आतलं काही दिसू शकत नसायचं. पण आज त्याच्या शेजारी त्याचा मदतनीस हुलिओ फर्नांडेझ बसला होता. आणि ड्रायवर हेसुस रहदारी मधून गाडी चालवत त्याला घराकडे नेत होता. हुलिओने निघताना त्याला नेहमीचा खुराक हाल्फ़ पौंड मिडीअम रेअर ह्यामबर्गर विथ बेकन, चेडर अंड पिकल आणि ४ ऑउन्स डॉ पेप्पर कोला सादर केला होता. हुलिओ येणाऱ्या निवडनुक प्रचाराच्या कॅम्पेनच्या प्रगतीची माहिती देत होता. या वेळचा मतदारसंघातला त्याचा लोकप्रियता निर्देशांक नजीकच्या स्पर्धकापासून फक्त ५ % पुढे होता. दोन महिन्यांपूर्वी भारताकडून त्याला (म्हणजे सकृत दर्शनी एका पब्लिक लिमिटेड अमेरिकन कंपनीला) दोन पैकी फक्त एका अणुभट्टीचंच कॉन्ट्राक्ट मिळालं होत, भारतीय पंतप्रधानांनी भविष्यात अमेरिकेकडून ब्लाकमेल होऊ नये म्हणून, दुसर्या अणुभट्टीचं कॉन्ट्राक्ट फ्रेंचांना दिलं होतं. त्यामुळे तो मनातून भारतावर थोडासा खार खाऊन होता. पण निदान या अणुभट्टीचं कॉन्ट्राक्टमुळे त्याच्या निवडनुक प्रचाराच्या कॅम्पेनच्या रणनीतीमधे 'मतदारसंघात येत्या वर्षभरात २००० प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती' या मुद्द्यावर जोर दिला गेला होता, त्यामुळेच ५ % तरी काठावर जास्त लोकप्रियता त्याला मिळाली होती…. प्रचार मोहिमे साठी वेळ कमी होता पण आज संध्याकाळी त्याच्या भेटीच्यासाठी भारताचा एक कौन्सुलेट ऑफिसर येणार होता, काय बरं विचित्र अन अवघड नाव होत ते … हां आठवलं … अजय खोब्रागडे …

"सिनेटर दहशतवादा विरुद्धच्या लढाईत भारतीय जनतेच्या प्रयत्नांना अमेरिकी जनता पूर्ण सहाय्य करेल, असा आमच्या पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला आहे" खोब्रागडे म्हणाले.
'ऐजे (अजय) मुला, तुला या खिडकीतून सभोवताली पसरलेली अमेरिका दिसतेय का ? किती माणसं इथे राहतात जगतात हे दिसतंय का तुला ? हे लोक स्वतंत्र लोकशाही दहशतवादविरोधी लढा किंवा कशाबद्दलही काय विचार करतात याचाशी मला काहीही कर्तव्य नाही, त्यांच्या गेलेल्या पिढ्या आणि येणाऱ्या पिढ्या काय विचार करतील, याच्याशी मला काडीचही देणघेण का असावं ?' टेड म्हणाला.
'आपले दोन्ही देश लोकशाहीत विश्वास आसलेल्या जनतेची आशा आहेत....' इति खोब्रागडे
'अरे देवा, तु काय वेड पांघरतो का काय ?, मला खरंच कळत नाही, मला माझ्या फायद्याला खार लावणाऱ्या पंतप्रधानाला मदत करण्याचा विचार मी का करावा असं तुम्हाला वाटतं ? हा आता तुमचं सरकार माझ्या प्रचारमोहिमेत बेनावी १० दशलक्ष डॉलरची रोख मदत देणार असेल तर गोष्ट वेगळी हं … नाहीतर तुझ्यापाठी जो दरवाजा आहे, तिथून तू सुमडीत निघून जावं, अशी मी अपेक्षा माझ्या जनतेच्या वतीने व्यक्त करतो, नो ऑफेंस पण नथिंग पर्सनल जस्ट बीसनेस… '

थिओडर स्माइल्स उर्फ टेड, गोर्यांलोकसंखेचा कारखाना असलेल्या दक्षिण अमेरिकेतील सिनेटर, त्याचं किंचित दक्षिणी हेल काढून नम्रतापूर्वक बोलण समोरच्यावर दबाव टाकायला पुरेसं असे, त्याला उघडपणे काही बोल लावला तर टेक्सासच्या न्यायविभागाचे कान उंचावले जायचे, लोन-स्टारच्या सन्मानाला ठेच लागायची. ज्याच्या आदेशावर पेट्रोउद्योग जगातल्या घडामोडी घडायच्या, ज्याच्या बुद्धीने वॉशिंग्टन डी सी मधल्या कॅपिटॉलहिलवर काळ्या तेलाची काळी कारस्थानं रचली जायची, मध्यपूर्वेत अनेक छोट्या देशांची भवितव्य ज्याच्या विचारांनी गढूळलं जायचं असा पातळयंत्री माणूस, पण सारकाही करून नामानिराळा, कोणालाही त्याचा संशय येणं शक्य नव्हत, कोणीही त्याच्यावर उघडपणे टीका करू शकत नव्ह, त्यानं स्वतःभोवती असं वलय निर्माण केलं होतं कि त्याच्याबद्दल कोणी ब्र काढला तरी, दुसर्यादिवशी पहाटे शेजार्यांशी बोलताना त्या सर्वसामान्य व्यक्तीची बोबडी वळलेली असायची, कारण आदल्या रात्री अंगणात केकेके ने जाळलेल्या क्रॉसच्या आठवणीने तो रात्रभर झोपलेला नसायचा, किंवा ब्र काढणारा थोडी मोठी व्यक्ती असेल तर टेक्सासच्या न्यायविभागाची वक्र नजर त्याव्यक्तीवर वळलेली असायची. अश्या माणसाने नकार देताच, एखादा उठून निमुटपणे गेला असता, पण दुसर्यादिवशी खोब्रागडे तयारीनिशी आले होते, त्यांनी टेडला कल्पना दिली होती की जर सौदिना फोन केला गेला नाही तर, कदाचित भारतातील पर्यावरण मंत्रालय (जे पंतप्रधानांच्या अख्यत्यारीत होते), त्यांना कदाचित या अणुप्रकल्पाच्या नव्याने प्रकाशात आलेल्या काही बाबींचा पुनर्विचार करावा लागेल, त्यामुळे हे विशिष्ठ कॉनट्राक्ट १-२ वर्षासाठी थंड्या बस्त्यात जाऊ शकते. त्यामुळे तुमच्या प्रचारमोहिमेतील रोजगारनिर्मितीच्या मुद्द्याची हवाच निघून जाइल अशी आपुलकीयुक्त 'काळजी' खोब्रागडेनी व्यक्त केली होती.

