श्री. श्री. संत यनावाला महाराज

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
6 Jan 2016 - 9:03 am

श्री. श्री. संत यनावाला महाराज

मित्रहो, धाग्याचे शीर्षक वाचून धक्का बसला नां ? पण त्याचे काय आहे, हल्ली दूरदर्शनवरील ब्रेकिन्ग न्युज प्रमाणे प्रत्येक शीर्षक धक्कादायक नसेल तर कोणी तिकडे लक्षच देत नाही. आता साधी गोष्ट, तुम्हाला माहीत आहेच महाराष्ट्रातील संत आपली ओळख कोणालाही पटू नये म्हणून नाना प्रयत्न करत असतात. श्री.(एकच श्री. बर कां !) तुकाराम महाराज घ्या. चांगला वाण्याचा वंशातला माणुस, म्हणे मीठ विकावयाला कोकणात गेला. त्यांच्या दुकानात विकावयास असलेल्या मीठाच्या गोण्या कोकणातून येतात हे त्यांना माहीत होतेच; पण लोकांना आपली खरी ओळख पटू नये म्हणून हा खटाटोप. साईबाबा घ्या, गजानन महाराज घ्या,फार काय गाडगे महाराज घ्या; त्यांच्याकडे पाहून कोणाला वाटेल तरी का कीं हा माणुस मोठा संत आहे ? तीच गत यांची.चांगले "यशवंत" नाव,आपल्या क्षेत्रात, मग ते यांत्रीकी महाविद्यालय असो वा वर्षानुवर्षे शब्दकोडी लिहावाची असोत, यशवंत झाले, पण लोकांना कळू नये म्हणून "यनावाला" हे पारशी नाव घेतले. घ्या घ्या, पण आम्ही मिपाचे चतुर, साक्षेपी सभासद. अशाने फसतो काय? अहो, कोणी डु.आय.डी, घेतला तर दोन प्रतिसादात निम्म्या सभासदांना ते कळलेले असते. आता हजारो वाचकांच्या आणि शेकडो प्रतिसादांच्या गदारोळात जर एखाद्यच्या नजरेतून खरी चलाखी लक्षात आली नसेल तर ती ध्यानात आणून देणे हे आमचे कामच आहे. आम्ही फक्त तीन सूचक गोष्टींकडे आपले लक्ष वेधतो. आपणास जास्त "क्लुं"ची गरज नाही.
(१) एकविसाव्या शतकांत कोणी ओव्या-अभंग लिहतात? तुकडोजी महाराज की पाडगावकर ? पैकी स्वामी पाडगावकर महाराजांनी मुखपृष्ठावर आपला लंगोटी घातलेला. हातात कमंडलू
घेत्लेला ,दाढीवाला फोटो छापून शंकेला जागाच ठेवली नाही. त्या नंतर यनावाला महाराज. एक दोन लेख गद्यात लिहले पण शेवटी "आतले" बाहेर पडतेच. लिहा लिहा. अभंग-ओव्या लिहा. एका चतुर सभासदाने त्याला extended चालिसा म्हणून संतगिरी बाहेर काढलीच कीं नाही ?
(२) आता तुम्ही म्हणाल ही बाह्य लक्षणे झाली..केवळ अभंग-ओव्या लिहण्याचा "चमत्कार" केला म्हणून संतपद द्यावयाला आम्ही व्हटिकान सिटीमध्ये बसलो आहोत काय ? आंतरपुरावे द्या. मान्य. तिकडेच वळू. संतांचे प्रमुख लक्षण काय ? त्यांना सामान्य जनांबद्दल कळवळा पाहिजे. म्हणजे हे लोक मजेत, आनंदाने इहलोकातील सुखाचा उपभोग घेत जलविहार करत असतील तर हे संत म्हणणार हे सामान्य लोक भवसागरात गटांगळ्या खात आहेत, या अज्ञानी लोकांना वाचवण्याकरिता तर ईश्वराने आपणास पाठविले आहे, चला तर, धरा यांची मानगुट, काढा बाहेर. सामान्यांच्या आनंदावर विरजण घालणे हे प्रमुख ध्येय. श्री.श्री.यनावाला महाराज हेच करत आहेत. जर मला वाटत असेल की "ईश्वराच्या भक्तीने माझ्या रोजच्या कटकटीतून माझी थोडी सुटका होत आहे, पुढील जन्मात चांगले आयुष्य लाभेल, माझ्या संकटात माझ्या पाठीशे देव असेल, अगदी .गेला बाजार शिर्डीला गेल्याने नवर्‍याला प्रमोशन मिळेल" तर हे लगेच सांगणार की, " छ्या, यडा की काय, पुढचा जन्म वगैरे भानगडच नाही. आणि देव वगैरे विसर. त्याचे अस्तित्वच सिद्ध झालेले नाही. दाखव मला तुझा देव ! " अगदी "बाप दाखव नाही तर श्राद्ध कर " म्हणत नाहीत हे खरे पण ते श्राद्धावर विश्वास नाही म्हणून बाकी "कळवळा" तसाच !
(३) आता शेवटचा प्रमुख पुरावा "देव नाही" हे पटवून देण्याचा आटापिटा का करत असतात ? अहो, श्री. संत तुकाराम महाराजांनी लिहले आहे
आहे ऐसा देव वदवावी वाणी !
नाही ऐसा मनी अनुभवावा !!
म्हणजे देव नाही हे खरे, पण या चार लोकांना सांगतांना "ये खयाल अच्छा है". जरा यांना बरे वाटत असेल तर तसे सांगावयास काय हरकत आहे ? पण श्री.श्री.संत यनावाला महाराज जास्त रोखठोक. यांचा कळवळा जरा जास्तच. जखमेवर फुंकर घालण्याऐवजी त्यावर आयोडीन ओतणेच पसंत. तेव्हा त्यांनी चार पावले पुढे जाऊन देवावर फुलीच मारली. तेव्हा आता आपल्या लक्षात आले असेलच की तुकाराम महारजांना एकच श्री का व यनावाला महाराजांना डबल श्री का.
(यनावाला महाराज आमचे सत्गुरू. आमचा हात धरून त्यांनी आम्हाला जालांवरील या स्थलांवर आणले. हल्ली सर्व बापू-बाबा यांना PRO and Event Manager लागतातच. आम्ही त्यातलेच. तेव्हा बोला श्री.श्री.संत यनावाला महाराजकी जय. पुंडलिक वरदे..अरर चुकलच की) .

