एका दिग्गज कलाकाराला आदरान्जली

शान्तिप्रिय's picture
शान्तिप्रिय in जनातलं, मनातलं
22 Dec 2015 - 9:06 pm

रफी साहेबांच्या कोट्यावधी चाहत्यांपैकी मी एक सामान्य चाहता. गळ्यात सरस्वती किंवा अल्लाह असणाऱ्या या गायकाचे किती गुण वर्णावेत? एक अष्टपैलू गायक तेवढाच एक विनम्र आणि सच्चा दिलाचा माणूस. ज्या भारतभूमीत असे कलाकार घडले त्या भारतभूमीत जन्म घेतल्याबद्दल आपल्या सर्वांना जन्माचे सार्थक झाल्याचे वाटले नाही तरच नवल.

"चौदहवी का चांद हो" सारखं प्रेमगीत
"कोई सागर दिल को बहलाता नही " सारखं विरहगीत
"रे माम्मा रे माम्मा रे" सारखं बालगीत
"बडे मियां दिवाने ऐसे ना बनो" सारखं खट्याळ गीत
किंवा "जान जानी जनार्दन" सारखं मस्तीने ओतप्रोत भरलेले गीत
किंवा भजन किंवा देशभक्तीपर गीत असो , रफिसाहेबानी या सर्व गाण्यात प्राण फुंकून ती अजरामर केली.
" जहां डाल डाल पार सोने की चीडीया करती हो बसेरा वह भारत देश है मेरा" हे देशभक्तीपर गीत आजही आपल्या रोमारोमात देशभक्तीची ज्वाला पेटवते.
"ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मती दे भगवान" हे अजरामर भजन तर सामाजिक सलोख्यासाठी केली जाणारी प्रार्थना बनून राहिलिये.
रफी साहेबांची असंख्य भजने आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातात.

२४ डिसेंबर हा रफी साहेबांचा वाढदिवस. या महान गायकाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

गोपी चित्रपटातील रफी साहेबांच्या स्वर्गीय आवाजातील एक भजन खाली देत आहे.

हे भजन ऐकताना आपण अहंकार क्षणभर विसरून शांततेच्या महासागरात विहार करू लागतो.
या क्षणभंगुर जीवनात , सुखात तुम्हाला बरेच साथी मिळतील पण दु:खात तुम्ही एकटेच असाल. परंतु ईश्वर हाच सर्व प्रसंगात आपला असतो. सुख येतात आणि जातात , पण लोभिपणाने माणूस अनेकदा पापाच्या मार्गावर ओढला जातो. एक ईश्वरच मानवजातीवर भेदाभेद न ठेवता निरपेक्ष प्रेम करतो हा संदेश या गीतातून आपल्याला मिळतो.. हा ईश्वर म्हणजे आस्तीकांसाठी आवडत्या देवाचे रूप असतो तर नास्तीकांसाठी ही एक अमूर्त चांगुलपणाची भावना म्हणूया आस्तिक असो वा नास्तिक, हे गाणे ऐकताना कोणीही अंतर्मुख होणारच.

गीतकार - राजेंद्र कृष्ण संगीतकार - कल्याणजी आनंदजी राग : दरबारी

सुख के सब साथी, दुःख में ना कोई।
मेरे राम, मेरे राम, तेरा नाम एक सांचा दूजा ना कोई॥

जीवन आणि जानी छाया,
जूठी माया, झूठी काय।
फिर काहे को साड़ी उमरिया,
पाप को गठरी ढोई॥

ना कुछ तेरा, ना कुछ मेरा,
यह जग योगी वाला फेरा।
राजा हो या रंक सभी का,
अंत एक सा होई॥

बाहर की तो माटी फांके,
मन के भीतर क्यूँ ना झांके।
उजले तन पर मान किया,
और मन की मैल ना धोई॥

कलाप्रतिभा

प्रतिक्रिया

सतिश गावडे's picture

22 Dec 2015 - 9:33 pm | सतिश गावडे

रफीजींबद्दल आपल्या मनात असलेला आदर, प्रेम छान व्यक्त केला आहे.

मात्र, लेखाचा शेवट करताना बळेच नास्तिकांना भजनात ओढण्याच्या प्रयत्नांचा तीव्र निषेध.

हा ईश्वर म्हणजे आस्तीकांसाठी आवडत्या देवाचे रूप असतो तर नास्तीकांसाठी ही एक अमूर्त चांगुलपणाची भावना म्हणूया आस्तिक असो वा नास्तिक, हे गाणे ऐकताना कोणीही अंतर्मुख होणारच.