जॅक्सनविले येथील टेकाडाच्या माथ्यावर लवेंडर नावाच्या प्रशस्त घराची इमारत उभी होती, जाडजूड विटांच्या भिंतीमधे नाजूक नक्षीकामानं सजवलेल्या प्रशस्त खिडक्या, हवा अन प्रकाश भरपूर प्रमाणात आत ओतत होत्या. छताजवळच्या उंचीवरच्या खिडक्या रंगीत काचचित्रांनी मढवलेल्या होत्या, उगवत्या कोवळ्या उन्हात व मावळत्या संधीप्रकाशात, त्या उंच खिडक्यातून आत डोकावणारा स्वप्नील धुसर प्रकाश घराला चॅपेलमधल्या पावित्र्यात न्हाऊ घालत असायच्या, अजय खोब्रागडे आत शिरताच कोरीव काम केलेल्या डेस्कमागून टेडच्या गीड्ड्या कृतीची तरंगती हालचाल झाली, त्यांचा मांसल विस्तार जणू त्यांच्या वादातीत प्रतिष्ठेच्या मर्यादेमुळेच केवळ अडून राहिला का काय, अशी पाहणार्याला शंका यायची. ‘ओ…. ऐजे स्वागत आहे’ ते हसून म्हणाले, 'ये ये, आत बस'. अजय बसला. त्याच्या तोंडून आपेक्षित विनवणी ऐकण्याच्या तयारीत टेड बोटं एकमेकात गुंतवून, सिगार तोंडात घोळवून, वाट पाहत बसून राहिले. जेव्हा काही क्षणांनंतरही कसलीच विनवणी बाहेर पडली नाही तेव्हा टेडने घसा खाकरला. 'दहशतवादच्या समूळ बिमोडासाठी मला प्रथमपासून किती आस्था आहे ते तुला माहीतच आहे’' सिगारचा झुरका घेऊन पुढ म्हणाले 'त्यामुळे काल जो दुर्दैवी प्रकार घडला…… त्याबाद्दल मी दुःख वैगरे व्यक्त करणं ……. मला वाटतं अनावश्यक ठरेल '
'अगदी अगदी' खोब्रागडे उत्तरले.
'हेही वेगळ सांगायाला नको की मी भारताला मदतीचा नकार दिला नव्हता तर मी तटस्थ राहिलो होतो' पुढचा झुरका घेऊन टेड म्हणाला.
'मान्य आहे मला' … खोब्रागडे म्हणाले, त्यांची नजर विनम्रपणे टेडवर खिळली होती.
"मला आता या निवडणूक कॅम्पेनच्या धामधुमीत, सौदिंना फोन करण्यावाचून, तुम्ही काही आता काही पर्यायचं शिल्लक ठेवला नाही, तुमच्या मनात माझ्याबद्दल कडवटपणा ठेवू नका बुवा आता " असं हसत हसत टेड म्हणाला परंतु त्याच्या मनाच्या एका कोपर्यात मात्र विचार करत होता, 'या निवडणुकानंतर निवांतपणा मिळाल्यावर, या करी-सकिंग, इलेफंट-रायडींग, स्नेक-चार्मिंग ब्राऊन-निगर बास्टर्ड-कौन्सुलेट ऑफिसरला चांगलाच धडा शिकवायला हवा, त्यासाठीच्या न्यायविभागातल्या एकदोन लोकांची नावे त्याच्या समोर चमकून गेली … '
पण सध्या सौदिना भारताच्याबाजूने फोनवरून हग्या-दम भरायची वेळ आली होती….

