भाग - १
भाग - २
भाग - ३
भाग - ४
आज कोअर झोनची सफारी. मागील भागात सांगितल्यानुसार , ५ वाजताच उठून सफारी गेट बदलून घेण्यासाठी साहेबांना भेटण्यासाठी गेलो . तिथे counter वर असलेल्या मैडमनी लगेच पावती दिली , शिवाय photography लेन्सचे पैसे भरले. २५० mm जास्त मोठ्या लेन्स असल्यास २५० रु . भरावे लागतात , फक्त कोअर झोन साठी . हा नियम मला थोडा विचित्र वाटला , पण शासनाचे काही नियम हे असेच आतर्क्य असतात. सफारी जीपवाले लवकरच आले होते . तिसर्या , चौथ्या नंबरवर आमच्या गाड्या होत्या. सुदैवाने आम्हाला कालचाच driver मिळाला , म्हटले चला …. नशीब चांगलाय , आम्ही काल जसे तसेच बसलो , कालच्या लकी सीटवर . उगाच कालच्या लकी setup मध्ये काही बदल नको . बरोबर ६.३० वाजता आम्ही आंत शिरलो. गाईडच्या सल्ल्यानुसार गाड्या वेगवेगळ्या दिशांना जाऊ लागल्या . जसजसे आतमध्ये जाऊ लागलो तसतसा एक बदल जाणवला , बफरच्या मानाने जंगल कमी घनदाट होतं . थोडं आश्चर्यच वाटलं . जास्त मोकळं , गवताळ आणि वाघांच्या अस्तित्वाच्या खुणा दाखवणारं .
थोड्याच वेळांत , गाईडने गाडी थांबवायला सांगितली , "बघा , वाघाच्या पायाचे ठसे . ताजेच दिसतायत , म्हणजे नुकताच इकडुन गेलेला दिसतोय."
लगेच आम्ही त्याच्या मागावर निघालो , गाईडच्या त्याच्या अनुभवाने संभाव्य ठिकाणं धुंडाळायला सुरुवात केली . वाघाच्या मागावर असतांना वाटेत आम्हाला बऱ्याच प्राणी , पक्षांनी दर्शन दिले.
जवळजवळ ३ तास , २५ - ३० किमी फिरलो जंगलात . वाटेत भेटलेल्या सगळ्यांच म्हणणं एकच , "नाही " . गाईडच्या म्हणण्यानुसार जास्तीत जास्त ८. ३० पर्यंतच वाघ दिसण्याचा चान्स असतो . आता ९.३० वाजत आले होते . आम्ही परतीच्या रस्त्याला लागलो आणि १० पर्यंत बाहेर आलों . ठीक आहे , अजून दुपारची एक सफारी बाकी होती.
दुपारी पुन्हा एकदा दुप्पट उत्साहाने आम्ही आमच्या शेवटच्या सफारीवर निघालो . मनोमन प्रार्थना करत होतो " देवा , शेवटची सफारी आज , दिसू दे परत आज वाघ ."
प्रवेश केल्याकेल्या मुंगुसाने दर्शन दिले . "नशीब चांगलंय आज ." - इति गाईड. चला सुरुवात तर चांगली झाली.
थोडं पुढे आलों , तर रानगवा अगदी पोझ देऊन उभा , मग केलं त्याचं फोटो शूटिंग.
तिथूनच पुढे हे…
आणि हा front/ side view
एका crossing वर दुसऱ्या एका जीपमधला गाईड म्हणाला "सोनम आताच क्रॉस झाली आणि इकडच्या झाडीत गेलीये , पुढुन बाहेर पडेल . " सोनम म्हणजे माधुरीची मुलगी , आमच्या जीपमध्ये एकदम उत्साहाचे वारे संचारले . गाईड म्हणाला मागे जावे लागेल , पण हा oneway आहे , मग काय driver ने reverse मध्ये गाडी चालवायला सुरुवात केली . आम्हाला म्हणाला "नीट पकडुन बसा . " आणि अक्षरश: ४० च्या स्पीड ने त्याने reverse गाडी मारली . तेव्हा खरंच वाटलं आपण रोहित शेट्टीचा सिनेमा बघतोय , नाही …. प्रत्यक्ष अनुभवतोय . कल्पना करा , जंगलातल्या खडबडीत रस्ता कसल्या , वाटेवरून तो अशी गाडी चालवतोय . सलाम त्या driver च्या कौशल्याला . हा थरार अनुभवायला मिळेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं . साधारण ५ मिनिटात आम्ही विविक्षित स्थळी पोहोचलो . अधुनमधून चितळ , माकडांचे call ऐकू येत होते . आम्ही अगदी चिडीचूप बसलो होतो . ह्यावेळेस मी ३०० mm लेन्स लावाली होती कॅमेराला . १० मिनिटं झाली , काहीच हालचाल नाही . होताहोता १५ -२० मिनिटं झाली , आणि काटक्या मोडल्यांचा आवाज आला . आम्ही डोळ्यांत प्राण आणुन त्या दिशेला बघू लागलो . पण …. काहीच घडले नाही . सोनमने आम्हाला हुलकावणी दिली होती . आम्ही थोडसं निराशच झालो , आणि तिथून निघालो . दरम्यान मला Green Bee Eater (वेडा राघू ) चे काही छान shots मिळाले . कालपासुन मी प्रयत्न करत होतो , पण मनासारखे नव्हते येत फोटो .
