बाजीराव-मस्तानी
बाजीराव मस्तानी या दोघांवर सोशल साईट्सवर इतकी चर्चा घडलेली आहे कि या सिनेमाचा इतिहासाशी, ब्राह्मणांशी संबंध हे सोडून फक्त एक कलाकृती म्हणून याच एनालिसिस होण कठीण वाटते आहे पण तरीही संजय लीला भन्साळीला या अप्रतिम कलाकृतीबद्दल श्रेय हे विरोधकही देतील याचा भरवसा वाटतो.
बाजीराव पेशवे हे शूर योद्धे होते हे मान्य पण त्यांच्याबद्दल महाराष्ट्राबाहेर त्यांचा उल्लेख शूर म्हणून न होता मस्तानी प्रकरणामुळे होतो. मी स्वत: गुजरात मध्ये काही वर्ष काढलेली आहेत आणि हे अनुभवलेलं आहे. त्यांची ब्राह्मण जात आणि मस्तानी या दोन गोष्टींचा उल्लेख त्यांच्या शुरत्वावर कडी करतो हे मी बघितलेलं आहे. त्यामुळे सगळ्यात आधी संजय लीला भन्साळी यांचे या मराठी मानसिकतेला अवघड विषयाला हात घातल्याबद्दल कौतुक कारण त्यांनी पूर्ण सिनेमात बाजीरावांचे मस्तानीवर प्रेम होते ती त्यांची रखेल-अंगवस्त्र नव्हती या वास्तविकतेवर भन्साळींनी फोकस केलेला आहे. बाजीरावांची मस्तानीशी झालेली पहिली भेट इथपासून सुरवात करून त्यांचे रंगलेले प्रेम इत्यादी अवघड विषयाला अप्रतिमरीत्या भन्साळीने हाताळलेल आहे.
बाजीराव पेशवे यांची झालेली मस्तानी या नर्तकीशी भेट अन त्या मस्तानीला तिच्या वडलांनी बाजीरावांना केलेले नजर. तिचा पुण्यात/त्यांच्या घरात प्रवेश आणि शेवटी दोघांचाही झालेला (वेगवेगळा) मृत्यू या धाग्याभोवती विविध अंगाने फुलणारी कहाणी म्हणजे बाजीराव-मस्तानी.नागनाथ इनामदार यांच्या "राऊ" या पुस्तकावर बेतलेली कहाणी असा उल्लेख पहिल्यांदाच आहे. मला अपेक्षा होती कि आधी घडलेला गदारोळ बघता भन्साळी "काल्पनिक कथा वास्तविकतेशी संबंध नाही" अशी सूचना आधी देईल. पण तसे काहीही घडले नाही.
काशीबाई साहेबांचा या कहाणीत आपोआप प्रवेश होतो कारण त्या श्रीमंतांच्या प्रथम पत्नी. त्यांचे आगमन कथेत झालावरही कथा मस्तानी आणि मस्तानीवर भाळलेला बाजीराव अशी न झुकता बाजीरावांचे शौर्य या गोष्टींवर फोकस करते या साठी भन्साळीचे खरोखर कौतुक.
बाजीरावांनी अवघ्या चाळीस वर्षांच्या जीवनात जवळपास सगळ्या प्रकारचे युद्धकौशल्य आत्मसात केले होते. मैदानी युद्धकलांत तर ते निपुण होतेच पण राजकारणी बाजूनेहि ते तरबेज होते. कथेत ओझरताच उल्लेख असला तरी निजामावर त्यांनी मिळवलेला विजय हा त्यांच्या कुटनिति अन कावेबाज डावपेचामक राजकारणाचा अप्रतीम नमुना होता/आहे. अश्या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाला पडद्यावर उभे करणे हि निश्चितच एक कठीण गोष्ट होती. पण रणवीर सिंग कदाचित त्याच्या आतापर्यंतच्या अभिनयात्मक कारकिर्दीतील अप्रतिम कामगिरी यात करून गेलाय. मस्तानीच्या प्रेमात पडलेला पण स्त्रीलंपट नसलेला अशी त्यांची योग्य अशी प्रतिमा रणवीर सिंग मुळे निर्माण होण्यास मदत होईल हे नक्की.