रियाध… रंगरूप अरब शहराचं असतं तसंच, शहरभर विविध भागांना जोडणारे प्रशस्त रस्ते, त्यावरून अखंड चालणारी एसी गाड्यांची वर्दळ, रस्त्यांच्या कडेने खाजुरांची सरळ झाडे , मुख्यशहरात एकमेकांना खेटून असलेल्या, सरळसोट चौकोनी उभ्या इमारती, सगळ्याच एअर कंडीशंड, त्यांच्यामधून डोकावत आकाशाकडे झेपावणार्या मशिदींचे शिडशिडीत मिनार, मधमाश्यांच्या पोळ्याप्रमाणे त्यांच्यावरचं नक्षीकाम, व त्यांच्या खड्या पहाऱ्यात वसलेले मशिदींचे ठसठशित घेरदार घुमट, निरभ्र निळं आकाश त्यात माथ्यावर आग ओतणारा सूर्य, सूक्ष्म रेतीयुक्त धुळीने माखलेला आसमंत, संपूर्ण शहराला हलक्या तपकिरी रंगात न्हाऊ घालत होता.
त्यातल्या एका इमारतीत आपल्या कार्यालयीन दालनात बसला होता, सौद राजकुलातील क्रं १७ वा प्रिन्स, अख्हमद बिन खालेद अल सौद, अल सौद म्हणजे, सौद कुळातला, आणि ते कुळ म्हणजे त्याला मिळालेले खिताब, हादीम-अलहर्मन-अस्ससरिफ़यन म्हणजेच, मुस्लिमजगतातील अत्यंत महत्वाच्या मक्का आणि मदिना येथील, 'अल-मस्जिद-अल-हर्म' आणि 'अल-मस्जिद-अल-नबावी' या दोन मस्जिदींचे प्रतिपालक, घराणे. असा हा अख्हमद बिन खालेद ज्या कार्यालाच्या मुख्य खुर्चीवर बसला होता त्या कार्यालयाचे नाव होते 'अल माबाहेथ अल अम्मह' म्हणजेच 'माबाहेथ', माबाहेथ चा सरळसोट इंग्रजी अर्थ होता जनरल इन्वेस्टीगेशन डीरेक्टोरेट GID, सौदींचे सिक्रेट पोलिस.
आज त्याच्या आलिशान वातानुकुलीत, पायाखाली नक्षीदार विविध काश्मिरी तुर्की उंची गालिचे अंथरलेल्या, छताला चकाकणारी झुंबरांच्या थाटामाटात आणि खानदानी अत्तरांच्या घमघमाटात, कार्यालयीन आगंतुक सभागृहात, एक व्यक्ती त्याच्या भेटीची वाट पाहत बसले होती. ते होते सौदी अरेबियातील भारताचे राजदूत डॉ साजिद हमीद. कारण काल माबाहेथच्या सैनिकांनी रियाध येथील एका ठिकाणाहून लियाक़त अली या पाकिस्तानी पासपोर्टधारकाला चौकशीसाठी अटक केली होती, चौकशीच कारण होतं की लियाक़त अली, फळांच्या बिसनेसनिम्मित सौदीत दाखल झाला होता परंतु गेल्या कित्येक दिवसात त्याने काहीच त्या व्यवसायाशी निगडीत काहीचं काम केलं नव्हत, बहुंतांश वेळा तो दक्षिण आशियायी कामगार वर्गात जिहाद विषयी बोलताना आढळला होता. अर्थात हे सांगायचं अधिकृत कारण होत, त्याला अटक, ही वरून आलेल्या हुकुमावरून झाली होती. सध्या त्याला रियाध येथील उलाइशा तुरंगात टाकलं होत.

नोबेल हॉस्पिटलमधे तज्ञ डॉक्टरांच्या खोल्यापासून साधारण १० पावलांवर असलेल्या कॉउन्टरवरचा कॅशीअर नायरला जिन्यातून वरच्यामजल्यावर येईपर्यंत धाप लागली होती, समोरच्याच वर्हांड्यात तो शोधत असलेली व्यक्ती दिसताच त्यानं चालण्याचा वेग वाढवायचा प्रयत्न करून पाहिला, पण ते शक्य नाही हे पाहून, त्याने तिथूनच हाक मारायला सुरुवात केली, सर … सर …. डॉ . कुंभारे, त्याची हाक ऐकून पँथोलॉजी विभागाचे डॉ . कुंभारे थांबले, त्यांनी विचारलं 'काय आहे रे ?, बोल पटकन, मी जर घाईत आहे', नवीनच रुजू झालेला नायर, वरिष्ठ डॉ च्या व्यक्तिमत्वामुळे थोडासा दबला … पण रेकॉर्ड्स वौचर फॉर्म्स फायली हेच त्याचं रोजी रोटी होतं, सगळ धैर्य एकवटून तो म्हणाला 'डॉ या बायोप्सी फॉर्मवर तुमच्या सह्या हव्या होत्या, मगाशी प्रती संपल्या होत्या म्हणून झेरॉक्सला पाठवल्या होत्या, त्यामुळ मागच्या पेशंटच्या फाइलमधे लावायच्या राहिल्या होत्या', डॉ नी त्याच्या हातातले फॉर्म व बॉलपेन घेतले, जवळच्याच भिंतीवर फॉर्म डाव्या हाताच्या मनगट ते कोपरा या दरम्यानच्या भागाने दाबून धरून, उजव्या हातातील पेनने सही केली. 'कुठल्या पेशंटचे आहे रे ?',
'मगा ती मुलगी, त्या म्हातार्या बाईला घेऊन आलेली नं ? ' … नायर
'ए शहाण्या, पेशंटच नाव काय ? या फॉर्ममधे देखील रीकामा ठेवला आहे रकाना ? '…. डॉ
'अं …फरीदा अत्तारी …असाव …. ' …. नायर आठवून उत्तरला …
डॉ कुंभारेनी आत्ताच, लोकल अनेस्थेशिया देऊन, पेशंटची फाईन नीडल बायोप्सी केली होती, ते स्याम्पाल मुंबईला टाटा इन्स्टीट्युटला पॉसिबल कॅन्सर तपासणीसाठी पाठवणार होते…

