अंधार वेशी वरचे

निनाव's picture
निनाव in जे न देखे रवी...
3 Dec 2015 - 8:04 pm

लिहित गेलो मी
वेचत गेलो
प्रश्न अनेक
अनुत्तरीत
अनेक पाने विखुरलेली
गुरफटलेली… शब्दांत !

लागते कोठे झोप हल्ली
रात्रच रात्र आहे वेशी वर
अंधार ही
आवाज मुके
मोर पंख सुके
रात्रीस जणु कापून डोळ्यात
स्वप्न सारे
भिजले आसवात

वेदना असंख्य
रक्त वाहते
लिहित अविरत
बोरू न थांबे

अंगणात बसलो
जरा विरंगुळा
हिरवे निळे
मोजत तारे
उरले गावात
हातात थोडे
जाणवत होते उजेडात काही
तारे… शब्द …
लागत नव्हते अर्थ काही
भय , व्याकूळ - अबोल काही
कुणास हवे आज काही
वळते वाट वेशी वर
मन स्तंभित
कळे न काही

थांबलो मी
वाटेस शब्द
अनेक प्रश्न अनुत्तरीत
वादळ , वारे …
पाने हवेत जुळवत होती
उतरण्या आधी
अर्थ अनेक
लागत होते हळुच मज ही
अंधाराचे!

कविता माझीसमाज

प्रतिक्रिया

पालीचा खंडोबा १'s picture

4 Dec 2015 - 11:02 am | पालीचा खंडोबा १

झकास