शरद

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

नाखु's picture

6 Jan 2016 - 9:07 am | नाखु

हा लेख टिकला तर आशचर्य वाटेल..

बाकीचा सा़क्षीदार नाखु

आमचा टिंपो नाक्यावरच हुबा असतुया बुला कुटं जायाचं हाय अकलकोट का तुळजा ? जु पैसे दिल त्याला पोचु वतो.डुआयडी का शुआयडी काय पन दिणंघिणं नाय.

संदीप डांगे's picture

6 Jan 2016 - 9:53 am | संदीप डांगे

अचूक....!!!

विकास's picture

6 Jan 2016 - 10:02 am | विकास

लेखातला मुद्दा मला समजला असे वाटत असल्याने आवडला...

अंधश्रद्धा कुठे नाही? सगळीकडे आहे... पण त्याची व्याख्या किती ताणायची ह्याचा देखील विचार करायला हवा. म्हणजे आता आमच्या अम्रिकेत कुठल्याही पदाची शपथ घेताना, त्या व्यक्तीस मी याँव करेन आणि त्याँव करेन असे छापिल म्हणावे लागतेच पण ते "मी करू शकेन" म्हणून "so help me God" असे देखील म्हणावे लागते. आता याला अंधश्रध्दा म्हणायला लागलो तर ते जरा जास्तच होईल असे वाटते.