कितीही मन स्थिर ठेवायचं म्हटलं तरी, सौदी अरेबियातील भारताचे राजदूत डॉ साजिद हमीद किंचितसे टेन्स झाले होते, तेरवा सकाळी त्यांना परत प्रिन्स अख्हमद बिन खालेदची भेट घेऊन भारताच्या बाजूने दुसर्यांदा केस रीप्रेसेंट करायची होती, सगळे पॉंइंट्स पिंजून काढले होते, पाकिस्तानी दूताची उद्याची पोसिशन काय असेल, तो कसा तंगड आडवं घालू शकतो, त्या करता तेरवा आपण कोणते पॉंइंट्स मांडायचे आहेत वै वै …
थोडक्यात काय तर पाकिस्तानी दूताने एकच गुर्हाळ लावलं होतं, 'तो' पाकिस्तानी नागरिक आहे, त्याचाकडे वैध पाकिस्तानी पासपोर्ट आहे, म्हणून यजमान देशामधे त्याच्या हातून कोणताहि प्रमाद घडला असेल आणि यजमान देशाने त्याला डीपोर्ट करायचं ठरवलं असेल तर त्यांनी त्याला त्याची 'कंट्री ऑफ ओरिजिन' म्हणजेच पाकिस्तानकडे सुपूर्त करावं ….
भारतातर्फे डॉ साजिद हमीद यांनी त्याचे वॉईस स्याम्पलस, तरुणपणाच्या फोटोवरून सुपरइम्पोज केलेले फोटो व त्याचा सध्याचा फोटो यांच्यातलं कमालीच साम्य, त्याचा जन्माचा गुजरातमधील नगरपालिकेचा दाखला, गुजरात बोर्डाच १० वी गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, राष्ट्रीयत्वाचा दाखला, डिप्लोमाच फोटोसहीत सर्टीफिकेट, म्यजीस्त्रेट अटक वॉंरंट वैगरे टेक्नीकल कागदपत्राचा भेंडोळी दाखल केली होती….
परंतु प्रिन्सच्या मते भारत व पाकिस्तानतर्फे सादर केलेल्या गोष्टी नेक-टू-नेक म्हणजेच बरोबरीच्या होत्या, म्हणून जर येत्या महिन्यात भारतातर्फे आणखी काही सक्षम पुरावा मिळाला नाही तर, डीफॉल्ट म्हणून त्याला पाकिस्तानच्या ताब्यात देण्यात येईल…

त्या दिवशी फारीदाची बायोप्सी झाल्यावर खुशबू तिला आपल्या बरोबर रिक्षातून घेऊन गेली होती, तिला सांगितलं कि तुझं स्याम्पल डॉ नी मुंबईला तपासायला पाठवलं आहे, पण तिकडे कामाचा आधीच प्रचंड ताण असल्यामुळे, कदाचित त्याचा रिसल्ट येई पर्यंत एक दीड महिना लागेल, तुझ स्याम्पल १-२ आठवडे तरी तिथल्या फ्रीजमधे वाट पाहत थांबलेलं असेल… आज फारीदाने आग्रह केला की तिला एकदा मीराबाबाच्या दर्ग्यावर जाउन आल्यावर बर वाटेल, खुशबू जरा कामात व्यापलेली होती, पण चाचीला तिने १०० रु च्या दोन नोटा काढून दिल्या, ती म्हणाली 'चाची तू रिक्षाने जा व ये'…फारीदाने विचार केला, शहरापर्यंत सिक्स सीटरने जाऊ, तिथून रिक्षाने जाऊ, संध्याकाळी परत येवू…नाहीतरी मला म्हातारीला दिवसभर काय काम आहे…

संध्याकाळी ऑफिसमधून बाहेर पडण्यापूर्वी, खुशबू इंटरनेटवरील ब्युरोवरच्या लेटेस्ट न्यूज वाचत होती, त्यातल्या एका बातमीने तीच लक्ष वेधलं, कारण ती बातमी तिच्या घराजवळची होती….
"पुणे-नगर महामार्गावरील सिक्ससीटरच्या बी आर टी मार्गात अपघातामुळे कलंडल्यावर बारीक स्फोटा सारख्या आवाजानंतर इंजिनमधून अचानक धुराचे लोट येऊ लागले आणि क्षणार्धात आगीचा भडका उडून सिक्ससीटर जळून खाक झाली. ही घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद येरवडा पोलिस ठाण्यात झाली आहे. गाडीने पेट घेतल्यानंतर नागरिकांनी अग्निशामक दलाला बोलावले. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर कर्मचा-यांनी भडकलेली आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. आगीमुळे त्यातल्या वाहक आणि एक प्रवासी यांची राखरांगोळी झाली होती. अपघातात संपूर्ण गाडी क्षणार्धात आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे त्यांना पळून जायची संधी मिळाली नसावी. पोलिसांनी पंचनामा केला. प्रत्येक वाहनामध्ये अग्निरोधक यंत्रणा बसविण्याची सक्ती असावी, अशी प्रतिक्रिया घटनास्थळी होती. "
खुशबू ऑफिसवरून घरी आली, त्यारात्री फरीदा चाची अजूनही आलेली नव्हती, म्हणून तिची अम्मी काळजीत होती, सकाळीच तिने फरीदाला सिक्ससीटरच्या स्टान्डवर, सिक्ससीटरमधे बसवून आली होती, ती सिक्ससीटर, फातिमाच्या चांगलीच लक्षात राहिली होती, कारण तिच्या मागे, पितळेच्या पंख फैलावून उभ्या असलेल्या परीच्या शिल्पाचा लोगो, इंजिनाच्या दरवाज्यावर शौकीन ड्रायवरने वेल्ड केलेलं होतं….

आजच्या मिटिंगनंतर डॉ साजिद हमीद थोडेशे खुश होते, त्यांनी आज पाकिस्तानचे सर्व मुद्दे यशस्वीरीत्या परतवले होते, एवढच नाही, तर त्यांनी आज प्रिन्ससमोर पाकिस्तानच्या नेहेले पे भारताचा देहेला टाकला होता, 'जबिउद्दिन अत्तारीची आई सध्या पुण्यात राहते आहे ', असं चर्चेदरम्यान, भारतीय सुरक्षा यंत्रणेने दिलेल्या फाइलमधे वाचल्याचं, त्यांना आठवलं, तेव्हाचं त्यांनी हुकुमी पत्ता टाकला, 'जबिउद्दिन अत्तारी भारतीय नागरिक असल्याच ते सिद्ध करणार होते … कशाच्या बळावर … सोप्पय… त्याचा आईची डी एन ए प्रोफाईल, सौदिना द्यायची, म्हणायचं, करा तुम्ही कॅम्पेअर, तुमच्या ताब्यातल्या वाक्तीच्या डी एन ए प्रोफाईल बरोबर …… '