मस्तानीच्या भूमिकेत आहे दीपिका पदुकोण. मस्तानी हि रखेल नव्हती पण तिचा आणि श्रीमंतांचा विवाह झालेला होता असा उल्लेख भन्साळीला कदाचित इतिहासात सापडला नसावा. कारण त्या दोघांचा विवाह झाल्याच्या उल्लेख/प्रसंग सिनेमात नाही. पण श्रीमंत ज्या व्यक्तिमत्वावर भाळले असतील असे व्यक्तिमत्व पडद्यावर उभे करण्यात मात्र दीपिका पदुकोण यशस्वी होते हे नक्की. आपल्या सौंदर्याचा अभिमान असलेली एक स्त्री, युद्धकलानिपुण पण श्रीमंतांच्या रूपावर/व्यक्तिमत्वावर भाळलेली स्त्री उभे करणे हे एक कठीण काम होते, नानासाहेबांचे व्यक्तिमत्व कथेत आल्यावर त्यांच्या रूपाने त्यांच्यासकट सगळ्या पेशवे घराण्याचा विरोध सहन करताना श्रीमंतांवर असलेली निष्ठा डळमळीत न होऊ देणारी स्त्री असल्या छटा फक्त तीन तासांत एका अभिनेत्याने पडद्यावर उभ्या करणे हे किचकट काम होते. पण दीपिका पुरून उरली दिग्दर्शकाच्या अपेक्षेवर हे नक्की.
काशीबाई राणीसाहेबांच्या भूमिकेत आहेत प्रियंका चोप्रा. काशीबाईंची भूमिकाही एक कठीण भूमिका होती. घरात नवर्याला होत असलेला विरोध कमी करण्याचा प्रयत्न करत नवर्याच्या चुका पोटात घालून त्याला तोलामोलाची साथ देणारी एक कुलीन भार्या प्रियंकाने शब्दश: पडद्यावर उभी केलेली आहे. मस्तानीला समजून घेणारी पण तिने तिच्या मोठ्या बहिणीचा दर्जा देताच त्या दर्जाला नाकारणारी अन फक्त पतीपेमाने तुला आपलंस करते आहे हे तिला जाणवून देणारी राणी अप्रतिम रित्या प्रियंकाने उभी केलेली आहे.
पिंगा अन मल्हारी या गाण्याला विविध कारणाने विरोध झाला. या गाण्यामुळे प्रतिमा खालावतेय या अन अश्या आशयाच्या पतिक्रिया मी तथाकथित पेशव्यांच्या वंशजांकडून वाहिन्यांवर बघितल्या. हे दोन गाणे अन माननीय काशीबाई साहेबांची प्रतिमा उभारण्यात दिग्दर्शकाने घेतलेली cinematic लिबर्टी आपण दुर्लक्षित करू पण तीन तासांची एक अप्रतिम ऐतिहासिक कथा विनादोष निर्माण करण्यात संजय लीला भन्साळी हे यशस्वी झालेत याचा आनंद होऊन मी चित्रपट ४१/२* (साडेचार) देईन बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.
-समीर
प्रतिक्रिया
22 Dec 2015 - 1:00 am | मोगा
.
22 Dec 2015 - 7:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाजीराव मस्तानी अतिशय सुंदर चित्रपट. चित्रपट लवकर संपला असे वाटले. भव्य सेट्स, वेगवान कथानक, चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा आपला एक ठसा उमटवते गाणीही सर्व चांगली आहेत. बाजीराव नुसता मस्तानीवर प्रेम करणारा नव्ह्ता तर व्यवस्थेविरुद्ध बंड करणारा बाजीराव अतिशय ठसठशीतपणे चित्रपटात आला आहे. कथेचा शेवट जरा रेंगाळल्यासारखा वाटला. दीपिका पदुकोण ने एक प्रेयसी, एक योद्धा, एक आई, जीव ओतून भूमिका केली आहे. प्रियंका चोप्रा अतिशय सुंदर दिसते आणि तिचा अभिनयही लाजवाब झाला आहे. बाजीरावाची पत्नी आणि आपला पती आपल्यावर प्रेम करणारा राहीला नाही, तरीही पत्नीची भूमिका अतिशय सहज झाली आहे. रणवीर सिंग बाजीराव म्हणुन जबरदस्त उतरला आहे.
