एकशे वीस माईल्स, म्हणजे १२० इन टू १.६, माईल्स आणि कि.मी.च गणित मांडायची सवय जाण्याचं तसं काही कारण नाही. परत किलोमीटरमध्ये लांबच्या गोष्टी आणीच लांब वाटतात.
असो, नासा, केनेडी स्पेस सेंटर, फ्लोरिडा - अंतर जवळपास दोनशे किलोमीटर.
अरे वोह एडविन ऑल्ड्रिन आ रहे हैं, बुक साईनिंग हैं। आओगे क्या आप ?
सुबह साडे नौ से साडे दस तक टाईम लिखा हैं ।
अगदी परवाच प्रशांतने विचारलं होतं, आणि हो, नक्की म्हणून, लगेच प्लॅनही झाला होता.
सुबह जल्दी निकलते हैं, सेपरेट कार्स. सिधे वही मिलेंगे ।
डन !
मी गाडी बाहेर काढली तेव्हा सकाळचे साडेसात वाजून गेले होते. गुगल मॅप्स पोहोचायची वेळ ९.२५ दाखवत होता. आज तर अगदी गाणी लावायलाही वेळ नव्हता. हायवेला लागायच्या आधीच्या, त्यातल्या त्यात संथ ट्राफिक मध्ये ते काम केले आणि आता हायवे, रस्ता थँकफुली तसा मोकळाच होता, जय गुगल आणि हैक हैक करोला !
जरा सीटमध्ये स्थिरावलो, लहानपणीच्या अगदी ठळक आठवणींमध्ये चंद्रावर पोचलेली जोडी अगदी सगळ्यांना पाठ असे. कुठल्याही बॅेकवर्ड गोष्टीची अवहेलना "अरे माणूस चंद्रावर जाउन पोचला आणि … " अशा सुरुवातीने करण्याइतपत ही घटना ताजी होती. खरं तर चवथी पर्यंतच्या शिक्षणातील एवढी एकच घटना मला अगदी भव्य वाटायची. आणि आज त्या दोघांपेकी एकाला भेटणार होतो ….त्यांची सही घेणार होतो… भेटी लागी जीव म्हणजे काय याचा अनुभव घेत होतो. अगदी नेहमीप्रमाणे गाडी क्रुझ कंट्रोल वर टाकून आरामात जावं हा विचारही नकोसा वाटत होता !
I -७५ सोडून I-४ वर आलो, विषम म्हणजे उत्तर दक्षिण जाणारा रस्ता आणि सम आकडा म्हणजे पूर्व पश्चिम. त्यामुळे समोरच एव्हाना उन्हं वर यायला लागली होती आणि मॅप्स, अरायव्हल टाईम अजूनही साडेनऊ च्या आसपास दाखवत होता, हुश्श आणि गुड ! सही घेतलेले एक पुस्तक शाळेला भेट देऊयात हे नक्की केले होते, म्हणून कि काय पण वेळेत पोहोचणे अगदी जबाबदारी वाटायला लागली होती . दोन शब्द बोलूयात जमलं तर, ते अगदी हसून हाय म्हंटले तरी कित्ती छान !
काय वाटत असेल ? पृथ्वी सोडून अनंताकडे झेपावताना ? म्हणजे तशी कशाचीच गॅरंटी नाही, नवं अवकाश संशोधन तंत्रज्ञान म्हणजे काही जीव कामी येण्याची शक्यता, ते तसे आलेही होते मिशनपूर्वी. मग अगदी निघताना काय भावना असतील ? नको म्हणावं वाटलं असेल का ? एवढं कुठे विचारता येणार आहे आणि पण विचार करून पहा खरंच, कितीही जात पात, पक्ष, धर्म , विचार यांनी विभागलेलो असलो तरीपण राहतो ती पृथ्वी कॉमन आहे आणि तशी ती गृहीतही धरलेली असते. तीच सोडून निघायचं म्हणजे …
She packed my bags last night pre-flight
Zero hour nine a.m.
And I'm gonna be high as a kite by then
I miss the earth so much I miss my wife
It's lonely out in space
On such a timeless flight
And I think it's gonna be a long long time
Till touch down brings me round again to find
I'm not the man they think I am at home
Oh no no no I'm a rocket man
Rocket man burning out his fuse up here alone
rocket man …।
- Elton John / Bernie Taupin ("Rocket Man")
--------------------------------------
आता भीतीची पाखरं आहेत खरं
आणि फारंच मोठा प्रवास असणार आहे हा
पण परत आल्यावर मग,
माझं मलाच कळेल
घरच्यांना वाटतो तसा कोणी मी नाहीये ….
मी आहे … रॉकेट मॅन !
एकदा I-४ सोडून टोल रोड पकडला कि रस्ता आणि आणिकच पिक्चरेस्क होत जातो, एव्हाना नऊ वाजून गेले होते, दरम्यान प्रशांतचा पोचल्याचा फोनही येऊन गेला होता. अमेरिकेचा लेजेण्डरी यु एस राउट वन हा जवळपास चार हजार किमी लांबीचा रस्ताही जवळूनच जातो. त्याच्या आसपासचा नासाकडे जाणारा रस्ता म्हणजे अक्षरशः स्वर्गीय आहे.