रियाधमधल्या मॅर्रिअट हॉटेलमधल्या माझ्या खोलीतील आरशात मला माझी प्रतिमा दिसत होती, कमावलेलं शरीर, सावळा वर्ण, देखणा तरुण वैमानिक दीपक गेहलोत…… खुश होऊन आजच्या दिवसाला सामोरे जाण्यासाठी हॉटेलमधून बाहेर पडलो, दोन मिनिटात मी मला टर्मिनलकडे नेणाऱ्या शटलसमोर उभा होतो, 'गुडमॉर्निंग कॅप्टन', शटल ड्रायवर बिलालने आपल्या बांगला वळणाच्या बोलीत माझं अभिवादन केलं, शटलमधे आधीच सहवैमानिक, आणि स्टेवर्डेस माझी वाट पाहत बसलेलेच होते, दरवाजा स्लाईड करून बंद करून बसलो. बिलालने सरकावलेल्या एअर इंडियाच्या वॉवचरवर मी स्वाक्षरी केली…
सहकार्यांबरोबर गप्पा मारत मारायला सुरवात केल्या त्या, किंग खालिद इंटरनॅशनल एअरपोर्टचं प्रवेशद्वार आलं तेव्हा थांबल्या, मी एक डॉलरच्या ४-५ नोटा बिलालकडे सरकवल्या…'तुमचा प्रवास सुखकर होवो !' तो उद्गारला. सगळे ऑफीशिअल सोपस्कार पार पाडून, माझी सॅमसोनाइट ची ट्रोली ओढत एअर इंडियाच्या कौंटरपाशी आल्यावर, माझं फ्ल्यायिंग लायसन्स व एअर इंडियाचं ओळखपत्र तिथल्या ऑपरेशन ऑफिसरकडे दिलं, त्यांन फॉर्मलिटी म्हणून विचारलं 'फ्लाईट AI ९२० टू मुंबई राईट ?, प्लीज हा आणखी एक फॉर्म भरून देता का ?', मी त्यावर आवश्यक तो मजकूर लिहिला, आणि 'ओन्ली फॉर डिप्लोमट्स अंड क्रु’ असं लिहिलेल्या दरवाजाकड प्रयाण केलं, 'चला आता सहवैमानिक आणि फ्लाईट इंजीनिअर बरोबर रुटीन इंजिन, इंस्त्रुमेंट्स, कम्युनिकेशन चेक्स काळजीपूर्वक करायला हवे म्हणून, माझ्या दोन्ही हाताचे तळवे क्षणभर हलकेच एकमेकांवर घासून, त्यादिशेने वळलो…

किंग खालिद इंटरनॅशनल एअरपोर्ट च्या दिशेने, रूट ५३९ वरून आमची गाडी प्रवास करून आता बरीच मिनिटे झाली होती, जेव्हा प्रिन्सेस नुरी बिंते अब्दुल रहमान युनिवर्सिटी डाव्या खिडकीतून मागे जाताना दिसली तेव्हा मनात विचार आला की बस्स थोड्याच वेळात आपण विमानतळावर पोहोचू, १०-१५ मिनिटात एअरपोर्टवर पोचलो. तिथं लगेज चेक-इन, इमिग्रेशन आदी सोपस्कार पार पडल्यावर आम्ही एअर इंडियाच्या लाउंजमध्ये जाऊन बसलो. विमानतळावरचे सोपस्कार आटोपून मुंबईच्या विमानात बसलो. आज लॉटरी लागली अस वाटलं, जेव्हा मला इकॉनॉमी क्लासमधून बिझनेस क्लासमध्ये अपग्रेडेशन मिळालं एकही रुपया न खर्चता. कारण विचारलं ते म्हणाले ‘एकतर हा ऑफसीजन आहे जवळजवळ सर्व विमान रिकाम आहे, म्हणून सर्व इकॉनॉमीच्या प्रवाशांना अपग्रेडेशन दिलंय. ‘इट्स यॉर लकी डे मिस्टर कुरिअन’, मनात विचार आला, नाहीतरी या एसी टेकनिशियनच्या पगारात स्वताच्या खर्चातून बिसिनेस क्लास थोडीच परवडणार आहे ? त्यामुळं मी बिझनेस क्लासमध्ये मोठ्या खुशीने बसलो. जेव्हा टेकऑफ केलं, तेव्हा नेहमीप्रमाणे लघवीची भावना झाली, पण सीट बेल्ट साईन ऑन होती….

टेक ऑफ झाल्यावर थोड्याच वेळात बोईंगच अजस्त्र धूड ३०००० फुटावर नेलं स्थिरस्थावर केलं, पँनेलवरची सगळी गेजेस व्यवस्थित रीडिंग दाखवत होती, तरी एस ओ पी प्रमाणे सर्व रीडिंग वेरीफाय केली, रियाध टॉवरबरोबरचा संवाद संपवला, त्यानंतर ते मोठ बोईंग जेट ऑटोपायलट ठेवलं, चीफ स्टूअर्डला इंटरकॉम वरून पुढच्या रुटीन सूचना दिल्या.