पुढे आलों , एका पाणथळी जागेजवळ हा दिसला , जाणकारांनी नांव सांगावे ,
आणि शेवटी हे मजेत बागडणारे हरणाचे पाडस .....
सगळ्यांना निरोप देऊन आम्ही बाहेर आलो , तेव्हा सूर्यास्त होऊन गेला होता . उद्या सकाळीच निघणार आम्ही इकडून , मनोमन सगळ्या जंगलाचे आभार मानले खास करुन माधुरीचे . तिने आमची ट्रीप सफल केली होती .
सकाळी आवरुन , नाष्टा करून ९.०० वाजता आम्ही ताडोबाचा निरोप घेतला आणि औरंगाबादच्या दिशेने कुंच केलं .
आमच्यासगळ्या प्रवासांत हा सगळ्यांत मोठा पल्ला , लाडांच्या कारंजाला जेवणाचा ब्रेक घेऊन साधारण ८.०० वाजता आम्ही औरंगाबादला आमच्या हॉटेल वर आलो . I must say , सिंदखेड राजा ते जालना हा संपूर्ण प्रवासातला worst रस्ता होता . अक्षरश: रस्त्याची चाळण झाली होती . नाहीतर आम्ही निदान १-१.५ तास आधीच पोहोचलो असतो . असो .
दुसऱ्या दिवशी सकाळी आरामात उठलो , आज काही घाई नव्हती . चेक आउट करून, उशीराच Brunch करुन बिवी का मक़बरा बघायला आलो. मुलांनी ताज महाल बघितला असल्यामुळे उत्स्फूर्त उद्गार बाहेर पडला , "हा तर ताज महाल सारखाच आहे . " आम्हालाही प्रथम दर्शनी तसेच वाटले . पण नाही , खूप फरक आहे.
आणि आता हा ताज चा फोटो पहा , आमच्या आग्रा ट्रीप मध्ये काढलेला
फरक लगेच लक्षात येईल तुमच्या , शिवाय ताज सारखा हा संपूर्ण संगमरवरात बनवलेला नाही . असो. एक दीड तास इथे आणि नंतर पनचक्कि परिसरात घालवल्यानंतर आम्ही पुणे रस्त्याला लागलो . वाटेत अहमदनगरला Cavalry Tank Museum ला भेट दिली . आशिया खंडामधले एकमेव असलेले ह्या संग्रहालयात ५० पेक्षा जास्त तोफा , रणगाडे आणि इतर युद्धात उपयोगी पडणाऱ्या गाड्या ठेवल्या आहेत . अगदी पहिल्या विश्वयुद्ध पासून ते १९७१ च्या भारत पाक युद्धा पर्यंत .
एक झलक
तिथुन निघून आम्ही ८.०० वाजेपर्यंत पुण्याला घरी पोहोचलो. पुन्हा एकदा माणसांच्या गर्दीत आणि कॉंक्रीटच्या जंगलांत . नेहेमीप्रमाणेच याही ट्रीपने बरंच काही शिकवलं . मुख्य म्हणजे निसर्गात राहायला , Wifi/इंटरनेट शिवाय राहायला शिकवलं . अशीही १६०० किमी प्रवासाची , व्याघ्र दर्शनाची कहाणी सफळ संपूर्ण .
तुम्हा सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रियांमुळे लिहिण्याचा उत्साह वाढला.
समाप्त.
प्रतिक्रिया
4 Jan 2016 - 7:21 am | वेल्लाभट
अरे अरे... दिसला असता वाघ शेवटी एकदा तर मजा आली असती... पण हरकत नाही... नाहीच दिसला असंही नाही. मस्त मजा आली वाचून पाचही भाग. जब-या!
4 Jan 2016 - 8:15 am | बोका-ए-आझम
शेवटी वाघ नाही दिसला तर काही हरकत नाही. एकदा-दोनदा वाघीण दिसली ना? आणि जंगलचा राजा म्हटल्यावर नखरे हे असायचेच;) आता अजून एखादी अशीच ट्रिप काढा आणि अशीच सुंदर लेखमाला येऊ द्या!
4 Jan 2016 - 12:48 pm | एस
छान झाली लेखमाला!
4 Jan 2016 - 2:33 pm | अमृत
सगळेच भाग आवडलेत.
4 Jan 2016 - 6:24 pm | नि३सोलपुरकर
धन्यवाद साहेब ,
छान झाली लेखमाला आणी आमची सफर सुद्धा .
तुमच्या भावी सफारीसाठी खूप खूप शुभेछ्या .
4 Jan 2016 - 10:15 pm | राघवेंद्र
पुढील ट्रीप साठी शुभेच्छा !!!
4 Jan 2016 - 11:17 pm | पद्मावति
लेखमाला आवडली.
5 Jan 2016 - 7:17 pm | विवेकपटाईत
आवडले. दोनदा ताडोबाला गेलेलो आहे , मला काही वाघ दिसला नाही.
19 Jan 2016 - 2:50 pm | शंतनु _०३१
सगळे भाग आवडले,फोटोज अप्रतिम *****
आणि रस्ते (रुट्स ) च्या माहिती बद्दल धन्यवाद. वा खु साठविली आहे
21 May 2016 - 10:34 am | हृषिकेश पांडकर
जंगल सफारी बद्दल वाचून छान वाटले .. असेच फिरत रहा आणि लिहित देखील :)
21 May 2016 - 12:27 pm | स्वीट टॉकर
मस्त वर्णन आणि खुसखुशीत शैली. मजा आली सगळे भाग एकदम वाचायला.