मला आवडलेल्या गाण्यांचा क्रम असा. नजर जो तेरी लागी मै दिवानी हो गयी, (सुंदर गाणं आणि नृत्य. ) अलबेला सजन आयो रे, आणि पिंगा अतिशय सुंदर गाणी. हं आता मल्हारी गाण्याला जरा हसू आलं. पौराणिक नाट्यातून आधुनिक जगात आपण येतो. अर्थात त्या गाण्यावर थिरकायचा मोह व्हावा इतकं संगीत भिडतं तो भाग अलहिदा.
तीन तास उत्तम मनोरंजन करणारा आणि आयुष्यातील काही क्षण देहभान विसरायला लावणारा चित्रपट थ्यांक्स भन्साळी.... आपल्यामुळे आयुष्यातील काही क्षण आनंदात गेले. बाकी चित्रपटामुळे होणारे वाद XXX जाऊ दे. :)
-दिलीप बिरुटे
22 Dec 2015 - 9:26 am | नाखु
लग्नकर्तव्यात (फक्त) सॅलरीच आणि जेवणात (फक्त) कॅलरीच शोधणार्यांसाठी याहून भारी प्रीतीसाद नाही, हे या ठिकाणी आम्ही नमूद करतो :
भरीत गवार (एकच वादा भरीत दादा फेम)
22 Dec 2015 - 10:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नाखुसेठ, मी चित्रपट पाहून खुपच खुश झालो. आत्ताच मैत्रीणीला चित्रपट पाहा म्हणालो आणि तुझी चित्रपटभर आठवण पिंगा घालत होती असेही म्हणालो. प्रियंका चोप्राने जशी साडी नेसली तशी आणि नजर जो तेरी लागी या गाण्याच्या वेळी जो ड्रेस घातलाय तो कुठे मिळेल त्याची चौकशी कर म्हणालो. ती म्हणाली तूच तर म्हणायचा की मराठी रियासत खंड २ मधे काशीबाईला व्यवस्थित चालता येत नव्हतं असा उल्लेख आहे. मैत्रिणीने माझ्या आनंदावर असं विरजन घातलं. :(
-दिलीप बिरुटे
22 Dec 2015 - 11:15 am | प्रचेतस
=))
22 Dec 2015 - 12:05 pm | किसन शिंदे
=)) =))
24 Dec 2015 - 10:49 pm | सतिश गावडे
मराठीच्या प्राध्यापकाचा प्रतिसाद शोभतो खरा =))
24 Dec 2015 - 10:51 pm | होबासराव
एकच वादा भरीत दादा फेम
बेक्कार हसतोय :))
24 Dec 2015 - 10:46 pm | समीर_happy go lucky
सगळ्यांचे धन्यवाद
24 Dec 2015 - 10:55 pm | प्रदीप साळुंखे
बाकि, आधीच्या परीक्षण धाग्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेतच.
24 Dec 2015 - 10:59 pm | होबासराव
हायला जेव्हढे परी़क्षण येतायेत, तेव्हढा तर भंसाली ने सुद्धा बाजिराव अभ्यासला नसेल :(
24 Dec 2015 - 11:24 pm | संदीप डांगे
+१
24 Dec 2015 - 10:59 pm | सत्याचे प्रयोग
आजच पाहिला अतिशय सुंदर आहे. तसेच समीक्षाही
25 Dec 2015 - 10:21 pm | समीर_happy go lucky
सगळ्यांचे धन्यवाद
2 May 2017 - 11:34 pm | समीर_happy go lucky
सहज........