स्पीकरवर सौम्य स्त्री आवाज उमटला, 'देविओ और सज्जनो, जहाजके कप्तानने कुर्सीकि सुरक्षापेटी बांधनेके चिन्हको बुझा दिया है, अभी यात्रीगन अपने इलेक्ट्रोनिक साधनोका प्रयोग कर सकते है, और कुर्सी की बांधी हुई सुरक्षापेटी खोल सकते है, यात्रियोसे अनुरोध है …'
हे ऐकून म्हटलं चला टॉईलेट वापरूया, तर बिसिनेस क्लासच्या टॉईलेटजवळ नंबर लावायला सुरवात झालेली लोकांची, ठीक आहे आपण इकॉनॉमीचा टॉईलेट वापरू म्हणून तिकडे मोर्चा वळवावा, तर घाई घाईत तिकडची एअर होस्टेस धावतच आली, तिने घाईने मधला पडदा एका हातात धरून, लावण्यापूर्वी मला सांगितलं, सर प्लीज तुम्ही बिसिनेस क्लासचीच टॉईलेट वापरा, तिच्या खांद्यामागे मला इकॉनॉमी सेक्शनमधे ५-६ लोकं दिसली, अरे ह्यांना का नाही अपग्रेड केलं ? बिसिनेस क्लासमधे तर अजूनही काही सिटा रिकाम्या होत्या… पण जाऊन दे न ! आपल्याला काय !… तरी इकॉनॉमी मधले ते लोकं काहीशी वेगळी वाटली मला नै, म्हणजे एक हातभर दाढीवाला झाब्बातल्या व्यक्ती आपल्या सीटमधे दोन्ही मनगट जवळ ठेवून बसला होता… आणि शिवाय कोपरा पासूनचे पुढचे त्याचे दोन्ही हात शालीमधे अशे गुरफटवून ठेवले होते की ते दिसूच नये…. आणि एवढी मोकळी सीट असताना त्याला चिकटून दोन्ही बाजूला व मागं खाकी सफारीतले, क्लीन शेव्ड, क्रु कटमधले दणकट लोकं होती, मागच्या कोपर्यात थोड्या अंतरावर एक सरदारजी बसले होते आपल्या गुलाबी पगडीमधे …

बोईंग अरबी सागरावरून उडत होतं व काही काळ जरा एअर टर्ब्युलन्स जाणवला. मी डाव्या खिडकीतून बाहेर पाहिलं. माझ्या डाव्या बाजूला पसरलेल्या ढगांच्या वरून आमचं विमान उडत आलं होतं. खालचं काही दिसत नव्हतं पण सवयीप्रमाणे मला ठावूक होतं एका रूपेरी महासागरातून आपली 'फ्लाईट AI ९२० टू मुंबई हळुवारपणं चालली आहे, तो एअर टर्ब्युलन्सही आता गेला होता. विमानतळ लोकेशन, समोरच्या स्क्रीनवर येत होतं. ते मोठ बोईंग जेट ऑटोपायलटवरून काढून माझ्या नियंत्रणात घेतलं, लॉगसाठी नोंद केली, मुंबई एअर ट्राफिक टॉवरशी संपर्क प्रस्थापित करायला सुरुवात केली, थोड्याच वेळात विमानाचं डिसेंडिंग सुरू केलं. मुंबईच्या विमानतळावर भरपूर एअर ट्रॅफिक होतं. मग क्लिअरन्स मिळेपर्यंत विमान आकाशात गोल गोल फेऱ्या मारीत ठेवलं. लांब अरबी समुद्रात जाऊन खाडीवरून चक्कर झाल्या. अखेर खाली ट्राफिक टॉवरकडून क्लिअरन्स सिग्नल मिळाला आणि विमान वेगानं वांद्र्याच्या झगमगाटावरून विमानतळावर उतरवलं.……….

खुशबूने आपल्या बिछान्याजवळच्या घड्याळात पाहिलं तर त्यात सकाळच्या ९ वाजताची वेळ दर्शवत होती, गेले काही दिवस झोप मिळतच नव्हती, एवढी थकून गेली होती त्या धावपळीमुळे, ऐनवेळी फरीदाला झालेला अपघात…. त्यामुळ होऊ न शकणारी डी एन ए टेस्ट, शेवटी ती जगात मागे सोडून गेलेल्या तिच्या बायोप्सिच्या स्याम्पलमुळे यशस्वी पार पडली होती…. आज ती बुट्टी मारणार होती… कारण आज दुपारी टी व्ही वर दिल्लीवरून एक प्रेस कॉन्फ्रंस प्रक्षेपित होणार होती…

आपण कोणत्या ठिकाणी चाललो आहोत, याची त्या बुरखेधारि व्यक्तीला, बुरख्यामुळे काहीच कल्पना येत नव्हती, विमान तळाच्याबाहेर मागच्या बिनवर्दळी हँगरमधे येण्याच्या जरा आगोदर, त्याला त्या गुलाबी फेटा घातलेल्या सरदारजीने विचारले, 'पाणी चाहिये ?', त्याचे पाणी पिउन झाल्यावर त्याला हँगरमधे आधीच उभ्या असलेल्या, काळ्या काचेच्या 'शिवनेरी' अस लिहिलेल्या एका बसमधे बसवण्यात आले, त्याचे हात बेडीत असल्यामुळे त्याला त्याच्या जागेवर बसवण्यात इंडो तिबेट बॉर्डर पोलिस कमांडो दलाचे जवान मदत करत होते, सौदीतून विमानप्रवास सुरु झाल्यापासून तेच त्याचे सोबती होते… पहाटे पहाटे प्रवासात बुरख्यामुळे त्याला काहीच दिसत नव्हत, फक्त त्याच्या कानावर पडत होती दूरवरून येणाऱ्या अजानचे शब्द … 'अल्ला हो अकबर …अल्ला …अशुदो अन ला इल्लल्लाहा…हैया लस सलाह …' आणि त्याचा अर्थ त्याला चांगलाच ठावूक होता …. ' बंधू (मित्रा) ऊठ आणि प्रार्थनेला चल …. नतमस्तक होण्याची वेळ जाहली आहे …… '

आईये आपको स्टुडीओसे सिधा ले चलते है, महराष्ट्र सदनमे, जहापे इस वक़्त, भारतके गृहमंत्री बालासाब थोरवे इस वक़्त पत्रकार परिषद ले रहे है,.....हा दीपक क्या हो राहा है वहा ?…दीपक … लागता है हमारा संपर्क नही हो पा रहा है ….