प्रचंड असहमत. नास्तिकांना ईश्वररूपी अमूर्त चांगुलपणाची भावनेची गरज नसते. तसेच नास्तिक भजन ऐकताना कधीही अंतर्मुख होत नाहीत. नास्तिकांना भजन ऐकताना काय वाटते हे इथे लिहिले तर आस्तिकांच्या भावना दुखावल्या जातील म्हणून लिहित नाही. कुणी वीडी पेटवली तर आपण माडी पेटवावी असले प्रकार नास्तिक करत नाहीत.

अरे हे चाललंय काय? नास्तिक अल्पसंख्यांक असल्यामुळे त्यांच्यावर बहुसंख्यांक आस्तिकांकडून अन्याय होतोय. कुणी बळेच लाडू खायला देतोय तर कुणी बळेच भजनात ओढतोय. किती दिवस अन्याय सहन करायचा?

जाता जाता, त्या गीताची शैली गोरक्षनाथांच्या गोरखबानीतील सबदींच्या शैलीवर आधारीत वाटते.

संदीप डांगे's picture

22 Dec 2015 - 9:59 pm | संदीप डांगे

नास्तिकांना भजन ऐकताना काय वाटते हे इथे लिहिले तर आस्तिकांच्या भावना दुखावल्या जातील म्हणून लिहित नाही

लिहा हो लिहा... बिन्दास लिहा. त्यानिमित्ताने भक्तिगीतांची जरा सोलपटे काढता येतील...

......

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र... धागा रफींवर आहे नै.... आय माय स्वारी बरंका..!

बोका-ए-आझम's picture

22 Dec 2015 - 11:23 pm | बोका-ए-आझम

रफीसाहेबांना आदरांजली. जो गेला तो रफी नावाचा माणूस.पण त्याचा आवाज अजूनही बुलंद आणि अजरामर आहे!

भक्तिगीते गाताना गायक आपले शास्त्रिय संगीतातले कसब दाखवू लागला की गीताचा आत्मा मागच्या दाराने सटकतो,भक्ती खिडकीतून उडी मारते असं नास्तिकाच्या टेम्प्लेटात बसवलेल्यांना वाटू लागते.याबाबतीत शास्त्रिय संगीत न कळणाय्रांना आणि आस्तिक नसणाय्रांनाही रफी गुंग करून माना डोलवायला लावतात.माझ्या मते कुठल्याही स्त्री गायिकांना त्या कितीही शास्त्रिय संगीतात मुरलेल्या असोत ,भजनं आरत्या गायला देऊ नयेत.फार टिपेला आवाज चढवून किंचाळतात जे भक्तीला पळवायला पुरेसं ठरतं.कंटाळवाणं नक्कीच ठरतं.रफीच्या धाग्यात रफी विरुद्ध इतर हा मुद्दा आणून थोडंसं डाइवर्शन झालंय हे मात्र खरं.

https://www.youtube.com/watch?v=Bo8k4L2c0XI

(अपवाद असेल कदाचित हा. पण सुंदर अपवाद आहे.)

शान्तिप्रिय's picture

23 Dec 2015 - 10:45 am | शान्तिप्रिय

मित्रहो मी निर्मळ मनाने हा धागा
लिहिला आहे.
रफी साहेब आणि भजन या दोन्ही गोष्टीन्चा मी निस्सीम चाहता आहे.
या धाग्या कडे आस्तिक विरुध्ध नास्तिक या भावनेतुन पाहू नये.

मी-सौरभ's picture

24 Dec 2015 - 7:10 pm | मी-सौरभ

मग तुमच्या धाग्याला प्रतिसाद कसे मिळणार? ;)

रच्याक्ने, रफी साहेबांना आमच्याकडून पण अभिवादन _/\_

सतिश गावडे's picture

29 Dec 2015 - 11:17 am | सतिश गावडे

आम्हीही निर्मळ मनाने तुम्हाला शतक करण्याची संधी दिली होती ;)

शैलेन्द्र's picture

29 Dec 2015 - 5:01 pm | शैलेन्द्र

1111

भाविक नसलेल्यांनाही रफी गाण्याने भुलवतो हे त्याच्या गाण्याबद्दलच आहे की नाही?भजन साल्लीड पोहोचवते.

सौन्दर्य's picture

29 Dec 2015 - 9:37 am | सौन्दर्य

मी देखील रफी साहेबांचा उपासक. कॉलेजात असताना महम्मद रफीच्या आवाजातील, एक आनंदी गाण्यांची आणि एक दु:खी गाण्यांची, अश्या दोन सी-९०च्या सोनीच्या कॅसेट्स बनवल्या होत्या. खूप वर्षे त्या ऐकल्या.

शान्तिप्रिय's picture

29 Dec 2015 - 10:58 am | शान्तिप्रिय

सौन्दर्य,
आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.