१३०) आनंदवन प्रयोगवन / डॉ विकास आमटे / समकालीन प्रकाशन / २६-१२-२०१४ / पृष्ठे १९२ / रुपये २५०/-
हे पुस्तक म्हणजे बाबा आमटेंच्या मानव मुक्तीचे स्वप्न साकारणाऱ्या ध्येय वेड्यांची कहाणी आहे.
काही शब्द व्यवहारात एव्हडे सामर्थ्यवान होतात कि त्यांचे अर्थच बदलून जातात.
उ हा. आनंदवन. आनंदवन म्हटले कि आठवतात बाब आमटे आणि त्यांनी कुष्ठ रोग्यांची केलेली सेवा.
परंतु हे पुस्तक वाचल्यावर आनंदवन म्हणजे आपल्याला असलेली हि फारच कमी ओळख आहे ह्याची जाणीव होते.
कुष्ठ रोगी बरा होतो पण त्याचे नातेवाईक - समाज त्याला खुल्या मनाने स्वीकारत नाहीत. शरीर विद्रूप झाले तरी तो सुद्धा एक माणूस आहे, इतपत सुद्धा इज्जत त्याला मिळत नाही.
आज समाजात विद्रूप मनाची - विचारांची माणसे आढळतात. परंतु अश्या विद्रूप विचारांच्या माणसांची आपल्याला लाज वाटत नाही, हि खरी शोकांतिका आहे.
सौंदर्य म्हणजे जे आरश्यात दिसते ते, असे मानले जाते. पण खरे सौंदर्य हे खूप व्यापक आहे. हे ज्यादिवशी प्रत्येकाला कळेल, तो सुदिन असेल.
डॉ विकास आमटेनी बाबा आमटेंच्या मार्गदर्शनाखाली कुष्ठ रोग्यांची सेवा सुरु केली. परंतु त्यांच्या मनात दडलेला Engineer त्यांना स्वस्थ बसू देईना. खरेतर गरज हि शोधाची जननी असते. रोग बरा झाल्यानंतर हा समाज त्यांना स्वीकारत नाही असे लक्षात आल्यानंतर त्यांचे पुनर्वसन करण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे अर्थातच अनेक गोष्टींची आवश्यकता निर्माण होणे अपरिहार्य होते. उ ह. अन्न धान्य, भाजीपाला, दुध, पाणी, कपडे, तसेच दळणवळणासाठी रस्त्यांची उभारणी , राहण्यासाठी घरे वगैरे. तसेच ह्या ह्या मंडळींच्या हाताला सोसवेल असे काम देणे आवश्यक होते, जेणेकरून त्याना आत्म सन्मान मिळेल.
डॉ विकास आमटे ह्यांनी आनंदवनात अनेक प्रयोग केले. हे सर्व प्रयोग पूर्णपणे अभ्यास करून अमलात आणण्यात आले. अभियांत्रिकी शिक्षण नसताना केलेले हे प्रयोग Engineer मंडळीना सुचले असते का? असे मनात आल्याशिवाय रहात नाही.
कामावर श्रद्धा आणि ज्याच्यासाठी काम करायचे त्याच्या बद्दल प्रेम असेल तर कोणतेही काम उत्तम होते.
थोडक्यात हे सर्व उद्योग म्हणजे आनंदवन MIDC, असे म्हटले तरी वावगे होणार नाही. ह्या उद्योग धंद्याची वार्षिक उलाढाल अडीच कोटींवर पोचली आहे.
पुस्तक एका बैठकीत वाचून होते. पुस्तकातील फोटो बघून आपल्याला त्या परिसराची सफर घडते आणि आपण पुस्तकात अधिकच गुंततो. पुस्तक जेव्हा वाचून संपते तेव्हा आपले हात नकळतपणे जोडले जातात. क्षणभर डोळे मिटून शांतपणे बसावे असे वाटते.
मित्रानो, वेळात वेळ काढून हे पुस्तक वाचाच. तुमचा वेळ सार्थकी लागेल ह्याची मी खात्री देतो.
सुधीर वैद्य
१५-१०-२०१५
Time Permitting, Follow me on .....
http://spandane.wordpress.com/
www.spandane.com
प्रतिक्रिया
2 Jan 2016 - 4:57 pm | विलासराव
२०१३ ला सोमनाथच्या श्रमसंस्कार शिबिरासाठी गेलो होतो. ७ दिवसाच्या पूर्ण शिबिरकाळात विकासभाउंबरोबर मनसोक्त गप्पा झाल्या. येताना २ दिवसांची आनंदवनला भेटही दिली.
त्यांच्या कार्याला सलाम करण्यावाचुन आपण जास्त काही करू शकत नाही. जमल्यास यथाशक्ती मदत फारतर करू शकतो. पुन्हा एकदा आनंदवन,प्रकाशभाऊंचे हेमलकसा,अभय बंगांचे सर्च ही संस्था, आणि मेळ घाटातील कोल्हे दांपत्य या स्थळांना भेट देऊन तेथे काहीकाळ सेवा देण्याचा विचार आहे.
2 Jan 2016 - 9:11 pm | मित्रहो
आनंदवनाला दोनतीनदा भेट दिलीय. ९७ मधे तिथे एका ट्रेनींगचा भाग म्हणून चार दिवस थांबायचा योग आला. विकास आमटेंशी बऱ्याच गप्पाही झाल्या. ते चारदिवस वेगळा विचार देउन गेले. माणूस उभा राहू शकतो परिस्थिती काहीही असू दे. तिथले प्रयोग आणि त्यामागचा विचार हे विचार करायला लावनारे आहे. असेही घर बांधता येते ती ज्यात पंखा व लावताही चंद्रपूर जिल्ह्यात तुम्ही राहू शकता. आजही तिथन येवारे ग्रिटींग आम्ही जपून ठेवतो. ती प्रेरणा मनात राहावी म्हणून.
2 Jan 2016 - 9:23 pm | जेपी
कंसात 130) का आहे??
3 Jan 2016 - 8:26 am | मुक्त विहारि
http://misalpav.com/node/34307
3 Jan 2016 - 9:53 am | सुधीर वैद्य
१३० म्हणजे त्या तारखे पर्यंत मी १३० पुस्तक परिक्षणे लिहिली आहेत.
3 Jan 2016 - 10:49 am | मुक्त विहारि
मग रोज असे एक-एक परीक्षण टाकण्यापेक्षा......
एकच धागा काढलात तर उत्तम...असे मला वाटते.
(बहूदा असा एखादा धागा आधी पण आला असावा.)