रिमोट क्लिक….दुसरे च्यानल …

पार्शभूमीवर तिरंगा ध्वज आहे गृहमंत्री पाहिलं वाक्य बोलतात 'हमने उसे पकड लिया है, वी गॉट हिम', मागच्या कित्येक महिन्यापासून चालू असलेली हि गुप्त मोहीम यशस्वी झाली आहे………

रिमोट क्लिक….दुसरे च्यानल …

ब्रेकिंग न्यूज
अनेक बॉम्बस्फोटप्रकरणी हवा असलेला एका महत्त्वाच्या अतिरेक्याला भारतीय सुरक्षा यंत्रणांनी अटक केलीय. अबू फैसल असं त्याचं नाव आहे. ही अटक खूप महत्त्वाची आहे. सौदी अरेबिया सरकारनं भारत सरकारच्या विनंतीवरून त्याला देशाबाहेर काढलं. आणि विमानतळावर पोहोचताच त्याला अटक करण्यात आली, असं समजतंय. त्यानंतर त्याला कोर्टात हजर करून पोलीस कोठडी देण्यात आलीय. अबू फैसलनं अतिरेक्यांना प्रशिक्षण दिलं तसंच त्यांना हिंदी शिकवली. तो भारताचा नागरिक असला तरी त्याचं वास्तव्य काही काळ पाकिस्तानमध्ये होतं. अबू फैसल मूळचा गुजरातचा - मूळ नाव जबीउद्दीन अत्तारी ……

पंधरा वर्षांपूर्वी
२६ जानेवारी
कारगिलकी में दुश्मन का सामना करने के लिए १६ ग्रेनेडीअर के जिला काठियावाडके हवलदार सलीम फरीद बागवान को जिम्मेदारी सौंपी गई। दुश्मनके हमले में भारी घमासान के बाद सलीम बागवान के प्लाटूनके सभी साथी मारे गए और वे स्वयं भी बुरी तरह घायल हो गए। पाकिस्तानी ठिकाने पर कब्जा करने मोहीम समाप्त होने की घोषणा तक बुरी तरह से घायल सलीम बागवान दुश्मन से मुकाबला करते रहे। मरने से पूर्व उन्होने कई दुश्मन सैनिकों को मौत के घाट उतारा। इस 23 वर्षीय जवान को मरणोपरांत शौर्यचक्र से नवाजा जा रहा है । गुजरातके काठीयावाडमें जन्मे इस होशियार ने अपनी वीरता एवं रणकौशल का परिचय देते हुए इतिहास में अपना नाम अमर कर लिया है ।

राम्पवरून एक महिला राष्ट्रपतींच्या दिशेने निघाली …. …. आपल्या स्वच्छ, नीटनेटक्या, दोन वेण्या चपचपीत तेल लावून घातलेल्या मुली बरोबर…राष्ट्रपतींनी तिचं कौतुक करून नाव विचारल्यावर ती मुलगी म्हणाली "खुशबू"…..

***************************** समाप्त ****************************************
******************************************************************************

उपसंहार

अबू फैसल विरुद्ध फास्ट ट्रयाक कोर्टात १०००० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे, सरकारतर्फे हा खटला यशस्वी पब्लिक प्रोसेक्युटर सौ उज्ज्वला निम्हण लढवत आहेत.

अबू फैसल की गिरफ्तारी के बाद भारतीय पुलिस के समक्ष पूछताछ के दौरान उसकी ओर से किए गए खुलासों के आधार पर भारतीय गृह मंत्रीने दावा किया था कि आतंकवादी हमले में आतंकवादियों को पाकिस्तानी सरकार का समर्थन प्राप्त था। लेकिन भारतीय गृहमंत्रीके इस दावे को, पाकिस्तानी मंत्रीने अस्वीकार कर दिया, उन्होने दावा किया था कि भारतीय गृहमंत्रीकी टिप्पणी पाकिस्तान और उसकी जासूसी एजेंसी इंटर-सर्विसेज इंटेलीजेंस को बदनाम करने का प्रयास है।

अणुभट्टी प्रकरणी भ्रष्टाचारच्या आरोपाला सामोरे जात भारतीय पंतप्रधानांनी लढवलेल्या निवडणुकीत त्यांच्या व त्यांच्या पक्षाचा दारूण पराभव झाला. लोकसभेत आता विरोधीपाक्षत बसण्यासाठी पक्षाचे गटनेते म्हणून माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब थोरवे यांची निवड झाली…. अणुगेट प्रकरणामुळे, चौकशीकरिता समन्स मिळून कोर्टाची पायरी चढावे लागणारे डॉ योगेंद्र यादव हे भारताचे तिसरे प्रधानमंत्री ठरले आहेत

टेड स्माईल्स त्यांची निवडणूक जिंकून भारतभेटीवर आलेले असताना, त्यांनी मुंबईतील पंचतारांकित हॉटेल फोर-सीजनमधे अनेक राजकीय व उद्योग जगतातील व्यक्तींची सदिच्छा भेट घेतली. त्यांच्या अमेरिकेला परत गेल्यावर भारताच्या संबंधित दोन घटना घडल्या, पहिली घटना, भारतातील सत्तेतील घटक असलेल्या एका छोट्या पक्षाने, विजेतापूर येथील प्रस्तावित फ्रेंच अणुभट्टीला तीव्र विरोध दर्शविला आहे…. दुसरी घटना, अमेरिकेतील भारतीय वकिलातीत काम करणाऱ्या एका कर्मचार्याला शॉपलिफ्टिंगच्या आरोपाखाली अटक केली, कर्मचार्याचे नाव होते …… अजय खोब्रागडे.

युद्धात वीरगती मिळालेल्या सैन्यातल्या शहीद जवानांच्या विधवांना, कोरेगाव पार्क येथे लष्कराच्या जागेत बांधण्यात आलेल्या सुदर्शन टॉवरमधे, अजूनहि फ्ल्याट मिळालेला नाही आहे, खुशाबुची आईने अजूनही फ्ल्याट मिळेल, याची आशा ठेवली आहे……

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

10 Jan 2016 - 12:58 pm | पद्मावति

कथा एकत्रित करून दिल्याबदद्ल धन्यवाद. कधीची वाचायची होती ती राहूनच गेली. आता वाचायला सोपं जाईल. नक्की वाचते.