त्या व्यतिरीक्त, अशा चर्चेत टिका करण्यासाठी लेख लिहीणार्‍यांनी देखील भाग घेयला हवा. समाज सुधारणा करण्याची खरेच गरज आहे आणि अंधश्रद्धा निर्मुलनाची देखील गरज आहे. पण कुठे आहे आणि ती "आजच्या काळासाठी" कशी करावी ह्याचा देखील विचार करणे गरजेचे आहे. नाहीतर (अतिशयोक्तीत म्हणायचे झाले तर) उद्या रामदेवबाबांसमोर योगासनांची गरज आहे म्हणून लेक्चर झोडून समाज जिथे सुधारायला हवा तेथे सुधारणार आहे का? याचा विचार करायला हवा.

दुर्दैवाने तसा होताना दिसत नाही. मग अशा समाजशिक्षणाचा अतिमारा झाला की माणसात त्या कारणासाठी योग्य बदल आपल्या वृत्तीत आणण्याऐवजी बधिरता येते आणि चांगल्या उद्देशावर पण पाणी पडते... माकडाची आठवण करायची नाही असे सारखे सांगत बसल्यावर काय होणार?

हा मुद्दा केवळ अंधश्रध्देपुरताच मर्यादीत नाही. हेच कुठल्याही आदर्श आणि प्रामाणिक हेतूने पण (चुकीचा अर्थ घेऊ नका) अतिरेकी वृत्तीने केलेल्या समाज जागृती/शिक्षणाच्या बाबतीत होते. उदाहरणादाखल पर्यावरण चळवळ. एकीकडे कळत असते पण तेच जर लोकशिक्षण म्हणून सांगायला लागले तर त्याबाजूला वळणेच होत नाही...

म्हणून नुसता उद्देश चांगला असून भागत नाही. त्यासाठी मनापासून (passionately) काम करायचे असेल तर स्थळ-काळ-वेळ आणि श्रोतृगण/वाचकवर्ग कोण आहे हे पाहून करणे महत्वाचे वाटते...

असो. तुर्तास इतकेच.

उद्या रामदेवबाबांसमोर योगासनांची गरज आहे म्हणून लेक्चर झोडून समाज जिथे सुधारायला हवा तेथे सुधारणार आहे का?

संकेतस्थळ हे प्रबोधनाचं उत्तम साधन आहे.

अशा समाजशिक्षणाचा अतिमारा झाला की माणसात त्या कारणासाठी योग्य बदल आपल्या वृत्तीत आणण्याऐवजी बधिरता येते आणि चांगल्या उद्देशावर पण पाणी पडते

मान्य. पण नक्की किती मारा केल्यानं उद्देश सफल होईल हे कसं ठरवणार?

नुसता उद्देश चांगला असून भागत नाही. त्यासाठी मनापासून (passionately) काम करायचे असेल तर स्थळ-काळ-वेळ आणि श्रोतृगण/वाचकवर्ग कोण आहे हे पाहून करणे महत्वाचे वाटते...

हे कसं ठरवणार? आणि हा फोरम अयोग्य आहे का?

विवेक ठाकूर's picture

6 Jan 2016 - 10:11 am | विवेक ठाकूर

त्यांचा टोन कडक असेल तरी काम योग्य आहे. हेतू चांगला असेल तर शब्द अणखर वाटू नयेत. इथे पूर्वी आरत्या चालायच्या त्या विरोधात लिहीणार्‍याला पब्लिकनं असाच कॉर्नर केला होत्या. सध्या किमान त्या तरी बंद झाल्यात. लोकांनी काल्पनिक आधार शोधण्यापेक्षा वस्तुनिष्ठ आणि वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवला तर देवाच्या नांवावर चालणारा प्रचंड अपव्यय बंद होईल.

यनावाला किंवा इतर कोणीही इथे स्वतःच्या आस्तिक, आध्यात्मिक आणि नास्तिक मतांविषयी जेव्हा लिहितो तेव्हा ती त्यांची खरीखुरी मतं असल्याचं मानणं आणि त्यावर टीकाटिप्पणी किंवा इतर काहीही करणं हीसुद्धा अंधश्रद्धाच नाही का? यनावाला किंवा इतर कोणीही self-proclaimed नास्तिक प्रत्यक्षात सत्यनारायणाची कथा ऐकताना त्यांचे लेख टंकत असल्याची शक्यता विचारात घेण्यासारखी आहेच. आणि हे इतर मतांच्या बाबतीतही खरं आहे.
(इथे लेखाच्या शीर्षकापासून यनावालांचा उल्लेख केलेला असल्यामुळे प्रतिक्रियेत त्यांचा उल्लेख आहे. त्यांच्यावर आणि त्यांच्या मतांवर टीका करण्याचा उद्देश नाही.)