आता नासाच्या खुणा सर्वत्र दिसू लागल्या होत्या, नासाला जाणा-या रस्त्याचे नावही नासा पार्कवे आहे.
पोचलो !
सिक्युरिटी क्लिअर करून अगदी पळतच अटलांटीस बिल्डींगपाशी पोचलो, तर तिथे चंद्रावर जाऊन आलेल्या माणसाचा इतका साधा बोर्ड लावला होता …
कि फ्लेक्स ची सवय करून घेतल्यामुळे इतके नवल वाटतेय ?
असो,
माणूस चंद्रावर पोचला म्हणजे सगळे चंद्रावर पोचले असं कुठेय !
आपल्यापुरतं आपण आजपासून आणि जास्त नम्रपणे वागायचं …
तर, प्रशांतला भेटलो आणि मग काय थोड्या वेळातच समोर तो ! चंद्रावर गेलेला माणूस …. अगदी लहानपणी पुस्तकातून भेटलेला पहिला हिरो ! आता अगदी समोर आहे … बझ ऑल्ड्रिन वय वर्ष ८५.
पुस्तकं घेतली, आणि समोर गेलो …
एक पुस्तक शाळेला देणार ते सांगितले
बझ : Where are you from ?
मी : Pune, India , Do you know Mumbai ?
बझ : Yes, I know Mumbai
त्यांच्या असिस्टंटने बझचा एक कलीग कुणी सौरव भारतातला आहे ते सांगितले ….
मग मी बझना भारतात मुलांना ते माहित आहेत ते सांगितले …
फोटो काढले …
त्यांनी सही करतानाही काहीही न खरडता लफ्फेदार बझ ऑल्ड्रिन अशी छान सही केली
आणि मी मग एकूणच तिथेच शेजारी उभा राहून तो क्षण आणि काही वेळ शांतपणे अनुभवला ….
चंद्रावर जाउन आलेला माणूस चक्क माझ्याशी बोलला होता ….
थँक्स इंग्लिश !
घरी फोन करून सांगितले …
मग निघालो
सकाळच्या उत्सुकतेची जागा आता भारावालेपणाने घेतली होती,
ते साधेपणाचं भारावलेलंपण आता परतीच्या रस्ताभर पुरणार होतं !
हो, आणि जाता जाता ….
पृथ्वी ते चंद्र … २,३८,९०० माईल्स …. ३,८२,२४० किमी
-निखिल
प्रतिक्रिया
21 Dec 2015 - 10:25 am | बाबा योगिराज
नशीबवान आहात.
जळलेला बाबा.
21 Dec 2015 - 10:25 am | बाबा योगिराज
नशीबवान आहात.
जळलेला बाबा.
21 Dec 2015 - 10:26 am | अनुप ढेरे
मस्तं!
21 Dec 2015 - 10:53 am | नीलमोहर
खूप छान अनुभव.
भारीच..
21 Dec 2015 - 1:32 pm | मी-सौरभ
तुमच्या मुळे आम्हाला फोटोत का होईना भेट घडली
धन्यु!!
21 Dec 2015 - 2:21 pm | पद्मावति
नशिबवान आहात!
इतका सुंदर अनुभव आमच्या बरोबर शेअर केल्याबदद्ल तुमचे मन:पूर्वक आभार.
21 Dec 2015 - 3:48 pm | एस
क्या बात है! :-)
21 Dec 2015 - 4:04 pm | आदिजोशी
भारीच भेट. आयुष्यभर लक्षात राहील अशी आठवण मिळवलीत.
21 Dec 2015 - 6:33 pm | रेवती
भारी अनुभवाबद्दल छान लिहिलयत.
21 Dec 2015 - 6:57 pm | तुषार काळभोर
धन्यवाद!
22 Dec 2015 - 3:07 am | ट्रेड मार्क
नशीबवान आहात.
कधी होता हा कार्यक्रम? आधी माहित असतं तर मी पण यायचा प्लान केला असता.
22 Dec 2015 - 6:32 am | चतुरंग
आयुष्यभरासाठीचा अनमोल ठेवाच ही आठवण म्हणजे. आमच्यासोबत वाटून घेण्याबद्दल धन्यवाद!
बझची सही खरंच लफ्फेदार आहे.
-चतुरंग
22 Dec 2015 - 10:13 am | कुसुमिता१
खरच लकी आहात!
22 Dec 2015 - 1:58 pm | टुकुल
सह्ही रे...
22 Dec 2015 - 2:03 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर अनुभव !
22 Dec 2015 - 11:20 pm | मास्टरमाईन्ड
सही!
मस्तच एकदम.
खरंच आयुष्यभर लक्षात राहील अशी आठवण कमवलीत.