नूतन सावंत's picture

11 Jan 2016 - 8:29 pm | नूतन सावंत

सुरेख कथा.खूप बारकाव्यांनी लिहिलंय.

पगला गजोधर's picture

3 Aug 2016 - 1:52 pm | पगला गजोधर

Abu

लष्कर‘चा हस्तक; अनेक कटांत सामील
मुंबई - मुंबई हल्ल्यातील पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला हिंदी शिकवणारा आणि मुंबई हल्ल्याच्या कटात सामील असलेला सय्यद झैबुद्दीन सय्यद झकीउद्दीन ऊर्फ अबू जुंदाल "लष्कर ए तैयबा‘ या दहशतवादी संघटनेचा विश्‍वासू हस्तक आहे. भारतात घातपात घडवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने घातक स्फोटके आणण्याच्या कारस्थानात तो सतत आघाडीवर राहिला आहे. मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना पाकिस्तानमधून चिथावणी देण्यातही जुंदाल सामील होता.

बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या जुंदालने आयटीआयमध्ये शिक्षण घेतले होते; पण महाविद्यालयीन काळातच लष्कर ए तैयबाच्या फिरोज या हस्तकाशी त्याची ओळख झाली. लष्कर ए तैयबा आणि इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांचे आकर्षण त्याला आधीपासूनच होते. त्या आकर्षणापोटी तो पाकिस्तानला गेला. पुढे तो कराची आणि पाकव्याप्त काश्‍मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सामील झाला.

जुंदाल या नावाबरोबरच अबू हमजा, जबी, रियासत अली अशा नावांनी तो ओळखला जातो. गुजरातमधील दंगलीनंतर निर्माण झालेल्या सामाजिक अशांततेचा फायदा उठवण्यासाठी दहशतवादी कारवाया करण्याचा कट "लष्कर‘ने आखला होता. त्यासाठी मोठा शस्त्रसाठा नेऊन कारवाया करण्याचे कारस्थान जुंदालने आखले होते; पण एटीएसच्या सतर्कतेमुळे हा कट उधळला गेला. शस्त्रसाठा नेणारी एक कार जुंदाल चालवत होता. पोलिसांनी पाठलाग केला तेव्हा तो मालेगावमध्ये पळाला. तेथून तो बनावट पारपत्राद्वारे लष्कर ए तैयबाच्या हस्तकांच्या मदतीने बांगलादेशात आणि तेथून पाकिस्तानमध्ये गेला.

लष्कर ए तैयबामधील तरुण दहशतवाद्यांना मुंबई आणि भारतातील अन्य शहरांची सविस्तर माहिती देण्याचे प्रमुख काम त्याच्याकडे होते. तो दहशतवाद्यांना हिंदीही शिकवत असे. मुंबई हल्ल्याच्या वेळी बधवार पार्कमध्ये घुसलेल्या 10 दहशतवाद्यांना हिंदी शिकवण्याचे कामही जुंदालनेच केले होते. "लष्कर‘च्या खास प्रशिक्षणात ज्या मोजक्‍या म्होरक्‍यांना दहशतवाद्यांना भेटण्याची परवानगी दिली जाते, त्यात जुंदालही होता.

जुंदाल भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर होता. तो पाकिस्तानमध्ये असून, तेथून सौदी अरेबियाला जाणार आहे, अशी खबर पोलिसांना लागली होती. त्यानुसार त्याला 2012 मध्ये सौदी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याचे प्रत्यार्पण सौदी सरकारकडून भारताकडे करण्यात आले. तेव्हापासून तो एटीएसच्या कोठडीत आहे. तीन वर्षांपूर्वी त्याच्यावर औरंगाबाद येथील हत्यारे बाळगल्याबद्दलच्या खटल्यात आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्याच्याविरोधातील पहिल्या खटल्याचा निकाल गुरुवारी (ता. 28) लागला असला तरी मुंबई हल्ल्याच्या खटल्यातही तो प्रमुख आरोपी आहे.

अटकेनंतर जुंदालने एटीएसला आणखी एका शस्त्रसाठ्याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर 13 किलो आरडीएक्‍स, 1200 काडतुसे आणि 50 हातबॉम्ब जप्त करण्यात आले होते. हा खटलाही प्रलंबित आहे. त्याशिवाय जर्मन बेकरी बॉम्बस्फोट आणि अहमदाबाद रेल्वे बॉम्बस्फोटातही तो सामील असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे.

Abu Jundal

नमकिन's picture

13 Jan 2016 - 10:01 am | नमकिन

मैं यहाँ टुकड़ों में जी रहा हूँ।
तू कहीं टुकड़ों में जीss रहा हूँ

सिरुसेरि's picture

3 Aug 2016 - 2:38 pm | सिरुसेरि

गुंतागुंतीची कथा . मिरज - बसाप्पा -- बसप्पा हलवाई आणी जयसिन्ग्पुर -- मगदुम -- जे जे मगदुम कॉलेज .. एवढे समजले .

राजाभाउ's picture

3 Aug 2016 - 5:59 pm | राजाभाउ

जबरदस्त !!!! पुर्वी अर्धवट वाचली होती. मस्त चित्रपट निघेल यावर

संदीप डांगे's picture

3 Aug 2016 - 6:18 pm | संदीप डांगे

गजोधार सर, हे सर्व खरे प्रसंग आहेत ना?

पगला गजोधर's picture

3 Aug 2016 - 6:23 pm | पगला गजोधर

कथा ही सत्यावर आधारित असली तरी सुरक्षेच्या दृष्टीने पात्रांची नावे, स्थळे, घटनाक्रमास
कल्पनेचे शुगर कोटींग देण्यात आलेले आहे.