लेखनातून जर मतं प्रकट होत नसतील तर मग त्या लेखनाला अर्थच नाही, भले ते लेखन असो की प्रतिसाद. या अँगलनं खरं तर मग कोणत्याही लेखनाला काहीच अर्थ राहाणार नाही.

तुम्ही आजाराने उताणे पडलाहात,औषधे चालू आहेत-आईने कुठला अंगारा आणला लावायला-----
१) "थांब असलं काही-------"
२) गपचिप अंगारा लावून घेणार.

यातले काय करणार?

प्रकाश घाटपांडे's picture

6 Jan 2016 - 1:48 pm | प्रकाश घाटपांडे

एक उत्तर असे असू शकते
ते त्यावेळच्या मनोव्यापारावर अवलंबून असेल. त्या वेळचा मनोव्यापार कसा असेल हे आत्ता सांगू शकत नाही. अर्थात संत यनावाला हे पर्याय क्र १ हे उत्तर आत्ताच देउ शकतात.

प्रसाद१९७१'s picture

6 Jan 2016 - 1:52 pm | प्रसाद१९७१

फक्त दोन च "श्री" यनावालां ना शोभुन दिसत नाहीत. कमीत कमी १००९ श्री तरी पाहिजेत संत यनावालांच्या नावा समोर.

नितीनचंद्र's picture

6 Jan 2016 - 2:45 pm | नितीनचंद्र

आपल्याला त्यांच्या सारख्या किमान दोन ओव्या लिहता येतील का ? विचार ओवी बध्द लिहायला फार फारच कष्ट आहेत. त्यामानाने गद्य विचार म्हणजे म्हशीला ढंढाळी असेच म्हणावे लागेल.

विचार पटले नाहीतर त्यावर प्रतिवाद कराना. हेटाळणी कशाला ?

संदीप डांगे's picture

6 Jan 2016 - 2:50 pm | संदीप डांगे

कबीरा तेरी झोंपडी, गल कटियां के पास
जैसी करणी वैसी भरणी, तू क्यू भया उदास

करता रहा सो क्यों रहा, अब करी क्यों पछताय
बोये पेड बबूल का तो आम कहां से पाय

धागा आक्षेपार्ह आहे. वैयक्तिकरित्या एखाद्या आयडीबद्दल असे लिहिण्याची किमान श्री. शरद यांच्याकडून अपेक्षा नव्हती.

बादवे, यनावाला हा त्यांच्या आयडी त्यांनी प्रा. य. ना. वालावलकर या नावावरूनच घेतला आहे आणि आंतरजालावर ह्याच आयडीने ते सक्रिय आहेत. इथे पारशी नाव घेऊन ओळख लपविण्याचा प्रयत्न कसा दिसला हे समजत नाही.

आक्षेपार्ह वाटत नाही. मात्र उपरोधाने लिहिलेला आहे (जो आस्तिक-नास्तिक अशा दोन्ही बाजूंकडून असू शकतो). शरद काका हे यनावालांना उत्तम तर्‍हेने ओळखतात असे दिसते.

उपरोधदेखिल मुद्द्यांवर असावा.. हा धागा व्यक्तिगत टीकाच आहे.. (भाषा जरी सौम्य असली तरिही )

मात्र उपरोधाने लिहिलेला आहे आक्षेप त्याचाच आहे. मग एकाने १००९ वेळा श्री लिहायला हवे होते हे ही जोडले. माझ्या मते योग्य नाही. लोकशाहीत काय किंवा संकेत स्थळावर कोण काय लिहतो याचे व्यक्तीस्वातंत्र्य आणि काय ते " व्यक्त होणे" रास्त आहे. माझ्या मते उपरोधापेक्षा अवहेलनाच ( हेटाळणीच ) जास्त आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

6 Jan 2016 - 3:47 pm | प्रकाश घाटपांडे

लेखन विनोद विरंगुळा या प्रकारातील आहे
टीप: आपल्या माहितीसाठी शरद व यनावाला हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. धागा नीट वाचल्यास हे समजेल.

