मनाची नाती

कविता१९७८'s picture
कविता१९७८ in जनातलं, मनातलं
4 Dec 2015 - 3:50 pm

लहान असताना आई - वडील म्हणुन प्रत्येक मुला मुलीला त्यांचे आई-वडील हे बेस्टच वाटतात. मग ते कसेही असो, दुसर्‍यांसाठी दुष्ट , वाईट वागणारे अगदी कसेही. स्वतःच्या मुलांसाठी बाबा कदाचित कठोर वागत असल्याने ते जरी बर्‍याचदा बेस्ट वाटत नसले तरीही त्यांची आई ही एक आदर्श बाईच असते. पण आपले आई-वडील सोडुन आपण आणखीही कुणाच्या जवळ असतो जसे मावशी - मावशीचे मिस्टर, मामा - मामी , काका - काकु, आत्या - आत्याचे मिस्टर. भले ही आपल्या आई-वडीलांशी ते कसेही वागत असले किंवा आपल्या आई-वडीलांचे त्यांच्या विषयीचे मत चांगले नसले, ते तसे मुलांवर ठसवले जरी असले तरीही जोपर्यंत आपण लहान असतो आणि आपल्याला त्यांचा काही वाईट अनुभव येत नाही तो पर्यंत आपण त्यांच्याकडुन लाड करुन घेतोच, आपली गुपिते, शाळेतली मज्जा सगळं शेअर करत असतो, त्यांच्यावर एक प्रकारचा हक्क गाजवत असतो.

माझ्यासाठी अशी एक मावशी होती जी माझ्या काकुची सावत्र बहीण होती पण मी तिची खुप लाडकी होते, गणेशोत्सव असला की काकांकडे सर्व नातेवाईक जमत, मी तीची वाट पाहत असे, मग ती आल्यावर दोन दिवस तिच्याच बरोबर फीरत असे. आताशा तिच्याशी जास्त भेट होत नाही. २ महीन्यांपुर्वी तिच्या २२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत झाला, गावात असल्याने अंतयात्रेसाठी मला घरातल्यांनी "नको येउस , खुप गर्दी असेल , तु आलीयेस असं तिला कळणार ही नाही" असे सांगुन रोखण्याचा प्रयत्न केला पण मी हट्टाने गेलेच, आणि एवढ्या गर्दीत ही भेटायला गेल्यावर ती मला हाका मारुन , माझा हात धरुन रडत होती. त्यावेळेस वाटलं की जर घरच्यांचे ऐकुन गेले नसते तर आयुष्यभर तिच्या नजरेला नजर मिळवु शकले नसते.

तर तुम्हाला अशी कुठली व्यक्ती जवळची वाटायची किंवा अशा नात्यांमधे मुलांच्या कीती जवळ आहात त्या विषयीसाठी एक धागा. काका आणि मावश्या यांच्याबद्द्ल लिहिताना वडीलांचे मित्र, शेजारी तसेच आईच्या मैत्रीणी असु शकतात. आपल्या अश्या सुखद किंवा दुखद सर्व आठवणी शेअर करुया इथे.

समाजविरंगुळा

प्रतिक्रिया

जातवेद's picture

4 Dec 2015 - 6:56 pm | जातवेद

वाचतोय.