शरद जी
मिपावरील एक दर्जेदार व्यक्तीमत्व !
त्यांच लेखन म्हणजे शरदाचं चांदणं जणु !!!!
आज श्री यनावाला यांच्या वर जो लेख त्यांनी लिहीलेला आहे तो अजिबात व्यक्तीगत नाही च च म्हणजे च
तो मित्रप्रेमाचे उज्वल उदाहरण आहे. !
मित्र असावा तर असा जिवाला जीव देणारा !
त्यात शरदजींची प्रखर प्रज्ञा अनुपम तेजाने झळाळतेय ! ती प्रज्ञा पिसाटलेल्या अश्वासारखी मदोन्मत्त गजासम भासते !
यात विखार अजिबात नाही द्वेषाला अजिबातच थारा नाही आहे ते विशुद्ध मित्र प्रेम
त्याच धडकणार्या प्रेमळ ह्रद्याची स्पंदने कोणाही संवेदनशील व्यक्तीला सहज जाणवतील अशीच नाही का ?
यात न्युनगंड नावाला नाही उद्दामपणा तर तीळमात्र ही नाही. अहंगंड नाही च हो
ना अहं ना न्युन ना पाखं यात आहे फक्त ड पण साधा सुधा केवळ एकाक्षरी ड डंखातला ड नाही बर का
हा लेख एका अर्थाने ऐतिहासिक आहे डॉ. म्हात्रे गवि आदी संपादकांना मी विनंती करतो
की या लेखाची उजव्या कोपर्यात दखल घेतली गेली नाही तर नोबील समीतीने जसे गांधीचा विचार
शांतता पुरस्कारसाठी न करता ओबामांच्या कार्यात रस दाखवला तसे होइल.
हा लेख दखलपात्र गुन्हा नव्हे दखल घेऊन पुन्हा पुन्हा कौतुकाचा पान्हा फुटावा असा आहे.
आज हे टंकतांना शरद जीं विषयी माझ्या भावना ओथंबुन वाहत आहे
या मंगल प्रसंगी मी बेभान शिवसैनिंकाप्रमाणे केवळ एकच विनवणी तारस्वरात करतो
की शरदजी
अजुन येऊ द्या अजुन येऊ द्या
शरदराव अजुन येउ द्या
आज तुमच्यामुळे मायमराठी धन्य झाली मिपाला तुम्ही एका आगळ्या उंचीवर नेऊन ठेवल
भविष्यातली पिढी आठवेल शरदराव कुठे नेऊन ठेवलीय मिपा म्हणजे कीती उंचीवर नेली
शरदराव तुमच्या असण्याने पृथ्वी धन्य झाली
शरद राव कस हो जमत तुम्हाला कस हो सुचत तुम्हाला
शारदादेवी प्रसन्न आहे हो तुम्हाला शरद राव
नाब बघा श र द
ना काना ना मात्रा ना उकार ना विकार ना वेलांटी ना अनुस्वार
तटस्थततेच दुसर नाव
श र द
शरद शरद करतात भल्याभल्यांना गारद
शरदराव करतात जेव्हा शर संधान
नेस्तनाबुत होतात तेव्हा दुष्मन
एक शेवटची विनंती शरद राव यांच्या लेखाची लिंक मध्यभागी कायमस्वरुपी ठेवावी
नवसदस्यांना एक प्रेरणा म्हणुन हा लेख वाचणे कंपलसरी करावे लेखावर आधारीत एक प्रश्नपत्रिका ठेवावी
त्यात पास झाला तरच मिपा सदस्यत्व द्यावे.
शरद राव असेच लिहीत राहो असेच प्रेम प्रसवत राहो हीच
ईश्वर चरणी प्रार्थना !
शरदमय मारवा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Jan 2016 - 4:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शरद सर आणि वालावलकरसेठ यांची जुगलबंदी झाली पाहिजे. मी या दोघांनाही कधी आपापल्या मुद्दयावरुन मागे हटतांना पाहिलेलं नाही.

-दिलीप बिरुटे
(दोघांचाही विद्यार्थी)

तिमा's picture

6 Jan 2016 - 4:48 pm | तिमा

वैयक्तिक शिंतोडे उडवले तर ते उडवणार्‍या माणसाच्या सदर्‍यावरही दिसतात.

प्रभाकर पेठकर's picture

6 Jan 2016 - 7:04 pm | प्रभाकर पेठकर

आता मिपावर वैयक्तिक चिखलफेकही खपवून घेतली जाते आहे हे पाहून सखेद आश्चर्य वाटले.

जातवेद's picture

6 Jan 2016 - 7:40 pm | जातवेद

+१

सतिश गावडे's picture

6 Jan 2016 - 10:54 pm | सतिश गावडे

जगाच्या कल्याणा | संतांच्या विभूती ||

संदीप डांगे's picture

6 Jan 2016 - 11:23 pm | संदीप डांगे

बर्‍याच सदस्यांना गैरसमज झालेला दिसतोय. प्रस्तुत लेख यनावालांच्या स्तुतीत आहे असे वाटते. त्यांच्या जिद्द, चिकाटी आणि ध्येयासक्तपणाला शरद यांनी मित्रत्वाच्या नात्यातून मिश्किल भाषेत सुंदर दाद दिली आहे.

प्रसाद१९७१'s picture

7 Jan 2016 - 10:45 am | प्रसाद१९७१

आणि मी सुद्धा १००९ वेळा श्री म्हणा असे जे लिहीले होते ते पण चांगल्याच भावनेनी. कोणी तरी एक बाबा स्वताला १०९ श्री म्हणुन घेतो. मग यनावालांना १००९ श्री तर पाहिजेतच पाहिजे.

यनावालांना मी भेटलो नसलो तरी ते माझे मित्र च आहेत.

प्रकाश घाटपांडे's picture

8 Jan 2016 - 10:33 am | प्रकाश घाटपांडे

अगदी अगदी! मी वैयक्तिक रित्या दोघांनाही ओळखतो. वर एका प्रतिसादात मी हेच म्हटले आहे. दोघेही रोज फिरायला जातात व त्यांच्या कट्टयावर छान गप्पा मारत असतात. उचलली जीभ लावली टाळ्याला असे प्रतिसाद कर्त्यांचे होउ नये म्हणुन मी यनावालांच्या पुर्वीच्या लेखनाचे संदर्भ दिले होते.

खरच श्री यनावालां वर टिका करणे आता बंद करा. ते तुम्हाला काहि सक्ति करत नाहित ना?

रमेश आठवले's picture

7 Jan 2016 - 1:27 am | रमेश आठवले

मिस्किल लेख

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Jan 2016 - 6:59 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

लेखामागचा उद्देश कळला नाही किंवा तुमचं यनावाला आयडीशी काय स्कोअरिंग आहे तेही समजलं नाही पण

आता तुम्ही म्हणाल ही बाह्य लक्षणे झाली..केवळ अभंग-ओव्या लिहण्याचा "चमत्कार" केला म्हणून संतपद द्यावयाला आम्ही व्हटिकान सिटीमध्ये बसलो आहोत काय ?

ह्या वाक्यासाठी +४६८४६५६५४८३२१३२६५ =)) फुटलो वाचुन वाचुन. आजच एका बिलिव्हर किरिश्चांव मित्रास दाखवणार =))

कंजूस's picture

7 Jan 2016 - 7:23 am | कंजूस

शरद हरण बघ.
अंकलिपीतलं पहिलं वाक्य.

विवेक ठाकूर's picture

7 Jan 2016 - 11:21 am | विवेक ठाकूर

.

ते नमन मीच बदललं.नमन नकोच या लेखात.आणि हो ,मीपण शरद आहे.